मृगजळ... भाग 17

राकेश चा चेहरा पडला होता, त्याला आठवत होत, मी अनाथ पण काकूंनी किती केल माझ, दिवाळी दसर्‍याला यांच्या कडे असायचो मी, कपडे सुधा घ्यायच्या काकू मला, वाढदिवस साजरा करायच्या आणि मी काय केल,



मृगजळ... भाग 17

©️®️शिल्पा सुतार
..............

रेवा कॉलेजला आली, संदीप आलेला होता, खूप चेहरा उतरलेला होता त्याचा

" काय झालं संदीप? काल असा अचानक कुठे चालला गेला तू? काही प्रॉब्लेम झाला होता का? ",... रेवा काळजी करत होती

"हो आईला बर नव्हत, डॉक्टरांकडे घेवून गेलो होतो",.. संदीप

"आता कश्या आहेत त्या? , काय झाल होत?",.. रेवा

"ठीक आहे आई" ,.. संदीपचा चेहेरा आईच्या आठवणीने रडवेला झाला होता

" तू काल काहीतरी सांगणार होता ना मला? , काय आहे ते? ",... रेवा

" सांगेन नंतर",... संदीप

" दोन दिवसानी तुझा बर्थडे आहे ना, काय झालं संदीप तू अजिबात खुश वाटत नाहीस ",.. रेवा

"मी ठीक आहे, हो.. बर्थडे च ठरवायचं होत",.. संदीप

सर आले लेक्चर सुरू झाल, जेवणाची सुट्टी झाली, सगळे जेवायला गेले संदीप क्लास मध्ये बसुन होता, रेवा जवळ आली,... "चल संदीप लंच साठी, तुझा डबा कुठे आहे संदीप तू डबा नाही आणला का?",....

तेच सांगत होतो ना आई ला बर नाहिये",... संदीप

"आपण कॅन्टीन ला जाऊ",... दोघ कॅन्टीनला गेले, सँडविच कॉफी सांगितली

" काय प्लॅन आहे परवाचा बर्थडे चा ",.. रेवा

" करू बर्थडे साजरा, ठरवतो आहे मी ",... संदीप

"लवकर ठेव बर्थडे खूप संध्याकाळी नको ठेवू ",...रेवा

"हो लवकर ठेवेन ",..संदीप

" सगळे फ्रेंड्स येतील ना आपले",.. रेवा

हो..

कुठला ड्रेस घालू मी?, तयारी करावी लागेल, गिफ्ट ही घ्याव लागेल, it\"s special day, खूप मजा येणार आहे.... रेवा खुश होती

रेवाची बेस्ट फ्रेंड श्रुती तिच्या सोबत होती

" श्रुती माझ्याबरोबर चालणार का मला संदीप साठी गिफ्ट घ्यायच आहे",.. रेवा

"अग पण आपण कॉन्ट्रिब्युशन करणार आहोत ना?",... श्रुती

"हो त्यात ही देईन मी पैसे, मला अजुन एक गिफ्ट घ्यायच आहे",... रेवा

रेवा आणि श्रुतीने जाऊन गिफ्ट घेतलं, मस्त घड्याळ त्याला आवडत तस, संदीपला नक्की आवडेल हे गिफ्ट संदीप ने बर्थडे लवकर ठेवला तर बरं होईल, मी खूप एक्सायटेड आहे

"हो ना जास्त उशीर होणार असेल तर मी ही नाही येणार",.. श्रुती

" आपण सांगू त्याला लवकर ठेव बर्थडे, तू ये ग श्रुती, मला सोबत होईल",... रेवा

"संदीप असतांना कश्याला हवी तुला माझी सोबत ",.. श्रुती चिडवत होती, रेवा छान हसत होती

रेवा घरी आली, विभा रूम मध्ये काम करत होती

"आज खुश दिसतेस रेवा",... विभा

" तू असतेस ना घरी मम्मा म्हणून मी खुश असते, नाहीतर इतर वेळी वाटत इथे कोणी नाही माझ, आजी फक्त गोड आहे, डॅडी बिझी असतो, हे बघ मम्मा मी संदीप साठी वॉच घेतल गिफ्ट म्हणून",.. रेवा

"अरे वाह, तू सिरियस आहेस का संदीप बाबतीत ",.. विभा

" हो मला तो आवडतो, पण आमच अजून तस काही ठरलं नाही",.. रेवा

रेवा आवरायला आत गेली, विभा विचार करत होती हे संदीप बाबतीत एकदा नीट रोहनशी बोलून घेवू, पण रोहनला वेळ कुठे आहे, तो घरी नसतो, आता त्याचा माझा काहीही संबंध नाही, तो काहीही करू दे, फोन वर बोलून घेवू नंतर, एकदा रेवाच शिक्षण झाल लग्न झाल की कुठे भेटणार आपण त्याला

रोहन ऑफिसहून निघाला, घरी आला, पटकन कपडे बदलले,

प्रिया चहा घेवून आली,.. "हे काय कुठे जायची तयारी आता?",..

"एक मीटिंग आहे येतो मी एक तासात",... रोहन

"उद्या नाही का ठेवता येणार मीटिंग? किती दमतो तू",.. प्रिया

"नाही महत्वाच काम आहे",... रोहन

"ठीक आहे लवकर ये",... प्रिया

सीमा गाडीत बसली, सीमा रोहन मीटिंग साठी निघून गेले, प्रिया वरुन बघत होती, गाडीत कोण होत रोहन सोबत? सीमा होती का? सीमा का गेली सोबत? , विचारु नंतर,

संदीप घरातुन निघाला, जुना फोन त्याने सोबत घेतला होता, नवीन फोन घरीच कपाटात ठेवून दिला, रोहनला कॉन्टॅक्ट केला, रोहनने पत्ता पाठवून दिला, घरातुन निघताना संदीपने कॅप घातली नेहमीचा शर्ट काढून ठेवून वेगळाच शर्ट घातला, आधी बघून घेतल त्याने की कोणी बाहेर नाही ना, राकेश आजकाल पाळतीवर असतो, मग पटकन मेन रोडवर येऊन रिक्षा पकडली, कोणी नव्हतं त्याच्यामागे, संदीप मिटिंगच्या जागी पोहोचला, वरती ऑफिस मध्ये आला

रोहन सीमा एका केबिन मध्ये बसले होते, संदीप गेला तस सीमा आश्‍चर्य चकित झाली, संदीप येवून बसला, कॉफी आली, तिघांना कॉफी दिली, खूप पॉश होत ऑफिस, दोन लोक आत आले, त्यांच्या कडे लॅपटॉप होत ते समोर येवुन बसले

"बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? ओळख करून द्या",..

रोहनने बोलायला सुरुवात केली, ही आहे सीमा हा आहे संदीप, आम्ही खूप अडचणीत आहोत, त्या करता मदत हवी होती

"या दोघां समोर डिसकस करायचा आहे का प्रोब्लेम ",..

"हो ते दोघ प्लॅन चा हिस्सा आहेत",.. रोहन

"बोला काय झाल आहे",...

रोहन ने सांगितल..
पाहिल्या पासुन कोणी तरी माझ्या फॅमिली वर पाळत ठेवून होत, आधी आम्हाला वाटल की माझा भाऊ रणजित असेल पण पोलिसानी त्याची चौकशी केली त्याला बहुतेक काही माहिती नाही, मागे कोणी तरी बंगल्यात शिरण्याचा पर्यन्त केला होता, पण या मागे वेगळे कोणीतरी लोक दिसता आहेत, ते लोक आता रेवाला माझ्या मुलीला किडनॅप करणार आहेत, पण कोण आहेत ते लोक हे माहिती नाही, काल समजल संदीप त्या लोकांच्या बाजूला होता,

सगळे संदीप कडे बघत होते...

पण तो आता आपल्याला मदत करायला तयार आहे , कारण त्याला नव्हत अवडत हे काम, त्याने काम करायला नकार दिला त्या मुळे गुंडांनी त्याच्या आईला किडनॅप केल, त्या मुळे आम्ही विचार केला की काय करता येईल, या मागे कोण आहे कोणा पासून आम्हाला धोका आहे हे ही समजल पाहिजे आणि संदीपची आई सापडली पाहिजे, माझ्या मुलीला काही होता कामा नये, आता हा प्लॅन कसा ठरवायचा?

"म्हणजे संदीप किडनॅपर्सच्या साईडला आहे का? ,

हो..

" तू इकडे माहिती घ्यायला तर नाही ना आलास ",..

" नाही सर मला खरच मदत करायची आहे रेवाची, म्हणून मी नाही सांगितल तिकडे काम करायला, मी सांगणार होतो रोहन सरांना की रेवाला धोका आहे त्या आधी माझ्या आईला त्यांनी किडनॅप केलं ",.. संदीप

"कोण कोण आहे तुमच्या ग्रुप मधे",..

"एक फोन येतो त्यावरून ते इन्स्ट्रक्शन देतात, बाकी कोण आहेत ते लोक माहिती नाही ",... संदीप

"नाव काय त्या माणसाच",..

"माहिती नाही ",.. संदीप

"कुठे आहे तो नंबर दे",...

संदीप ने नंबर दिला...

"नेहमी हाच मोबाईल नंबर असतो का की दर वेळी वेगळा असतो नंबर",..

"हाच असतो नंबर ",.. संदीप

"पैसे कसे देतात",..

"ऑनलाईन येतात ",.. संदीप

" या कोण?",..

" ही सीमा.. बॉडी गार्ड आहे रेवाची ",... रोहन

"तिचा काय रोल असेल",..

" रेवाला किडनॅप करायचा प्लॅन आहे या लोकांचा हिला माहिती असल म्हणजे बर, ती नेहमी रेवाच्या सोबत असते ",.. रोहन

"हो बरोबर आहे ",..

हो..

" पण यात रिस्क आहे, काहीही होवू शकत आम्ही करू तुम्हाला मदत पण 100% आपण ठरवू तस होईल अस नाही, विचार करून बघा ",..

"मूळ सूत्रधार कोण आहे हे पकडले जाण महत्त्वाच आहे, नेहमीच हे टेंशन नको आहे मला, एकदा सोक्षमोक्ष लावायचा आहे, कोण आहे या मागे? त्यांना आमची इस्टेट का हवी आहे?, का त्रास देता आहेत ते आम्हाला? ,हे सगळ जाणून घ्यायच आहे, माझ्या फॅमिलीला मुलीला कायमचा धोका आहे ते नको आहे मला ",... रोहन

" काय प्लॅन होता तुमचा संदीप ",...

संदीप ने सांगितल बर्थडे पार्टी प्लॅन....

सीमा आश्चर्याने संदीप कडे बघत होती

" आधी ठरल्या प्रमाणे प्लॅन असू द्या, संदीप तुझी बर्थडे पार्टी असेल, रेवा मित्र मैत्रिणींना बोलव, नंतर सगळे मूल घरी गेले की रेवा एवजी सीमाला त्यांच्या ताब्यात द्यायच ",...

" पण ते रेवाला ओळखत असले तर काय करायच?, कारण ते कधीचे मागे आहेत या फॅमिली च्या म्हणजे त्यांना माहिती असतिल फॅमिली मेंबर्स ",.. संदीप

" हो ना ओळखत असतिल ते, प्लॅन फ्लॉप व्हायचा तसा",.. रोहन

" मग रेवा सोबत सीमा आणि मी सोबत असु तेव्हा ही ",.. संदीप

" काहीही करा पण रेवाला काही होता कामा नये, घरी काहीही माहिती नाही या प्लॅन बद्दल, नाही तर विभा ऐकणार नाही ती लगेच रेवाला घेवून फॉरेनला निघून जाईल ",.. रोहन

" त्या दोघी जरी फॉरेन ला गेल्या तरी त्यांच्या मागचा धोका कमी होणार नाही",.. संदीप

"हो बरोबर आहे, ते लोक मागे लागले आहेत, तिकडे अजून सोप होईल त्यांना काम रेवा एकटी सापडेल, आता त्यांना शोधायच आपण, नक्की कोण आहे ते ",.. सीमा

" हो आम्ही असणार आहोत सोबत तुम्ही काळजी करू नका मला थोडा वेळ द्या मी प्लॅन तयार करतो",..

ते थोड्या वेळाने आले त्यांनी प्लॅन तयार केला होता,
संदीपची बर्थडे पार्टी होईल, त्यात संदीप रेवाला किडनॅप करून एका रिसॉर्ट वर नेईन, तिथे आमची माणस ऑलरेडी असतिल, ते किडनॅपर्स येतील रेवाला ताब्यात घ्यायला आपण त्यांना पकडू मग त्यांच्या पूर्ण टोळीचा पत्ता लागेल

संदीप तुझी आई ही त्यांच्या ताब्यातून घेवू एक दोन मुलांना साईडला घेतल की ते करतात मदत, सगळे अटक होतील, मी सांगतो ते रिसॉर्ट बूक कर आम्ही सांगू त्याच लोकांशी बोलायच तीच गाडी वापरायची

हो सर.... संदीप

रोहन ला आता प्लॅन ऐकुन बर वाटत होत,... "होईल ना अस?",..

"हो होईल, अस करु आपण, जास्त गुंतागुंत नाहीत या केस मध्ये don\"t worry",...

तिघ ऑफिसच्या बाहेर आले,

"मी निघतो सर काही लागल तर सांगतो" ,... संदीप घरी निघून आला

सीमा रोहन निघाले

"रेवाला यातल काही कळता कामा नये, तुला काय वाटतय सीमा कितपत सक्सेस होईल हा प्लॅन? ",.. रोहन

"सर यात खूप धोका आहे रेवा मॅडम ला , तुमचा विश्वास आहे ना संदीप वर? नाही तर तो बातमी फोडायचा, हा त्यांचा प्लॅन असायचा ",.. सीमा

"नाही करणार तो काही संदीपला माहिती नसेल पण त्याच्या मागे मी माणस लावले आहेत, बघू काय करतो तो, मी मुद्दाम ही मीटिंग बोलावली या सीक्रेट एजन्सी सोबत, माझे सकाळी बोलण झाल यांच्या सोबत, त्यांनी केली संदीपची, चौकशी बरोबर बोलतो आहे, तो गुन्हेगार नाही, त्याची आई खरच गायब आहे, या आधी काही गुन्हे केले नाहीत त्याने, चुकीची संगत लागली त्याला एवढच, आपल्याला ही जाणून घ्यायच आहे कोण आहे या मागे? होईल आपल्या मनासारख, ह्या लोकांना आता पकडल नाही तर पुढे अजून धोका वाढेल त्यांचा ",.. रोहन

" हो सर मी काही होवू देणार नाही रेवा मॅडम ला",.. सीमा
......

संदीप घरी आला, राकेश आला....

" कुठे गेला होतास तू? ",... राकेश

" बाहेर गेलो होतो काय झाल? ",.. संदीप

" बॉस केव्हाचा फोन करतो आहे तुला फोन कुठे आहे तुझा",.. राकेश

" घरी विसरलो होतो वाटत मी फोन",.. संदीप

" काही गडबड तर करत नाहीस ना तू संदीप?, काकू त्यांच्या कडे आहे हे लक्ष्यात ठेव",.. राकेश

" नाही रे..... बॉस ला सांग ना तू आईला सोडायला, मी काहीही करायला तयार आहे, माझ मन नाही लागत कशात आई नाही तर ",... संदीप

"मी सांगून उपयोग नाही, तू काम पूर्ण कर" ,... राकेश

" तू बोलून बघ ना राकेश, प्लीज मदत कर, माझ्या आईने किती केल आहे तुझ, जसा दुसरा मुलगा आहेस तू तिचा, एका ही सणाला तिने तुला बोलवलं नाही आमच्या कडे अस झाल नाही, आम्ही जे खाऊ त्यातून अर्ध नेहमी तुला दिल आहे तिने, किती जीव लावला आहे, तुला आईची शप्पत प्लीज मदत कर राकेश ",... संदीप

राकेश चा चेहरा पडला होता, त्याला आठवत होत, मी अनाथ पण काकूंनी किती केल माझ, दिवाळी दसर्‍याला यांच्या कडे असायचो मी, कपडे सुधा घ्यायच्या काकू मला, वाढदिवस साजरा करायच्या आणि मी काय केल, मूर्खासारख वागलो, त्या दिवशी उगीच काकूंची माहिती दिली बॉसला, आता काकूंना माहिती आहे मी खराब आहे, त्यांना तिकडे गुंडाच्या ताब्यात मीच दिल, आता त्या कधी माझ्याशी बोलणार नाही, मला माफ करा काकू, पण मी वेळ आल्यावर मदत करणार नक्की काकू संदीप तुम्हाला, आता मी काही बोलत नाही

"काय झाल राकेश येतो का आत? ",.. संदीप

"नाही मला काम आहे मी येतो",.. राकेश घरी गेला, त्याच्या डोळ्यात आसू होते, चुकीच वागलो मी....

संदीप आत आला

संदीप कपाटातुन फोन घेतला, जुना फोन गुपचुप ठेवून दिला... त्याने बॉसला फोन केला....

🎭 Series Post

View all