Login

मृगजळ... भाग 25

आतला रूमच कपाट उघडल्यावर आत एक जिना होता तिथे संदीप पळत गेला, आत रेवा होती, संदीप ने तिला सोडल, दोघ रडत होते, रेवाने संदीपला मिठी मारली


मृगजळ... भाग 25

©️®️शिल्पा सुतार
..............

"विभा, रणजित प्रिया, ऐकत नाही तुम्ही कोणी, ठरवा काय ठरवायचं आहे ते, लवकर निघा, तिकडे धोका आहे, मी अजून सांगतोय घरी जा तुम्ही ",.. रोहन चिडला होता

"नाही.. आम्ही सोबत येणार",...

सगळे बंगल्या कडे जायला निघाले, प्रिया, विभा, रणजित कार मध्ये होते, रोहन, इंस्पेक्टर सावंत सोबत होते , राकेश, सीमा आपल्या आपल्या ग्रुप सोबत होते,

"सगळ्यांनी अलर्ट रहा, फॅमिली मेंबर्स लगेच कार मधून उतरू नका",.... इंस्पेक्टर

" कार थोडी लांब लाव",... रोहन ड्रायवर काकांना सांगत होता

हो सर....

"सीमा तू विभा प्रिया कडे ही लक्ष दे, तिकडे काहीही होवु शकत",.. रोहन

हो सर...

राकेश रोहन इन्स्पेक्टर साहेब आणि इतर एजन्सीच्या लोकांनी मिळून एक प्लॅन तयार केला, बंगल्या जवळ आल्यानंतर सापळा लावल्याप्रमाणे सगळ्यांनी त्या बंगल्याला घेरलं,

"या लोकांकडे बंदुका असू शकतात त्यामुळे सगळ्यांनी सावधान रहा",... इंस्पेक्टर सावंत

सगळ्यांनी बंगल्यावर एकदमच हल्ला केला, बंगल्यातील गुंड गाफील होते, एकच मारामारी सुरू झाली

एका बेडरूम मध्ये बसून बॉस फोनवर बोलत होता, खाली काही तरी गडबड होते आहे याचा त्याला आवाज आला, काय झालं म्हणून तो बघायला बाहेर आला, तसं पोलिसांनी त्याला गच्च पकडून धरल, त्याचा फोन काढून घेतला, सगळ्या गुंडांना आता पोलिसांनी अरेस्ट केली, त्यांना रांगेत व्हॅन मध्ये बसवल,

"मी आत जाऊ का इंस्पेक्टर ",... रोहन

" हो पण काळजी घ्या कोणी लपल असेल तर, नाहीतर चला मी पण येतो तुमच्या सोबत",.. इंस्पेक्टर

रोहन पळत जाऊन सगळीकडे मुलांना शोधत होता, मुलं कुठे आहेत? वरच्या बेडरूम मध्ये संदीप भेटला, त्याला बांधलेल होत, संदीपला रोहनला बघून खूप आनंद झाला, त्याने संदीप ला सोडवल..

" संदीप रेवा कुठे आहे? ",.. रोहन

" ती बाजूच्या बेडरूम मध्ये आहे ",... संदीप

रोहन तिकडे पळत गेला, संदीप ही त्याच्या मागे गेला, रूम मध्ये रेवा नव्हती,

"कोणती रूम संदीप",.. रोहन

"हीच रूम होती सर, आधी मला ही इथे ठेवल होत",.. संदीप

आता रोहन खूप घाबरला, त्याने इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं...... रेवा नाही आहे तिथे...

"असं कसं झालं?, थांबा मी बाहेर व्हॅनमध्ये गुंड आहेत त्यांना विचारून येतो ",... इंस्पेक्टर

" संदीप तू तोपर्यंत बाजूच्या रूम मध्ये शोध",... रोहन

"हो सर",... संदीप

सगळे रेवाला खूप शोधत होते

सगळ्या गुंडांना व्हाॅन मधुन पोलिस स्टेशनला नेत होते, त्यांच्यासोबत बॉस ही होता

संदीप बाहेर आला, पळत तो व्हॅन कडे गेला, त्याने सांगितल.... बॉसला विचारा रेवा कुठे आहे

" बॉस तू आहेस का?",.. इंस्पेक्टर

हो...

" हा मास्क का घातला आहेस? तो काढ आधी",.. इंस्पेक्टर

बॉसने मास्क काढला, ओळखीचा चेहरा वाटत नव्हता, इन्स्पेक्टर साहेब आणि संदीपने त्याला ओळखलं नाही, रोहन आत मध्ये रेवाला शोधत होता, तो बाहेर नव्हता

"मला माहिती नाही, थोड्या वेळापूर्वी आमची मॅडम इथे आली होती ती रेवाला घेऊन गेली",.... बॉस

"कुठे घेऊन गेले? कोण मॅडम, बोल पटकन",... इंस्पेक्टर

"ते मला माहिती नाही",.. बॉस

" खरोखर सांग नीट प्रश्नांचे उत्तर दे नाहीतर मी खूप मारेल",.. इंस्पेक्टर

" मला मारून काय होणार आहे, मला खरंच नाही माहिती पोरगी कुठे आहे, तुम्हाला जे करायचं ते करू शकता मला",... बॉस रागाने संदीप कडे बघत होता

" मला माहिती आहे इन्स्पेक्टर साहेब हे खोटं बोलता आहेत",.. संदीप

" पण आता पण काही करू शकत नाही, जाऊ द्या गाड्या पोलीस स्टेशनला, तिथे बघतो मी तुझ्याकडे नंतर ",... इन्स्पेक्टर साहेब बॉस कडे रागाने बघत होते

इन्स्पेक्टर आणि संदीप आत आले

"कळली का माहिती रेवा बद्दल?",... रोहन

" नाही ते काही सांगत नाही, त्यांनी रेवाला लपवुन ठेवल आहे ",.. संदीप

" हा खरा बॉस नाही, खरा बॉस दुसरी आहे, तिने रेवाला नेल थोड्या वेळा पूर्वी",... इंस्पेक्टर

"खोट बोलतो आहे हा, त्याने रेवाला इथे कुठे तरी लपवल आहे, सुरुवातीला मी आणि रेवा एकत्र होतो एका रूम मध्ये, मग त्या बॉसला कोणाचा तरी फोन आला, त्यांनी मला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आणि मग रेवाला लपवलं, ठीक आहे शोधेल मी रेवाला, इथे एकाही गाडीचा आवाज आला नाही, मी अलर्ट होतो, म्हणजे इथून कोणी बाहेर गेल नाही, रेवा बंगल्यात आहे रोहन साहेब ",... संदीप

" काय कराव समजत नाही ",.. रोहन हताश झाला होता

" रेवा कुठे आहे रोहन? सगळे मुलं सापडले, रेवा कुठे आहे? ",.. विभा

सापडेल ....

" नाही मला आत्ताच्या आत्ता सांग रेवा कुठे आहे? ",.. विभा चिडली होती, रडत होती, प्रिया सांग कुठे आहे रेवा?

"मला माहिती नाही विभा, मी पण तेवढ्याच काळजीत आहे, तू का एवढा गैरसमज करून घेतला आहेस ",.. प्रिया

"पुरे झाले तुझ नाटक, बोल पटकन",... विभा

रोहन पुढे गेला, त्याने विभाला शांत केलं, प्रिया हिच्या कडे लक्ष देऊ नको, जा आत मध्ये कोणी दिसतंय का ते बघ, चौकशी कर, लवकरात लवकर रेवाला शोधायला पाहिजे

रणजीत हि रेवाला शोधत होता....

सीमाही बाहेर आली,... "सगळ्या रूम बघून झाल्या कुठेच नाही रेवा, काय करूया? ",..

रोहन वेड्या सारखा पळत सगळीकडे रेवाला शोधत होता, प्रिया विभा रणजित सीमा आत आले, विभा रडत होती सीमा सगळीकडे रेवाचा शोध घेत होती, मागच्या बाजूला ते काम करणार जोडप होत प्रिया तिथे गेली,

"या घराला किती रूम आहेत? ",.. प्रिया

" चार बेडरूम ",...

तिथे बघून झाल रेवा नाहिये, कुठे असेल मग?

\"इथून बाहेर जायचा मार्ग आहे का अजून? ",.. प्रिया त्यांना विचारत होती

" नाही तो मेन गेट एक आहे ",..

संदीप बोलतो एक ही गाडीचा आवाज आला नाही, म्हणजे काय रेवाला पाई घेवून गेले का?, काय झालं असेल नेमक?, एवढी शांतता आहे इथे गाडी आली असती तर नक्की आवाज आला असता, संदीप बरोबर बोलतो आहे,

"एखादी स्टोअर रूम, अडगळीची खोली आहे का आत ?",... प्रिया

"नाही आहे, म्हणजे आम्हाला माहिती नाही",...

"सगळ्या घरात नीट बघा, परत एकदा", .... प्रिया ने सांगितल

संदीप रोहन राकेश सगळीकडे पळत होती, कुठे रेवा मिळत नव्हती,

" चला आता आपण निघू पोलिस कंप्लेंट करू तोच एक उपाय आहे आता",... रोहन रडत होता जिच्या साठी एवढ केल तीच रेवा सापडत नाहिये

" मी येणार नाही, रोहन सर तुम्ही पुढे जा त्या गुंडाना विचारा रेवा कुठे आहे, तो पर्यंत मी इथे तिचा शोध घेतो",... संदीप

"हो मी पण थांबतो इथे",.. राकेश

संदीप तिथे बाजूला उभा होता, राकेश त्याच्या जवळ गेला, राकेश तू ही पोलिस स्टेशन ला जा आणि बॉस ला विचार रेवा कुठे आहे? , तो पर्यंत मी एकदा नीट बघतो बंगल्यात,

" ते लोक जाता आहेत मी थांबतो तुझ्या सोबत इथे, धोका आहे उरलेले गुंड परत आले तर ",... राकेश

"हो.. चल आपण बाहेर गार्डन मध्ये बघू",.. संदीप

ठीक आहे...

दोघं गार्डन मध्ये गेले, सगळीकडे बघत होते ते, दाट झाडी होती बंगल्याच्या आजुबाजूला,

"हे बघ संदीप आतल्या बाजूला ही काचेची खिडकी दिसते जमिनीला लागुनच खिडकी आहे ही, या बंगल्याला तर खाली पार्किंग नाही म्हणजे खाली एखादी खोली आहे",... राकेश

"बरोबर बोलतो आहेस तू राकेश, तळघर असेल का? पण तिथे जायचं कसं? रस्ता दिसत नाही, घरातुन असेल रस्ता",... संदीप

संदीप राकेश पळत आत मध्ये आले,

" काय झालं आहे संदीप",.. रोहन

" आत मध्ये तळघर आहे तिथेच असेल रेवा ",... संदीप

" जायचा रस्ता कुठे आहे",.. रोहन

"हो शोधतो आहे आम्ही",... राकेश

आतला रूमच कपाट उघडल्यावर आत एक जिना होता तिथे संदीप पळत गेला, आत रेवा होती, संदीप ने तिला सोडल, दोघ रडत होते, रेवाने संदीपला मिठी मारली,.... "संदीप मला सोडून जाऊ नकोस, खूप घाणेरडे अंधारलेली खोली आहे ही, मला खूप भीती वाटते आहे इथे, मला तुझ्या सोबतच रहायचं आहे ",...

"तुझे डॅडी आले बघ रेवा, घाबरू नकोस गुंडाना पकडल आहे, तुझी मम्मा सीमा प्रिया मॅडम सगळे आले आहेत" ,.... संदीप

रोहन आला तळघरात रेवाने त्याला मिठी मारली, दोघ रडत होते, सगळे वरती आले

गुंडांना घेवून मेन व्हेन पोलिस स्टेशनला केव्हाची गेली होती

" इंस्पेक्टर साहेब मला उद्या त्या गुंडांशी बोलायच आहे, मेन मॅडम अजून हाती आल्या नाहीत ",... रोहन

" हो उद्या या तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये",... इंस्पेक्टर

रेवा वरती येवून विभाला भेटली, विभा खूप काळजीत होती,

"रेवा ठीक आहेस ना तू? काही केल तर नाही ना तुला गुंडांनी?" ,... विभा

"मी ठीक आहे मम्मा",.. रेवा

रणजित काका रडत होता, प्रिया कोपर्‍यात उभ राहून सगळ बघत होती, तिच्या डोळ्यात पाणी होत,

इंस्पेक्टर सावंत प्रिया जवळ आले,... "तुम्हाला माझ्या सोबत पोलिस स्टेशनला याव लागेल आता, मिस सीमा तुम्ही ही चला तुमची ही चौकशी होईल",..

"काय प्रकार आहे हा? प्रियाला का अटक करता आहेत? ",... रेवा

"कारण प्रिया आहे या मागे, माझी खात्री आहे ",... विभा

रेवा आश्रयाने प्रिया कडे बघत होती,... "हे शक्य नाही मम्मा, प्रिया खूप चांगली आहे, मम्मा कशावरून तू हे म्हणते आहेस? , ती माझी खूप काळजी करते",.. रेवा

रेवा प्रिया जवळ आली, प्रियाने तिला मिठी मारली,..." मी काहीही केल नाही रेवा, विभाचा गैरसमज झाला आहे, फक्त माझ्या कडे काही पुरावे नाही की मी निर्दोष आहे" ,

" मला माहिती आहे प्रिया, तू कश्याला मला काही करशील",.. रेवा

"तू काळजी करू नको प्रिया मी तुझ्या सोबत आहे, लगेच वकील बघु आपण",... रोहन

" चला निघू या आता",.. कार मध्ये विभा रणजीत रेवा बसले

दुसर्‍या गाडीत संदीप राकेश बाकीचे होते...

पोलिस व्हॅन मध्ये प्रिया सीमा इंस्पेक्टर सावंत सोबत होते, प्रिया रोहन कडे बघत होती,..

तो पोलिस व्हॅन जवळ आला,... " काळजी करू नको प्रिया , मी रेवाला घरी सोडून लगेच पोलिस स्टेशनला येतो ",..

" मी काहीही केल नाही रोहन, मी खरच तुझ्या काळजीने मागे आले होते, विभा का अस करते आहे? ",.. प्रिया

"मला माहिती आहे ते प्रिया, इन्स्पेक्टर साहेब प्रिया माझ्या सोबत फॅमिली कारने नाही येवू शकत का?",... रोहन

"सॉरी रोहन साहेब पण विभा मॅडम ने कंप्लेंट मागे घेई पर्यंत अस करता येणार नाही, तुम्ही काळजी करू नका प्रिया मॅडम सीमाची, मी आहे ",... इंस्पेक्टर सावंत

" मम्मा प्लीज अस करु नकोस, प्रिया वरची केस मागे घे",... रेवा

" नाही रेवा, तुला माहिती नाही काही, तू गप्प बस ",.... विभा

" अग पण मम्मा प्रिया माझ्याशी नीट वागवायची, मी नीट वागत नव्हते तिच्याशी, आणि सीमाने काय केलय?, तिची का चौकशी? ",.... रेवाला या सगळ्या गोष्टीचा अति स्ट्रेस आला

रेवाला चक्कर आली, परत धावपळ झाली,

" आधी हॉस्पिटल मध्ये चला, संदीप रेवाच फूल चेक अप करा, सीमालाही दाखवून देवू ",... रोहन

" सर मी ठीक आहे, मी प्रिया मॅडम सोबत थांबते ",... सीमा

ठीक आहे...

गाड्या हॉस्पिटल कडे निघाल्या

रोहन विभा रणजित संदीप राकेश हॉस्पिटलला गेले

प्रिया सीमा इंस्पेक्टर सावंत पोलिस स्टेशनला गेले

" तुला काय वाटतय सीमा, कोण असेल ती मॅडम?, तिचा आमच्या फॅमिली शी काय संबध? ",... प्रिया

"माहिती नाही मॅडम , आता त्या गुंडाना पकडल आहे उद्या होईल त्यांची चौकशी",... सीमा

" हो आपली ही होईल चौकशी",.. प्रिया....