Login

मृगजळ... भाग 24

माझं काही खरं नाही आहे आता इथे, कधी डॅडी मम्मा संदीप भेटतील की नाही? हे लोक माझं काय करतील माहिती नाही, पण आपल्याला असा विचार करून चालणार नाही, संदीप ने काय सांगितलं काहीही संकट आलं तरी पॉझिटिव्ह रहा



मृगजळ... भाग 24

©️®️शिल्पा सुतार
..............

बॉस रेवा संदीपशी बोलून बाहेर आला, आधी या दोघांना वेगवेगळ्या रूम मध्ये शिफ्ट करा, त्यात ते अर्धे गळून जातील, नंतर संदीपला कामाला लावू आपण, म्हणजे काही रिस्क असेल तर तर पोलिस संदीपला धरतील,

" त्या पोरीला दुसरीकडे शिफ्ट करा बॉस, या एरियात आपण जास्त वेळ राहिलो तर लगेच सापडून जाऊ आपण, त्या संदीपला इथेच राहूद्या, तुम्ही पोरीला घेऊन निघा इथून",.... गुंड

" हो तसेच करतो मी पण बाहेर पोलिस गस्त घालत असतिल, आता पर्यंत समजल असेल त्यांना अपहरणाची बातमी, लगेच निघण रिस्की आहे ",.. बॉस

बॉसच्या फोनवर त्याच्या बॉसचा म्हणजे मॅडमचा फोन येत होता,.. " काय चाललं आहे तिकडे? मुल आले का शुद्धीवर ",.

"हो आले आहेत शुद्धीवर आणि मी संदीपला सांगितल आहे फोन करायला रोहन साहेबांना , लवकर मिळतील पैसे आपल्याला ",...

" लगेच फोन नका करू, घाई नको करायला ",.... मॅडम

" पण त्या साठी धरल आहे ना त्या रेवाला? ",... बॉस

" हो पण घाई करून काय होणार आहे, ती पोरगी महत्त्वाची आहे आपल्यासाठी, आधी त्या पोरीला सुरक्षित स्थळी हलवा आणि लगेच पैशासाठी फोन करू नका, एक दोन दिवस तरी आपल्याला त्या पोरीला लपून ठेवाव लागेल, तेव्हा ते लोक घाबरून जातील आणि भरपूर पैसे देतील",... मॅडम

" ठीक आहे मॅडम मी लगेच करतो सगळं ",.. बॉस

"त्या पोरीला काही होता कामा नये, फक्त धमकी देत रहा की आम्ही काहीही करू शकतो, त्या संदीपला आधी वेगळे करा तिच्यापासून, त्याला धमकी द्या की रेवा सोबत काहीही होऊ शकत म्हणजे तो घाबरून जाईल, आपल्याला मदत करेन, असे भरपूर पैसे मिळू शकता",... मॅडम

"माझ पेमेंट कधी करताय मॅडम",.. बॉस

"हो देते लवकर पैसे",.. मॅडम

"इकडे खर्च खूप आहे, बरेच मुल लावले आहेत कामाला",... बॉस

"एवढ्यांची गरज नसेल तर उद्या थोडे कमी करा",.. मॅडम

"धोका खूप आहे मॅडम लागतील एवढे मुल",.. बॉस

"ठीक आहे मी करते पैशाची व्यवस्था, पण तुम्ही घरचे लोक असे करतात, फायदा आपलाच आहे ना यात ",... मॅडम

"हो ग ताई", ... बॉस

" आता कस बोललास, अरे पैसे जपून वापर आपल्याला लागतील ",... मॅडम

हो....

" या गुंडांवर पैसे उधळायला पण एवढी मोठी रिस्क घेतलेली नाही",.. मॅडम

" हो बरोबर आहे ताई, उद्या मी थोडे लोक कमी करतो ",... बॉस

.........

रूम मध्ये रेवा संदीप दोघ काळजीत होते

" कसला गेम? काय प्लॅन होता संदीप तुझा? काय प्रकार आहे हा? कोण आहेत हे लोक? का किडनॅप केल आपल्याला? हे लोक ओळखतात का तुला? मला सगळ नीट सांग, तो माणूस काय म्हणत होता",... रेवा

संदीप काही बोलला नाही..

"संदीप मी काही तरी विचारते आहे, काही प्रोब्लेम आहे का?, प्लीज सांग ना, मला खूप काळजी वाटते आहे ",... रेवा

"रेवा सगळ सांगणार आहे मी तुला, माझी चूक झाली आहे, थोडा वेळ दे, आधी इथून कस निसटता येईल हा विचार करतो आहे मी, आपल्याला खूप धोका आहे इथे, तू काळजी करू नकोस, गुंड आहेत ते, काहीही बोलतात, माझ्यावर विश्वास आहे ना? ",... संदीप

" हो आहे संदीप ",... रेवा

" मी तुला काहीही होवू देणार नाही, सुरक्षित घरी सोडेन मी तुला ",.. संदीप

" पण का किडनॅप केलं आहे आपल्याला ",... रेवा

" पैशासाठी वाटत",.. संदीप

" कोण करत आहे हा सगळा प्रकार ",... रेवा

" तेच तर माहिती नाही आता समजेल लवकर",... संदीप

" किती भयानक लोक आहेत हे तुला का मारलं? मला अजिबात आवडलं नाही ते, लागल का जास्त ",... रेवा

" हे बघ रेवा मी जे सांगतो ते नीट ऐक, काही होऊ शकत इथे, अजिबात धीर सोडायचा नाही, ज्या परिस्थितीत आहोत तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा, काहीतरी क्लू सापडतोच, स्वतःला सोडवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा",... संदीप

" हो संदीप, पण तू आहेस ना माझ्या सोबत",... रेवा

" मी तुझ्या सोबत असो किंवा नसो तू धीर सोडू नकोस, सगळे तुझ्या सुटकेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत, तू पॉझिटिव रहा",.... संदीप

रेवा आता चिंतेत होती, किती विचार करतो आहे संदीप माझा, खूपच चांगला आहे हा, पण त्याला उगाच मारलं त्या माणसाने, किती गाल लाल झाला आहे त्याचा, मला खूपच काळजी वाटते आहे आता..

रेवा प्रेमाने संदीप कडे बघत होती, संदीप विचार करत होता काय करता येईल? रोहन साहेबांना फोन करू तेव्हा आम्हाला कुठे ठेवलं आहे आहे हे लगेच सांगून देऊ म्हणजे ते लगेच पोलिस घेऊन येतील, पण हे बॉस आणि इतर गुंड एवढे साधे नाहीत, रोहन साहेबांनी घाई करायला पाहिजे जेवढा उशीर होईल तेवढे हे लोक अजून वेग वेगळे प्लॅन रचतील, माझ जाऊ दे पण रेवा हा सगळा प्रकार पहिल्यांदा बघत असेल, आई कशी असेल घरी तिला किती काळजी वाटत असेल माझी एक तर नवीन घरात तिला करमणार नाही, ती गेली तर नसेल ना जुन्या घरी वापस? तिकडे धोका आहे, काय करू? राकेश कुठे आहेस तू?

हा सगळा काय प्रकार आहे हे जेव्हा रेवाला समजेल तेव्हा ती एवढच प्रेम करेल का माझ्या वर, मी ही आधी गुंडाच्या बाजूने होतो हे जेव्हा तिला समजेल तेव्हा काय होईल, ती बोलणार नाही माझ्याशी, पण रेवा खूप प्रेम करते माझ्यावर, नुसत मला मारल त्या लोकांनी तरी तिच्या डोळ्यात पाणी होत, मीच विश्वास घात केला होता तिचा , पण आता मी प्रामाणिक आहे, रेवा शी.... आमच्या नात्याशी... मला रेवा सोबत रहायच आहे.

दोन स्ट्रॉंग गुंड आत आले, संदीप रेवा एकमेकांना कडे बघत होते, त्यांनी संदीपला खुर्ची सकट उचलल, संदीप ओरडत होता... काय प्रकार आहे हा..... सोडा मला,..... प्लीज सोडा मला... ते संदीप ला रूम बाहेर नेत होते

रेवा रडायला लागली, रेवा रडू नको स्ट्रॉंग रहा, मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव रेवा.... चान्स मिळाला तर इथून पळून जा, माझ्यासाठी थांबलात बसू नको... रेवा..... रेवा....

संदीपला बाजूच्या रूम मध्ये घेवून गेले , रेवा प्रचंड घाबरली होती, संदीप..... संदीप... ती ओरडत होती, कुठे नेता आहेत याला, थांबा हो... सोडा त्याला
संदीप.... कुठे नेल याला, माझ्यासोबत थांब संदीप , मला खूप भीती वाटते आहे, रेवा आता त्या रूम मध्ये एकटीच होती, ती हात सोडवायचा प्रयत्न करत होती, दोर घट्ट होता

संदीपला बाजूच्या रूम मध्ये नेल,... "मला का आणल इथे? तिकडे रेवा एकटी आहे, बापरे बॉस काही करणार तर नाही ना रेवाला? मला बॉस शी बोलायच आहे, प्लीज बोलवा त्यांना, आत्ताच्या आता",..

दार बंद झाला संदीप त्या खोलीत एकटा होता, रेवा बाजूच्या खोलीत एकटी होती, ती खूप घाबरली होती दोघ रडत होते,

कुठे गेला संदीप? थोड्या वेळा पूर्वी त्या घाणेरड्या माणसाने त्याला मारल, माझ्या कडे कसा बघत होता तो, मला खूप भीती वाटते आहे, तो माणूस परत आत मध्ये येणार तर नाही ना, त्याने जर मला काही केलं तर? संदीपला त्या लोकांनी मारलं तर? डॅडी कुठे आहेस तू? कोण आहेत हे लोक? प्लीज सोडवायला ये मला आणि संदीपला.....

रेवाला आधी काही माहिती नव्हत हे सगळ त्यामुळे आता तिला टेन्शन यायला लागलं होत, नक्की काय झालं आहे, काहीतरी गडबड नक्की आहे , मी खूप मोठ्या संकटात आहे वाटत, डॅडी मम्मा प्रिया आजी किती काळजी करत असतील, कोणी केल असेल हे, मला घरी जायच आहे, सीमा कुठे आहे , बॉडी गार्ड आहे ना ती माझी, नेहमी काळजी घ्यायची माझी, तिला काही झाल तर नसेल ना ,

आता रेवाच्या रूमचा लाईट हि बंद झाला सगळीकडे अंधार झाला, काहीही दिसत नव्हत, रेवा अजूनच खूप घाबरून गेली होती, अंधारलेल्या खोलीत खुर्चीवर बांधलेली ती सगळी कडे बघत होती,

काय करू मी, खूप निराश झाली होती ती, डॅडी प्रिया मी खूप उर्मट सारखी वागली पूर्वी तुमच्याशी, या पुढे मी नीट वागेन, मम्मा तू किती दिवसानी आली आणि हे अस सुरू आहे आपल्याला नीट एकत्र राहता आल नाही, संदीप माझा प्रिय संदीप... कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात प्रेम आनंद मिळाला होता मला, पण हे अस झाल, काय करू मी, सुटकेचा मार्ग दिसत नाही,

संदीपच्या रूम मध्ये बॉस आला, येवून समोर बसला

"संदीप तू का केल अस?, आमचा जीव धोक्यात टाकला त्या लोकां सोबत" ,.. बॉस

"काय केल मी?",.. संदीप

"आमच्या विरुद्ध गेम खेळला तू त्या एजन्सीच्या लोकांसोबत, ते लोक तुला सोडणार नाहीत, मी पण नाही सोडणार तुला आता, तुला माहिती आहे ना मी काहीही करू शकतो तुझ्या सोबत, आणि तुझी ती रेवा तिला अशी गायब करेन ना, कधीच समजणार नाही तुला कुठे आहे ती ते, तुझी आई आमच्या ताब्यात होती तिकडे ही तू अस केल, तुला काय वाटल मला समजल नसेल काही, तुझ्या आईच्या बाबतीत तू आणि राकेश ने जे केल त्याची शिक्षा मी रेवाला देणार आहे आता ",... बॉस

"अस करु नका बॉस, मला माफ करा, तुम्ही म्हणाल ते करेन मी, रेवाला सोडा, किती पैसे हवेत ते सांग, मी प्रॉमीस करतो मी देईन तेवढे पैसे तुम्हाला",.. संदीप

"कुठून आणणार रे तू पैसे, अच्छा घर जावई होणार आता तू मोठ्या घरचा, मजा आहे तुझी, तुला अस वाटल एवढी श्रीमंत मुलगी बायको म्हणून मिळाली तर आयुष्य भर मजा आहे, कश्याला बॉसची साथ द्या ",... बॉस

" नाही बॉस अस नाही मी पूर्वी ही कधी अस काम केल नाही, माझ्या मनाला ते पटत नव्हत ",.. संदीप

" हो का खूप चांगला दिसतो आहेस तू",.. बॉस

" बॉस मला रेवाजवळ जाऊ द्या, ती एकटी आहे तिकडे, घाबरली असेल ती, उद्या सकाळी म्हणाल ते काम करेल मी , म्हणाल तेवढे पैसे मिळतील तुम्हाला, मी शब्द देतो",...संदीप

" शब्द तर तू मागे पण दिला होता की मी हे काम व्यवस्थित करेन, पण काय केलस तू? मधेच सांगितलं की मी काम करणार नाही ",.. बॉस

" माझी चूक झाली बॉस, प्लीज मला आणि रेवाला असे वेगळ ठेवू नका, माझं काही नाही पण रेवा घाबरली असेल",... संदीप

" अरे बापरे.. हो ना मी विचार केला नाही असा, नसेल एकटी तुझी रेवा, मी जातोच आहे आता तिच्या सोबतीला, तू काळजी करू नकोस अजिबात, म्हणूनच तर तुला या खोलीची शिफ्ट केलं आहे मी संदीप ",.... बॉस

" बॉस ऐकाना माफ करा मला, मला जे हवं ते करा वाटलं तर शिक्षा द्या पण रेवाला काही करू नका, तीच आयुष्य का खराब करत आहात तुम्ही? , खूप चांगल्या घरची आहे ती, कधी अस बघितल नाही तिने, लहान आहे ती प्लीज तिला काही करू नका, तुम्हाला पैसे हवे ना मिळतील ना तुम्हाला प्लीज तिच्या खोलीत जाऊ नका",.. संदीप

बॉस बाहेर आला, संदीप खूप घाबरला होता

बॉस ने मॅडमला फोन केला,..." केल त्या दोघांना वेगळ",

" रेवाला सुरक्षित स्थळी शिफ्ट करू या ",... मॅडम

" हो उद्या नेतो तिला दुसरी कडे आधी तिला लपवतो तळघरात",... बॉस

" आहे का तळघर तिथे ",.. मॅडम

" हो आहे मी पूर्ण बंगला बघून घेतला आहे काय काय आहे इथे ते" ,... बॉस

"जास्त कोणाला माहिती नाही ना या बाबत ",.. मॅडम

" नाही कोणाला शंका येणार नाही ",.. बॉस

दोन गुंडाने आता रेवाच्या रूममध्ये प्रवेश केला रेवा खूप घाबरली होती,..." काय हवंय तुम्हाला ? का आले आहात इथे?",...

त्यांनी रेवाला उचलं आणि तळघरात येऊन बंद केलं

अतिशय अंधारलेली अशी खोली होती ती, जुन मोडकतोडक सामान सगळीकडे ठेवलेलं होतं, रेवा खूपच घाबरून गेली होती, ती सगळीकडे नजर टाकत होती, छोटा डीम लाईट एका कोपऱ्यात लावलेला होता, दोन-चार तुटलेले कपाट एका रांगेत ठेवलेले होते,

माझं काही खरं नाही आहे आता इथे, कधी डॅडी मम्मा संदीप भेटतील की नाही? हे लोक माझं काय करतील माहिती नाही, पण आपल्याला असा विचार करून चालणार नाही, संदीप ने काय सांगितलं काहीही संकट आलं तरी पॉझिटिव्ह रहा आणि यातून बाहेर कसं निघायचं ते बघायला पाहिजे, हळूहळू हात सुटता आहे की नाही हे तिने बघितलं, आधीपेक्षा आता तो दोर बराच सैल झाला होता, बघू काय करता येईल ते...

सीमाच्या एजन्सी चे लोक आले होते मदतीला, ते प्लॅन करत होते, राकेश रोहन एका बाजूला बसुन बोलत होते, त्याचे मित्र आले होते, रोहनने बोलावलेले एजन्सीची लोकही आलेले होते, पोलिसही बऱ्यापैकी होते, सगळे आता त्या बंगला कडे जाणार होते

" प्रिया विभा रणजित मी या लोकां सोबत जाऊन येतो" ,... रोहन

"मी पण येते आहे रोहन",.. प्रिया

"नाही प्रिया तू घरी जा, तिकडे धोका आहे" ,... रोहन

"मी तुला एकट नाही सोडू शकत रोहन आणि जर तिथे रेवा सापडली तर तिला गरज लागेल माझी",.. प्रिया

" त्यासाठी मी आहे प्रिया, तुला जायची काही गरज नाही, मी आई आहे तिची",... विभा

"विभा प्रिया तुम्ही प्लीज भांडण थांबवणार आहात का? काय सुरू आहे समजत ना, दोघीजणी घरी जा, घरी आई एकटी आहे ",... रोहन चिडला होता

" नाही आम्ही नाही जाणार ",... विभा

"तिकडे धोका आहे तुम्हाला येता येणार नाही ",... रोहन

आम्ही येऊ,...

" ठीक आहे काहीही करा.. आता इथे अजून वेळ घालवून उपयोग नाही, चला लवकर, गाडीत बसा तुम्ही, रणजित कुठे गेला? ",... रोहन

" तो काय फोन वर बोलतो आहे",... विभा

" कोणाशी बोलतो आहे तो? ",.. रोहन

काय माहिती?...

सगळेच आता बंगल्याकडे जायला निघाले होते.....

.......

कथा संपत आली आहे, वाचकांचे खूप आभार....

🎭 Series Post

View all