Login

मृगजळ... भाग 15

सुरेखा ताई तश्याच बसुन होत्या डोळ्यात पाणी होत त्यांच्या काय झाल आहे नक्की? संदीप कुठे आहे तू? त्याच काही बर वाईट तर नसेल झाल, राकेश चांगला मुलगा नाही आहे, त्याने मला या गुंडांच्या ताब्यात दिल, हे लोक मला काही करणार तर नाही ना, मला घरी जायचं आहे, इथून कस बाहेर पडणार,




मृगजळ... भाग 15

©️®️शिल्पा सुतार
..............


ऑफिस मध्ये रोहन आणि प्रियाचं काम सुरू होतं, प्रिया काहीशी अस्वस्थ होती..

" रोहन आज मी लवकर घरी जाणार आहे तू येतो आहेस का? ",.. प्रिया

"नाही माझ काम झाल नाही अजून, काय काम काढल प्रिया ",.. रोहन

" आईंना दवाखान्यात न्यायचं आहे",.. प्रिया

" काय झालं आईला? ",.. रोहन

"काही नाही, गोळ्या लिहून आणायच्या आहेत पुढच्या महिन्यासाठी, रूटीन चेक अप",... प्रिया

" ठीक आहे",...रोहन

प्रिया घरी गेली

रोहनच्या फोनवर इंस्पेक्टर सावंत यांचा फोन आला

"काय झालं इन्स्पेक्टर साहेब? रणजीतची चौकशी झाली का पूर्ण? ",.. रोहन

" हो झाली आहे पूर्ण, त्याला काही विशेष माहिती नाही असं वाटत आहे, तो सारखा प्रिया मॅडमच नाव घेतो आहे",.. सावंत

" काहीही काय? प्रिया चोवीस तास माझ्या सोबत असते हा रणजीत तिच्यावर नेहमी राग धरून असतो, प्रिया घरच्यांची रेवाची किती काळजी घेते माझं मला माहिती आहे",... रोहन

"काय करायच आहे मग साहेब? रणजीतला सोडून देऊ का?",.. सावंत

"हो सोडून द्या त्याला, त्याच्या पाळतीवर माणसं लावतो मी आता म्हणजे तो कुठे जातो काय करतो हे आपल्याला बरोबर कळेल",.. रोहन

"ठीक आहे साहेब मग रणजीतला सोडतो मी",.. सावंत

"हो चालेल, मी येऊन जाईल नंतर तुम्हाला भेटायला, तुम्ही खूप छान सहकार्य केलं.. थँक्यू",.. रोहन
....

फोन चार्ज झाला, संदीप विचार करत होता काय करू आता? एक रस्ता दिसत होता, कराव का तस, पण मदत मिळेल की नाही माहिती नाही, प्रयत्न करायला काय हरकत आहे, त्याने एक फोन फिरवला समोरून फोन उचलला गेला नाही, तो परत निराश झाला, आज सगळे विरोधात दिसता आहेत माझ्या, काय करू? , चुकी केली राकेशशी मैत्री करून, कुठून त्याच ऐकल आणि या भानगडीत पडलो, पण आज राकेशमुळे रेवा मला मिळाली, तो विचार करत होता, त्याच्या जुना फोन वाजला, संदीप ने घाई घाईत फोन उचलला

"कोण बोलतोय माझ्याकडून कॉल मिस झाला",..

"मी संदीप बोलतो आहे",..

"कसा काय फोन केला तू मला संदीप? ",..

"मला बोलायच आहे तुमच्याशी, मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे, मला मदत करा",.. संदीप

"काय झाल? कुठे आहेस तू ",..

"मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आता जे मी तुम्हाला सांगेल त्याने बहुतेक तुम्हाला राग येईल माझा पण मला आता तुमचा आधार आहे ",.. संदीप

" बोल काय झाल ",..

"तुम्ही प्रॉमीस करा हे कोणाला सांगणार नाही अगदी रेवाला ही नाही आणि माझ्या वर विश्वास ठेवाल ",.. संदीप

संदीप ने हा फोन रोहनला केला होता...

" काय म्हणतो आहेस तू? भेटून बोलू या का संदीप ",.. रोहन

" नको सर मला ट्रॅक केल असेल त्या लोकांनी म्हणून मी तुम्हाला जुन्या फोन वरुन फोन करतो आहे, मी येईन तुम्हाला भेटायला पण आता नको ते लोक मागे असतिल माझ्या ",.. संदीप

"कोण लोक? काय झाल? बोल काय झाल नक्की? ",.. रोहन

"सर तुम्ही माझ बोलण पूर्ण ऐकुन घ्या त्याशिवाय फोन ठेवू नका ",.. संदीप

" ठीक आहे",.. रोहन

" सर प्लीज लगेच पोलिसांना सांगू नका ",.. संदीप

" अरे काय झाल सांग बाबा पटापट ",.. रोहन

" सर रेवाला धोका आहे ",.. संदीप

" हो ते माहिती आहे मला ",.. रोहन

"सर मी पण होतो त्या ग्रुप मधे ज्यांच्या पासून रेवाला धोका आहे ",.. संदीप

" काय बोलतो आहेस तू? कोण आहात तुम्ही लोक? मग तू आता मला हे सगळ का सांगतो आहेस ",.. रोहन

" मी सांगितल त्या लोकांना मला हे काम जमणार नाही, आणि मी आज मी हे तुम्हाला आज सांगणार होतो की रेवाची काळजी घ्या, पण त्या आधी त्यांनी माझ्या आईला किडनॅप केल आहे सर, मला मदत करा ",.. संदीप

" बापरे काय भयानक आहे हे, काय म्हणण आहे त्या लोकांच ",.. रोहन

" ते बोलता आहेत की रेवाला आमच्या ताब्यात दे , आणि मग आईला घेवून जा ",.. संदीप

" कोण आहेत ते लोक? काय प्लॅन आहे त्यांच्या ",.. रोहन

" सर ते मला ही माहिती नाही कोण आहेत ते लोक, एका नंबर वरुन फोन येतो फक्त इन्स्ट्रक्शन साठी, आणि त्यांना रेवाला पैशासाठी किडनॅप करायच आहे ",... संदीप

" तुला कसे भेटले हे लोक ",.. रोहन

" आमच्या शेजारी राकेश राहतो त्याने दिल मला हे काम, मला पैशाची गरज होती माझी चुकी झाली सर ",.. संदीप

" मग आता का नाही बोलतो आहेस कामाला ",.. रोहन

" माझ्या आईने अतिशय शिस्तीत चांगल्या गोष्टी शिकवत वाढवल आहे मला, माझी चुकी झाली, वाईट संगत लागली मला, आता मला अस वाटतय मी काहीही झाल तरी रेवाला काही होवु देणार नाही ",... संदीप

" आता तुझ्या वर संकट आल तर तुला माझी आठवण झाली, नाही तर आधी तू आम्हाला त्रास द्यायला तयार होता, पोलिस कंप्लेंट करू का तुझी? , कायमच पाठवतो बघ मी तुला खडी फोडायला ",.. रोहन खूप चिडला होता

" नाही सर अस नाही, मला आधी पासून वाटत होत यात पडू नये, माझ्या मुळे कोणाच नुकसान होवू नये, मला पटत नव्हत, मी काम करायला नाही बोललो म्हणून माझ्या आईला किडनॅप केल, ते बोलता आहेत मला अस काम मध्येच सोडता येणार नाही, सर मी तुम्हाला काळजी पोटी काॅन्टेक्ट केला आहे, रेवा माझी मैत्रिण आहे तिची काळजी आहे मला ",... संदीप

" आता तरी तू कशावरून खरं बोलत आहेस तू? हा ही तुझ्या प्लॅन चा एक भाग असू शकतो, मी कसा काय विश्वास ठेवावा ",... रोहन

" नाही सर विश्वास ठेवा माझ्यावर माझी आई त्यांच्या ताब्यात आहे, मला माहिती आहे ही गोष्ट मी तुम्हाला सांगितल्यावर काहीही होऊ शकत माझ्याबाबतीत, तुम्ही काही वेळेस मला पोलिसात देऊ शकता, पण तरी मी तुम्हाला स्वतः फोन करून ही गोष्ट सांगितली कारण ही गोष्ट चुकीची आहे त्यात रेवाला खूप मोठा धोका आहे, तसं जर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली नसती आणि गुपचुप काम केलं असतं तर माझी आई मला वापस मिळाली असती, पण मला आता आईला ही सोडवायचं आहे आणि रेवाला ही काही होता कामा नये, प्लीज मला मदत करा",... संदीप

" आता काय करायच मग? काय प्लॅन आहे पोलिसात नाही जायच का आपण ",.. रोहन

" सर पोलिसात जायचं की नाही ते मला माहिती नाही पण मला आता त्या लोकांच्या प्लॅन प्रमाणे सगळ कराव लागेल ",.. संदीप

"म्हणजे रेवाला त्यांच्या ताब्यात द्यायच... नाही.. मुळीच नाही जमणार हे ",.. रोहन

" सर पण अस नाही केल तर कस समजेल या मागे खरा गुन्हेगार कोण आहे ते ",.. संदीप

" पण रेवाला किडनॅपर्स कडे देवून काय साधणार आहोत आपण, किती धोका आहे ",..रोहन

" धोका असाही आहे सर, जरी मी या कामाला नाही बोललो तर ते दुसर्‍या मुलाला निवडतील, मग तो मुलगा किती डेंजर असेल हे ही माहिती नाही आपल्याला, पण या मागे मूळ बॉस कोण आहे हे तुम्हाला समजणार नाही, तुमच्या मागे धोका कायम असेल, रेवाला कायम धोका असेल आणि माझ्या आईच काय होईल माहिती नाही ",... संदीप

" पण तरीही रेवाला धोक्यात टाकायचे म्हणजे मी रेडी नाही ",.. रोहन

" पण सर रिस्क तर घ्यावी लागेल कारण तुम्ही कायम रेवाला घरात राहू देवू शकत नाही ना, ती जाईल कुठे तरी तेव्हा तिला कायम धोका असेल, पण आता ही टोळी सापडली तर सगळे पकडले जातील, काय उद्देश आहे त्यांच्या हे समजेल ",.. संदीप

" पण तरीही यात धोका आहे ",.. रोहन

" हो खूप धोका आहे माझ तर काय होणार आहे काय माहिती? , मी आहे ना सर मी रेवाला काहीही होवू देणार नाही, माझ्या वर विश्वास ठेवा, पण मी तुम्हाला बळजबरीने करणार नाही, तुम्ही नकार देवु शकतात मी परत तुम्हाला फोन करणार नाही, हे काम करणार नाही मग माझ्या आईच जे व्हायचं असेल ते होवू द्या, माझ्या कर्माची फळं मिळाल हे अस समजेन ",.. संदीप

" तू पोलिसात का सांगत नाही आई हरवली अस",.. रोहन

" खूप डेंजर लोक आहेत ते, नाही सापडणार एवढ्या सहज आई, त्यांच जाळ असत, कोणत्याही प्रकारे मी नाही म्हटलो तरी ते रेवाला पळवतील, जे व्हायच ते होणार आहे, आई ही जाईल रेवा ही जाईल, त्या पेक्षा मी करतो हे काम",... संदीप

रोहन विचार करत होता काय कराव? किती विश्वास ठेवावा त्या संदीप वर त्या साठी रेवाला धोक्यात टाकाव का? पण आता माघार घेतली तर कायम हे कोण किडनॅपर आहेत त्यांच्या धोका असेल, आपण संदीपची साथ देवू

" ठीक आहे तू म्हणतो तर मी तुझी साथ देईन पण जर रेवाला काही झाल तर माझ्याहून कोणी वाईट नाही",.. रोहन

"नाही सर मी आहे रेवा साठी, काहीही होणार नाही, आता ही खूप धोका आहे तुम्हाला निदान मूळ सूत्रधार तरी समजेल, thank you",.. संदीप

"आता काय प्लॅन होता तुमचा",.. रोहन

"माझ्या बर्थडे पार्टी साठी सगळ्या फ्रेंड्सला बोलवणार होतो आम्ही, तेव्हा रेवाला पळवून बॉसच्या ताब्यात देणार होतो मी, बाकी पुढच नाही माहिती मला त्यांचा प्लॅन होता, मला माफ करा सर" ,.... संदीप

"ठीक आहे तुझ्या मुळे तरी समजल नक्की काय होणार आहे पुढे , आता या मागे कोण आहे हे समजायला पाहिजे, तुला काय वाटत यात किती धोका आहे, जरी आपण खूप प्लॅन केला त्यांनी अचानक रेवाला गायब केल तर माझी मुलगी हातची जाईल रे रिस्क आहे",... रोहन

" आपण बॉडी गार्ड ची मदत घेवू शकतो, मी कंटिन्यू तिच्या टच मध्ये राहील",.. संदीप

" हो तस करू शकतो, ठीक आहे मी सांगतो तुला उद्या",.. रोहन

" सर प्लीज माझी मदत करा माझी आई मला हवी आहे आणि मला रेवाला ही काही व्हायला नको आहे ",.. संदीप

" बघु आपण तू मला तुझ्या त्या बॉसचा फोन नंबर इकडे पाठवून दे, मी मागेल ती माहिती तुला द्यावी लागेल",.. रोहन

" हो लगेच पाठवतो",.. संदीप

" आणि काळजी करू नकोस मी आहे",.. रोहन

" हो सर ",.. संदीप

रोहन विचार करत होता काय कराव आता? संदीपला मदत केली तर आपल्याला कोण खरा सूत्रधार आहे ते समजेल, नाही तर कायम आपल्या मागे टांगती तलवार राहील, पण किती धोका आहे यात, कोणा कडून मदत घ्यावी का, डोक काम करत नव्हत

त्याने सीक्रेट एजंट कंपनीला फोन केला,

"मला उद्याची अपॉइंटमेंट हवी आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मदत हवी आहे मला ",.. रोहन

त्यांनी दुसर्‍या दिवशीची अपॉइंटमेंट दिली, त्यांच्या ऑफिस मध्ये भेटायला बोलवलं

रोहनने संदीपला दुसर्‍या दिवशी तिकडे मीटिंगला बोलवलं,.. "तो फोन नंबर घेवून ये, तुझा फोन आणू नको त्याला ट्रॅकींग लावल असेल, जुना फोन तो आण ",

" ठीक आहे सर ",.. संदीप

नक्की कोणासोबत मीटिंग आहे? पोलिस तर नसतील ना? रोहन सर मला पकडून पोलिसांत तर नाही ना देणार? , बापरे, जे होईल ते, बहुतेक ते मार्ग काढत असतिल यातून, मी जाईन मीटिंगला
.........

एका गोडाऊन सारख्या घरात संदीपची आई सुरेखा ताई बसल्या होत्या, एक गुंड बाजूला टेबल खुर्ची वर बसुन काहीतरी करत होता, एक गुंड बाहेर उभा होता,

"मला इथे का घेवून आले आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही लोक? काय हवय तुम्हाला? कुठली जागा आहे ही, माझा मुलगा कुठे आहे? ",.. सुरेखा ताई

कोणी उत्तर दिल नाही.....

"बोला ना? मला घरी जायच आहे, हा सगळ काय प्रकार आहे? मी ओरडेन ह, कोण आहात तुम्ही? , राकेश कुठे आहे? तो मला घेवून आला इथे, संदीपला लागलय अस सांगुन इथे आणल त्याने मला, कुठे आहे माझा मुलगा? तो ठीक तर आहे ना? ",... सुरेखा ताई

"ओ ताई गप्प बसायच काय, अजिबात बडबड करायची नाही, आत किचन आहे, तिथे सामान आहे, पाहिजे ते करून खा, किती प्रश्न विचारता आहे या ",... गुंड

" हे बघा दादा काय झालं आहे नीट सांगा मला खूप काळजी वाटते आहे माझ्या मुलाची तो तुमच्या ताब्यात आहे का",.. सुरेखा ताई

"कोण आहे तुझा पोरगा माहिती नाही आम्हाला, शांत रहा, तुला का धरल ते ही माहिती नाही आम्हाला, वरुन ऑर्डर येई पर्यंत तुला इथे रहायच आहे ",.. गुंड

सुरेखा ताई तश्याच बसुन होत्या डोळ्यात पाणी होत त्यांच्या काय झाल आहे नक्की? संदीप कुठे आहे तू? त्याच काही बर वाईट तर नसेल झाल, राकेश चांगला मुलगा नाही आहे, त्याने मला या गुंडांच्या ताब्यात दिल, हे लोक मला काही करणार तर नाही ना, मला घरी जायचं आहे, इथून कस बाहेर पडणार,

सुरेखा ताई उठून आत किचन मध्ये जावुन बसल्या, मोडक पत्र्याच दार त्यांनी व्यवस्थित लावून घेतल या दाराचा एक आधार होता आता त्यांना

खूप रडायला येत होत त्यांना, बर्‍याच वेळ त्या खिडकीतून बाहेर बघत होत्या काहीही नव्हत बाहेर कमरे ऐवढ गवत वाढलेल दिसत होत फक्त,

दार वाजल

काय कराव उघडाव का? , त्यांनी हिम्मत करून दार उघडल, तो गुंड वडा पाव घेवून आला होता त्याने खायच सामान टेबल वर ठेवल तो निघून गेला, सुरेखा ताईंनी परत दार लावून घेतल, परत त्या रडत होत्या.....

🎭 Series Post

View all