मृगजळ... भाग 14

संदीप ने फोन ठेवला राकेश गेला, संदीप एकटाच होता आता घरात, तो रडायला लागला, आयुष्यात पहिल्यांदा मी प्रेम केल आहे कोणावर तरी, तर हे अस, काय करू? मी चोरावर मोर होणार आहे,

मृगजळ... भाग 14

©️®️शिल्पा सुतार
..............

संदीप आज निश्चिंत होवुन कॉलेजला आला, आज त्याच्या मनात अजिबात अपराधी पणाची भावना नव्हती, हे अस किती छान वाटत आहे, बर झाल लवकर घेतला आपण हा डिसिजन , चुकीची गोष्ट करायला नको होती मी, उगीच त्या राकेशच्या नादी लागलो, तो आता रेवाची वाट बघत होता, केव्हा येतेस तु रेवा, आज पासून अगदी शुद्ध मनाने मी तुझ्या सोबत असेन, काहीही नाटक नाही यात

रेवा आली,.. नेहमी प्रमाणे खूप सुंदर दिसत होती ती, संदीप तिच्या कडे बघत बसला

हाय संदीप..

हाय रेवा..

"आज काय झाल संदीप? तू खूप खुश आहेस" ,... रेवा

"असच... मला तुझ्याशी बोलायच आहे थोड रेवा",.. संदीप

"बोल ना ",.. रेवा

"आता नाही कॉलेज संपल्यावर जावू कुठे तरी, माझ्या कडून तुला ट्रीट",... संदीप

"अरे वा, काय झाल? बोल ना, लाजतेस काय",.. रेवा

"हे घे तुला चॉकलेट",.. संदीप

"अरे आज काय विशेष आहे का? , खूप लाड सुरू आहेत माझे ",.. रेवा

हो... आहे विशेष

" काय? सांग ना ",... रेवा

" सांगेन नंतर",... संदीप

लेक्चर सुरू झाल, संदीप आज रेवाला अजिबात सोडत नव्हता, तिच्या मागे मागे होता तो , रेवाला ते लक्ष्यात आल होत, ती मस्त हसत होती, एन्जॉय करत होती त्याची कंपनी,

लंच ब्रेक मध्ये संदीपच्या फोन वर बॉसचा फोन आला

" कुठे पर्यंत आल काम संदीप ",... बॉस

" मी राकेशला सांगितल आहे, मी हे काम नाही करू शकत ",... संदीप

" काय झाल? मी देणार आहे तुला बर्थडे पार्टी साठी पैसे, अजून हवे आहेत का? ",.... बॉस

"माझ मन सांगत हे चुकीच आहे, मला सोडा, मला नाही करता येणार हे काम, मी तुमचे दहा हजार रुपये परत करेन, माझ्या आईला नाही आवडणार मी अस चुकीच काम केल तर ",... संदीप

"अरे असू दे एवढ काय नको करू पैसे वापस, तू नाराज आहे का? कोणी काही बोलल का तुला? हे काय नवीन खूळ डोक्यात घातल, आता आपल काम शेवटच्या टप्प्यात आहे, आता मागे फिरायचं नाही, तुला अस करता येणार नाही, काम पूर्ण कराव लागेल, आपल्या धंद्यात अस चालत नाही, एखाद काम हाती घेतल की पूर्ण कराव लागत ",... बॉस

"मला जमणार नाही ",... संदीप

" अरे मी तुला एवढ समजावतो आहे तरी तेच, तुला याचे परिणाम माहिती आहेत का?, मला माहिती आहे काल मी नाही बोललो तरी तू गेला होतास पार्टीला रेवाकडे , तिकडे त्यांची श्रीमंती बघून तू अस करतो आहेस ना ",.. बॉस

" नाही अस काही नाही, मला नाही आवडत आहे अस गुन्हेगारी आयुष्य , रेवाच्या घरचे कुठे स्विकारतील मला अश्या झोपडपट्टीतील मुलाला, मला माहिती आहे मला रेवा नाही मिळणार, पण आता मी तिला काही होवु देणार नाही ",... संदीप

" ठीक आहे मग तुझा निर्णय झालेला दिसतोय, आता परिणामाला सामोरी जा ",... बॉस

" म्हणजे काय?",.. संदीप

" घरी तुझी आई एकटी आहे, माहिती आहे ना ",.. बॉस

" काय बोलता आहात तुम्ही? , आईला काही झाल तर माझ्याहून कोणी वाईट नाही ",...संदीप

"हो ना मग गुपचूप काम पूर्ण करायच, हे गुन्हेगारी जग आहे इथे आत यायचा मार्ग असतो बाहेर जायचा मार्ग नसतो ",...बॉस

बॉस ने फोन ठेवला

संदीप वर्गात पळत गेला, त्याने त्याची बॅग घेतली, रेवा दिसत नव्हती क्लास मध्ये ,पण आता थांबण्यात अर्थ नव्हता, .."प्रकाश रेवाला सांग मी घरी गेलो ,नंतर भेटेल मी तिला ",..

" ठीक आहे ",.. प्रकाश

रेवा क्लास मध्ये आली प्रकाश ने सांगितल संदीप घरी गेला

"असा अचानक? काय झाल?",... रेवा

"मला माहिती नाही",.. प्रकाश

रेवा विचार करत होती काय झाल असेल? आज संदीप किती खुशीत होता, काहीतरी सांगणार होता तो मला, काय झाल अस अचानक? , तब्येत ठीक आहे ना त्याच्या आईची? तो त्याच्या आईची खूप काळजी करत असतो, तिने संदीपला फोन केला त्याने फोन उचलला नाही

रेवा काळजीत होती..

संदीप घरी पोहोचला, घर सताड उघड होत,.." आई.... आई.... आई तू कुठे आहेस? ",.. रोज या वेळी आई घरी असते, तिला सकाळी संध्याकाळी काम असत, आई कुठे गेली मग,

संदीप पळत शेजारी गेला,... "काकू आई कुठे आहे? ,",.

"माहिती नाही मला, आता तर होती सुरेखा थोड्या वेळा पूर्वी, येईल दुकानात वगैरे गेली असेल",..

संदीप परत घरात आला

आई... तो रडायला लागला, जी भीती होती ती खरी ठरली

त्याच्या फोन वर बॉसचा फोन येत होता

"माझी आई कुठे आहे, तिला सोडा तुम्ही म्हणाल ते मी करेन",.. संदीप

"आमच्या कडे नाही आहे तुझी आई",... बॉस

"मग का फोन केला होता तुम्ही",.. संदीप

"तुला पार्टी साठी वीस हजार रुपये पाठवले आहे, जोरात पार्टी कर रेवाला आमच्या ताब्यात दे",.. बॉस

"ऐका ना एक मिनिट, सगळ करतो मी, माझी आई कुठे आहे सांगा ना",... संदीप

"रेवा हवी आहे मला, एका हाताने रेवा दे तुझी आई घेवून जा ",.. बॉस

"का अस करता आहात तुम्ही? ",.. संदीप

" मी नव्हतो आलो तुझ्याकडे रिक्वेस्ट घेवून हे काम कर अस, तूच आला होता राकेश सोबत माझ्याकडे काम मागायला , आता हातात घेतल ते काम पूर्ण कर ",.. बॉस

" मला जोपर्यंत माझी आई मिळणार नाही तो पर्यन्त मी काहीही काम करणार नाही ",.. संदीप

" ठीक आहे नको करू काम, जो पर्यंत रेवा मला मिळणार नाही तुझी आई माझ्या ताब्यात राहील",.. बॉस ने फोन ठेवून दिला,..

हॅलो ..... हॅलो....

संदीप ने परत फोन लावला, बॉस ने फोन उचलला नाही

संदीपने आता राकेशला फोन लावला

" बोल रे संदीप ",.राकेश

संदीप रडायला लागला..

" संदीप काय झाल? ",.. राकेश

" माझी आईला किडनॅप केल बॉसने ",... संदीप

" काय? कस काय? कधी झाल हे? थांब मी येतो तिकडे कुठे आहेस तू? ",.. राकेश उगीच काळजी असल्यासारख नाटक करत होता

"घरी आहे मी, आत्ताच आलो कॉलेजहून",.. संदीप

"आलोच मी तिकडे काळजी करू नकोस ",.. राकेश

राकेश आला, संदीप बसलेला होता

"काय झाल संदीप? ",.. राकेश

"तू सांगितल का बॉसला, मी काम करायला तयार नाही ते",.. संदीप

" हो मी केला होता फोन, ते बोलले ठीक आहे, ते बिझी होते, काकूंच काय झाल नक्की? ",.. राकेश

" अरे मला कॉलेजला फोन आला त्यांचा, मी सांगितल मला जमणार नाही काम तर ते बोलले रेवाला माझ्या ताब्यात दे आईला घे, काय करू मी आता",... संदीप

" देवून टाक रेवाला, कर पार्टी अरेंज, काकूंना सोडवून घे ",... राकेश

" अरे पण मी अस नाही करू शकत, ती रेवा खूप विश्वास ठेवते माझ्या वर, खूप चांगली मुलगी आहे ती आणि काय प्लॅन आहे बॉसचा? काय करणार ते रेवा सोबत? , मला नाही सहन होत आहे हे, मी रेवाला धोक्यात नाही टाकू शकत",... संदीप

" तू प्रेम करतो का रेवा वर? ",.. राकेश

संदीप काही बोलला नाही

" कोण आहे हा बॉस? ",.. संदीप

" नाही माहिती कोण आहे, फक्त फोन येतो त्यांच्या ",.. राकेश

" रेवाच काम पूर्ण करायला काय प्रॉब्लेम आहे तुझा? सांग ना प्रेमात पडला आहेस का तू तिच्या?",... राकेश

" हो माझ तिच्यावर प्रेम आहे, खूप साधी भोळी आहे रे ती, तिला काहीही माहिती नाही काय धोका आहे तिला ",... संदीप

" आई पेक्षा जास्त प्रेम आहे का तिच्यावर? आता तर भेटली ती तुला, जाऊ दे ना तिला आईला घे सोडवून ",... राकेश

" आई तर आई आहे, रेवा ही स्पेशल आहे",.. संदीप

" कर काम पूर्ण, आई ला वाचव",... राकेश

" हो बघतो काय करायच ते",... संदीप

" बॉस खतरनाक आहे, उगीच तू रेवाच काम केल नाही तर ते तुझ्या आई ला कायम च गायब करतील ",... राकेश

" काय बोलतो आहेस तू राकेश?",... संदीप

" माहिती आहे मला खूप भयानक अस बोलतो आहे मी, तरी असच होवु शकत, आपण काळजी घ्यायला हवी",... राकेश

" ठीक आहे मी माझ काम पूर्ण करतो ",.. संदीप

" कर मग तसा बॉस ला फोन, हळू व्यवस्थित बोलून घे, भांडू नको, लक्ष्यात ठेव काकू त्यांच्या कडे आहेत ",.. राकेश

संदीप ने फोन लावला..

बॉस ने फोन उचलला...

" सॉरी बॉस मी का अस वागलो माहिती नाही, माझी चुकी झाली, मी रेवाच काम पूर्ण करेन ",.. संदीप

"हो मला माहिती होत तू हे काम पूर्ण करशील ते, काळजी करू नकोस मी आहे तुझ्या सोबत ",... बॉस

" ते वीस हजार रुपये पुरणार नाही अजून पैसे लागतील",.. संदीप

"ठीक आहे मी अजून पाठवतो तू बूकिंग कर रिसॉर्टच तिकडे डायरेक्ट भरतो मी पैसे ",... बॉस

" ठीक आहे ",... संदीप

" तुझी आई एकदम ठीक आहे, तुझी आई ती माझी आई, काहीही होणार नाही त्यांना, काळजी करू नकोस पण काम ही तेवढ महत्वाच आहे ",... बॉस

" बॉस आई ला सोडा ना, वाटल तर मी येवून रहातो तिकडे, तुम्ही म्हणाल तस तिथे राहून करतो प्लीज बॉस",.. संदीप

"संदीप काळजी करू नकोस, दोन दिवसाचा प्रश्न आहे दोन दिवसानी रेवाला देशील तू आमच्या ताब्यात, तेव्हा तुझी आई तिथे असेल",.. बॉस

संदीप ने फोन ठेवला राकेश गेला, संदीप एकटाच होता आता घरात, तो रडायला लागला, आयुष्यात पहिल्यांदा मी प्रेम केल आहे कोणावर तरी, तर हे अस, काय करू? मी चोरावर मोर होणार आहे, रेवाला देईल त्यांच्या ताब्यात आईला सोडवेन तेव्हा रेवाची बरोबर सुटका करेन, कामाला लागल पाहिजे, काय करता येईल? जर मी हे रेवाला सांगितल तर की असा प्लॅन आहे तर, नको ती माझ्याशी बोलणार नाही , सगळ अवघड होवुन बसेल, काय करू या, ठरवू काही तरी, मदत मिळायला पाहिजे कोणाची तरी , संदीप विचार करत होता

संदीप ने कपाटातून दुसरा जुना फोन बाहेर काढला, तो सुरू केला नशीब तो काम करत होता, त्याने तो फोन चार्जिंग ला लावला, तो नंबर कोणालाच माहिती नव्हता, कधी कधी आई वापरत होती तो फोन त्या मुळे बिल वगैरे भरलेल होत त्या फोन च, संदीप विचार करत होता काय करता येईल? रेवा वाचली पाहिजे, आई सुटली पाहिजे, खूप मोठय़ा संकटात आहे मी.....

रेवा घरी आली, ती तिच्या विचारात होती, काय झाल नक्की? संदीप असा काय घरी चालला गेला? , सांगितल नाही त्याने काही? काही प्रॉब्लेम असेल का?

विभा तिच्या ऑफिसच काम करत होती, तिचा फोन वाजत होत, ती बोलायला म्हणून बाल्कनीत गेली,... "मिळाली का माहिती काही प्रिया बद्दल",..

"हो केली चौकशी आम्ही , काही विशेष नाही, रोजचा दिनक्रम आहे प्रिया मॅडमचा, रोज ऑफिसला जातात घरी येतात, कधी तरी आईकडे जातात, त्यांचा भाऊ साधा आहे नौकरी वर जातो येतो बाकी विशेष संशयास्पद काही आढळल नाही",...

"प्रॉपर्टी नवीन इन्व्हेस्टमेंट अस काही आहे का प्रिया च गुपचूप घेतलेल",.. विभा

" नाही काही नाही, बँक अकाऊंट ही एक आहे, मी करतो मेल तुम्हाला ",..

"ठीक आहे तरी तुम्ही लक्ष ठेवा ",.. विभा

ठीक आहे..

" प्रिया तर मला ही साधी वाटते, मग कोण असेल?? नक्की रणजित असेल बॉस, काय कराव काळजी वाटते, जाऊ दे, इकडे कोणी काहीही करेना प्रॉपर्टीच, आपण रेवाला सोबत घेवून जाऊ आपल्याकडे, इथे खूप धोका आहे, मला काहीही घेण नाही यांच्या प्रॉपर्टी शी, माझी मुलगी सुरक्षित असली पाहिजे, आधी उगीच मी इतक दुर्लक्ष केल रेवा कडे, मला वाटल ठीक असेल इकडे सगळ, तर कसल काय? गोंधळ आहे सगळा ",... विभा

" रेवा तुझी परीक्षा कधी आहे फायनल एक्झाम ",.. विभा

रेवाच लक्ष नव्हत ती संदीपच्या विचारात होती

"रेवा.... कुठे आहे तुझ लक्ष",.. विभा

"काय मम्मा",.. रेवा

" अग तुझी एक्झाम कधी आहे? ",... विभा

" अजून डेट आली नाही ",... रेवा

" तू माझ्या सोबत येशील का रहायला एक्झाम नंतर? ",.. विभा

" तुझ्यासोबत फॉरेनला? हो चालेल मम्मा",.. रेवा खुश होती

"पुढच्या वर्षी तिकडे घेवू अ‍ॅडमिशन ",... विभा

"चालेल लवकर करावा लागतो अ‍ॅडमिशन साठी प्रयत्न, अस ऐकल आहे ",.. रेवा

" हो करू आपण मी एकदा तुझ्या डॅडीशी बोलून घेते, मला आता हे टेंशनच लाइफ नको आहे, तुला माझ्या सोबत ठेवणार आहे मी आता, आपण सोबत राहु",... विभा

रेवा खुश होती, आईच प्रेम तिला सगळ्यात जास्त प्रिय होत, पण आता तिच्या मनात संदीपचे विचार येत होते, मला संदीप सोबत रहायच आहे, बघू काय ठरतंय ते..

🎭 Series Post

View all