मृगजळ... भाग 13

हे काम तर संदीपलाच करावं लागेल, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, त्याची माहिती काढ थोडी, घरी कोण कोण असतं, कोणावर प्रेम वगैरे आहे का? सगळे डिटेल्स मला आज दुपारपर्यंत दे, लगेच काम सुरू करू आपण


मृगजळ... भाग 13

©️®️शिल्पा सुतार
..............

प्रिया विभाची ओळख तिच्या मैत्रिणींशी करून देत होती, सगळ्याना खूप आवडला विभाचा स्वभाव, ऑफिसचे काही महत्त्वाचे क्लायंट आले होते, रोहन त्यांच्या सोबत होता, सुलभा ताई मस्त गप्पा मारत होत्या सगळ्यांशी

"चला मी आधी तुमच्या सगळ्यांची ओळख माझ्या आजीशी करून देते, खूप छान आहे माझी आजी" ,.... रेवा

"आजी हे आहेत माझे फ्रेंड्स",.... आजी छान बोलत होती प्रत्येकाशी,

"आजी हा आहे संदीप" ,.... रेवा

संदीप ने पुढे होवुन सुलभा ताईंच्या पाया पडल्या, तस सगळे हसायला लागले

"अरे असू दे बेटा, ऐ हसू नका त्याला किती चांगला मुलगा आहे हा, संदीप कुठे रहातो तू, रेवाच्या वर्गात आहेस का तू",... सुलभा ताई

"हो आजी" ,... संदीप छान बोलत होता

विभा प्रिया तिथे आल्या,.. "हॅलो everyone एन्जॉय करा ह कुठल्याही गोष्टीच संकोच करू नका",..

हो आन्टि...

"मम्मा मी माझ्या फ्रेंड्स ना आपल घर दाखवू का ",.. रेवा

हो..

सगळे आत गेले

अतिशय सुंदर होत घर आतून, उंची फर्निचर, सोफा सेट, निरनिराळे पेंटिंग, सुंदर पडदे, प्रत्येक गोष्टी साठी वेगळी रूम होती, टीव्ही रूम, डायनिंग हॉल, मागे स्विमिंग पूल, वरती बेडरूम होते, एखाद्या five star हॉटेल मध्ये आल्या सारख वाटत होत

"मस्त आहे तुझ घर रेवा",... श्रुती

सगळे बाहेर आले, सगळे मुल एका टेबल जवळ बसले, मदतनीस येवून सरबत ठेवून गेला, लगेच तो स्टार्टर घेवून आला

"घ्या फ्रेंड्स" ,.... रेवा

संदीप रेवा कडे बघत होता

"बिनधास्त रहा संदीप, जे हव ते खा, काहीही नियम नाहीत इथे, सगळे साधे आहेत ",... रेवा त्याच्या जवळ येवून बसली,

"आता ठीक आहे मी, मला बर वाटतय, तू माझ्यासोबत रहा ",... संदीप

रोहन येवून मुलांना भेटला,

" हे आहेत माझे डॅडी" ,... सगळे मुल उठून उभे राहिले

"अरे बसा एन्जॉय करा" ,.... रोहन

" डॅडी मी तुझी ओळख करून देते, ही आहे श्रुती, प्रशांत, प्रिती, हा आहे संदीप",.... रेवा

रोहन संदीप कडे नीट बघत होता, अतिशय हँडसम दिसत होता तो व्हाइट शर्ट जीन्स, मुलगा तर छान वाटतो आहे, त्याने विभा प्रिया ला हाक मारली,... "तुम्ही दोघी भेटल्या का रेवाच्या मित्र मैत्रिणींना ",

रेवाने ओळख करून दिली...

त्या दोघी संदीप कडे बघत होत्या, संदीप ला ते समजल, तो ऑकवर्ड झाला होता,

या लोकांना माहिती आहे का माझ्या बद्दल? , बहुतेक त्या बॉडी गार्ड ने सांगितल असेल का काही, चूक केली की काय आपण इथे येवून, काही बोलणार तर नाहीत ना मला हे लोक, रेवाने सांगितल तर नसेल माझ्या बद्दल तरीच ती म्हणत होती माझ्या आईला भेटायच आहे तुला, आता काय करू मी, येईल त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल

विभा सगळ्यांशी बोलत होती, ती संदीप जवळ आली

"कुठे रहातो तू संदीप, आधी कुठल्या शाळेत होतास तू, घरी कोण कोण आहे तुझ्या",.. विभा

"माझी आई आणि मी असतो, माझे बाबा आम्हाला सोडून गेले, त्याने शाळेच नाव सांगितल ",... संदीप

"आई जॉब करते का तुझी? ",.. विभा

हो..

ते दोघ बोलत असतांना रोहन ही तिथे आला

आता विभा रोहन संदीप तिघे बोलत होते

" तुझी रेवाची ओळख आहे हे माहिती आहे आम्हाला, काही हरकत नाही, पण तुम्ही मुल खूप लहान आहात, अजून खूप शिकायच आहे तुम्हाला",.. विभा

" तुझ पुढचा काय प्लॅन आहे बेटा, शिक्षण झाल्यावर काय करणार",... रोहन

"मला बिझनेस करायचा आहे, तुमच्या सारख सक्सेस फुल बनायच आहे, मी मेहनत करायला मागे पुढे बघत नाही ",... संदीप

" खूप छान बेटा तुझे स्वप्न खूप छान आहेत, असाच छान अभ्यास कर खूप मोठा हो",... रोहनला चांगल वाटल मुलगा सिरियस आहे, नक्की पुढे जावून हा काही तरी करेन

ते बोलत असतांना रेवा तिथे आली,.." डॅडी मम्मा संदीप काय बोलण चालल आहे? ",.

" चांगले आहेत तुझे मित्र मैत्रिणी रेवा एन्जॉय कर",.... रोहन

रोहन विभा दुसर्‍या पाहुण्यांना अटेंड करायला निघून गेले

" काय म्हणत होते माझे मम्मी डॅडी?",... रेवा

"मला तर खूप भीती वाटली रेवा, जसा काही माझा इंटरव्ह्यू घेत होते ते, तुझा पुढे काय विचार आहे? घरी कोण आहे? घर कुठे आहे? असं सगळं विचारत होते ",... संदीप

"हो मग विचारणारच ते त्यांना माझी काळजी आहे",... रेवा

"हो का रेवा त्यांना तुझी काळजी आहे म्हणजे काय? तू काही सांगितलं आहेस का त्यांना माझ्याबद्दल? , तुला लग्न करायच आहे की काय माझ्याशी? ",....संदीप मुद्दाम चिडवत होता

" नाही... काहीही काय... मी कशाला काय सांगू ",... रेवा छान हसत होती

" मग बाकीच्यांना काही विचारलं नाही आणि मलाच विचारलं हे कुठे राहतोस? काय करतोस? ",... संदीप

" बहुतेक तु सगळ्यांमध्ये जास्त हे हॅण्डसम दिसत असशील, त्यांना वाटल असेल चांगला दिसतो आहे मुलगा, म्हणून तुला विचारलं असेल ",... रेवा

" काहीही काय रेवा मला असं वाटत आहे हे तूच केलेलं आहे, तूच माझ्याबद्दल तुझ्या मम्मीला काहीतरी सांगितलं असशील, मी पसंत वगैरे आहे की काय त्यांना ",... संदीप

" चूप रे संदीप काही तरी काय",... रेवा छान हसत होती

त्या दोघांचं एक वेगळंच बॉण्डिंग होतं, त्यांची केमिस्ट्री खूपच छान होती, बघणाऱ्या लगेच कळायचं किती छान जोडी आहे ही, जेव्हा संदीप रेवा सोबत असायचा तेव्हा तो विसरून जायचं की तो हे फक्त नाटक करतो आहे, नंतर त्याला आठवायचं नक्की काय करायचं आहे, नको वाटायच त्याला, तो खरोखरच रेवाच्या प्रेमात पडला होता, त्याला रेवा सोबत खूप छान वाटत होत, गरीब श्रीमंत काहीही कळत नव्हत त्याला, फक्त हवी होती रेवाची साथ, पूर्ण पणे गुंतला होता तो रेवात, ती म्हणेल ती पूर्व दिशा, अगदी काहीही करायला तयार होता तो तिच्या साठी

जेवणाची वेळ झाली, रेवा संदीप सोबत होते, संदीप खूप खुश होता

त्या दोघांना लांबून रोहन, विभा, प्रिया बघत होते

"या दोघंच खूप पटत वाटत? रेवा किती प्रेमाने वागते आहे त्याच्याशी, त्याला जेवण ही वाढल आता तिने" ,... विभा

"हो ना", ... प्रिया

"पण मुलगा चांगला आहे, नक्की पुढे जावून तो काहीतरी चांगल करेल",... रोहन ला विश्वास होता

जेवण झाल... "चला आम्ही निघतो आता",... संदीप

"उद्या कॉलेज ला ये",.. रेवा

हो...

"आता कस जाणार? ",... रेवा

" टॅक्सी ने",... श्रुती ने टॅक्सी बूक केली..

सगळे मुल रोहनला भेटायला आले

" निघतो आम्ही अंकल, खूप एन्जॉय केल आम्ही ",... प्रशांत

" खूप छान वाटल तुम्ही सगळे आले तर, या परत",.. रोहन

"हो नक्की येवू",... श्रुती

विभा संदीप कडे बघत होती,

सगळे मुल निघाले, रेवा गेट पर्यन्त गेली

" नक्की तुझ्या डॅडी मम्मीला माझा संशय आला आहे, ते सगळे माझ्याकडे बघत होते परत ",... संदीप

" चांगला आहे ना मग, आपण चोरून लपुन तर काही करत नाही आहोत ",... रेवा

टॅक्सी आली, मुल गेले, रेवा आत आली, येवून आजी जवळ बसली, रोहन विभा प्रिया तिथे होते

"छान झाली नाही आज ची पार्टी ",... सुलभा ताई

" हो ना, चला मी थकली आहे, मी जाऊ का रूम मध्ये",... रेवा

"ठीक आहे रेवा दरवाजा लॉक करू नकोस, मी येते आहे थोड्या वेळाने",.. विभा

"ठीक आहे मम्मा",.. रेवा

रेवा रूम मध्ये निघून गेली

"रोहन संदीपची चौकशी करावी लागेल",.. विभा

" हो करू आपण चौकशी, पण चांगला आहे मुलगा, साधारण घरचा आहे, पण मी आहे, मी करेन बरोबर, हे सगळं आपल्या रेवाच तर आहे, तिच्यासाठी काहीही करू, you don\"t worry ",.. रोहन

विभाच्या चेहर्‍यावर समाधान होत
....

संदीप घरी आला,

" कशी झाली पार्टी संदीप",... सुरेखा ताई

" आई तू जागी आहेस अजुन",.. संदीप

" तू घरी नाही तर झोप येत नाही मला, जेवला आहेस का तू? ",.. सुरेखा ताई

"हो आई खूप छान जेवण झालं माझ, तू यायला पाहिजे होतं आई तिकडे, खूप मोठा बंगला आहे त्यांचा, खूपच सुरेख बगीच्या, स्विमिंग पूल सगळंच आहे, त्यांच्या घरी जेवणही खूप छान होतं, आई मला असंच काहीतरी करायचं आहे छान आपल्यासाठी",... संदीप

" हो आता खूप रात्र झाली आहे आराम कर ",.. सुरेखा ताई

संदीप आवरून जागेवर आला, त्याला आज झोपच येत नव्हती, सारखा रेवाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता, काय करतो आहोत आपण? रेवा किती विश्वास ठेवते माझ्यावर, किती प्रेम करते ती माझ्यावर ती, तिच्या घरचे किती चांगले आहेत,

माझं ही रेवा वर खूप प्रेम आहे, मला तिच्या सोबत राहायचं आहे, हे केवळ ती श्रीमंत आहे म्हणून नाही तर मला खरंच रेवा खूप आवडते, तिच्या आई-वडिलांनी जरी तिला घराबाहेर काढून दिले तरी मी तिला घेऊन या घरात राहील,

रेवा खूप निरागस आहे, किती छान साथ दिली तिने आज माझी, सगळ्या गोष्टी नीट समजून सांगत होती, किती चांगली आहे ती आणि मी काय करणार आहे तर तीला माझ्या खोट्या वाढदिवसाला बोलवुन संकटात पाडणार आहे, मला नाही करायचं हे, मी उद्या सांगतो बॉसला फोन करून की मला हे काम जमणार नाही, तुम्ही दुसरा मुलगा बघा आणि मी रेवाला हे सांगून दिल की तुला धोका आहे, असंच करूया आपण, अजिबात या धोक्यात पडायचं नाही,

कोण आहे ते बॉस उगाच पैशासाठी रेवाला किडनॅप करतील, न जाणो ते काय करतील तिच्यासोबत, अजिबात नाही मी, यापुढे रेवाला धोक्यात टाकू शकत नाही, तिच्या घरचे हो म्हणू अगर नाही, पण माझ रेवावर प्रेम राहीलच, मी रेवाला काही होवू देणार नाही, आता जरा संदीपला बरं वाटत होतं, त्याला झोप लागली

सकाळी संदीप लवकर निघाला कॉलेजला जायला, व्यवस्थित चहा नाश्ता ही केला नाही त्याने, बाहेर येउन राकेश ला फोन केला,... "मला तुला भेटायचं आहे राकेश, येता येईल का आता तुला पाच मिनिट",..

राकेश आला,... "काय झाल आहे संदीप?",..

" मला नाही करता येणार हे काम, मी बॉस ला सांगतो आहे",.. संदीप

"का रे काय झाल, अजून पैसे हवे आहेत का? ",.. राकेश

"नाही यार लहानपणापासून कधीच वाईट काम केलेलं नाही कोणतं, हे असं मला अजिबात आवडत नाही, कोणाला पळवणे धमक्या देणं नाही करणार मी आणि रेवा खूप चांगली मुलगी आहे, मी तिला अस धोक्यात टाकू शकत नाही, आईला समजल तर ती कधीच माफ करणार नाही मला ",... संदीप

" अरे पण तू हे तुझ्या आई साठी करतो आहेस ना, खूप पैसे मिळतील ",.. राकेश

" नको ही वाट चुकीची आहे मी मेहनत करेन पण हा गुन्हा नको घडायला माझ्या हातून ",.. संदीप

" पण तुला अस मधुन हे काम सोडता येणार नाही ",.. राकेश

" का नाही सोडता येणार? मी बघितल नाही कोण आहे बॉस, त्यांच नाव मला माहिती नाही? , समोर जरी उभे असले तरी समजणार नाही, आणि माझ्या जवळ काहीही पुरावे नाहीत, मी सोडू शकतो हव तेव्हा काम ",.. संदीप

" ठीक आहे तू विचार कर आणि मला नीट संध्याकाळपर्यंत तर सांग",.. राकेश

" नाही आता काही विचार करायचा नाही माझं फिक्स आहे मला हे काम करायचं नाही",... संदीप

" ठीक आहे मग तू तसं बॉसला फोन करून सांगून दे",... राकेश

" हो सांगतो मी, पण तुला जर बॉसने विचारलं तर तू सांग की आता संदीप हे काम करू शकत नाही त्याला जाऊ द्या",... संदीप

" ठीक आहे मी सांगतो",.. राकेश

संदीप कॉलेजला निघून गेला

राकेश नी फोन काढून बॉसला फोन लावला,... "आत्ताच मला संदीप भेटला होता, त्याचे विचार काही नीट वाटत नाही, तो आता हे काम करायला नाही म्हणतो ",.

"का काय झालं ?, कोणी काही बोलल का त्याला ",...बॉस

"आता तो म्हणतो की लहानपणापासून कधीच असं चुकीचं काम केलं नाही, मला वाईट वाटत वगैरे ",..राकेश

"अजून काही दुसरे कारण तर नाही",..बॉस

"माहिती नाही पण कालपर्यंत तो ठीक होता आज अचानक असं म्हणायला लागला की मी हे काम करणार नाही, काल तो तयार होवुन कुठे तरी गेला होता संध्याकाळी, मी विचारल होत त्याने सांगितल नाही ",.. राकेश

"अच्छा अस आहे का, काल त्या रेवाकडे पार्टी होती, संदीप ने मला विचारल होत की मी जाऊ का तिथे, तर मी नाही सांगितल होत, तरी गुपचूप गेला वाटत हा तिकडे आणि तिथली श्रीमंती बघून त्याला वाटल असेल आपण आयात मायत जावई होवू इथल, उगीच का काम करा ",... बॉस

" अस आहे तर, काय करूया त्याला तशी आपली विशेष माहितीही नाही, जाऊ द्यायच का त्याला? ",..राकेश

"नाही सोडायच त्याला, आणि हे असं मधूनच त्याने काम सोडून जाण आपल्यासाठी धोकादायक आहे, आता परत कुठून दुसरा नवीन मुलगा शोधायचा आणि नेमका तो त्या रेवा च्या मागे कसं सोडायचा, परत या सगळ्या कामाला सहा महिने जातील, आपण आधीच हा सगळा प्लॅन सहा महिन्यापासून करतो आहे, आता नेमकं काम पूर्ण व्हायवर आल होत, आता का हा संदीप नाही म्हणतो आहे ",... बॉस

" हो ना काय करूया आता ",... राकेश

"हे काम तर संदीपलाच करावं लागेल, त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, त्याची माहिती काढ थोडी, घरी कोण कोण असतं, कोणावर प्रेम वगैरे आहे का? सगळे डिटेल्स मला आज दुपारपर्यंत दे, लगेच काम सुरू करू आपण",... बॉस

"दुपारपर्यंत कशाला आत्ताच सांगतो ना मी, त्याच्या घरी फक्त त्याची एक आई आहे आणि त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम आहे, तो आईला खूप घाबरतो आणि आई साठी काहीही करायला तो तयार असतो",... राकेश

" झालं ना मग काम एक काम कर ",... बॉस फोनवर राकेश ला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होत्या

" ठीक आहे मी करतो तसं ",.. राकेश

" तुझ्या अकाउंट वर दहा मिनिटात पैसे येतील",.. बॉस

" आता कशाला पैसे देत आहे तुम्ही मला ",.. राकेश खुश होता

" असू दे रे काम जोखमीचं आहे आणि खर्चही होईल तुझा",.. बॉस

" ठीक आहे मी करतो काम आणि मग काम झाले की तुम्हाला फोन करतो",..राकेश

दोन तासाने राकेश ने बॉस ला फोन केला,..." काम झाल आहे आपल ",...

" ठीक आहे ",... बॉस

🎭 Series Post

View all