एम.एस.डब्ल्यु. माहिती (MSW Information In Marathi)

Information About MSW In Marathi
असं म्हणतात आपण समाजात राहतो त्याचं काहीतरी देणं लागतो. सामाजिक कार्य, समाजाच्या गरजा जाणून घेऊन निस्वार्थी मनाने समाजसेवा करणारे कित्येकजण आपण बघतो. बऱ्याच जणांना समाजसेवेची आवड असते पण असं म्हणतात जोवर आपण आपल्या कुटुंबाचे पोट भरून थोडी शिल्लक ठेवत नाही तोवर समाजसेवा आणि राजकारणात पडू नये. परंतु जर समाज सेवेसोबत अर्थार्जन होत असेल तर हा सुवर्णमध्य ठरू शकतो. एम.एस.डब्ल्यु. हा असाच एक कोर्स आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना समाजातील समस्यांचे निवारण करण्यासाठी भविष्यातील रोजगारासाठी तयार करतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

• एम.एस.डब्ल्यु.चा फुल फॉर्म काय? (What is the full form of MSW?)
:- एम.एस.डब्ल्यु. म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क. (Master of Social Work). यालाच सोशल वेलफेअर पोस्ट ग्रॅज्युएट म्हणून देखील ओळखतात.

• एम.एस.डब्ल्यु.ला प्रवेश मिळण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी?
:- जर तुम्ही या कोर्ससाठी प्रवेश मिळवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला खालील अटी पूर्ण कराव्या लागतात.
१. यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून कोणत्याही विषयात डिप्लोमा मिळवलेला असावा. B.com, B.sc, B.A. अशी कोणत्याही शाखेतून मिळवलेली पदवी असावी लागते.

२. खुल्या गटासाठी पदवी परीक्षेत कमीतकमी ४५% गुण तर राखीव वर्गासाठी कमीतकमी ४०% गुण असावे लागतात. अर्थात महाविद्यालयानुसार यात बदल होऊ शकतात.

३. MSW ला प्रवेश मिळवण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते. फक्त तुमच्याकडे पदवी पर्यंतचे शिक्षण असणे गरजेचे आहे.

• MSW साठी प्रवेश प्रक्रिया काय असते? (Admission Process of MSW)
:- हा कोर्स तुम्ही पूर्णवेळ किंवा डिस्टंस मधून पूर्ण करू शकता. जर तुम्ही पूर्णवेळ पर्याय निवडला असेल तर तुम्हाला कॉलेजला जावे लागते तर डिस्टंस एज्युकेशन मधून तुम्ही तुमचा पार्ट टाईम जॉब किंवा काम सांभाळून घरूनच अभ्यास करू शकता. जर तुम्हाला महाविद्यालयातून प्रवेश घ्यायचा असेल तर खालील पर्यायांपैकी कोणत्याही पर्यायाने तुम्हाला तो मिळू शकतो.

१. गुणवत्ता यादी नुसार प्रवेश:- यासाठी तुम्हाला कॉलेजच्या अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरावा लागतो. त्यात लागणारी कागदपत्रे, फॉर्म फी भरावी लागते. एकदा तुम्ही तुमचा फॉर्म यात सबमिट केला की वेळोवेळी त्या कॉलेजची गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट तपासत रहा. या यादीत तुमचे नाव आले तर पुढची प्रक्रिया करून कोर्स फी जमा केली की तुमचा प्रवेश निश्चित होतो.

२. प्रवेश परीक्षा:- काही कॉलेजेस या कोर्स मध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात. यासाठी तुम्हाला कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागतो. जी कागदपत्र लागणार असतील ती आणि अर्जाची प्रत अपलोड केल्यावर आणि परीक्षा शुल्क भरल्यावर काही दिवसात हॉल तिकीट उपलब्ध होते. ते डाऊनलोड करून परीक्षेच्या दिवशी परीक्षा देणे आवश्यक असते. ही परीक्षा दिल्यानंतर याच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर कोर्स साठी प्रवेशाची सुरुवात होते. या काळात प्रवेश फी भरून प्रवेश निश्चित करणे गरजेचे असते.

३. थेट प्रवेश:- काही कॉलेजेस या कोर्स साठी थेट प्रवेश स्वीकारतात. यासाठी कोणत्याही प्रवेश परीक्षेची गरज नसते त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची देखील गरज नसते. थेट महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रे आणि फी जमा करून आपला प्रवेश निश्चित करता येतो.

• प्रवेश परीक्षा देऊन MSW साठी प्रवेश घ्यायचा असल्यास कोणत्या प्रवेश परीक्षा असतात?
:- जर तुम्ही प्रवेश परीक्षा देऊन तुमचा प्रवेश निश्चित करणार असाल तर खाली काही प्रवेश परीक्षांची माहिती दिली आहे ती तुम्हाला उपयोगी पडू शकते.

१. BHU PET:- बनारस हिंदू विद्यापीठ विविध पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BHU PET विविध प्रवेश परीक्षा आयोजित करते. यात १६० मिनिटांचा कालावधी असतो. पदवीच्या अंतिम वर्षी असताना देखील तुम्ही ही परीक्षा देऊ शकता.

२. TISS NET:- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस TISS NET परीक्षांचे आयोजन करते. या परीक्षेत १ तास ४० मिनिटांचा कालावधी दिला जातो. या वेळात तुम्हाला १०० वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच ऑब्जेटीव्ह प्रश्न सोडवायचे असतात.

३. DUET:- "दिल्ली युनिव्हर्सिटी एंट्ररन्स टेस्ट" चे किंवा DUET चे व्यवस्थापन राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा म्हणून करते. दिल्ली मधील कोणत्याही महाविद्यालय प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.

४. AMU:- अलीगढ मुस्लिम विद्यापीठ या परीक्षांचे आयोजन करते. यात वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच ऑब्जेटीव्ह प्रश्न सोडवायचे असतात.

५. क्राइस्ट युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा:- क्राइस्ट युनिव्हर्सिटी कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थांना क्राइस्ट युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

• MSW साठी फी किती लागते? (What is the admission fees for MSW)
:- या कोर्सची फी तुम्ही कोणते महाविद्यालय निवडता त्यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे तुम्ही पूर्णवेळ किंवा डिस्टंस असा कोणता पर्याय निवडला आहे त्यानुसार फीच्या रकमेत बदल होतात. सरकारी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात ही फी कमी असते तर खाजगी महाविद्यालयात जास्त असते.

जर मुक्त विद्यापीठातून समान अभ्यासक्रम घेतला तर फीची रक्कम बारा हजार रुपये ते छत्तीस हजार रुपये या दरम्यान असू शकते. ठराविक कोर्स मध्ये ही फी दहा हजार रुपये ते दोन लाख रुपये अशी असू शकते.

• MSW मध्ये कोणते विषय असतात? (Subjects for MSW)
:- MSW अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयांपैकी सामाजिक कार्य, मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानवी हक्क आणि सामाजिक विकास हे विशिष्ट विषय आहेत.

दोन वर्षाच्या या कोर्स मध्ये चार सेमीस्टर असतात. चार सेमीस्टर परीक्षा देऊन MSW ही पदवी मिळवता येते. या संपूर्ण कोर्स दरम्यान विद्यार्थांना विविध विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते. ज्यात नेतृत्व, प्रशासन प्रक्रिया, गुन्हेगारी, महिला व बालविकास, मानव संसाधन व्यवस्थापन, वैद्यकीय आणि सामाजिक विकास इत्यादींचा समावेश असतो.

• भारतातील काही खास MSW विद्यापीठे (Top universities for MSW in India)
:- भारतात अनेक खाजगी, मुक्त आणि सार्वजनिक विद्यापीठे आहेत जी MSW मध्ये पदवी मिळवण्यासाठी चांगली आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे:-

• मेदिनीपूर विद्यापीठ, विद्यासागर - पश्चिम बंगाल
• इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
• नेताजी सुभाष विद्यापीठ
• महात्मा गांधी विद्यापीठ - केरळ, कोट्टायम
• वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ - राजस्थान, कोटा
• देवी अहिल्या विद्यापीठ - मध्य प्रदेश, इंदौर
• केंद्रीय विद्यापीठ - कर्नाटक, गुलबर्गा
• महात्मा गांधी काशी विद्यापीठ- उत्तर प्रदेश, वाराणसी
• महाराजा सयाजीराव विद्यापीठ - गुजरात, बडोदा

• MSW कोर्स झाल्यानंतर काय? (What after MSW course?)
:- जर तुम्हाला समाज सेवेची आवड असेल आणि तुम्ही हा कोर्स पूर्ण केला तर पुढे काय असा प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊया या कोर्स नंतर तुम्हाला काय करता येते? हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्ही सरकारी, व्यवसाय क्षेत्र किंवा ना नफा संस्थांमध्ये काम करू शकता. याशिवाय जर तुम्हाला यात अजून उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही पी.एचडी. किंवा एम.फील. करू शकता. जर तुम्ही नोकरी करणार असाल तर तुम्हाला कोणत्या पदांसाठी काम मिळू शकते याची यादी खाली दिली आहे.

• आरोग्यसेवेतील सामाजिक कार्यकर्ता
• प्रकल्प व्यवस्थापक
• व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता
• व्याख्याता किंवा प्राध्यापक
• सल्लागार
• समुदाय आरोग्य सहाय्यक
• सल्लागार
• प्रकल्प समन्वयक

• MSW झाल्यानंतर पगार किती मिळतो? (Salary for MSW)
:- तुमचा पगार हा तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्र, संस्था आणि तुमच्या अनुभवावर अवलंबून असतो. तरीही जे उमेदवार MSW पूर्ण करून नोकरी करतात त्यांना मासिक पंधरा हजार ते तीस हजार यादरम्यान पगार असतो. अनुभव वाढल्यानंतर पगार वाढत जातो.

🎭 Series Post

View all