©️®️शिल्पा सुतार
..............
..............
संदीप ने बॉस ला फोन केला..
"कुठे गेला होतास तू संदीप, मी एक तासापासून फोन करतो आहे तुला",... बॉस
"मी मावशी कडे गेलो होतो, आई घरी नाही तर करमत नाही, बॉस आईला सोडा मी तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे ना आता, प्लीज, आईचा काय दोष आहे? तिला का अशी शिक्षा देताय?",... संदीप
"मी तुझ्या पार्टी साठी रिसॉर्ट बूक केला आहे उद्या साठी आता घाई करायला पाहिजे आपण, एकदा प्लॅन डिसकस करून घेवू आपण काय करायच ते फिक्स हव ",... बॉस
" तुम्ही ऐकताय का मी काय म्हणतोय ते, आई ला कधी सोडताय",.. संदीप
" संदीप एकदा काम झाल की मिळेल तुला तुझी आई, काळजी करू नकोस, आपल आधी झाल आहे ना या बाबतीत बोलण",.. बॉस
संदीप नाराज होता, एकदाच काम करून टाकू यांच, पण आईला धोका आहे, जर मी रेवाला यांच्या ताब्यात दिल त्यांनी आईला परत केल नाही तर काय करू कुठे शोधू आईला?, काही तरी करायला हव
"बॉस आईला बघितल्या शिवाय मी रेवाला तुमच्या कडे देणार नाही ",.. संदीप
" तू का काळजी करतो एवढी संदीप? तुझी बर्थडे पार्टी सुरू असली की तुझी आई घरी आलेली असेल, वाटल तर तेव्हा व्हीडीओ कॉल करुन चेक कर तू",.. बॉस
" ठीक आहे, पण रिसॉर्ट मी बूक करणार होतो ना बॉस? ",.. संदीप
" कोणी बूक केल तर काय फरक पडतो, काय आहे तुझा प्लॅन आता ",.. बॉस
" बॉस बर्थडे झाला की मी रेवाला तुमच्या ताब्यात देईन, पण तुम्ही काय करणार आहात रेवाला किडनॅप करून?",.. संदीप
"त्याच्याशी तुझा काही संबध नाही संदीप",.. बॉस
" मला समजल पाहिजे बॉस",.. संदीप
" कश्याला? , तू तुझ काम कर",.. बॉस
" मी संकटात सापडलो आहे, पुढे काय होणार हे माहीती नसेल तर मी नाही काम करणार हे, तुम्ही मला अर्धा प्लॅन सांगता आहात ",.. संदीप
" मी तुला प्लॅन सांगायच ठरल नव्हत आपल काही, फक्त तू रेवाला माझ्या ताब्यात द्यायच अस ठरल होत, सगळा प्लॅन मी सांगणार नाही, हे जमणार नाही",.. बॉस
" मी हे काम करणार नाही मग, तुम्ही माझ काही ऐकत नाहीत ",.. संदीप
"तुला माहिती आहे का काय बोलतो आहेस तू? याचे परिणाम काय होतील?",.. बॉस
"हो माहिती आहे परिणाम, प्लॅन काय आहे ते सांगा, नाही तर मी हे काम करणार नाही, मी तुमच्या कामाचा माणूस आहे, माझ्या इतक कोणावर विश्वास नाही रेवाचा, मी आता बोललो तरी ती मला भेटायला येईल, मी जे बोलेल तेच करते रेवा, पूर्ण माझ्या मुठीत आहे ती, बघा विचार करा, मी हे काम नाही केल तर परत सहा महिने थांबाव लागेल तुम्हाला आणि अजून एक सांगतो फक्त मला माहिती आहे रेवा काही वेळेस फॉरेनला गेली तर काय करणार तुम्ही",... संदीप
" ठीक आहे, मी रेवाला माझ्या बॉस कडे देणार आहे ",... बॉस
" कोण आहे तुमचा बॉस ",.. संदीप
" माहित नाही मला ही फोन वर इन्स्ट्रक्शन येतात",.. बॉस
" नंबर आहे का त्यांचा काही ",. संदीप
" हो आहे ",.. बॉस
" तो नंबर द्या ना मला ",.. संदीप
" नाही कश्याला हवा आहे तुला नंबर, असा देता येणार नाही ",.. बॉस
" मी पण आहे ना त्या प्लॅन चा हिस्सा मला ही माहिती हवी",.. संदीप
"काही गरज नाही त्याची, नको करू काम, अति होत तुझ संदीप, मी या पुढे तुला फोन करणार नाही, तुझी आई तुला कधी भेटणार नाही ",.. बॉस
संदीप घाबरला.. हे लोक काही ऐकत नाही, पण माहिती मिळाली असती तर बर झाल असत, सॉरी बॉस मी करतो काम तुम्ही आईला काही करू नका
" नाही काही नाही होणार आईला, मी शब्द पाळेन, तूही काम पूर्ण कर ",.. बॉस
संदीप ने फोन ठेवला तो रडायला लागला, खूप बेकार फसलो आहोत, बॉस काहीही झाल तरी आईला सोडत नाही काय करू, पुढचा प्लॅन काहीही समजला नाही, रेवाला धोका आहे, राकेशला माहिती आहे सगळ तरी तो सांगत नाही, राकेशला भेटायला पाहिजे
.......
.......
रात्रीच जेवण होवुन सुरेखा ताई बसल्या होत्या, त्या आता खूप कंटाळल्या होत्या, का पकडल आहे मला? , कोण आहेत हे लोक? , कधी घरी जाणार मी? , काय करू? संदीप तू कुठे आहेस? ,... त्या लोकांनी त्यांना खिचडीच सामान आणून दिल,.. भाऊ मला सोडा ना, काय कारण आहे? का पकडल आहे मला?, मला घरी जायच आहे,..
नेहमी प्रमाणे ते लोक काहीही बोलले नाही..
नाईलाजाने उठून सुरेखा ताईंनी खिचडी केली, त्यांची ही आणि त्या दोन लोकांची ही, जेवण झाल
का काही बोलत नाही हे लोक? अस मला इथे बसुन वेड लागेल आता, मला घरी जायच आहे...
बाहेर एक गाडी थांबली, दोन माणस उतरली, ते गुंडांशी काही तरी बोलत होते, त्यांनी त्यांना पैसे दिले, ते लोक काही तरी बोलत होते किचन कडे बघत होते जिथे सुरेखा ताई बसल्या होत्या,
माझ्या बाबतीत काहीतरी कट रचता आहेत की काय ते? काय करू? इथून निसटायला जागा नाही, ते लोक इकडे का बघता आहेत? त्यातला एक किचन कडे येत होता, सुरेखा ताईंनी उठून चाकू हातात घेतला, दार वाजल, काय करू? उघडू का दार? तुटलेले पत्र्या मुळे त्यांना त्या बाजूच सगळ दिसत होत, त्यांनी भीत भीत दार उघडलं,
"थोड जेवण आहे का ताई उरलेल, त्या लोकांना भूक लागली आहे",.. गुंड
"हो घेवून जा",.. सुरेखा ताई
सुरेखा ताईंनी उठून ताट वाढल, तो माणूस जेवण घेवून गेला
काय करू परत बोलून बघु का या लोकांशी? मला सोडा अस, ऐकतील का ते?, संदीप मला तुझी खूप आठवण येते आहे आणि काळजी ही वाटते आहे, माझ्या काळजीने अर्धा झाला असेल तो, गुंड बरे आहेत तसे, ते काही बोलत नाहीत फक्त कोंडून ठेवल आहे मला...
.........
.........
रोहन सीमा घरी आले, सीमा तिची गाडी घेवून घरी निघून गेली
रोहन रूम मध्ये आला, प्रिया काहीतरी लॅपटॉप वर काम करत होती
"कुठे मीटिंग होती तुझी रोहन? तू ऑफिस मध्ये नव्हता गेलास का?, बराच दमलेला दिसतो आहेस तू",.. प्रिया
"हो बाहेर होती मीटिंग",.. रोहन
"तुझ्या सोबत कोण होत गाडीत",.. प्रिया
"सीमा होती, तिला घरी जायच होत, तिला बस स्टॉप वर सोडल",.. रोहनने जे सुचेल ते सांगितल
"पण सीमा स्कूटर वर येते ना? आणि आता येतांना ही सीमा सोबत होती, काय झाल आहे रोहन? काही प्रॉब्लेम आहे का? तू खोट का बोलतो आहेस माझ्याशी?, तू सीमा सोबत होतास का इतक्या वेळ? ",.. प्रिया आता चिडली होती
" सॉरी प्रिया मी खरच खोट बोललो, मी सीमा सोबत मीटिंगला गेलो होतो, रेवाच्या सिक्युरिटी साठी होती एक मीटिंग ",... रोहन
" का काय झाल काही प्रॉब्लेम आहे का? ",.. प्रिया
" नाही ग पण ज्या एजन्सी तर्फे सीमा आली आहे ना तिकडे बोलवलं होत, सर्विस आवडते का वगैरे विचारत होते",.. रोहन
"अच्छा मग आधी का नाही सांगितल, माझ्या पासून का लपवुन ठेवल तू हे मीटिंगच",. प्रिया
" काही विशेष नाही ग यात कोणाला नाही सांगितल, विभाला ही नाही तुला ही नाही, नवीन बॉडी गार्ड घेणार आहोत रेवा साठी ",... रोहनने खोट सांगितल प्रिया ला, त्याला नव्हत आवडत खोट बोलायला, पण ही आजची मीटिंग रेवा साठी महत्त्वची होती, कोणालाच सांग यायच नव्हत प्लॅन
"काही धोका आहे का",.. प्रिया
" नाही पण आपण सावध राहिलेल बर, चल ना भूक लागली आहे खूप, जेवायला बसू", ... रोहन
रेवा आज अगदी वेळेच्या आधी डायनिंग रूम मध्ये उपस्थित होती, रोहन प्रिया खाली आले
"आई विभा चला जेवायला",.. रोहन
"हो आलेच मी, रेवा तू आजीला बोलव",.. विभा
हो... रेवा जावून सुलभा ताईंना घेवून आली
रोहन प्रिया टेबल जवळ बसले
"कसा होता आजचा दिवस रेवा",.. रोहन
" चांगला गेला नेहमी प्रमाणे कॉलेज लेक्चर झाले",... रेवा
"आज खुश दिसतेस तू",.. रोहन
"हो आता मम्मा इथे असते ना म्हणून मी खुश आहे",.. रेवा
जेवताना कोणी जास्त काही बोलल नाही, जो तो आपापल्या विचारात होत, प्रिया विचार करत होती रोहन नक्की काहीतरी लपवतो आहे आपल्या पासुन? , तो आणि सीमा सोबत कुठे तरी गेले होते सोबत, काय प्रकरण आहे हे? , नक्की रेवाची मीटिंग होती ही की आणखीन काही",
रोहन विचारात होता उद्याचा दिवस महत्वाचा आहे आपल्या साठी, सगळ नीट व्हायला पाहिजे, काळजी वाटते आहे,
विभा विचार करत होती.. संदीप बद्दल सांगायला पाहिजे आपण रोहनला, रेवा त्याच्या साठी गिफ्ट घेवून आली आहे अस, पण रोहन नेहमी बिझी असतो, ती प्रिया सदोदित त्याच्या मागे असते
संदीप चा मिस कॉल आला होता रोहनच्या फोन वर, तो पटकन जेवून फोन वर बोलायला बाहेर गेला
प्रिया बघत बसली त्याच्या कडे,.." काय चाललय रोहनच, अजिबात जेवणात लक्ष नाही, कोणाचा फोन होता डायरेक्ट बोलायला बाहेर गेला हा",.
" बोल संदीप ",.. रोहन
"सर आता मला बॉस चा फोन आला होता, मी त्यांना खूप विचारलं की पुढचा प्लॅन काय आहे? तर त्यांनी काही सांगितलं नाही, या बॉसच्या वरती ही अजून एक बॉस आहे आणि या सगळ्यांचा मिळून काय प्लॅन आहे ते काही सांगता येत नाही",.. संदीप
" बापरे हे धोकादायक आहे हे ",.. रोहन
"हो ना सर मलाही तीच काळजी वाटते आहे म्हणून मी तुम्हाला लगेच फोन केला",.. संदीप
" तुझ्या आई बद्दल काही समजलं का ",.. रोहन
"नाही अजून काहीच नाही समजल, त्यांना रेवा हवी आहे, मग ते आईला सोडतील ",.. संदीप
" कठीणच आहे सगळं आता काय आहे पुढे प्लॅन?, तू शक्य असेल तर तुझ्या आईला सोडवून घे, आपण त्यांना सुरक्षित जागी हलवू ",.. रोहन
" हो प्रयत्न करतो आहे मी, सर त्या लोकांनी आधीच रीसॉर्ट बुक केला आहे बर्थडे साठी",.. संदीप
" पण रिसॉर्ट आपण पण बुक करणार होतो ना",.. रोहन
" हो मी म्हटलं त्यांना तसं तर ते बोलले कोणीही बुक केलं तर काय फरक पडतो ",.. संदीप
"पण आपल्याला त्या सिक्रेट एजन्सीच्या म्हणण्यानुसार रिसॉर्ट बुक करायचं होतं ना ",.. रोहन
"हो मी सांगितलं त्यांना पण ते लोक आहे ऐकत नाही",.. संदीप
"ठीक आहे मी करतो पुढे सिक्युरिटी एजन्सीला फोन आणि मी तुला नंतर सांगतो काय करायचं आहे ते, उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे आपल्यासाठी",.. रोहन
" हो मी तुमच्या फोनची वाट बघतो ",.. संदीप
" त्या लोकांनी जे रिसॉर्ट बुक केला आहे त्याचा पत्ता इकडे पाठवून दे मग मी बघतो तिकडे काय करायचं ते ",.. रोहन
"सगळं नीट होईल ना सर? मला खूप भीती वाटते आहे माझ्यासोबत आई नाही रेवा नाही दोघींची सुरक्षा माझ्या हातात आहे ",.. संदीप
" होईल सगळ नीट तू काळजी करू नको",.. रोहन
रोहनने तिकडे सिक्युरिटी एजन्सी ला फोन लावला त्यांना आता संदीप काय म्हटलं ते सगळं सांगितलं, नवीन रिसॉर्टचा पत्ता त्यांना पाठवून दिला, आता सगळेच सज्ज झाले होते दुसऱ्या दिवसाच्या संदीप च्या बर्थडे पार्टीसाठी
........
........
रेवाला झोप येत नव्हती, उद्याचा दिवस कधी येईल अस झाल होत तिला बर्थडे चा नवीन ड्रेस खूप छान होता तिचा त्यावर मॅचिंग ज्वेलरी तिने रात्री शोधून ठेवली होती, बर्थडे साठी वेगळी बॅग घेतली होती, संदीपचा विचार करून रेवा लाजली होती, काय होणार आहे नक्की, श्रुती बोलते तस संदीप करेन का मला प्रपोज, मी हो बोलणार आहे त्याला, मला खूप आवडतो संदीप, मी घेतलेल घड्याळ त्याला आवडेल ना, परवा ही बोलला होता तो त्याला काहीतरी सांगायच होत मला, काय असेल ते,.. संदीप साठी मी एक छान लेटर लिहिल आहे, आवडेल ना त्याला ते, केव्हा देवू ते लेटर मी त्याला, केक कापल्या वर देईन.... विचार करत रेवा झोपली
संदीपने फोन लावला, तिकडून फोन उचलला गेला.. "बोल रे काय झाल संदीप",..
"बॉस मला पन्नास हजार रुपये द्या, आता कामाचे " ,.. संदीप
"काय रे एवढी घाई आधी काम तर कर",.. बॉस
"नाही बॉस मला पैसे हवे, बोलण झाल होत आपल, नाही तर मी रेवाला घेवून येणार नाही तिकडे",... संदीप
"रिसॉर्ट तर बूक आहे मग का लागता आहेत तुला एवढे पैसे",.. बॉस
" एवढे काय या पेक्षा जास्त काबूल केले आहेत तुम्ही, 2 लाख ठरल होत आपल आता शी तीस हजार मिळाले",.. संदीप
" पैसे काय पळून जाता आहेत का देतो",.. बॉस
" आता ट्रान्सफर करा I am serious, रिस्क मी घेतो आहे, आई माझी गायब आहे आणि आता पर्यंत खूप कमी पैसे दिले तुम्ही मला",.. संदीप
" हे बघ आता नाही उद्या देतो पैसे ",.. बॉस
" उद्या सकाळी पूर्ण उरलेले हवे मग 1 लाख 70 हजार ",..संदीप
"50% काम होण्याच्या आधी द्यायचे ठरले होते",.. बॉस
"ठीक आहे एक लाख तर द्या मग उद्या सकाळी नाही तर मी काम थांबवेन",.. संदीप
"नाही चालणार अस संदीप तुझी आई आमच्या कडे आहे",.. बॉस
"माहिती आहे मला ते, सारख सांगू नका आधी पैसे नाही तर मी काहीही करणार नाही",.. संदीप
"ठीक आहे मी 25,000 देतो आता बाकीचे काम झाल्यावर चालेल का",.. बॉस
" नाही एक लाख द्या संदीपच्या अकाउंटवर अर्ध्या तासात पन्नास हजार रुपये आले, बाकीचे उद्या देतो",... बॉस
ठीक आहे...
सकाळी संदीप ने मेसेज केला त्यांना , परत पन्नास हजार रुपये आले संदीपच्या अकाऊंट वर आता सत्तर हजार बाकी होते....
चला थोडे तर पैसे मिळाले बाकीचे बुडतील, आईला सुरक्षित ठिकाणी ठेवायला तिची सुटका करायला लागतील पैसे....