मृगजळ... भाग 16

सुरेखा ताई आज केव्हाच्या उठून बसल्या होत्या, मुळात त्यांना रात्री झोप आली नव्हती, सारखा संदीपचा चेहेरा डोळ्यासमोर येत होता, काय करत असेल संदीप? , त्याला समजल असेल का मी गायब आहे ते?



मृगजळ... भाग 16

©️®️शिल्पा सुतार
..............


रणजित बाहेर आला, पोलिसांनी त्याला खूप दम दिला होता, तो सरळ रोहनच्या घरी आला, नेहमी प्रमाणे त्याला गेट जवळ सिक्युरिटी गार्डने अडवल, तो खूप चिडलेला होता, तिथेच बसुन तो मोठ्या मोठ्याने ओरडत होता,

रोहन आला ऑफिस मधून, एक तर संदीपशी बोलण झाल्या नंतर त्याला सुचत नव्हत काय कराव ते, त्यात काय आहे हा गेट जवळ गोंधळ? सिक्युरिटी गार्ड काय आहे हा प्रकार? ",...

" सर रणजित सर आले आहेत, आत सोडल नाही म्हणून गोंधळ सुरू आहे ",...

" त्याला सोड आत ",.. गेट उघडल

रणजित रोहन दोघ आत आले, खाली हॉल मध्ये कोणी नव्हत, विभा खाली आली

" रणजित तू इकडे कसा? ",.. विभा

" मला सोडल आज पोलिसांनी, मला काही माहिती नाही यातल , मी नाही या कटामागे, तुम्ही लोक माझ्या वर का संशय घेता आहात? ",.. रणजित

"तू नाही तर मग कोण आहे? ",.. विभा

"मला काय माहिती? ",.. रणजित

"प्रिया कुठे गेली?, ती नाही का घरात? ",.. विभा

" ती आईला डॉ कडे घेवून गेली आहे ",.. रोहन

तेवढ्यात सुलभा ताई रूम मधुन बाहेर आल्या, सगळे सुलभा ताईं कडे बघत बसले

" केव्हा आले तुम्ही डॉ कडून आई, प्रिया कुठे आहे?",... रोहन

" प्रिया बाहेर गेली आहे", ... सुलभा ताई

"डॉ कडे गेले नव्हते का तुम्ही?",.. रोहन

\"गेलो होतो.. ते काम झाल, मला घरी सोडल मग प्रिया बाहेर गेली",.. सुलभा ताई

"कुठे गेली ती ",.. रणजित

" माहिती नाही मला ",.. सुलभा ताईंना माहिती होत प्रिया कुठे गेली पण त्यांना ते रणजित ला सांगायच नव्हत

रोहन विचार करत होता नक्की कुठे गेली प्रिया?..

"बघ विभा मी म्हणत होतो ना, कुठे गेली प्रिया? आता तुला तरी माहिती आहे का रोहन?",... रणजित

"रणजित तू जरा गप्प बस, असेल तीच काम काही तरी, जरा बाहेर गेली ती म्हणजे तीच कट रचते आहे अस थोडी आहे ",... रोहन

विभा विचार करत होती नक्की कुठे गेली प्रिया? रोहनला ही काही माहिती नाही म्हणजे काय?

प्रिया घरी आली सगळ्यांना हॉल मध्ये बघून ती दचकली,.... "रोहन तू लवकर आलास ऑफिस मधून? ",..

" हो.. तू कुठे गेली होतीस ",... रोहन

" सांगते जरा वेळाने ",... प्रिया

" जरा वेळाने का आता सांग प्रिया",.. रणजित

"रणजित तू मध्ये पडू नकोस, तुझा काही संबध नाही यात, हा आमचा पर्सनल मॅटर आहे, तुझं झाल असेल बोलून तर तू जाऊ शकतोस",.. रोहन

" तुम्ही घरचे मी कोण बाहेरचा का?, कोण चांगल कोण वाईट हे कधी समजणार तुला रोहन",.. रणजित रागाने बाहेर गेला

"चला मी आवरते",... प्रिया रूम मध्ये निघून गेली

रोहन दोन मिनीट थांबला,..." मी येतोच फ्रेश होऊन येतो",... ही रूम मध्ये निघून गेला

रणजित ने बाहेर जावुन विभाला फोन केला,..." वहिनी बाहेर ये मला बोलायच आहे तुझ्याशी ",

" ठीक आहे तू थोड पुढे जावून थांब मी येतेच ",... विभा

विभा रूम मध्ये गेली,... "माझ थोड काम आहे रेवा मी येते अर्ध्या तासात ",.. विभा घरातून निघाली

रोहन आत आला प्रिया कॉटवर बसली होती

"काय झालं प्रिया? कुठे गेली होती तू? ",... रोहन

" मी आई कडे गेली होती, माझ्या भावासाठी दोन तीन स्थळ सांगून आले आहेत त्या साठी आईने बोलवलं होत, उद्या ही बोलवलं आहे, तू ही येशील का उद्या? आईने किती फोन केले तुला, तू का नाही उचलले",... प्रिया

रोहनने फोन बघितल प्रियाच्या आईचे तीन मिस कॉल होते

"अग मी बिझी होतो मीटिंग मध्ये, मी करतो त्यांना फोन नंतर, खाली का नाही सांगितल मग तू आई कडे गेली होतीस ते ",.. रोहन

" मला खूप कंटाळा आला आहे रणजितचा, तो सारखा माझ्यावर संशय घेत असतो आणि आई कडचा काही कार्यक्रम आहे हे कशाला सांगायचं त्याला, उगाच तो मध्येमध्ये मोडता घालतो, उगीच जावून वगैरे भेटेल नवरी कडच्या मंडळीना तर काय करणार, खोट नाट सांगत बसेल ",.. प्रिया

" हो बरोबर आहे तुझं, नाही तरी त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही, उगीच तो मध्ये मध्ये करतो",... रोहन

" मी कुठे जाईल त्याच्याशी त्या रणजीत चा काय संबंध?
त्याला सारखं वाटत असतं की मी काहीतरी कट रचते आहे आणि मी एखाद्या गुंडाला भेटायला गेली आहे",... प्रिया

"तू जास्त टेन्शन घेऊ नकोस प्रिया, आपला एकमेकांवर विश्वास आहे ना तेच खूप आहे",... रोहन आवरायला आत गेला, प्रियाच्या चेहऱ्यावर समाधान होतं

विभा घाईघाईने बंगल्याच्या बाहेर निघाली, कोपऱ्यावर रणजित तिची वाट बघत होता

" विभा वहिनी आता बघितलं ना तू, कुठे गेली होती ती प्रिया, नीट सांगितल सुध्दा नाही तिने, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली ",.. रणजित

"हो ना,.. कुठे गेली होती ती? आणि आपल्याला सगळ्यांना हॉल मध्ये बघून दचकली सुद्धा ती",... विभा

"रोहनच्या डोळ्यावरुन प्रियाच्या प्रेमाची पट्टी काही हलत नाही, तिने काहीही केलं तरी त्याला दोष वाटत नाही",... रणजित

" हो तू आता हल्ली बरोबर बोलत आहेस असं मला वाटायला लागला आहे रणजीत, प्रियाचं वागणं संशयास्पद आहे, सारखं काय ईकडे तिकडे न सांगता जाते ती",... प्रिया

"बघ मी बोललो होतो ना तुला आणि तुम्ही लोक माझ्यावर संशय घेतात आणि कंप्लेंट करतात, हा त्या प्रिया चा डाव आहे, तिला फक्त ती आणि रोहन हवा आहे, तिला विभा तू रेवा नको आहेत तू रेवाला इकडे सोडल म्हणून ती मुद्दाम अशी करते आहे, आपण कोणी नसेल तर तिला फावेल कोणी नसेल वाटेकरी तिच्या ईस्टेट मध्ये, आरामात राहील मग ते राजा राणी, आणि तिच्या माहेरची माणस",... रणजित

रणजीत जे बोलत होता ते विभा नीट ऐकत होती हे बघून रणजीतला अजून बोलायचा चेव आला

"एक काम कर विभा वहिनी तू प्रिया वर पोलीस कंप्लेंट करून टाक हिच्यापासून मला आणि माझ्या मुलीला धोका आहे अस सांगुन टाक, काय विचार करते आहे तू वहिनी? किती धोका आहे ह्या प्रिया पासून आपल्याला, काही झाल्यानंतर एक्शन घेणार आहेस का तु?",... रणजित

"विचार करते आहे मी की काय करता येईल? प्रिया कितपत धोकादायक आहे सांगता येत नाही, अशी साधे दिसणारे माणसं जास्त डेंजरस असतात आणि आता तिच्या कडे पैसा ही आहे ती वापरू शकते तो पैसा ",...
विभाला आता टेंशन आल होत

" मग पुढे काय ठरवल आहे तू वहिनी ",... रणजित

"मी आता प्रिया वर लक्ष ठेवणार आहे ",.. विभा

" ती ऑफिसच्या नावाने फिरते, रोहनला समजत नाही, तो विश्वास ठेवतो तिच्यावर, त्यात सगळ फायनान्स डिपार्टमेंट तिच्या कडे आहे, पैशाची कमी नाही ",... रणजित

"बघु काय करता येईल, मी निघते",.... विभा

" मी जे बोललो त्याच्या विचार कर वहिनी ",... रणजित

हो...

विभा घरी आली सुलभा ताई हॉल मध्ये बसल्या होत्या टीव्ही बघत, विभा जावून त्यांच्या जवळ बसली

" डॉक्टर काय म्हटले आई?, बर नाही का तुम्हाला? ",... विभा

" ठीक आहे मी, रुटीन चेक अप होत, गोळ्या दिल्या महिन्याच्या, प्रिया दर महिन्यात येते माझ्या सोबत डॉक्टर कडे, आज बिझी होती ती तरी आली माझ्या सोबत",.. सुलभा ताईंच्या डोळ्यात बोलण्यात प्रिया विषयी प्रेम होत, ते दिसत होत

" कुठे जायचं होत प्रिया ला",... विभा

"तिच्या आईचा फोन येत होता तिकडे डॉक्टर कडे",.. सुलभा ताई

"अच्छा",..

"तिच्या भावाच लग्न जमत आहे ना ती तिकडे गेली होती ती मलाही बोलली तुम्ही चला सोबत इथून डायरेक्ट जाऊ, मी नको बोलले ",.. सुलभा ताई

"तुम्ही का नाही गेल्या ",.. विभा

" अग आपण गेलो म्हणजे तिच्या घरच्यांची धावपळ होते आपल्या कडे बघतील का पाहुण्यां कडे",... सुलभा ताई समजूतदार होत्या

विभा विचारता होती प्रिया खरच तिच्या आई कडे गेली होती वाटत, काय प्रकरण आहे हे, गुंता वाढत चालला आहे, प्रिया नाही मग कोण आहे, रणजित असेल का,

सगळे डिनर ला आले रेवा कडे बघून रोहनला भरून येत होत, एवढी गोड मुलगी माझी, किती मोठ्या संकटात टाकणार आहे आपण तिला, संदीपला हो बोललो मदतीला म्हणजे रेवाला द्याव लागेल गुंडांच्या तावडीत , काय होणार आहे पुढे? बरोबर आहे की चुकीच आहे हा डिसिजन,

"रेवा चल इकडे ये",... रोहन

"डॅडी काय झाल? तु काय विचारात आहे",... रेवा

"काही नाही बेटा तुझ काय सुरू आहे कॉलेज मध्ये",.. रोहन

"ठीक सुरू आहे डॅडी परीक्षा येतील आता",.. रेवा

"अभ्यास सुरू आहे ना",.. रोहन

"हो, डॅडी माझ्या वर्गातील संदीपचा बर्थडे आहे, जवळ रिसॉर्ट वर मी जाऊ का बर्थडे ला?",... रेवा

रोहनच्या चेहर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती, वाटत होत सांगाव नको जाऊ रेवा तिकडे तिथे धोका आहे पण हे कराव लागेल कोण आहे मूळ सूत्रधार ते सापडायला हव

" कोण कोण येणार आहे बेटा? ",.. रोहन

" माझा सगळा ग्रुप श्रुती आहे अजून संदीप चे मित्र आहेत",.. रेवा एक्साईटेड होती

"किती वाजता आहे बर्थडे? लवकर घरी यायच ह विभा तुला काय वाटतय जाऊ द्यावा ना रेवाला",.. रोहन

"हो जावून ये बेटा",.. विभा

"सीमाला सोबत ठेव आपल्या गाडीने जा ",.. रोहन

हो.... रेवा खुश होती

खर तर त्यांची ही बर्थडे पार्टी कुठे कशी होणार हे रोहन ठरवणार होता, पूर्ण फिल्डिंग लावणार होता, तरीही चिंता होती

जेवण झालं, सगळे बोलत बसले होते, रेवा बराच वेळ पुढे बसुन होती

सगळे रूम मध्ये आले, रेवा खुश होती ती कोणता ड्रेस घालायचा त्याचा विचार करत होती
.......

सकाळी सीमा आली, ती पार्किंग मध्ये उभी होती, रोहन तिला भेटायला गेला सीमा कॉलेज झाल की रेवा घरी आली की आपल्याला एका महत्वाच्या मीटिंग साठी जायच आहे, कोणाला सांगू नको हे कॉन्फिडन्शीयल आहे

" काय झाल सर? काही प्रॉब्लेम आहे का? ",... सीमा

" सांगतो नंतर रेवा कडे नीट लक्ष ठेव, कॉलेज झाल की लगेच या घरी ",.. रोहन

"हो सर",.. सीमा

रेवा खाली आली नाश्ताला

विभा रोहन प्रिया सुलभा ताई नाश्ता करत होते, प्रिया ने उठून रेवाला नाश्ता वाढला,

"काल एक बोलायच राहून गेल, मी पुढच्या वर्षी रेवाला माझ्या सोबत न्यायच्या विचारात आहे माझ्या घरी ",.. विभा

" पण इथे तीच ग्रॅज्युएशन पूर्ण झाल नाहीतर एक वर्ष वाया जाईल तीच तिकडे जावुन नवीन कोर्स घ्यावा लागेल",.. रोहन

"इकडे खूप धोका आहे तिला, मला अजिबात चांगल वाटत नाही इथल वातावरण",... विभा

" हो ते ही आहेच, बघु ठरवू आपण आता पासून नको तो विषय",... रोहन

रेवा दूर जाईल माझ्या पासून रोहनला हे सहन होत नव्हत
........

सुरेखा ताई आज केव्हाच्या उठून बसल्या होत्या, मुळात त्यांना रात्री झोप आली नव्हती, सारखा संदीपचा चेहेरा डोळ्यासमोर येत होता, काय करत असेल संदीप? , त्याला समजल असेल का मी गायब आहे ते? काय झाल नक्की, तो मला शोधत असेल का? की राकेश ने त्याला काही केल असेल? , सुरेखा ताई टेंशन मध्ये होत्या, डोळ्यात पाणी होत त्यांच्या , त्या देवाच्या धावा करत होत्या,

एक गुंड आत आला, त्याने त्यांना चहा करायच सगळ सामान आणून दिल,

"चहा घेणार का तुम्ही" ,... सुरेखा ताई

तो हो बोलला,... सुरेखा ताईंनी सगळ्यांसाठी चहा केला, बाहेर नेवून दिला, त्या दोन गुंडांनी चहा घेतला, चहा खरोखर छान झाला होता, सुरेखा ताई परत आत येवून बसल्या, त्या लोकांना खात्री पटली सुरेखा ताई त्रासदायक नाही

इथून निसटायच कस? , हेच बाहेर जावुन बघत होत्या त्या, गुंड डेंजर होते पण सुरेखा ताई शांत होत्या म्हणून ते ही शांत होते...

काय करू? कोणता एरिया आहे हा? जेव्हा आलो तेव्हा काहीही समजल नाही, फक्त एक तास लागला होता यायला, या गुंडांशी बोलायला पाहिजे, पण ते बोलतच नाही काही, नुसत पहारा करतात, काय कराव?...


🎭 Series Post

View all