Login

मृगजळ... भाग 28... अंतिम

संदीप स्वतः एअरपोर्टवर गेला होता रेवाला घ्यायला, रेवा आली विभा आली होती तिच्या सोबत, त्या दिवशी संध्याकाळी खूप मोठी पार्टी अरेंज केली होती, सुरेखा ताई इतर सगळेच पाहुणे होते पार्टीत, मिनाक्षी पण बरी झाली होती तरीसुद्धा तिची काळजी घेण्यासाठी रणजीत हजर होता,


मृगजळ... भाग 28... अंतिम

©️®️शिल्पा सुतार
..............

विभा रणजित पोलिस स्टेशनला पोहोचले, सीमा प्रिया बाकावर बसल्या होत्या,

" रोहन आत मध्ये असेल बहुतेक तो दिसत नाही" ,.... विभा

ते दोघ समोर खुर्ची वर बसले, विभा प्रिया कडे बघत होती प्रियाने तिच्याकडे दुर्लक्ष केल, विभाला वाटत होत उठून बोलव प्रियाशी... पण ती उठली नाही, रोहन इंस्पेक्टर सावंत आतुन बाहेर आले, विभा रणजित रोहनशी बोलायला गेले, तो सरळ प्रिया जवळ आला, बाकावर बसला,

"या दोघांना आपला राग आला आहे वाटत ",... रणजित

"हो येणारच, जावू दे आता जे होईल ते, मी हे काम झाल्यावर जाणार आहे माझ्या फ्लॅट मध्ये वापस",... विभा

विभा रणजितला आतल्या ऑफिस मध्ये बोलवलं... दोघ आत जावून बसले...

"तुमच काय म्हणण आहे? , कोणत्या बेसिस वर तुम्ही प्रिया मॅडम वर केस केली? ",.... इंस्पेक्टर

"प्रिया बाहेर बसली आहे, तीला अटक झाली नाही अजून, का ते समजेल का? ",... विभा

" प्रिया मॅडम आमच्या ताब्यात आहे, पुढचा काही तपास लागे पर्यंत त्या पोलिस स्टेशनच्या बाहेर जावू शकत नाही, आतल्या लोकांसोबत कश्या बसतील त्या मॅडम ",... इंस्पेक्टर

विभाला माहिती होत काहीही झाली नसेल प्रियाची चौकशी, व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असेल तिला, त्याचा तिला राग येत होता

" तुम्हाला प्रिया मॅडम वरची कंप्लेंट मागे घ्यायची की अजून चौकशी व्हावी अस वाटतय? ",... इंस्पेक्टर

" किडनॅपर सापडले का? ",.. विभा

"नाही अजून सुरू आहे चौकशी, तुम्ही कोणत्या पुराव्या निशी प्रिया मॅडम वर कंप्लेंट केली? काही आहे का तुमच्या कडे?, तसा तपास करतो मी, रणजित बोल काही तरी ",... इंस्पेक्टर

" नाही.. काही नाही माझ्या कडे, मला फक्त वाटल अस की प्रिया असेल त्या मागे ",.. विभा

"अस कस वाटल तुम्हाला? तुमचा ही आणि आमचा ही वेळ फुकट घालवला मॅडम तुम्ही? अस कोणी भडकवल तेव्हा तुम्हाला? , तुम्ही त्यांचं का ऐकल?",... इंस्पेक्टर सावंत रणजीत कडे रागाने बघत होते

रणजीत तसा घाबरला.... तो खूप गप्प बसलेला होता

" काय करायचं आहे आता पुढे या केसच? ",.. इंस्पेक्टर

"मागे घ्यायची आहे कंप्लेंट मला",... विभा

" तुम्हाला त्या मॅडमची माफी मागावी लागेल आणि कागदावर लिहून द्यावे लागेल",... इंस्पेक्टर

हो चालेल....

इन्स्पेक्टर सावंत यांनी रोहन आणि प्रियाला आत बोलवलं, सीमा ही आत आली, विभाने उठुन प्रिया आणि रोहनची माफी मागितली...." मला माफ कर प्रिया.. रोहन, मी उगाचच प्रियावर कंम्प्लेंट केली, माझ्याकडे काहीही पुरावा नव्हता, फक्त रेवा किडनॅप झाली म्हणून मी इमोशनल झाली होती",.. ती प्रिया कडे बघत होती

"अगं पण मग तू इमोशनल झाली म्हणजे मग तू माझं नाव घेणार का आरोपी म्हणून? म्हणजे काहीही झालं की मी सोपी वाटते का तुला आरोप करायला?, मला अजिबात आवडल नाही हे , तू मला असं किती ओळखतेस विभा? मी काय काय केल आहे या घरासाठी रेवासाठी हे तुला काय माहिती ग? तू तिला सोडून निघून गेलीस, रेवाने त्याचा सगळा राग आमच्यावर काढला, खूप चुकीच केल आहेस तू हे, मला यापुढे तुझ्याशी कुठलेही संबंध ठेवायला आवडणार नाही",.... रागाने प्रिया बाहेर निघून गेली, तिच्या मागे सीमा गेली,

रूम मध्ये रोहन विभा रणजीत आणि इन्स्पेक्टर साहेब होते,...." रणजीत हे असं काम करतोस का तु? का बर भडकलं तू विभा मॅडमला एवढं? ",

" हो ना आता किती गैरसमज झाले या दोघींमध्ये, विभा तुलाही समजायला हवं होतं की प्रिया असं करेल का?",... रोहन

" पण प्रियाने हे केलं नाही मग कोणी केलं आहे?",.. विभा

"सुरू आहे त्याची चौकशी तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्ही प्रिया मॅडम वरची केस मागे घेतली ना मग या पेपरवर सही करा आणि घरी जा ",... इंस्पेक्टर

विभाने पेपर वर सही केली, ती निघाली तसा रणजित ही तिच्या मागे निघाला, रणजीत एक मिनिट तुला जाता येणार नाही, तुला थोड्या वेळ पोलीस स्टेशन मध्ये रहावे लागेल,

रणजीत खूप घाबरला होता,.." काय झाले इन्स्पेक्टर साहेब? मी काय केलं आहे आता?

"याला का बरं राहू देता ? तिथे त्याने काहीही केलेलं नाही? ",... विभा

" असू दे पण त्याच्या कडुन काहीतरी माहिती लागणार आहे आम्हाला ",... इंस्पेक्टर

" रणजीत तू तिथे बाहेर जाऊन बस, पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या बाहेर जाऊ नकोस",... रोहन

"ठीक आहे",... रणजीत बाहेर जाऊन बाकावर बसला, विभा बाहेर आली,

" वहिनी बघ ना मला का सोडत नाहीत हे लोक",... रणजित

" करायची असेल काही चौकशी रणजित, don\"t worry, कर नाही त्याला डर कशाला ",... विभा

बाहेर प्रिया आणि सीमा उभ्या होत्या, विभा तिथून गेली, प्रियाने तिच्याकडे बघितलं नाही,

रोहन बाहेर आला,... "प्रिया आता राग सोड आणि तू घरी जा, सीमा तू हि घरी जा ",..

" पण माझी चौकशी झाली नाही काहीही",... सीमा

" तुझी चौकशी करायची गरज नाही, जर काही वाटलं तर मी बोलवून घेईन तुला",... रोहन

"ठीक आहे सर मग मी निघते",... सीमा

"थांब सीमा गाडीने सोडून देईन मी तुला घरी",.. प्रिया

सीमा गाडीजवळ जावून उभी राहिली

" मी निघते आहे रोहन घरी जायला",.. प्रिया रागात होती

" प्रिया एक मिनिट इकडे ये, हे बघ असा मनात राग धरू नको, मला माहिती आहे विभा एकदम चुकली आहे, तिने असं नव्हतं करायला पाहिजे, बोलणार आहे मी तिच्याशी थोड ",... रोहन

" म्हणजे तुमच्या घरात वाईट काही झालं तर ते मीच केलं असं आहे का?, किती केल मी रेवाच, तिचा राग सहन केला कायम, शेवटी मी रेवाची सावत्र आई हेच सिद्ध केल विभाने, मी आपल्या घरी जात नाही आहे रोहन, मी माझ्या आईकडे जाते आहे, विभा तिच्या घरी वापस गेली कि मी घरी येईल, मला तिच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत आणि तिला जर रेवाला तिच्या घरी घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ दे, सांभाळू दे थोडे दिवस तिला तिच्या मुलीला",.. प्रिया

" तू नको जाऊ ना आईकडे, मी कसा राहू तुझ्याशिवाय, प्लीज ",.. रोहन

" तू पण ये ना मग संध्याकाळी तुझं काम झाल्यावर आईकडे, नाहीतर तू तुझ्या घरी गेला तरी चालेल माझी काही हरकत नाही, पण मी तिथे विभा असेपर्यंत येणार नाही",... प्रिया

" हे बघ प्रिया असा विचार करू नको , तू आपल्याच घरी जा, आई कालपासून एकटी आहे, वाटलं तर तू विभाशी बोलू नको, मला माहिती आहे विभा चुकली आहे, आता तुझ्या आधाराची सगळ्यांनाच गरज आहे, बघते आहेस ना काय काय होतं आहे आजूबाजूला, नको जाऊस माहेरी, हे सगळं झालं की नंतर जा आपण दोघे जाऊ",.. रोहन

"ठीक आहे मग मी घरी जाते आहे आपल्या , घरी जाऊन औषध वगैरे देते आईंना, कालपासून त्यांनी औषध घेतले आहे की नाही ते बघते",.. प्रिया घरी गेली, रोहनला जरा बरं वाटत होतं, काय काय सुरू आहे दोन चार दिवसापासून काय माहिती?
........

इन्स्पेक्टर सावंत आत गेले, त्यांनी मनीषला फोन करायला सांगितला

"ताई तुला इथे येता येईल का आत्ता? ते लोक रेवाला सोडण्यासाठी भरपूर पैसे द्यायला तयार आहेत, मी केला होता फोन",... मनीष

"आपण सांगितल तेवढे पैसे देणार आहेत का ते?",.... मीनाक्षी

हो....

" ठीक आहे मग मी सांगते तिथे पैसे आणून द्या",... मीनाक्षी

" नाही तू स्वतः ये ताई, ते असे कुठेही एवढे पैसे ठेवणार नाही",... मनिष

"मी पैसे घ्यायला येणार नाही, मला पोलिसांनी पकडल तर? त्यापेक्षा तु जा मनीष पैसे घ्यायला",.... मीनाक्षी

" ठीक आहे, मी बघतो विचारून त्यांना",... मनिष

दहा मिनिटांनी मनीषने परत फोन केला की...." ते असे कुठेही पैसे ठेवायला नाही म्हणतात आहे, जर व्यवस्थित पैसे घ्यायचे असेल तर या, नाहीतर ते पोलीस कम्प्लेंट करतील, असं ते सांगत आहेत, तुला माहिती आहे मोठी माणसं ती पोलिस त्यांच्या बाजूने असतात, आपला प्लॅन फ्लॉप होईल अश्याने",..

मीनाक्षी विचार करत होती काय करता येईल.... पैसे तर खरच लागता आहेत आपल्याला, काय करू?

" मी एक ठिकाण सांगते, तिथे येते मी पैसे घ्यायला ",... मीनाक्षी

" चालेल.. ठीक आहे ",... मनीष

" मग पैसे आले की सांगा ",... मीनाक्षी

" हो पैसे येणारच आहेत एका तासात ",... मनीष

मीनाक्षीने एक ठिकाण सांगितलं, तिथे या तुम्ही पैसे घेऊन, ठरल्याप्रमाणे मनीष, पोलिस, रोहन, राकेश, सगळे तिकडे गेले

सगळे लपून बसले होते, ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधी रोहन पुढे जाणार बॅग घेऊन असं ठरलं

वेळ झाली, रोहन बॅग घेऊन पुढे गेला, दहा मिनिटं झाले पंधरा मिनिटं झाले कोणी आलं नाही,

मनीषच्या फोनवर फोन आला, मीनाक्षी बोलत होती ... "मला तिथे जायला धोका वाटतो आहे, त्यांना ते पैसे बाकावर ठेवून निघून जायला सांग",..

ठीक आहे बोलून बघतो.... इंस्पेक्टर सावंत यांनी मानेने नाही म्हंटले

"नाही ते असे ऐकत नाहीत, असे एवढे पैसे बाकावर ठेवू शकत नाही अस म्हंटले ते, तु जर आता आली नाही तर ते साहेब पैसे घेऊन परत निघून जातील",... मनिष

थोडे पैसे नव्हते ते साठ लाख होते, त्यासाठी कोणी काहीही करायला तयार होत, ठीक आहे मी येते दहा मिनिटांनी

एक गाडी थांबली जरा वेळ गाडीतुन कोणीही उतरलं नाही नंतर एक मनुष्य गाडीतून उतरला, तो ती बॅग ठेवली होती तिथे गेला आणि सगळ्या बाजूने त्या गाडीतल्या ड्रायव्हर लाही आणि मीनाक्षी लाही पोलिसांनी धरल, तिच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला केला, मनीषने तिला ओळखल,... मीनाक्षीला अटक झाली

ती गाडीतून उतरायला तयार नव्हती, तिथेच बसून ती पोलिसांशी वाद घालत होती, तुम्ही आधी खाली उतरा दोन-तीनदा पोलिसांनी सांगितलं तरीही मीनाक्षी काही गाडीतुन खाली यायला तयार नव्हती, रोहन तिथे पळत गेला, रोहनला बघून मिनाक्षी दचकली

"मीनाक्षी तू हे सगळं का केलं? रणजीतला माहिती आहे का तुझे हे उद्योग? की तोही तुझ्यात सामील आहे",... रोहन

"नाही... रणजीत नाही आहे माझ्याच सामील, हे काम मी माझ्यासाठीच करत होती",.. मीनाक्षी

"का केल अस तू सांग?",.. रोहन

"रेवाला किंवा तुम्हाला कोणाला मला धोका पोचवायचा नव्हता फक्त मला माझ्या जीवन जगण्यासाठी पैसे नव्हते म्हणून मी हा प्लॅन रचला, रणजितशी लग्न करून काय मिळाल मला? तुमच्या आईने सगळी संपत्ती तुम्हाला दिली रणजित कडे काही नव्हत",... मीनाक्षी

" अस काही नाही ग मीनाक्षी, कोणी सांगितल तुला हे सगळ? आम्हाला सगळं समसमान वाटलं होतं, रणजीतला ते सांभाळता आलं नाही, त्याचा राग तू माझ्या मुलीवर का काढला? आज काही करता काही झालं असतं आमच्या रेवाला तर? आम्ही काय करणार होतो? तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या फॅमिली कडी बघायची? ",... रोहन

" मला रणजितने सांगितल त्याच्या वर खूप अन्याय झाला ते, तुम्ही लोकांनी त्याला घराबाहेर काढल, कमी पैसे टेंशन मुळे तो असा झाला ",... मीनाक्षी

" नाही मीनाक्षी तू कोणाला ही विचार अस काही नाही, उलट रणजित ने कधीच कुठली जबाबदारी उचलली नाही, होत नव्हत एक केल तुमचा ही घटस्फोट झाला, तुला पैसे लागत होते तर एकदा मला सांगून तर बघायचं होतं मी मदत केली असती तुला ",... रोहन

" मी कित्येक वेळा रणजीतला सांगितले की तुम्ही रोहन भाऊंची मदत घ्या, तुम्ही तेव्हा यांना काम दिल नाही हाकलून लावलं, त्यावेळी आम्हाला मदत केली नाही आणि आता असे बोलत आहात",... मीनाक्षी

" बऱ्याच वेळा रणजीत पैसे घेऊन गेला आमच्या घरातुन, आम्ही मदत केली त्याला नाही असं नाही, पण तो सगळे पैसे उडवत होता, व्यवस्थित वागत नव्हता, म्हणून पुढे पुढे आम्ही त्याला मदत करण बंद केलं, पण तू असा गुन्हेगारी मार्ग निवडण्याचे आधी एकदा विचार करायला पाहिजे होता, अजून कोण सामील आहे तुझ्यासोबत या कटा मध्ये आत्ताच पूर्ण सांग",... रोहन

" कोणी नाही ही माझी आयडिया होती की रेवाला किडनॅप करायचा आणि भरपूर पैसे घ्यायचे त्यानंतर आनंदाने राहत आल असत त्यामुळे मी माझा हा चुलत भाऊ मनीषाला हाताशी धरलं, तो पहिल्यापासून छोटे मोठे गुन्हे करत होता",... मीनाक्षी

" नोकरी करण्याच्या ऐवजी, काही काम करण्याच्या ऐवजी तू चुकीचा मार्ग का निवडलास? मी आधीपासून ओळखतो मीनाक्षी तुला तू खूप चांगली आहेस मग का अस केल ते सांग? ",... रोहन

मीनाक्षी काही बोलली नाही...

" अटक करा यांना ",... इंस्पेक्टर

" चला मॅडम खाली उतरा तुमच्या गाडीतून.. पोलिस व्हॅन मध्ये बसा ",.. पोलिस

मीनाक्षी उतरली नाही...

" ऐकायला येत नाही का मॅडम तुम्हाला? खाली उतरा",..

लेडीज पोलीसांनी मीनाक्षीला हाताने धरून खाली उतरवलं, तशी मीनाक्षी एकदम पडली, तिला नीट उभा सुद्धा राहता येत नव्हतं, तिचा ड्रायव्हर पुढे आला, या बाई अपंग आहेत, त्यांना चालता येत नाही, एक पाय काम करत नाही त्यांच्या, अ‍ॅक्सीडेंट झाला आहे त्यांचा, त्यात पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आला होता त्यांना, त्याने डिकीतून खुर्ची काढली, दोन-तीन पोलिसांच्या मदतीने मीनाक्षी व्हिलचेअरवर बसली, रोहन तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहीला, त्याच्या डोळ्यात पाणी होत,

मीनाक्षी काय ग हे....

मीनाक्षी रडत होती,.... काय सांगू माझी कर्मकहाणी तुम्हाला

"कस काय झाल हे?, रणजीतशी नुकतच लग्न झालं होतं तेव्हा केवढी सुंदर होती ही मीनाक्षी, आता काय झालं हे?",...

"रणजितशी डिवोर्स झाल्या नंतर, मी आई सोबत रहात होते, माझा जॉब नीट सुरु होता , एक दिवस ऑफिसला जातांना माझा अ‍ॅक्सीडेंट झाला, माझा पायाला खूप लागलं, त्यातच पॅरालेसीस चा अॅटेक आला मला, जीवन अगदी असह्य होऊन गेलं, ट्रीटमेंटसाठी ऑपरेशन साठी खूप पैसे लागणार होते, काय करावं काही सुचत नव्हतं, आईने घर विकलं, छोटीशी खोली ती किती पैसे मिळणार, विशेष फायदा झाला नाही, डॉक्टरांनी फॉरेनला ट्रीटमेंट घ्यायला सांगितली, मग माझ्या मनात आलं की तुमच्याकडून पैसे मिळू शकतात, म्हणून मी हा प्लान केला",... मीनाक्षी

" अगं तू मला असंच जरी बोलली असती ना मिनाक्षी तरी मी तुझी पूर्ण ट्रीटमेंट केली असती",.. रोहन

" मला वाटल तुम्ही मला पैसे देणार नाही, रणजीतने आधीपासून सांगितल्याप्रमाणे माझ्या मनात हाच आग्रह होता की तुम्ही मला मदत करणार नाही, मला वाटलं की मी रेवाला किडनॅप करेल आणि थोडे पैसे घेईल, यात मला रेवाला कुठलीही हानी पोचवायची नव्हती, फक्त आणि फक्त माझा आजारपण नीट करणे हाच माझा उद्देश होता माझा, तुम्ही विचारू शकता मनीषला मी त्याला वारंवार सांगितलं होतं की रेवाला काही होता कामा नये",... मीनाक्षी

" आता तू काळजी करू नको मिनाक्षी आपण तुझ्या ट्रीटमेंटचा बघू, मी आहे ",.... रोहन

" पण आधी तुम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनला यावे लागेल",.. इंस्पेक्टर

हो चालेल...

सगळे पोलिस स्टेशनला आले, रणजीत बाकावर बसलेला होता, मीनाक्षीला बघून तो दचकला, अशी खुर्चीवर का बसली आहेस तू मीनाक्षी? तुला इथे का आणल? तू गुन्हेगार आहेस का?

मीनाक्षी रणजीतला बघून रडत होती, तोही खूप भारावून गेला होता, तुझा एक्सीडेंट झाला आहे का मीनाक्षी? काय झालं आहे तूला? बोल काही तरी?...

रोहनने रणजीतला सगळं काय काय झालं ते पूर्ण सांगितलं, अजिबात काळजी करू नका रणजीत मीनाक्षी आपण मीनाक्षीची पूर्ण ट्रीटमेंट करू, इन्स्पेक्टर साहेब मला ही केस मागे घ्यायची आहे

" चालेल आपण तसे पेपर तयार करून घेऊ",... इंस्पेक्टर

रोहनने मीनाक्षी मनीष आणि इतर मुलांवरची केस मागे घेतली सगळे घरी आले..

हॉल मध्ये सगळे बसलेले होते बसलेले होते, मीनाक्षीला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं, रेवा विभा येऊन मीनाक्षीला भेटले, प्रियाची ओळख करून दिली, मीनाक्षी रडत होती, तिने सगळ्यांचे माफी मागितली

दुसऱ्या दिवशी संदीप आणि सुरेखा ताई त्यांच्या घरी गेले, विभाग तिच्या फ्लॅटवर निघून गेली, तिथून ती दुसर्‍या दिवशी फाॅरेनला निघून गेली, रेवा परत एकटी पडली, पण आता ती खूप समजूतदार झाली होती,

मीनाक्षीला चांगल्या डॉक्टर कडे ॲडमिट केलं, आता तिची व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू झाली होती, संदीप रेवाचा व्यवस्थित कॉलेज सुरू झालं, दोघं अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देत होते,

संदीप रेवा ग्रॅज्युएट झाले,...

विभा भारतात परत आली रेवाला भेटायला,.. "मला असं वाटत आहे रोहन की रेवाला पुढच्या शिक्षणासाठी परदेशात घेऊन जाते मी",

जड अंतकरणाने रोहनने परवानगी दिली..

आज दोन वर्षांनी रेवा परत भारतात येणार होती , ती पोस्ट ग्रॅज्युएट झाली होती, तिकडे संदीप हि पोस्ट ग्रॅज्युएट झाला होता , तो रोहनच्या कंपनीत जॉईन झाला होता, राकेश मनीष सगळेच तिकडे कामाला होते, आता या सगळ्यांचा बॉस संदीप होता

संदीप स्वतः एअरपोर्टवर गेला होता रेवाला घ्यायला, रेवा आली विभा आली होती तिच्या सोबत, त्या दिवशी संध्याकाळी खूप मोठी पार्टी अरेंज केली होती, सुरेखा ताई इतर सगळेच पाहुणे होते पार्टीत, मिनाक्षी पण बरी झाली होती तरीसुद्धा तिची काळजी घेण्यासाठी रणजीत हजर होता,

रणजीत मध्ये विशेष सुधारणा नव्हती पण मीनाक्षी साठी तो व्यवस्थित वागत होता

प्रिया रूम मध्ये तयार होत होती, रोहन आवाज देत होता ,... "चला मॅडम झाल का आवरून? खाली पाहुणे आले आहेत",

हो झालच...

रोहन प्रियाने मिळून रेवा आणि संदीपच लग्न ठरल्याची अनाउन्समेंट केली

दोघांसाठीही सरप्राईज होतं, खुप आनंद झाला होता त्यांना, सुरेखा ताईंच्या डोळ्यात पाणी होतं, त्या रोहन जवळ आल्या.... तुम्ही माझ्या मुलाला ज्याप्रकारे सांभाळला आहे त्याचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही, आज तुमच्या मुळेच आम्हाला चांगले दिवस आले आहेत, संदीप राकेश यांना तुम्ही नवजीवन दिले,

"मी काही केलंच नाहीये ताई, मुलच मेहनती आहेत" ,... रोहन

रेवा संदीप खूप खुशीत होते, पुढच्या आठवड्यात साखरपुडा होता त्यांचा, त्या नंतर लग्न होत

दोघ पूल साईडला बोलायला आले, एकांत शोधत होते ते, बर्‍याच दिवसांनी ते भेटले होते

मग खुश ना मॅडम... संदीप ने विचारल... तस रेवाने पुढे होवुन त्याला मिठी मारली.......

........

वाचकांचे खूप खूप खूप आभार, खूप प्रेम दिल तुम्ही....