Login

मृगजळ... भाग 26

सर माझी आई वाट बघत असेल , एक तर तिला नवीन घरी ठेवल आहे, आणि हे सगळ काय सुरु आहे याची तिला काही कल्पना नाही, आमची 4-5 दिवसा पासुन भेट नाही, मला खूप काळजी वाटते आहे तिची



मृगजळ... भाग 26

©️®️शिल्पा सुतार
..............

संदीप रेवाला अ‍ॅडमिट केल, उद्या पूर्ण तपासणी होणार होती त्यांची... संदीप खूप काळजीत होता, नीट झोपत नव्हता तो..

"काय झालं संदीप? काही प्रॉब्लेम आहे का?",... रोहन

"सर माझी आई वाट बघत असेल , एक तर तिला नवीन घरी ठेवल आहे, आणि हे सगळ काय सुरु आहे याची तिला काही कल्पना नाही, आमची 4-5 दिवसा पासुन भेट नाही, मला खूप काळजी वाटते आहे तिची",... संदीप

"इकडे बोलवून घे त्यांना, राकेश घेवून ये त्यांना",.. रोहन

राकेश संदीप कडे बघत होता

" काय झालं आता? ",.. रोहन

"सर काकू माझ्या सोबत यायला नाही बोलल्या तर? ",... राकेश

" का अस करतील त्या?", ... रोहन

"मी चुकीच वागलो सर काकूं सोबत , चार पाच दिवसा पूर्वी अस त्यांना संदीपला लागल म्हणून सांगितल आणि किडनॅप केल होत मी ",... राकेश

" तू केल होत का ते?, काय करतात तुम्ही मुल पण ना, या पुढे अजिबात चुकीच काम करायचा नाही, समजल का संदीप राकेश, ही गडबड झाली की राकेश तू मला येवून भेट नौकरीला लावून टाकतो तुला, आणि तू संदीप नीट अभ्यास करायचा ",... रोहन

हो सर...

" मी करतो तुझ्या आईला फोन, काय नाव त्यांच, ड्रायवर पाठवतो ",.. रोहन

सुरेखा..

" ठीक आहे",... रोहनने फोन करून सुरेखा ताईंना हॉस्पिटल मध्ये बोलवून घेतल

संदीपला बघून सुरेखा ताई घाबरून गेल्या होत्या,..." काय झालं तुला संदीप? का अ‍ॅडमिट केल आहे तुला?, जास्त आहे का काही? ",... त्या रडायला लागल्या

"काहीही झाल नाही आई मला, जनरल चेक अप साठी अ‍ॅडमिट केल आहे, हे बघ मी ठीक आहे एकदम",.. संदीप

रेवाला बाजूला अ‍ॅडमिट केल होत, सुरेखा ताई रेवाकडे बघत होत्या, आई ही रेवा आहे माझी मैत्रिण, रेवा आई माझी

दोघी छान हसल्या

"हिला काय झाल? तुम्हाला दोघांना सोबत कस अ‍ॅडमिट केल? ",... सुरेखा ताई

" जनरल चेकअप साठी केल अ‍ॅडमिट, उद्या सोडतील ",.. संदीप

विभा रणजित तिथे होते रूम मध्ये हजर

"हे कोण आहेत?",.. सुरेखा ताई

"त्या विभा मॅडम.. रेवाची आई, आणि काका आहेत ते ",.. संदीप

रोहन आत आला,.." तुम्ही घरी जा दोघ... विभा रणजित, थोडा आराम करा",..

"नाही आम्ही इथेच थांबू ",... रणजित

" घरी आई काळजीत असेल",... रोहन

"नाही त्यांना काही माहिती नाही, मी सांगितल नाही ",.. विभा

" उद्या टेस्ट झाल्यावर सोडणार आहेत रेवाला",... रोहन

" मी रेवा सोबत राहणार ",.. विभा

कोणीच ऐकत नव्हत ते तिथे झोपले...
......

" काय सुरू आहे हे संदीप राकेश? कोण आहेत हे साहेब?" ,... सुरेखा ताई

" आई हे रोहन साहेब आहेत, रेवाचे बाबा ",... संदीप

" तुम्ही सगळे एकत्र कसे? आणि मला का किडनॅप केल होत तू राकेश? , तुझ्या कडे बघणार आहे मी जरा",.. सुरेखा ताई

"काकू मला माफ करा, सांगणार आहे आम्ही तुम्हाला सगळ",... राकेश

" आता सांगा ",.. सुरेखा ताई

"आई मोठी स्टोरी आहे, इथे नको आई, मी सांगणार आहे तुला",.. संदीप

रेवा झोपली होती, विभा तिच्या बाजूला बसली होती सोफ्यावर, रणजितशी ती हळू हळू बोलत होती

संदीप, राकेश, सुरेखा ताई कॅन्टीन मध्ये आले, राकेश जावून चहा घेवून आला

"आई सांगतो तुला सगळ पण तू आधी पूर्ण ऐकुन घे, चिडू नकोस माझ्यावर",.. संदीप

" बोल पटकन काही संकट आहे का?",.. सुरेखा ताई

"होत आधी संकट, आता नीट झाल सगळ, रोहन साहेब भेटले आता चांगल होईल बघ ",... संदीप

संदीप पाहिल्या पासुन सगळ सांगत होता, कस तो आणि राकेश चुकीच्या मार्गाला लागले, मग रेवाला किडनॅप करायचं काम मिळालं, त्यामुळे तिच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, नशिबाने एकाच वर्गात आले ते दोघं, पुढे कशी रेवाशी ओळख वाढवली, बॉस कडून वेळोवेळी पैसे घेतले,

"हे असे उद्योग करतात का तुम्ही?, घरी गेल्यावर काठीने बदडते तुला बघ, माझे संस्कार कमी पडले की काय? ",.. सुरेखा ताई

"आई तू काय बोलली होती सगळ नीट ऐकुन घेशील ",... संदीप

ठीक आहे बोल पुढे....

"नंतर आई माझ्या लक्षात आलं की आपण हे चुकीचं करतो आहोत, आई तु दिलेले संस्कार मला आठवले, वाटलं की हे खूप चुकीचं काम आहे आणि रेवाचा काय दोष आहे? तिला मी असं गुंडांच्या हवाली नव्हतं करू शकत, म्हणून मी माघार घेतली, मी त्यांना सांगितलं मी हे काम करणार नाही, तर मग मी हे काम करावं म्हणून त्या लोकांनी तुला किडनॅप केलं, सांगितल की आई हवी असेल तर रेवाला आमच्या ताब्यात दे",... संदीप

"राकेश तू त्या लोकांची मदत करत होता का रे? तुला समजत नाही का काही? ",.. सुरेखा ताई परत चिडल्या होत्या

" चुकी झाली काकू मी असं नव्हतं करायला पाहिजे, मला ते नंतर लक्षात आलं आणि मग म्हणून मी तुम्हाला सोडवायला आलो होतो",... राकेश

" ते गुंड चांगले होते म्हणून नशीब काही झाल नाही, नाही तर आज मी तुम्हाला दिसली नसती",... सुरेखा ताई

"हो ना आई मी किती काळजी होतो माहिती आहे का? ",... संदीप

सुरेखा ताई आता खूप चिडल्या होत्या, त्यांनी संदीप राकेशला दोन चार फटके मारले,... "हे असे उद्योग करतात का तुम्ही? ती रेवा किती गोड मुलगी आहे, काही करता काही झाल असत तर काय केल असत आपण? आपल्याला पैसे नको संदीप, मला तू हवा आहे, राकेश ह्या पुढे हे असे उद्योग बंद, सगळ सामान घेवून आमच्या कडे रहायला यायच काय आता",.... सुरेखा ताई

राकेशच्या डोळ्यात पाणी होत,..." काकू... संदीप मला माफ करा",

" आता किती वेळा माफी मागणार आहेस राकेश, ठिक आहे रे, आम्हाला तुझा राग नाही ",... संदीप

रोहन तिथे आला,..." काय सुरू आहे? येवू का मी एक मिनिट? ",..

" या ना सर",... राकेश पळत जावून चहा घेवून आला,

" संदीप आता झोप जरा वेळ, तुम्ही ही ताई जरा आराम करा, मी जरा पोलिस स्टेशनला जावून येतो, प्रिया एकटी आहे तिथे" ,... रोहन

"मी येवू का सर तिकडे सोबत तुमच्या? , तो बॉस माझ्या ओळखीचा आहे बोलायच आहे त्याच्याशी, माझी मदत होवु शकते ",.. राकेश

"हो चल राकेश ... आणि संदीप उद्या टेस्ट झाली की घरी जा आमच्या, अजून मेन बॉस सापडायचा आहे, सावध रहा, नंतर सगळ ठीक झाल की मग तुमच्या घरी जा",... रोहन

हो सर....

"सुरेखा ताई संदीप गुणी मुलगा आहे हा, तो आणि रेवा एकमेकांना पसंत करतात, तुम्हाला माहिती नसेल तर सांगितल ",.. रोहन

सुरेखा ताईंच्या चेहर्‍यावर आश्चर्य होत

रोहन राकेश गेले

" अजून काही बातमी लपवली आहे का तू संदीप? , एक एक गोष्टी समजता आहेत मला, एवढी श्रीमंत मुलगी कशी राहील रे संदीप आपल्या झोपडीत, किती नाजूक आहे ती रेवा, अगदी बाहुली सारखी, मी लोकाकडे स्वयंपाकाच काम करते, तिच्या घरी आपल्या सारखे शंभर नौकर असतिल, आता काय करू या",.. सुरेखा ताई

" आई तू टेंशन घेवू नकोस, होईल बरोबर ",... संदीप

" टेंशन घेवु नको म्हणजे काय? , तुला कोणी सांगितल होत असे उद्योग करायला? ", .... सुरेखा ताईंनी परत संदीपला मारल

" आई अग मी अ‍ॅडमिट आहे ना, मारतेस काय ",... संदीप

" चल आराम कर आता ",... सुरेखा ताई
......

रोहनने जाता जाता वकिलांना फोन केला

"काय झालं रोहन साहेब एवढ्या रात्री फोन केला? ",..

" पोलिस स्टेशनमध्ये या सकाळी तिकडे बोलू, थोड काम होत ",.. रोहन

"ठीक आहे, काय झालं पण? ",... वकील

" अहो विभाने प्रिया वर केस केली आहे, की प्रिया पासून रेवाला धोका आहे आणि त्यामुळे प्रियाची चौकशी व्हावी" ,..... रोहन

"नेमकं झालं काय? ",... वकील

" मोठी गोष्ट आहे, तुम्ही सकाळी या मग आपण बोलू त्या संदर्भात ",.. रोहन

" आता येवू का? ",.. वकील

"मी सांगतो, पोलिस स्टेशनला जातो आहे मी आता, एकदा इंस्पेक्टर सावंत यांच्याशी बोलून घेतो",.. रोहन

" ठीक आहे करा मग फोन ",.. वकील

रोहन पोलिस स्टेशनला गेला, सीमा प्रिया बाकावर बसल्या होत्या, एवढी रात्र असून गर्दी होती, रोहनला बघून प्रिया पटकन उठून त्याच्या जवळ आली

" I am sorry प्रिया, हे सगळ होत आहे ते काही चांगल नाही, हे अस पोलिस स्टेशन वगैरे विभाने अति केल या वेळी ",.... रोहन

"ठीक आहे रोहन... विभा एक आई आहे, तिला तिच्या मुलीची काळजी आहे, तिला वाटल असेल मी केल आहे हे अस, काही हरकत नाही, कशी आहे रेवा?",... प्रिया

"ठीक आहे, झोपली आहे आता ",.. रोहन

" इंस्पेक्टर साहेब प्रिया सीमाच्या बेलच काय करू या?,...रोहन

"त्या हवालदारने गडबड केली संध्याकाळी, मी इथे असतो तर कच्ची केस केली असती",.. इंस्पेक्टर सावंत

"असू द्या काही हरकत नाही, आता पुढे काय करूया?",... रोहन

" या गुंडांची चौकशी सुरू करू, त्यात येईल खर नाव समोर, कोण आहे त्या मॅडम ते समजेल",... इंस्पेक्टर

हो चालेल.....

" मग सकाळी करू बेल पेपर तयार",... इंस्पेक्टर सावंत

ठीक आहे...

" हवालदार काका वही घ्या, गुंडांचे नाव लिहा, कधी पासून ते गुन्हे करत आहेत सगळे डिटेल्स आले पाहिजे, रोहन साहेब तुम्ही बसा जरा वेळ ",... इंस्पेक्टर

एका एकाच नाव हवालदार लिहून घेत होते,...

" बाकीचे गुंड असे साधे आहेत रोहन साहेब, तो उंच धिप्पाड बॉस त्याची चौकशी करा पटकन, त्याच्याकडे आहे माहिती ",... राकेश

" बरोबर बोलतो आहेस तू ",... रोहन इंस्पेक्टर सावंत यांच्या जवळ गेले, त्यांना सांगितल राकेश काय म्हणतोय ते

इंस्पेक्टर आत गेले त्यांनी सगळ्या गुंडांना बाजूच्या लॉक अप मध्ये नेल, आता तिथे बॉस, हवालदार, इंस्पेक्टर होते

" नाव काय तुझ नीट सांग? ",.. इंस्पेक्टर

बॉस काही बोलला नाही...

"परत विचारतो आहे तुझ खर नाव सांग?, सगळी माहिती दे? ",.... तसा इंस्पेक्टर सावंत यांनी एका पोलिसाला इशारा केला, तो माणूस खूप धिप्पाड होता, त्याने आत येवून बॉसच्या कानाखाली साटकन मारली

बॉस कळवळला....

"आता नीट ऐकु येईल तुला प्रश्न, बोल पटकन ",.... इंस्पेक्टर

तरी बॉस गप्पच..

परत तो धिप्पाड पोलीस पुढे आला, आता बॉसला त्याने खाली पाडल, पाठीत मारल

खरं तर बॉस घाबरला होता पण तस न दाखवता तो बोलला,... " मला कितीही मारा मी काही सांगणार नाही, मीच पैसे मागणार होतो, कोणी नाहिये मॅडम ",....

"खोट बोलू नकोस पटकन सांग",... इंस्पेक्टर

बॉस काहीही बोलायला तयार नव्हता...

इंस्पेक्टर सावंत बाहेर आले, रोहन जवळ येऊन बसले,....." तो माणूस काहीही बोलायला तयार नाही, काय करूया? आता त्याला मारून पाहिल, समजावून पाहिलं",

" मी एकदा बोलू का त्याच्याशी? ",... राकेश

" चालेल प्रयत्न करायला काही हरकत नाही",... इंस्पेक्टर

"पण इंस्पेक्टर साहेब तुम्ही येवू नका मी बोलतो त्याच्याशी, मग बोलवतो तुम्हाला",... राकेश

इंस्पेक्टर सावंत रोहन कडे बघत होते...

" ठीक आहे प्रयत्न करायला काय हरकत नाही, कारण मेन बॉस कोण आहे ते समजण महत्वाच आहे",... रोहन

राकेश लॉक अप मध्ये आला...

राकेश ला बघून बॉस चपापला, राकेश जावून बॉस जवळ बसला, ...

" तुम्ही सगळे सामील होते का एकमेकांना? धोका दिला तुम्ही मुलांनी मला, तो संदीप तसा तू ही तसा राकेश, मी सोडणार नाही तुम्हाला, लक्ष्यात ठेव, मी बाहेर येईन मग बघतो तुम्हाला, तू संदीपच्या आईला सोडवल ना? , तेव्हा समजल होत ते मला, मी अ‍ॅक्शन घ्यायला हवी होती ",... बॉस

"एवढी रिस्क घेऊन काय मिळालं तुम्हाला बॉस? मेन मॅडम वेगळीच आहे, ती मॅडम सगळे पैसे घेऊन जाईल आणि तुम्हाला मात्र पोलिसांचा मार मिळेल",.. राकेश

" होऊदे जे व्हायचं ते, पण मी आता मागे फिरणार नाही, मला कितीही मारला तरी मी काहीही सांगणार नाही",.. बॉस

" का असं करत आहात बॉस तुम्ही?, तुम्ही ही सामील व्हा आमच्यात बॉस, आज ना उद्या ती मॅडम पकडली जाणार आहे, त्यापेक्षा जर तुमचा तर फायदा होत असेल तर करून घ्या",.. राकेश

म्हणजे....

" जर पोलिसांना मदत केली तर ते तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवतील, विशेष शिक्षा होणार नाही, आणि रोहन साहेब चांगले आहेत, ते काम मिळवून देतील, मी हमी देतो",... राकेश

बॉस विचार करत होता काय करता येईल..

" एवढ मोठ आयुष्य आहे आपल्यापुढे, जर प्रामाणिकपणे पुढचं जीवन जगता येत असेल तर काही हरकत आहे",... राकेश

बॉस एकदम गप्प होता काहीच बोलत नव्हता,...
" तसं मी मदत करेन पण त्या मॅडमची ही थोडी शिक्षा माफ व्हावी ही माझी अट आहे, तस लिहून द्या, तरच मी त्या मॅडमला पकडायला मदत करू शकतो",

" ठीक आहे सांगतो मी बाहेर जावुन",... राकेश

राकेश बाहेर आला, त्याने इंस्पेक्टर साहेबांना सांगितलं की तो बोलायला तयार आहे, पण त्याच्या काही अटी आहेत, त्या मोठ्या मॅडमला ही माफीचा साक्षीदार करायच

" सगळेच माफीचा साक्षीदार होतील तर मग शिक्षा कोणाला होईल?, काय अर्थ आहे या गोष्टीला?, म्हणजे गुन्हा करायचा त्यांनी, परत शिक्षा ही कमी हवी त्यांना ",... इंस्पेक्टर

"बघू तर खरी तो काय म्हणतो आहे इन्स्पेक्टर साहेब, जर समजा त्याने मदत केली तर समजेल ना कोण आहे ती मॅडम? , कायमचा धोका नको आहे मला ",... रोहन

ठीक आहे चला बघू..... आत मध्ये चला

🎭 Series Post

View all