लेखिका मृणाल मोहिते : शिक्षणातून लेखनकलेत समृद्धी

ईरा : शब्दांची तेजस्वी फुले


 लेखिका मृणाल मोहिते : शिक्षणातून लेखनकलेत  समृद्धी

??????

जीवनात अनेक
प्रवाहातून जावे लागते त्यापैकी शैक्षणिक प्रवाह हा महत्वाचा असतो.अनेक मानसिक चढउतार घडत असतात.आपली गुणवत्ता टिकवून ठेवणे हे खरे कसब लागते .जीवनातील निश्चित ध्येयाचे संकेत या टप्यात मिळत असतात.या शैक्षणिक साधनेत आपले छंद जोपासने ही एक कला आहे.या कलात्मक उपासनेला मनांमनातून जपून आनंद प्राप्त करणे थोड्या जणांना जमते अशाच शिक्षणात रमलेल्या व लेखणीला आदर्श मानलेल्या लेखिका आदरणीय मृणाल मॕडम ....!!

आपल्या शिक्षणातून वेळ काढून लेखण बहारदार करणाऱ्या , या माध्यमातून नवे हितसंबंध जपणा-या , मुद्देसुद बोलणे , सात्विक सहकार्य , गोड स्वभाव , सर्वांना आनंद देण्याची वृत्ती , अशा अनेक गुणांनी परिपूर्ण लेखिका आदरणीय मृणाल मॕडम ..!! ईरावरील अनेक स्पर्धेत त्यांचा सहभाग प्रेरणादायक असतो.ईरावर त्या लेखन करतातच पण चॕम्पियन ट्राॕफी व राज्यस्तरीय करंडक स्पर्धेत त्यांची खरी ओळख झाली.राज्यस्तरीय स्पर्धेत एक उत्तम लघूकथा लिहून आपली प्रतिभा स्पष्ट केली पण खरे कौशल्य त्यांचे vlog बनवताना समजले. यासाठी त्या खास पन्हाळगडावर आल्या स्वतः पुढाकार घेऊन vlogची माहिती दिली , सुंदर चित्रीकरण केले परिणामतः आमच्या संघाच्या vlog ला उत्कृष्ट vlog चा पुरस्कारही मिळाला याबद्दल सगळ्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत पण यातून मृणालजी यांची उत्तम निरिक्षणशक्ती व सहकार्यवृत्ती दिसून आली.या स्पर्धेत सांघीक भावना टिकवून ठेवल्याने व सर्वांच्या सहयोगाने कोल्हापूर संघाला उपविजेतेपद मिळाले हे अभिमानास्पद आहे यात मृणालजी यांचे योगदान महत्वाचे आहे.

अशा या कार्यतत्पर , अभ्यासू व उत्साही लेखिकेला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ..!! येणारे क्षण आनंदी , सुखाचे यावेत , आपले लेखन समृद्ध व्हावे आपण शिक्षणातून प्रगती करावी. निरोगी व आरोग्यदायी आयुष्य लाभावे हीच वाढदिवसानिमित्त मनोकामना ..!!

?????

? वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!!

               ©®नामदेवपाटील