©️®️शिल्पा सुतार
..............
..............
मागच्या सीट वर सीमा बेशुद्ध होती , डॉक्टर आले लगेच त्यांनी सीमा आणि ड्रायव्हर काकांना चेक केल, बॅगेतून इंजेक्शन काढून दोघांना दिल...
दोन मिनीटांनी सीमा थोडी उठली,
"सीमा... सीमा... उठ उठ",.. रोहन
"थोडा धीर धरा तुम्ही सगळ्यांनी ती उठेल",... डॉक्टर
डॉक्टरांनी तिला उठवल
ड्रायवर काका उठले
"काय झालं काका तुमच्या दोघांवर हल्ला झाला का? रेवा कुठे आहे",... प्रिया
"मॅडम तुम्ही इथे काय करता आहात ? कुठे काय झालं? सगळ ठीक आहे, रेवा मॅडम पार्टी साठी आत आहेत",.. ड्रायवर काका
" सीमा उठ, अग काय झाल तुला माहिती का सीमा, डॉक्टर ही का नाही उठत",... प्रिया
" उठेल पाच मिनिटात , औषध स्ट्रॉंग आहे ",.. डॉक्टर
इंस्पेक्टर सावंत रोहन आत गेले, आत कुठे पार्टी सुरू होती मॅनेजरने दाखवल, आत एक रूम दाखवली त्यात रेवाची बॅग पडली होती, रोहनने ती बॅग स्वतः जवळ घेतली, रोहनला एकदम रडायला आल,
इंस्पेक्टर सावंत जवळ आले, त्यांनी रोहनच्या खांद्यावर हात ठेवला,..." धीराने घ्या साहेब, आपण करू काही तरी" ,
"कुठे असेल हो माझी रेवा, काय झालं असेल इथे, मी उगीच तिला इथे पाठवल",.. रोहन
सिक्युरिटी एजंट वाले लोक आले तोपर्यंत, त्यांचे जे दोन लोक बेशुद्ध होते त्यांनाही डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, ते लोक उठून बसले
"काय झालं होतं इथे? ",.. रोहन
"पार्टी नीट सुरू होती आम्ही संदीप आणि रेवा कडे लक्ष देऊन होतो दोन मिनिटं हि त्यांना दृष्टीआड केलं नाही माहिती नाही पण काय झालं आम्हाला झोप लागली",..
"किडनॅप करणारे हुशार दिसता आहेत, बघू काय करता येईल आता, तुम्ही काळजी करू नका",... इंस्पेक्टर सावंत याना फोन आला, ते बरच वेळ बोलत होते,... ठीक आहे
" काय झाल इंस्पेक्टर साहेब ",.. रोहन
" चेक नाक्यावर गाड्या चेक करायला सांगितल्या आहेत ",.. इंस्पेक्टर सावंत
"किती लांब आहे इथून चेक नाका",.. रोहन
" पंधरा मिनिटावर आहे, संशयास्पद गाडी पास झाली नाही अजून पण तिथून",... इंस्पेक्टर सावंत
"म्हणजे ते लोक इथे आजुबाजूला असतिल, दोन तीन किलोमीटर वर सगळे जुने नवीन घर हॉटेल शोधायला सांगा",... रोहन
"हो, तेच बोललो मी त्यांना चौकशी सुरू केली आहे, तुमचा कोणावर संशय आहे का? ",... इंस्पेक्टर सावंत
नाही...
इंस्पेक्टर सावंत फोन वर इन्स्ट्रक्शन्स देत होते..
काही क्लू लागत नव्हता नेमक रेवा गेली कुठे? ते लोकं किडनॅप करून रेवा आणि संदीप ला कुठे घेऊन गेले, सीसीटीव्ही कॅमेरे यातही काही नव्हत नक्की कसे गायब झाले? नशीब संदीप तरी आहे रेवाच्या सोबत
सगळे बाहेर आले सीमा थोडी शुद्धी वर येत होती
"सीमा काय झालं इथे उठ सीमा?, नीट सांग",.. रोहन
सीमा थोडी उठली,... "काही झाल नाही सर सगळ ठीक आहे, तुम्ही सगळे इथे कसे?",..
"रेवा कुठे आहे" ,... रोहन
सीमा थोडी उठली, अचानक उठून उभी राहिली, तशी ती खाली पडली, सगळे तिला पकडायला धावले
बाजूला नेवून सीमाला बसवल
" सीमाला खूप स्ट्रॉंग डोस दिला आहे वाटतं औषधांचा",.. रोहन
" हो तसंच वाटत आहे कारण ती खूप अलर्ट असते ना ती बेशुद्ध होणे महत्वाचं होतं, नशीब काही झाल नाही तिला",... इंस्पेक्टर सावंत
आतुन कॉफी आली सीमा ने कॉफी पिली, प्रिया तिच्याजवळ बसलेली होती
"सीमा काय झालं इथे आठवत असेल तर सांग खूप उशीर होतो आहे आता बराच वेळ झाला रेवा किडनॅप होऊन",.. प्रिया
" मला काही आठवत नाही,.. सीमा
"सिमाला आराम करु द्या, तिला लगेच काही आठवणार नाही बहुतेक, तिला काही माहिती नाही वाटत ",... इंस्पेक्टर सावंत
सीमाला थोडं बरं वाटत होतं आता
"प्रिया मॅडम बाकीचे मुल कुठे आहेत? ",...सीमा
"प्रोग्राम संपून बराच वेळ झाला सीमा, काय झालं तू आणि ड्रायवर काका बेशुद्ध कसे झाले",.. प्रिया
मला काही आठवत नाही, रेवाने सांगितल ती दहा मिनिटात येते आहे, आणि मग हॉटेल मधुन पाणी आला चहा नाश्ता आला , मी पाणी घेतल ड्रायवर काकानी नाश्ता केला , बाकी सगळे खात होते मी खाल्ला नाही, सेफ वाटल नाही, पण बहुतेक पाण्यात काहीतरी होत, चुक झाली माझी मॅडम, मी अलर्ट रहायला हव होत, उगीच पाणी पील",.. सीमा
" ठीक आहे काळजी करू नकोस",... प्रिया
" पुढे काय आता ",.. सीमा
" शोध घेता आहेत हे सगळे ",... प्रिया
" सीमा निष्काळजी पणाची हद्द झाली, आम्ही तुला अटक करू शकतो , पोलिसां सोबत राहा आता, नंतर चौकशी साठी तुला याव लागेल पोलिस स्टेशनला आणि पोलिसांना सांगितल शिवाय तुला कुठे जाता येणार नाही",..... इंस्पेक्टर सावंत
सीमा रोहन कडे बघत होती,... " माझी चूक झाली रोहन सर मी उगीच पाणी पिल मी बघते काय करता येईल ते ",..
" ठीक आहे इंस्पेक्टर साहेब सीमाला बोलण्यात काही अर्थ नाही, तिचा दोष नाही, आता मला मला रेवाची सगळ्यात जास्त काळजी आहे, पुढे काय करूया",.... रोहन
सीमा ने फोन केला कोणाला तरी,... "मला इकडे मदत लागेल दोन तीन लोकांना पाठवा लगेच ",
हो..
" रोहन सर... प्रिया मॅडम तुम्ही घरी जा आता इथे या रिसॉर्ट वर काही नाही मध्ये दोन तासात ते लोक व्यवस्थित लपले असतिल उद्या सकाळी येईल त्यांचा फोन जर पैशासाठी पळवलं असेल तर",... इंस्पेक्टर सावंत
"आम्ही जाणार नाही चला आपण रेवाला शोधू इथे बसुन काही होणार नाही ",... रोहन
" याचा उपयोग नाही रोहन साहेब, उद्या सकाळी काम होईल, मी करतो आहे रात्रभर चौकशी तुम्ही कश्याला जागता, जा घरी, काही समजल तर सांगतो मी ",.. इंस्पेक्टर सावंत
" मी परत एकदा आत बघून येतो, मी करतो चौकशी आणि शोधण्याचा काम, इंस्पेक्टर साहेब मी तुमच्या सोबत राहीन",... रोहन
रोहन इंस्पेक्टर सावंत आत गेले त्यांची रूम पार्टी हॉल डायनिंग रूम दाखवली, बाजूला एक बाल्कनी होती तिथे इंस्पेक्टर सावंत गेले, दोन चॉकलेट पडलेले होते एक कागद ही होता, त्यांना ते उचलून पिशवीत टाकलेl, बाकीचे हॉल आणि डायनिंग रूम मध्ये फारसा काही सापडलं नाही, सगळ आवरुन साफ करून ठेवल होत, त्या रिसॉर्ट स्टाफ चा काय दोष ते पार्टी झाली की आवरता ते फास्ट घरी जायच असत त्यांना
इंस्पेक्टर सावंत जावून मेन कुक ला भेटले, ..... "काय विशेष मागणी केली होती का कोणी केल होत बर्थडे पार्टीच रिझर्वेशन कोणी केलं होतं? बिल कोणी भरल?",..
ते ऑफिस मध्ये गेले.. सर हॉल संदीप ने बूक केला होता कॅश मध्ये, काल कॅश दिली त्यांनी
"एवढी कॅश घेता तुम्ही?",.. इंस्पेक्टर सावंत
"हो सर आम्हाला लागतात पैसे, कॅश बरी पडते",..
" बूकिंग हिस्ट्री बघितली, बूकिंग संदीपच्या नावावर होत, पत्ता कॉलेजचा दिला होता",..
"अस चालत का? घरचा पत्ता दिला नाही त्यांनी",.. रोहन
"हो सर नाही तरी बूकिंग चार तासाच होत, पार्टी छोटी होती दहा लोकांची",..
"कोण कोण आल होत काही लिस्ट वगैरे ",.. इंस्पेक्टर सावंत
" नाही सर बर्थडे पार्टी होती जास्त कोणी लक्ष दिल नाही",..
ठीक आहे..
सगळे निघणारच होते तेवढ्यात विभा आत आली, तिच्यासोबत रणजीत ही होता, ती सरळ रोहन जवळ आली,...." कुठे आहे रेवा? काय प्रकार आहे हा? तुम्ही सगळे इथे काय करत आहात? काय ग प्रिया तू काय करते आहे इथे? तुला बरं माहिती होतं की इथेच रेवाची पार्टी होती?",..
इन्स्पेक्टर साहेब आले तोपर्यंत बाहेर...
"इन्स्पेक्टर साहेब कुठे आहे माझी मुलगी रेवा? मला आत्ताच्या आत्ता रेवा हवी आहे ",.... विभा रडत होती
प्रिया तिला सावरायला गेली, तिने प्रियाला झटका मारला,..." या प्रियाला अटक करा आधी इंस्पेक्टर साहेब, हीच आहे जिने माझ्या मुलीला किडनॅप केल आहे, तिला नको होती रेवा आधीपासून, शेवटी तिने तिचा मतलब साधला, माझ्या छोट्याश्या मुलीला गायब केलं आहे हिने" ,.. विभा तोंडाला येईल ते बोलत होती खूप चिडली होती ती
रोहन मध्ये आला,..." काय बोलते आहेस विभा तू? शांत राहा जरा, प्रियाला नव्हतं माहिती इथे पार्टी आहे, तू तिच्यावर कशाला आरोप करते",
" तू गप्प रहा रोहन, तुला प्रिया मध्ये कधीच काही दोष दिसत नाही, इथे माझ्या मुलीवर एवढं मोठं संकट आले आहे, तरी तुला प्रियाची बाजू घ्यायची आहे का? पुरे झाल आता, या सगळ्यामागे प्रियाच आहे, हे घ्या इंस्पेक्टर साहेब मी येतांनाच प्रिया विषयी पोलीस कम्प्लेंट केली आहे, तिला आत्ताच्या आत्ता अटक करा इन्स्पेक्टर साहेब",... विभा
इन्स्पेक्टर साहेबांनी पोलीस कंप्लेंट केलेला पेपर व्यवस्थित बघितला, आय एम सॉरी रोहन साहेब पण मला प्रिया मॅडमला अटक करावी लागेल....
" पण मला काहीही माहिती नाही इन्स्पेक्टर साहेब, मी सुद्धा तेवढ्याच शॉक मध्ये आहे, रेवा माझी पण मुलगी आहे, मला काळजी आहे तिची, मी का किडनॅप करेल तिला? , इतर वेळी तर रेवा माझ्यासोबत होती, जर मला रेवाला काही करायचं असतं तर मी आधीच केल असत ना, एवढ रिसॉर्टवर कशाला घेऊन आली असती मी तिला, कित्येक वेळा घरी आम्ही दोघी एकट्याच होतो, माझ्या पासून काहीही धोका नाही रेवाला, मी इनोसंट आहे, काहीही बोलते आहेस तू विभा",... प्रिया
" हो का तुला एवढी काळजी आहे का रेवाची? मग तु या येथे रिसॉर्टवर अशी अचानक कशी काय आली ",... विभा
" मी रोहनच्या मागे आली होती इथे, मला माहिती नव्हतं रोहन काय करतो आहे, तो दोन-तीन दोन दिवसापासून वेगळाच बिझी होता, काहीही सांगत नव्हता, मी बघायला आली होती की नक्की रोहन कुठे चालला आहे, मला रोहनची काळजी वाटत होती ",... प्रिया
इन्स्पेक्टर साहेब रोहन कडे बघत होते
" बरोबर बोलते आहे प्रिया तिला काही माहिती नव्हतं यातलं ",.. रोहन
" तरीपण चौकशीसाठी मला तुम्हाला अटक करावी लागेल प्रिया मॅडम ",.. इंस्पेक्टर सावंत
" काय गोंधळ चालला आहे हा सगळा? ",... रोहन चिडला होता, आपण असा इथेच वेळ घालवणार आहोत का? आता पर्यन्त किडनॅपर व्यवस्थित लपले असतिल , आपण आपापसातले भांडण विसरून आधी रेवाला कसं शोधायचं याविषयी विचार करू",..
प्रिया आता रडायला लागली, रोहन ही सुन्न होवुन बसला होता, रोहन प्रिया जवळ आला, ..... "प्रिया सांभाळ स्वतःला ",..
" विभा कसं बोलू शकते मला, शेवटी मी सावत्र आई आहे हेच सांगितलं तिने, माझं किती प्रेम आहे रेवावर आणि मला तिची किती काळजी वाटते हे तिला कधी समजणार? मी खरं सांगते रोहन मी काहीही केलेलं नाही, माझी एकच चूक झाली की मी तू कुठे चालला आहे हे बघायला तुझ्या पाठीमागे आले, मी असं नव्हतं करायला पाहिजे",... प्रिया
" मला सगळं माहिती आहे प्रिया तू खरं बोलते आहे, मी समजावतो विभाला आणि माझी पण चूक झाली आहे, मी तुला खरं आधी सांगायला पाहिजे होतं की मी रेवा बाबतीत काही तरी प्लॅन करतो आहे, त्या सिक्रेट एजन्सी वाले लोकांनी सांगितलं की ही गोष्ट कोणाला म्हणजे कोणाला सांगू नका म्हणून मी तुला सांगितलं नाही विभा ला सांगितलं नाही",... रोहन
" जाऊदे आता झालं ते झालं आता पुढे काय करायचं आहे? रेवाला शोधा लवकर ",.. प्रिया
हो...
" मी तुझी जामीन करतो लगेच don\"t worry प्रिया ",.. रोहन
" माझ जाऊ दे रोहन, तू रेवा सापडते का ते बघ आधी, मी दोन दिवस जेल मध्ये राहिली तर काही फरक पडणार नाही",... प्रिया
" विभा रणजितच्या बोलण्यात आली आहे ",... रोहन
" हो समजल ते मला, रणजित ने भडकवल आहे तिला रस्त्यात, मला माहिती आहे पण मी निर्दोष आहे, कोणी काहीही बोले ना I don\"t care, तुझा माझ्यावर विश्वास आहे हे खूप महत्वाचं आहे माझ्या साठी रोहन",... प्रिया
दोघ बोलत होते तेवढ्यात तिथे राकेश आला, तो रोहनला ओळखत नव्हता, तो सरळ आत रिसॉर्ट मधे गेला, आत कोणी नव्हत, तो रिसेप्शन मध्ये गेला,.." इथे बर्थडे पार्टी सुरू होती ना? , कुठे गेले ते लोक? ",..
" कोणाची पार्टी काय नाव? ",..
संदीपची बर्थडे पार्टी
इंस्पेक्टर सावंत मागे उभे होते... कोण हवय तुम्हाला?...