Login

मृगजळ... भाग 27

विभा विचार करत होती सगळेच बोलत आहे प्रिया चांगली आहे, मी उगाच त्या रणाजितच्या बोलण्यात आली, बघू आता काय होत आहे पुढे पोलीस स्टेशनला जाऊन...



मृगजळ... भाग 27

©️®️शिल्पा सुतार
..............

इन्स्पेक्टर साहेब आत जात होते, बॉसच्या चौकशी साठी

" मी पण येऊ का आत मध्ये? मला ही बघायचा आहे कोण आहे बॉस",... रोहन

"हो चला ना रोहन साहेब",.. इंस्पेक्टर

सगळे आत गेले...

रोहन आत गेला, बॉस समोर खाली मान घालून बसला होता,

"ह्यांना बोलायच आहे तुझ्याशी",... इंस्पेक्टर

रोहनने समोर बघीतला आणि तो दचकलाच...

"तुम्ही ओळखता का यांना रोहन साहेब? ",... इंस्पेक्टर

" हो मी ओळखतो... हा मनीष ",.. रोहन

"कोण मनीष? ",... इंस्पेक्टर

"हा रणजीतचा साला आहे, रणजीतच्या बायकोचा भाऊ",..रोहन

" चला यामागे खरा सूत्रधार कोण आहे ते समजलं आहे आता, रणजितच हे काम दिसतय, त्याने बायकोला आड करून केलेले दिसत",.. इंस्पेक्टर

"नाही रणजितला हे माहिती नाही, त्यांचा काही संबंध नाही ",.. मनीष

" मग कोण आहे तुझ्या सोबत ",... इंस्पेक्टर

" मीनाक्षी ताई,... रणजितची बायको ",... मनीष

" काय? oh my god.... तिचा काय राग आहे आमच्यावर? एवढ आम्ही काय केल आहे तीच?, ती कधीची सोडून गेली रणजितला",... रोहन

"काय प्रॉब्लेम आहे ते तीच तिला माहिती ",... मनीष

" तू सख्खा भाऊ का तिचा?, असे काम करतो का तू? ",... इंस्पेक्टर

"नाही चुलत भाऊ आहे मी तीचा, थोडे वसुलीचे काम करतो मी",... मनीष

" बोलव तिला पोलिस स्टेशनला",... इंस्पेक्टर

" ती येणार नाही बहुतेक ",.. मनिष

का?,..

" मी पण तिला भेटलो नाही कधीच, फक्त फोन वर बोलतो आम्ही, ती कुठे रहाते ते ही माहिती नाही मला, ती अशी सहजासहजी भेटणार नाही, मी ही बराच प्रयत्न केला तिला भेटण्याचा, ती नाही म्हणते ",... मनिष

" काय करू या मग ",... रोहन

इंस्पेक्टर मनीष जवळ आले,... "हे बघ तुझ्या ताईला फोन कर, गोड बोलून पैसे घ्यायला बोलवून घे, सापळा लावू आपण, तिला सांगू नको की तुला आम्ही पकडला आहे, नाहीतर आम्हाला मदत केली नाही तर तुला पैसे ही मिळणार नाही आणि शिक्षाही खूप होईल, आम्हाला मदत केली तर शिक्षा ही कमीत कमी होईल आणि पुढे चांगलं जीवन जगण्यासाठी आम्ही तुला मदत करु",

"हो मी पण मदत करेन",.. रोहनने शब्द दिला

बॉस विचार करत होता.. काय करू? ...

राकेश जवळ येऊन बसला,... "मला असं वाटत आहे बॉस तुम्ही साहेबांना मदत करायला पाहिजे, किती दिवस गुन्हेगारी आयुष्य जगणार आहोत आपण? आणि दुसऱ्याला गुन्ह्यात मदत करत राहणार, यात काही प्रगती नाही खूप धोका आहे, आता चान्स आहे तर सुधारणा करता येईल, आपली चूक झाली आहे, मदत करा त्यांना, आणि रोहन साहेब तयार आहेत मदत करायला आपल्याला ",..

" ठीक आहे मी तुम्हाला सगळ्यांना मदत करायला तयार आहे, मला कमीत कमी शिक्षा झाली पाहिजे ",... मनीष

" ठीक आहे पण तू काम तर सुरू कर आधी ",... इंस्पेक्टर सावंत

मनिषने फोन हातात घेतला.... मीनाक्षीला फोन केला

"कुठे आहेस तू काल पासुन? काय सुरु आहे मनीष? तू असा गायब झाला, मला वाटल पोलिसानी पकडल की काय तुला ?",.. मीनाक्षी

"नाही ग ताई, मी फोन मुद्दाम बंद केला होता, पोलिस मागावर होते",.. मनीष

"रेवा आहे ना ताब्यात तुझ्या, आता काय करू या पुढे ",.. मीनाक्षी

"हो आहे ताई, जरा रिस्क आहे तिला सांभाळण्यात, लवकर पैसे ताब्यात घेवून घे, टेंशन आहे हे ",.. मनीष

" लक्ष्यात ठेव रेवाला काही होता कामा नये, आपल्याला फक्त पैसे हवे आहेत",.. मीनाक्षी

" हो ताई मी घेतो काळजी रेवाची, तू कुठे आहेस तू येतेस का मदतीला? ",.. मनीष

"नाही मी नाही येवू शकत",.. मीनाक्षी

"का पण? तू मला का कधीच भेटत नाही ",.. मनीष

" माझे काही कारण आहेत",... मीनाक्षी

" काय कारण आहेत? सांग ना? काय झालं आहे नक्की? ",... मनीष

"कामाच बोलू या आपण, तू पैशासाठी फोन कर, संपवून टाकू आता हे काम ",.. मीनाक्षी

" ठीक आहे, किती पैसे मागू? ",.. मनीष

50 लाख.. थांब.... ती काहीतरी हिशोब करत होती, 60 लाख...

" ठीक आहे करतो फोन, मग सांगतो तुला",... मनिष

मनीषने फोन ठेवला ,..." पैसे मागायला सांगते ती ",..

"ठीक आहे, अर्धा तासात परत फोन कर, देता आहेत म्हणा ते पैसे, ये घ्यायला",... इंस्पेक्टर साहेबानी त्याचा फोन काढून स्वतः जवळ ठेवला

"ठीक आहे",.. मनीष

इन्स्पेक्टर सावंत आणि रोहन बाहेर आले...

" रोहन साहेब अजुन या बद्दल काहीही तुमच्या घरी किंवा रणजितला सांगू नका, आता हा मनीष म्हणतो आहे कि रणजीत त्यात सामील नाही, पण काही सांगता येत नाही, जर समजा रणजीत यात सामील असला तर तो ही बातमी फोडू शकतो किंवा तो सामील नसेल ही त्याला त्याच्या बायकोचा पुळका आला तर तो देईल सगळं सांगून",... इंस्पेक्टर सावंत

" हो बरोबर बोलता आहात तुम्ही इन्स्पेक्टर साहेब, पण हा रणजित सारखं प्रियाच का नाव घेत होता?, किती त्रास झाला त्या मुळे आम्हाला, प्रियावर त्याने पोलिस कंप्लेंट केली, विभाला भडकवल",... रोहन

" हो ना... ती चौकशी करावी लागेल, तुम्ही रणजितला बोलवून घ्या इकडे",... इंस्पेक्टर

" हो त्याच काय म्हणणं आहे समजवुन घेवू",.. रोहन

" त्याला या बाजूला ठेवून चौकशी करू, त्याला समजू द्यायच नाही की बॉस आपल्या ताब्यात आहे ",.... इंस्पेक्टर

" हो त्याने विभाला भडकवल ",... रोहन

" नंतर विभा मॅडमला हि चौकशी साठी बोलवून घ्या",... इंस्पेक्टर

हो....

सकाळ झाली होती विभाचा फोन आला रोहनच्या फोनवर,.." काय झालं रोहन तिकडे? ",

" काही नाही प्रियाला आणि सीमाला अटक केलेली आहे, अजून वकील साहेब आले नाहीत",.... रोहन

" किडनॅपर कोण आहेत सापडले का? ",... विभा

" प्रिया आहे ना तुझ्या मते, मग का अस विचारते आता? तुझ्या इच्छेनुसार अटक केली ना तिला, आता का काळजी करतेस तू? ",... रोहन नाराज होता विभावर

" तस नाही रोहन मला फक्त संशय होता, मागे ही संशय वरुन रणजितला तू अशी अटक केली होती ना, तेव्हा नाही तुला वाईट वाटल, होईल ना चौकशी, समजेल कोण कस आहे ते ",... विभा

" तिकडे रेवा आणि संदीपची टेस्ट साठी केव्हा आहे? ",... रोहन

" आता येतील जरा वेळात लॅब वाले",.... विभा

"ठीक आहे मग टेस्ट झाली की तुम्ही लोकं घरी जा, संदीप आणि त्याच्या आईलाही घरी घेऊन जा, आणि नंतर तू पोलिस स्टेशनला ये ",... रोहन

"हो ठीक आहे",.. विभा

"रणजित कुठे आहे?" ,... रोहन

"इथेच आहे" ,... विभा

"दे जरा त्याला फोन",.. रोहन

बोल रोहन...

"अरे तू इकडे ये पोलिस स्टेशन मध्ये",... रोहन

"का? कश्याला?",... रणजित

" तू प्रिया वर आरोप केले ना की तिच्या पासून धोका आहे रेवाला, पुरावे घेवून ये, लगेच ये अर्धा तासात ",... रोहन

"माझ काही म्हणणं नव्हत तस, विभाने केली कंप्लेंट",... रणजित

"तिला ही बोलवलं आहे पोलिस स्टेशनला आणि यात तुझ ही नाव आहे" ,.... रोहन

"कोणी लिहील माझ नाव? ",... रणजित

" तुझ नाव लिहील तर तुला काय प्रॉब्लेम आहे? , तूच दिली ना प्रियाची कंप्लेंट? इकडे ये आता लवकर , इंस्पेक्टर साहेब तुझी वाट बघत आहेत ",... रोहनने फोन ठेवला

रणजित घाबरून गेला, तो विभा जवळ गेला, विभा तिच्या विचारात होती

"मला बोलवलं आहे वहिनी पोलिस स्टेशनला ",.. रणजित

" हो मला ही बोलवलं आहे चौकशी साठी ",... विभा

आता काय?...

" टेंशन नको घेवू रणजित, ते जे विचारतील त्याच उत्तर द्यायच, आता आपण तिचं नाव घेतल आहे तर ती काहीतरी करेल",... विभा

लॅब वाले लोक आले, त्यांनी टेस्ट सॅम्पल घेतले, बाकीच्या टेस्ट तिथे हॉस्पिटल मध्ये होणार होत्या

सगळ्या टेस्ट झाल्या, संदीप रेवाला घरी सोडल, उद्या रीपोर्ट येणार होते तेव्हा परत बोलवलं होत चेकअप साठी

" चला आता घरी जाऊ",.. विभा

" आम्ही जातो आमच्या घरी" ,... सुरेखा ताई विभाला सांगत होत्या

"नाही तुम्ही घरी चला आजच्या दिवस, उद्या रीपोर्ट येतील डॉक्टरांनाही भेटून घ्या, तो पर्यन्त ते गुंड सापडतील",.... विभा

विभाला आता खरच वाटत होत प्रिया वर पोलिस केस करायची घाई केली आपण....

रेवा आवरत होती,

सुरेखा ताई संदीप कडे बघत होत्या,... "काय करू या आता संदीप, अरे मला घरी जायचं आहे आपल्या, किती दिवस झाले आपण घरी नाही गेलो ",

" आई अग पण धोका आहे, आपण आता जावु या रेवा कडे",... संदीप

"काकू चला तुम्ही आमच्या कडे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही",.. रेवा

"तस नाही ग मला अवघडल्यासारखं होत आहे",.. सुरेखा ताई

" मी आहे ना काकू, don\"t worry",.. रेवा

"संदीप रेवा चला पटकन नंतर आम्हाला काम आहे ",...विभाने रेवाला सांगितल नाही की तिला पोलिस स्टेशनमध्ये जायच आहे

सगळे घरी गेले, बंगल्याजवळ गाडी आली, एवढा मोठा बंगला, मोठा गेट, समोर सुंदर गार्डन, सिक्युरिटी गार्ड सगळं बघून सुरेखाताई आश्चर्य चकित झाल्या,... "हे प्रकरण झेपेल का आपल्याला संदीप? किती श्रीमंत लोक आहेत हे",

" आई तू आत्तापासून काळजी करू नकोस",.. संदीप

सगळे आत गेले, सुलभाताई पुढेच बसलेल्या होत्या, त्या अतिशय काळजी करत होत्या, अनिता कामात होती, रेवा पळत जाऊन त्यांना भेटली

"कुठे होते तुम्ही लोकं रात्रीपासून? काय चालले आहे? रोहन आणि प्रिया कुठे आहे? मला कोणी काही सांगत का नाही? ",... सुलभा ताई

"आजी रात्री पासून काळजी करता आहे",... अनिता

"आजी प्रियाला अटक झाली, मम्माने तिच्याविषयी पोलिस कम्प्लेंट केली आहे, फार मोठा प्रॉब्लेम झाला होता, मला आणि संदीपला किडनॅप केलं होतं",.... रेवा

" कोणी केल हे? सापडले का ते लोक? ",.... सुलभा ताई रणजित कडे बघत होत्या

"नाही अजून, डॅडी तिकडे आहे प्रिया सोबत ",... रेवा

"विभा अग इकडे ये, माझ जरा ऐकणार आहेस का तु? हे बघ प्रिया असं करू शकत नाही, तिचा खूप जीव आहे रेवा मध्ये, मी कायमच राहिली आहे त्या दोघीं सोबत, काही प्रॉब्लेम नाही ग, तुझा गैरसमज झाला असेल, मी बघितलं आहे प्रिया नेहमी रेवाला जे हवं ते खायला करून देत होती, तिला रोज बोलवायची जेवायला, ती कॉलेज हून आली की नाही ते विचारायची, रेवा किती वेळा बोलायची माझ्या रूम मध्ये येऊ नको, तरीसुद्धा प्रिया तिला जाऊन व्यवस्थित भेटायची ",.. सुलभा ताई

"हो बरोबर बोलते आहे आजी, माझं बराच वेळा चुकलं आहे प्रियाशी वागणं, मी नंतर माफी मागणार आहे प्रियाची",... रेवा

विभा विचार करत होती सगळेच बोलत आहे प्रिया चांगली आहे, मी उगाच त्या रणाजितच्या बोलण्यात आली, बघू आता काय होत आहे पुढे पोलीस स्टेशनला जाऊन...

संदीप आणि सुरेखाताई आत मध्ये आल्या, सुलभाताई उठून उभ्या राहिल्या.... या ना आत

" आजी संदीप ला तर तू ओळखते ना, ह्या संदीपच्या आई आहेत, आज ते आपल्याकडेच राहतील",.. रेवा

अनिता यांना गेस्ट रूम दाखव....

"तुम्ही आत आराम करा, रेवा बघ जरा",.. सुलभा ताई

रेवा, संदीप, सुरेखा ताई आत गेल्या

मोठी रूम होती छान, किंग साईझ बेड, पडदे सोफा सेट सगळ होत रूम मध्ये,

" संदीप काकू तुम्ही नाश्त्याला काय घेणार मी करायला सांगते ",.. रेवा

दोघे काही बोलले नाहीत..

अनिता यांचा चहा नाश्ताच बघ

" तुम्ही काय घेणार रेवा मॅडम",..

हो सांगते नंतर...

बाहेर विभा रणजित चहा घेत होते, दोघांच्या चेहर्‍यावर टेंशन होत..... "आई आम्ही जरा पोलिस स्टेशनला जावून येतो",...... विभा रणजित पोलिस स्टेशनमध्ये जायला निघाले ...
........

🎭 Series Post

View all