मृगजळ... भाग 23

आता तो बॉस रेवा कडे वळाला, तसा संदीप अस्वस्थ झाला, तो रेवा जवळ आला, त्याने रेवाला वरुन खालून बघितल, तशी रेवा खुर्चीत जराशी मागे सरकली, ती संदीप कडे बघत होती, चेहर्‍यावर भीती होती तिच्या



मृगजळ... भाग 23

©️®️शिल्पा सुतार
..............

राकेश रिसेप्शन मध्ये उभा होता, तो संदीपची चौकशी करत होता

"तू संदीपला ओळखतो का?",.. इंस्पेक्टर सावंत

"हो मी संदीपचा मित्र राकेश, संदीप फोन नाही उचलत आहे, मी पार्टी साठी आलो आहे",... राकेश

रोहन आला मागून, ... "राकेश... राकेश ना तू?? घात झाला, रेवा संदीप दोघ गायब आहेत",

"म्हणजे बापरे",.. राकेश

"बर्थडे पार्टी झाली , आणि मी आलो तेव्हा पासून रेवा संदीप गायब आहेत ",.. रोहन

" डेंजर आहे हे ",.. राकेश

" हो आपल्या सगळ्यांना उशीर झाला यायला, बर्थडे झाला आणि मूल गायब झाले, रेवा संदीप सापडत नाही, तू बघ ना काही मदत होते का ",.. रोहन

" हो सर ",.. राकेश

इंस्पेक्टर सावंत राकेश कडे संशयाने बघत होते,..." कोण आहे हा रोहन साहेब?, याचा काय संबंध या केस शी?, हा कसा काय करणार मदत? ",

" याचा काहीही संबध नाही केस शी, हा संदीपचा मित्र आहे आणि इथे वाढदिवसाला आला होता, हा आपल्याला मदत करू शकतो, बघ ना राकेश जरा",.. रोहन

" मदत करू शकतो म्हणजे काय? , काय प्लॅन आहे तुझा राकेश?, तू ओळखतो का गुंडांना? ",.. इन्स्पेक्टर सावंत

राकेश रोहन कडे बघत होता..

" नाही तो नाही ओळखत, हे बघा इन्स्पेक्टर साहेब आता संदीप आणि रेवा गायब झाले आहेत, ह्याला काही माहिती आहे का ते मी बघतो आहे, तुम्ही प्लीज त्याला माहिती काढू द्या",.. रोहन

"ठीक आहे ",.. इन्स्पेक्टर सावंत

ते दोघ बाजूला गेले..

राकेशने बॉसला फोन केला... त्यांच्या फोन स्विच ऑफ़ होता

"फोन बंद आहे",.. राकेश

" बघ ना अजून कोण आहे का सोबत तिकडे? तुला माहिती असते ना प्लीज",.... रोहन

" सर मी विचार करतो आहे, काय करता येईल",... राकेश

राकेश फोन मध्ये काहीतरी शोधत होता, त्याने बाजूला जावून एक फोन केला, तो फोन झाला लगेच त्याने परत एक फोन केला, तो फोन वाजत होता पण कोणी उचलत नव्हत, हा तिथे आहे म्हणजे फोन उचलत नाही तर,..
" सर हा नंबर ट्रेस करता येईल का? फास्ट... हा मुलगा नक्की बॉस सोबत आहे" ,

हो...

"इंस्पेक्टर साहेब हा नंबर ट्रेस करा लवकर",... रोहन

सावंत साहेब राकेश कडे संशयाने बघत होते.... याला कुठे तरी पाहिल आहे मी....

पटकन.... सावंत साहेब

हो.... इंस्पेक्टर सावंत यांनी तो नंबर पुढे पाठवला

"लगेच थोड्या वेळात लोकेशन मिळेल",....

"सर लोकेशन आल आहे का? जास्तीच पोलिस बोलवावी लागेल आपल्याला",.. राकेश

"आटपा ना भरभर",... रोहन

"तुम्हाला कंप्लेंट करावी लागेल की काय आहे मॅटर, का लागता आहेत एवढे लोक",... इन्स्पेक्टर सावंत

"चालेल करून टाकू कंप्लेंट",... रोहन

" सध्या मी माझ्या इथले लोक बोलवतो आहे ",... राकेश

" हो करा फास्ट ",.. रोहन

राकेश बाहेर उभ राहून फोन लावत होता,

रोहन त्याच्या जवळ गेला,..." कोण आहे हा बॉस? ",..

" माहिती नाही साहेब, आम्हाला फोन करून काम सांगतात",... राकेश

" ते मेन आहेत का?",... रोहन

" नाही त्यांची कोणी बॉस आहे म्हणे.. लेडी बॉस",... राकेश

" लेडी बॉस म्हणजे?",... रोहन

"कोणी तरी बाई आहे ती घडवते आहे हे सगळ",... राकेश

"तुला कस माहिती ",... रोहन

"मला बॉस ने सांगितल, चांगल्या घरची आहे ती बाई या शहरात रहाते म्हणे ",... राकेश

रोहन विचारात होता लेडी बॉस म्हणजे कोण असेल? सगळे माझ्या प्रिया कडे बोट दाखवता आहेत, नाही नाही अस होवु शकत नाही, प्रिया स्वार्थी नाही, एकदम साध्या घरातून आली आहे ती, तिला पैशाची हाव नाही, तीच तर मालकिण आहे या इस्टेटीची, तिला काही गरजच नाही असे उद्योग करायची, कोण असेल मग? कोण आहे ती स्त्री? तिचा माझा काय संबंध काय? का ती रेवाच्या आणि आमच्या इस्टेटच्या मागे आहे, म्हणजे कोणी तरी ओळखीची व्यक्ति आहे, रोहन एक एक नातेवाईक आठवत होता, डोक फुटायची वेळ आली आहे, रेवा सापडायला पाहिजे एकदाची

प्रिया कार मध्ये बसलेली होती, ती सीमाशी बोलत होती, सीमाने तिच्या एजन्सीच्या दोन तीन लोकांनाही इथे मदतीला बोलावलं होतं, ते केव्हाचे निघाले होते, जे झालं त्यात ती स्वतःलाच दोष देत होती,

प्रिया तिला समजावत होती,... "जे झालं ते झालं, आता एवढ टेन्शन घेऊ नको, या मागे कोणी दुसर आहे ज्याला रोहनचे पैसे हवे आहेत असे लोक, ज्यांना आयुष्यभर काहीच काम करायचं नाही, त्यांना काही येत ही नाही, रोहनने दिलेल्या पैशावर त्यांचं पुढचं प्लॅनिंग आहे",..

प्रिया रणजीत कडे बघत होती, सिमाला ते समजलं

" एक सांगू का प्रिया मॅडम, मला ही असंच वाटतं आहे यामागे नक्की रणजीत सर आहेत",... सीमा

" हो मलाही तेच वाटतं आहे, पण आपल्या दोघींना वाटून काय उपयोग, ते आपल्यावरच आळ आणता आहेत, आत्ता या क्षणी मला अटक झालेली आहे, आणि तुला ही चौकशी साठी बोलवलं आहे, जेणेकरून रोहन एकटा पडेल आणि त्याला आपली मदत मिळणार नाही, कारण आपल्या दोघींचा रोहनला स्ट्रॉंग सपोर्ट आहे",... प्रिया

"हो मॅडम मला हि तेच वाटत आहे, काय करायचं आता आपण? ",... सीमा

"मी तोच विचार करते आहे, काहीही करून आपण रणजीतच पितळ उघड पाडल पाहिजे",... प्रिया

विभा रणजित हॉटेलच्या गार्डन मध्ये खुर्चीवर बसले होते

" पुढे काय रणजित? अजून प्रियाला अटक झाली नाही? कधी समजेल रेवा कुठे आहे ते? तू बघ ना रोहनला विचारून, तो आपल्याशी बोलतच नाहीये, सारखा आपल प्रियाचं सांत्वन करायला जातो आहे तो ",.. विभा

"हो ते पहिल्यापासूनच आहे, आपल्याशी नेहमी तो तुटक वागतो तो , थांब मी त्याला बोलवतो ",.. रणजित

रोहन.... रोहन

रोहन विभा बसली होती तिकडे गेला,

" अजून प्रियाला कशी अटक झाली नाही रोहन? तुला काही रेवाचा विचार आहे की नाही ",..विभा

"प्रियाला अटक होवुन काय होणार आहे विभा? , तिने काही केल नाही, तू उगीच गैरसमज करून घेतला आहे, शांत डोक्याने विचार कर विभा, प्रिया अस करु शकत नाही, तिच्यावरील केस मागे घे" ,.... रोहन

" मुळीच नाही घेणार मी केस मागे , प्रिया चांगली नाही, तुम्हा लोकांना रेवाची एवढी काळजी होती तर रेवा कशी झाली किडनॅप? शिवाय तुम्ही तिच्या सिक्युरिटी साठी काही केल नाही, ती बॉडीगार्ड काही उपयोगाची नाही वेळेवर तीच बेशुद्ध होती, ती काय संरक्षण करणार आहे रेवाच, तुम्हाला कधीच माहिती होतं ना की काहीतरी धोका आहे, म्हणून तर तू बॉडीगार्ड तिच्या मागे ठेवला होता तरी व्हायचं ते झालं ",.. विभा

" हे बघ आता आपण भांडत बसण्याची वेळ नाहीये विभा, तुला जर एवढंच वाटतं रेवा विषयी मग तू का नाही सांभाळल तिला आधीपासून, का तिची जबाबदारी झटकली तू, तुला तर स्वतःचं स्वतंत्र हवं होतं",... रोहन

" तू जर मला असं बोलशील तर माझ्याकडे पण खूप मुद्दे आहे रोहन",.. विभा

" सांग ना काय आहे ते मुद्दे, तुला भांडणच करायचं आहे ना, तुझी संगतच चुकीचे आहे विभा, हेच काम करतो का तू रणजीत? आमच्यात भांडण लावायचं काम, एकदा रेवा सापडू दे मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो मी विभा, पण तोपर्यंत जरा शांत राहा, अजून मुश्किल वाढवू नको, आणि तू हे प्रियाशी वागते आहे ते चुकीच आहे विभा, मला अजिबात आवडलं नाही , काय रे रणजित हे तुझ काम आहे ना? तू भडकवत असतो विभाला नेहमी, हे अस चांगल नाही समजल का ",... रोहन चिडला होता

इन्स्पेक्टर सावंत रोहन कडे बघत होते दोघ उठून बाहेर आले हवालदार इतर लोक आले होते

तेवढ्यात राकेशच्या फोन वर संदीपच्या आईचा फोन आला..." राकेश अरे संदीप अजून घरी आला नाही, तो फोन उचलत नाही, कुठे आहे तो? ",..

" काकू आम्ही बर्थडे पार्टीला आलो आहोत, माझ्या मित्राचा बर्थडे होता, आम्ही उद्या सकाळी येतो घरी, तुम्ही काळजी करू नका, इथे रेंज नाही फोन ला",.. राकेश

"मला इथे नवीन घरी करमत नाही, तू सकाळी लवकर संदीपला पाठवून दे ",.. सुरेखा ताई

" हो काकू तुम्ही काळजी करू नका आणि घर सोडून कुठेही जाऊ नका, कोणाला दार उघडू नका नाही",.. राकेश

" काही काळजी सारखं नाही ना रे राकेश? ",.. सुरेखा ताई

" नाही काकू सगळं ठीक आहे",... राकेश नी फोन ठेवला त्याने मुद्दामच संदीपच्या आईला काही सांगितलं नाही

मगाशी ज्या मुलाला राकेश ने फोन केला होता त्याचा फोन आला तो बॉस सोबत होता

"कुठे आहेस तू?",.. राकेश

"मी इकडे आहे बंगल्यावर तू नाही का या केस मध्ये",..

"नाही काय झाल?",.. राकेश

"संदीप आणि एका श्रीमंत पोरीला धरल आहे",..

"कुठे आहे तुम्ही लोक",.. राकेश

"आम्ही ते अण्णाच्या बंगल्याच्या पुढे सुनसान जागी एक घर आहे तिकडे आहोत",..

"ठीक आहे",.. राकेशने पटकन रोहनला बोलवलं, सीमा ही आली, त्याने सांगितला पत्ता, आपल्याला घाई करायला पाहिजे...

" हो अजून लोक लागतील आपल्याला, पोलिस येतं आहेत अजून" ,.... रोहन

"हो माझे ही एजन्सीचे लोक येतील अर्धा तासात" ,... सीमा

"माझ ही मित्र येतील ",.. राकेश
....

रिसॉर्ट पासून थोड्या दूर अंतरावर एक जुना बंगला होता, झाडांनी वेढलेला, खाली चार पाच गुंड पहारा देत होते, आत बॉस अजून एका गुंडा सोबत बसुन बोलत होता, आले का ते दोघ शुद्धीवर, काय आहे पुढचा प्लॅन आता,

" बघाव लागेल बॉस ते दोघ शुद्धीवर आले का ते",..

"त्या संदीपला चांगला धडा शिकवणार आहे मी ",.. बॉस

बंगल्याच्या वरच्या बेडरुम मध्ये रेवा संदीप यांना खुर्चीला बांधल होत, ते दोघ थोडे शुद्धीवर आले होते, बाहेर बरेच लोक पहार्यावर होते,

बंगल्याची देखरेख करायला एक जोडपं होतं, त्यांना नेमकं आत काय चालल आहे हे माहिती नव्हतं, ते त्यांच काम करत होते, नेहमी हा बंगला कोणीतरी भाड्याने घ्यायचं त्याप्रमाणेच चार-पाच दिवसासाठी हे लोक आले आहेत असं त्यांना वाटत होतं

थोड्या वेळाने रेवाला नीट जाग आली, जरा डोळे उघडून तिने बघितलं, कुठे आहे आपण? ही तर आपली रूम दिसत नाही , बाजूला संदीपला बांधलेल होत, तो रेवा कडे बघत होता, ती नीट उठून बसली, हात का बांधले आहेत माझे, लागतोय दोर खूप, संदीप मला खूप भूक लागली आहे , अजून आपण पार्टीसाठी रिसॉर्ट मध्येच आहोत का? काही कळायला मार्ग नव्हता,

"संदीप आपण कुठे आहोत, आपल्याला का बांधल आहे" ,... रेवा

संदीप काही बोलला नाही..

"माझ खूप डोक दुखत आहे संदीप, कुठे आहोत आपण?, मला काहीतरी हव आहे, पाणी आहे का?",... संदीप बोल ना काही तरी,

"आपल्याला किडनॅप केल आहे रेवा",... संदीप

"म्हणजे,.. बापरे, कोणी केल किडनॅप ",.. रेवा

" माहिती नाही",..संदीप

मूर्ख पणा झाला आहे सगळा, प्लॅन फ्लॉप झाला, काय करू आता मी? , कोणी आहे का तिकडे जो मदत करेन मला, काही अजून संकट नको यायला, नशीब मला रेवाला सोबत ठेवल जर रेवाला अजून दुसरीकडे पळवून नेल असत तर, काय केल असत मी?, रोहन साहेब करत असतिल प्रयत्न, आई काय करत असेल, ती वाट बघत असेल...

दाराचा आवाज आला, एक माणूस आत आला, संदीप रेवा एकमेकांकडे बघत होते, खूप उंच माणूस होता तो, त्या माणसाने आत येवून संदीपच्या थोबाडीत एक चापट लावली

रेवा जोरात ओरडली... "काय करताय? का मारता आहात याला? काय प्रकार आहे हा?",...

Shut up... बॉस ओरडला,... रेवा घाबरून शांत बसली

संदीपला समजल की हाच बॉस आहे, त्याने आवाज ओळखला होता, बॉसने मास्क घातला होता, संदीप अंदाज लावत होता कोण आहे हा?, कधी बघितल का याला

"आमच्याशी चाल खेळली का तू संदीप? आम्ही पंचवीस वर्षापासुन हे काम करतो आहोत, तेव्हा तुझा जन्म नव्हता झालेला, कसा गेम वळवला मी",.. संदीप

आता तो बॉस रेवा कडे वळाला, तसा संदीप अस्वस्थ झाला, तो रेवा जवळ आला, त्याने रेवाला वरुन खालून बघितल, तशी रेवा खुर्चीत जराशी मागे सरकली, ती संदीप कडे बघत होती, चेहर्‍यावर भीती होती तिच्या, बॉस ने तिच्या गालावर हात फिरवला, रेवा प्रचंड चिडली होती, तिने मान झटकली, don\"t touch me i said,...

"काय काम आहे बॉस माझ्याशी बोला, रेवाला सोडा",.. संदीप

"रेवाला सोडून काय करणार आहे, तीच मेन आहे, नाही तर तुला किडनॅप करून काय मिळणार आहे आम्हाला, हे बघा मुलांनो शांत रहायच, अजिबात गडबड नको, नाही तर तुला माहिती आहे संदीप मी काय करू शकतो ते" ,... बॉस

पण काहीही म्हणा तुझी रेवा खूप सुंदर आहे, एकदम बाहुली सारखी, खूप प्रेम आहे वाटत तुमच एकमेकांवर, अगदी एकाला मारल तरी त्रास दुसर्‍याला होतो,

आता बॉस संदीप जवळ आला, त्याच्या कानात बोलला लवकर रोहनला फोन कर पैशासाठी, नाही तर तुझी रेवा कधी माझी होईल तुला ही समजणार नाही, कळल का मी काय म्हणतो ते, देतो जरा वेळाने फोन आणून, लगेच कामाला लाग.... पैसे हवे आहेत मला


🎭 Series Post

View all