Login

मृगजळ... भाग 20

संदीप ने पत्र खिश्यात ठेवून दिल तो खूप खुश होता , त्यांने रेवाला मिठी मारली, त्याच्या मिठीने रेवा भारावुन गेली होती, कोणी तरी तिथुन पास झाल, संदीप सोड मला, आता कोणीतरी तिकडून बघत होत आपल्या कडे,


मृगजळ... भाग 20

©️®️शिल्पा सुतार
..............

दुपारचं जेवण झालं होतं, सुरेखाताई नुसत्या बसल्या होत्या, सुटकेची त्यांनी आशा सोडली होती, काय माहिती संदीप कधी भेटले आता मला, त्यांच्या डोळ्यात पाणी होत

जरा वेळाने बाहेर गाडी थांबली, त्यांनी पत्र्याच्या आडून बघितलं, राकेश आलेला होता, त्यांना खूप आनंद झाला राकेशला बघून, सुटकेची आशा होती, पण राकेशनेच मला इथे आणून सोडलं आहे, त्यामुळे माहिती नाही तो मला सोडवायला आला आहे की अजून काही संकटात टाकायला,

राकेश त्या लोकांशी काहीतरी बोलत होता, त्यातल्या एका गुंडाने कोणाला तरी फोन लावायला हातात घेतला, राकेशने फोन त्याच्या हातातून फोन घेवून खाली ठेवला, त्या गुंडाने राकेशशी भांडायला सुरुवात केली, राकेश काहीतरी बोलत होता, तो गुंड नाही नाही बोलत होता, आता राकेशने त्या गुंडाला पैसे दाखवले, दोन मिनिट ते गुंड काहीतरी बोलत होते, परत त्यांनी नकार दिला,

आता खूपच मारामारी सुरू झाली होती, अचानकच गाडीतून अजून सात आठ जण उतरले, त्यांनी त्या दोन गुंडांना धरून ठेवलं, राकेश इकडे-तिकडे धावत होता, तशा सुरेखाताई पटकन किचनमधून बाहेर आल्या,

"चला काकू लवकर गाडीत जाऊन बसा" ,... राकेश

सुरेखाताई पळत जाऊन गाडीत बसल्या, ड्रायव्हरने गाडी वळवली, त्या सात-आठ लोकांनी दोघं गुंडांना किचनमध्ये कोंडलं, खुर्चीला बांधून ठेवलं, त्यांचे मोबाईल फोन घेतले, डायरी खिशातील कागद पत्र सगळ घेतल, सोबत लॅण्ड लाईन ही कापून ते फोन सोबत घेतले, आता त्यांना तिथे कोणताही फोन नव्हता बॉसला काॅन्टॅक करायला, फोन नंबर ही नव्हता, सगळे गुंड पळत गाडीत बसले, गाडी वेगाने शहराकडे निघाली, सुरेखा ताईंना गाडी निघाल्यावर बरं वाटलं,

राकेश त्यांच्याकडेच बघत होता, सुरेखा ताई राकेश कडे बघत होत्या, खूप समाधान वाटत होत त्यांना

"काकू मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आला असेल, काम तस केल मी, मला माफ करा, खूप मोठी चूक झाली माझी, मी तुम्हाला इकडे गुंडाकडे सोडल",.. राकेश

"काही हरकत नाही, सोडवायला ही तूच आलास, संदीप कुठे आहे? कसा आहे तो? लागल होत का त्याला त्या दिवशी?",... सुरेखा ताई

"नाही काकू मी खोट बोललो होतो तुमच्याशी, संदीप ठीक आहे ",... राकेश

"काय काम करता आहात तुम्ही मुल हे अस? , किती धोकादायक आहे हे, संदीप ही सामील आहे का तुमच्यात? ",.. सुरेखा ताई

राकेश काही बोलला नाही,..." संदीप कॉलेज ला गेला आहे काकू ",..

" तो का नाही आला? नक्की काय सुरु आहे त्याच? तो ही संकटात सापडला आहे का? नीट सांग राकेश",.. सुरेखा ताई

"नाही काकू अस काही नाही, तुम्ही फोन करा त्याला",... राकेशने फोन वरून संदीपला फोन केला

संदीप कॅन्टीन मध्ये होता राकेशचा फोन बघून तो बाजूला गेला,.. "बोल राकेश झाल का काम? ",

" मी आई बोलते आहे ",.. सुरेखा ताई

" आई तू कशी आहेस? आई कुठे आहेस तू आता?",..संदीप हळवा झाला होता

"मी राकेश सोबत आहे, घरी जाते आहे मी गाडीत आहे",.. सुरेखा ताई

" आई मी काय सांगतो ते ऐक, एका नवीन घरी तुला आता जाव लागेल, राकेश तुला एका फ्लॅट मध्ये सोडेल तिथे थांब तू",.. संदीप

" आपल्या जुन्या घराला काय झाल? ",.. सुरेखा ताई

" तिथे धोका आहे ",.. संदीप

" कसला धोका? ",.. सुरेखा ताई

" आई मी सांगतो नंतर ",.. संदीप

"काय सुरू आहे तुमच्या मुलांच? मला भिती वाटते आहे संदीप, तू केव्हा येतो आहेस घरी? ",.. सुरेखा ताई

" आई आज रात्री येईन मी नाही तर उद्या ",.. संदीप

" का? कुठे असणार तू संध्याकाळी? ",.. सुरेखा ताई

" काम आहे थोड",.. संदीप

"संदीप खरं सांग काय काम करतो आहेस तू हे? काही धोका आहे का?",.. सुरेखा ताई

"आई मी घरी आलो की सांगतो ना सगळं",.. संदीप

"ठीक आहे पण संदीप काही धोकादायक काम करू नकोस, मला तुझ्या शिवाय कोणी नाही आयुष्यात, नेहमी चांगल वागव रे", ,... सुरेखा ताई

"नाही आई हे शेवटच काम त्या नंतर मी तू म्हणशील तेच करेन मी",.. संदीप

राकेश कडे दे ना फोन....

" राकेश आईला एखादा फोन देवून दे तिकडे फ्लॅट वर पोहोचले की फोन कर ",.. संदीप

" हो काही काळजी करू नकोस ",.. राकेश

कॉलेज संपलं, सगळे रिसॉर्ट कडे जायला निघाले,

" चल रेवा माझ्यासोबत ",.. संदीप

" नाही मी माझ्या गाडीने येते आहे",.. रेवा

"अरे मग तुझी गाडी पण सोबत येउदे ना आपल्या मागे, तू चल माझ्या सोबत ",... संदीप

" मला सीमाला विचारावे लागेल, कारण मी आमच्याच गाडीत बसेन म्हणून मला डॅडने परवानगी दिली आहे बड्डेला, नाहीतर तू असं कर तू सुद्धा आमच्या गाडी ने चल",... रेवा

" नको मी याच गाडीत बसतो तू ये तुझ्या गाडीने आमच्या मागे मागे येत असू दे तुझी गाडी ",.. संदीप

"हो ते ठीक राहील, नाहीतर सीमा पर डॅडींना कम्पलेट करेन ",... रेवा

रेवा तिच्या गाडीत जाऊन बसली

सीमाने रोहनला मेसेज केला,.." आम्ही निघालो आहोत रिसॉर्टला जायला आणि रेवा आणि तिची मैत्रीण श्रुती आपल्या गाडीत आहेत माझ्या सोबत",..

" ठीक आहे लवकर निघा तुम्ही सगळे be alert, रेवा सोबत रहा मी येतो तिकडे थोड्या वेळाने",... रोहन

हो...

लक्ष दे सगळीकडे...

रोहन प्रियाच्या केबिन मध्ये गेला,..." मी आज जरा लवकर घ जात आहे प्रिया ",..

" माझ ही झाल आहे काम चल मी पण येते ",.. प्रिया

"नाही मी घरी जात नाही, थोड काम होत, बाहेर जात आहे मी ",... रोहन

" मी येवू का सोबत? ",.. प्रिया

"मीटिंग आहे, नवीन क्लायंट सोबत, तू बोर होशील मी जावून येतो",... रोहनला वाईट वाटत होत खोट बोलायला

" ठीक आहे लवकर ये मग ",.. प्रिया

हो...

रोहन निघाला ऑफिस मधून, प्रियाने पटापट आवरल, तिने दुपारी टॅक्सी बूक केली होती, ती पटकन कार मध्ये येवून बसली, ड्रायवर लवकर त्या गाडी मागे सुरक्षित अंतर ठेवून चला, पिछा करा ती कार डोळ्याआड होवू देवू नका,

"ठीक आहे मॅडम ",..

रोहनने गाडीतून सिक्रेट एजन्सी ला फोन लावला,.. "मी निघालो आहे रिसॉर्ट वर जायला" ,

"आमची माणस आहेत तिकडे",..

"ठीक आहे be alert, माझ्या रेवाला काही व्हायला नको",.. रोहन

प्रियाची टॅक्सी रोहनच्या कारच्या मागे होती, हळू हळू गाडी गावाबाहेर जात होती, कुठे चालला आहे नेमका रोहन? काय आहे हे प्रकरण? रोहनला समजल मी अशी चोरून त्याच्या मागे येते आहे तर तो नाराज होईल, पण मला जाणून घ्यायच आहे की नक्की काय सुरु आहे त्याच? , कोणाला भेटायला असा हा गावाबाहेर जातो आहे, पूर्वी अस कधी वागला नाही तो,

"मॅडम अजून किती पिछा करायचा आहे त्या गाडीचा? आता सिटी संपली पैसे जास्त होतील ह",.. टॅक्सी ड्रायवर

"होवू दे मी देईन तुम्हाला पैसे काळजी करू नका तुम्ही",... प्रिया

संदीप सकाळ पासून रेवाला विचारत होता माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, रेवा त्या गाडीत होती, संदीपने तिला मेसेज पाठवला.... काही तरी तर बोल रेवा? माझा बर्थडे गिफ्ट कुठे आहे? ,

तो मेसेज बघून रेवा खूप लाजली होती...

संध्याकाळी मी तुला होकार देणार आहे संदीप, रेवा मनातल्या मनात विचार करत होते अतिशय सुंदर घड्याळ त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं होतं ते तिने ते परत एकदा नीट आहे का ते बघितल, मी त्याच गाडीत जायला हव होत उगीच इथे सीमा सोबत आहे मी, आज एवढा स्पेशल दिवस आहे संदीप साठी, त्याच्या सोबत राहायच होत मला,

राकेशचा फोन आला,.. "आईला फ्लॅट वर सोडल आहे, कोणाला माहिती नाही ते ठिकाण, इतर मुलांना नाही नेल तिथे पर्यंत",..

"बर झाल आईला सांगितल ना काहीही झाल तरी बाहेर पडू नकोस तिथून अस",.. संदीप

हो सांगितल..

"तू येतो आहेस ना रिसॉर्ट वर राकेश, मला मदत लागेल तुझी",.. संदीप

"हो मी येतो आहे ",.. राकेश

" बॉसला फोन कर ना काय प्लॅन आहे त्यांच्या विचार, त्यांना माहिती नसेल आपण दोघ मिळालेलो आहे अस ",... संदीप

" हो नाही माहिती त्यांना मी करतो बॉसला फोन",.. राकेश

" मला सांग प्लॅन त्यांचा ",.. संदीप आता खुश होता आई सेफ आहे

थोड्या वेळाने राकेशचा फोन आला,.." बॉस फोन उचलत नाही मी नंतर प्रयत्न करतो, तू अलर्ट रहा",.

हो...

सगळे रिसॉर्टला पोहोचले, रेवा श्रुती आपल्या बॅग घेवून आत गेल्या सीमा ही आली मागे, एक रूम मध्ये मुलींनी कपडे बदलले, आजूबाजूच वातावरण नॉर्मल वाटत होत

रेवा तयार होवुन बाहेर आली, खूप सुंदर दिसत होती ती व्हाइट गाऊन मध्ये, संदीप तिच्या कडे बघत बसला, दोघ हॉल मध्ये आले,

वाढदिवसाला सुरुवात झाली, छोटासा हॉल छान सजवला होता, सुंदर म्युझिक वाजत होत, सगळे फ्रेंड्स खूप खुश होते, भला मोठा केक होता, संदीप सारखं रेवा कडे बघत होता,... "चल रेवा केक कापायला",.

"अरे संदीप पण वाढदिवस तुझा आहे तू काप केक",.. रेवा

तरी संदीप मी ऐकलं नाही, पुढे होऊन त्याने रेवाचा हात धरला आणि त्या तिला टेबल कडे घेऊन आला, दोघांनी मिळून केक कापला, सगळे खूप आनंदात होते, दोघांनी एकमेकांना केक भरवला

डान्स सुरू झाला, संदीप तिच्या अगदी जवळ होता, खूप स्पेशल फिलींग होती ती, रेवा वेगळ्याच दुनियेत होती, खूप खुश होती ती , संदीप आपण अस सोबत रहायला हव कायम,

पण संदीप टेंशन मध्ये होता, नेमकं काय होणार आहे आता इथे ? कुठे आहेत ते सीक्रेट एजन्सीचे लोक? इथे कोणी दिसत नाही, सपोर्ट साठी फक्त सीमा आहे, बघू जे होईल ते, रेवाला काही व्हायला नको, प्लॅन नीट वर्क व्हायला पाहीजे, मी रेवा शिवाय नाही राहू शकत, रिस्क आहे, काळजी वाटते आहे,

तो पर्यंत पार्टी एन्जॉय करू...

"सांग ना रे वा माझ्या प्रश्नाचे उत्तर?", ... संदीप

रेवा छान लाजत होती..

सीमा लांबून बघत होते की व्यवस्थित बर्थडे पार्टी सुरू आहे

रोहनने बघितल ट्रेकिंग डिवाइस प्रमाणे दाखवले लोकेशन वरच रेवा आहे, अजून अर्ध्या तासात मी तिथे पोहोचेन, लवकर निघायला हव होत, त्याने सीमा ला मेसेज केला" ठीक आहे ना सगळ?",

"हो सर ठीक आहे, तुम्ही लवकर या",.. सीमा

ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड साठी हॉटेलमधला नाष्टा बाहेर आला आणि सीमा ने सांगितलं की ती नाही खाणार, ड्रायव्हर काकांनी चहा घेतला बिस्किट खाल्ले

सीमा गाडीत बसलेली होती, तिने रोहनला मेसेज पाठवला, ऑल ओके सर आता पर्यंत ठीक आहे सगळ

" तुम्ही पण घ्या ना थोडा चहा" ,... ड्रायव्हर ने आग्रह केला

सीमाने यावेळी नाही सांगितल,..

घ्या हो काका थोडा चहा, श्रीमंत लोकांच्या पार्टी लवकर संपत नाही, उशीर होईल घरी जायला, घ्या हो मॅडम,..... दुसरा ड्रायवर आग्रह करत होता

सीमा ने काहीही खाल्ल नाही....

सगळ्या ड्रायवरचा नाश्ता चहा झाला , नाश्ता ची प्लेट तिथे ठेवून, वेटर आत गेला, सीमा ने बघितल बाकीचे ड्रायवर खरोखर नाश्ता करत होते, तरी नको रिस्क घ्यायला

सीमा ने पाणी मागितल आतून, पॅक बॉटल आली पाण्याची,

मॅडम आत बसा ना

सीमा आत जावून बसली

"चला जेवून घेवू आपण",.. सगळे जेवायला गेले, संदीप रेवाच्या मागे मागे होता

संदीप मी पटकन थोड खाते, सीमाचा फोन येतो आहे निघाव लागेल

हो चालेल,..

अरे अजून कोणी आल नाही इथे, बॉस ही नाही एजन्सीचे लोक नाही, रोहन सर नाही काय करू मी?

" रेवा मला तुझ्याशी थोड बोलायच आहे, जाण्या आधी" ,.... संदीप

संदीप सहेतुक रेवा कडे बघत होता तिला समजल ते, ती लाजली होती,

संदीपने रेवाचा हात हातात घेतला,... "रेवा प्लीज बोल ना काही तरी",..

रेवा शांत होती

"रेवा मला माहिती नाही तू माझ्या बद्दल काय विचार करतेस, काही तरी बोल, माझा बर्थडे अजून स्पेशल कर ना मला कायम लक्ष्यात राहील असा",... संदीप

प्रेम वगैरे काय असत मला माहिती नाही संदीप पण मला तुझ्या सोबत खूप छान वाटत, तुझ्या सोबत असतांना मी खूप खुश असते, तुझी कंपनी मी एन्जॉय करते, घरी गेली तरी मी तुझा विचार करते संदीप, मला आवडेल तुझ्या सोबत राह्यलाय, रेवाने त्याला घड्याळ गिफ्ट दिल आणि लेटर ही दिल

"काय आहे लेटर मध्ये",.. संदीप

"इथे नाही घरी जावून वाच",... रेवा

संदीप ने पत्र खिश्यात ठेवून दिल तो खूप खुश होता , त्यांने रेवाला मिठी मारली, त्याच्या मिठीने रेवा भारावुन गेली होती, कोणी तरी तिथुन पास झाल, संदीप सोड मला, आता कोणीतरी तिकडून बघत होत आपल्या कडे,

संदीप घाबरला बॉस आला वाटत

जेवण झाल सगळे रूम कडे येत होते,

"संदीप मी कपडे बदलून येते",.. रेवा

"नको रेवा नको जाऊ तू कुठे",.. संदीप

संदीपला माहिती होत खूप धोका आहे, काहीही होवु शकत, तो घाबरला होता, खूप तहान लागली होती त्याला, मनात वाईट विचार येत होते,

अरे आली मी पाच मिनिटात मला फ्रेश व्हायच आहे

संदीपचा नाईलाज झाला,..

रेवा श्रुतीने जावून कपडे बदलले

संदीप ने बाहेरून बॉस ला फोन केला,.. "झाला बर्थडे आता पुढे काय?",

"सांगतो थोड्या वेळाने",.. बॉस ने फोन ठेवला

संदीप ने रोहनला फोन लावला,... "कुठे आहात तुम्ही लोक?, इथे कोणी दिसत नाही ",

"मी रस्त्यात आहे येतो आहे",.. रोहन

लवकर या..

"काही प्रॉब्लेम आहे का?, रेवा कडे लक्ष दे ",.. रोहन

" मला भिती वाटते आहे सर ",.. संदीप

हो आलोच मी....

संदीप बाहेर बसुन रेवाची वाट बघत होता रेवा आली,

"आता निघू या आपण संदीप ",.. रेवा

संदीप ला सुचत नव्हत काय कराव

समोर पाण्याच्या बॉटल होत्या, त्याने घटाघटा पाणी पिल लगेच रेवा ने पाणी पिल

आणि अचानक रेवाला संदीपला कसतरी व्यायला लागल रेवाला चक्कर आली, ती बेशुद्ध झाली ,... रेवा .. रेवा.... संदीपला धुसर दिसत होत तो ही चक्कर येवून पडला.....