मृगजळ... भाग 10

विभा ने फोन ठेवला, ती खाली बसली, नक्की काय आहे हा प्रकार, प्रिया अस करणार नाही, ती ऑलरेडी मालकिण आहे, तिला प्रॉपर्टी ची हाव असेल अस वाटत नाही, मग तो माणूस कोण आहे ज्याला आमची पूर्ण माहिती आहे,मृगजळ... भाग 10

©️®️शिल्पा सुतार
..............

विभा एअरपोर्टवर लॅण्ड झाली, या वेळी बर्‍याच दिवसांनी ती घरी आली होती

तिने तिथून रेवा ला फोन केला, रेवा क्लास मध्ये होती त्यामुळे तिने फोन उचलला नाही

विभा तिच्या घरी गेली, एकटीच आली होती ती यावेळी, तिने घरी गेल्या नंतर रोहन ला फोन केला,.. "मी आली आहे इकडे घरी, संध्याकाळी येते मी घरी" ,

"चालेल जेवायला ये",... रोहन

हो...

" प्रिया विभा आली आहे, संध्याकाळी येणार आहे जेवायला, मावशींना चांगला जेवणाचा बेत करायला सांग, मी विभाला जेवायला बोलावलं आहे" ,... रोहन

"हो चालेल काय आवडतं विभाला? ",.. प्रिया

" खरं सांगू का मला आता लक्षात नाही विभाला काय आवडतं ते, कर काहीतरी दोन चार पदार्थ ",... रोहन

" ठीक आहे प्रियाने घरी फोन केला स्वयंपाक वाल्या मावशींना स्वयंपाकाचं इन्स्ट्रक्शन दिल, काही सामान लागलं तर मागवुन घ्या",... प्रिया

" ठिक आहे ताई",..

पहिल्यांदाच विभा आणि प्रिया प्रत्यक्षात भेटणार होत्या, तसं फोटोत पाहिलं होतं त्यांनी एकमेकांना दरवेळी विभा आली की किती रेवाला तिकडे बोलवुन घ्यायची त्यामुळे त्यांची अशी प्रत्यक्षात भेट झालीच नव्हती, आणि दोघींना भेटायची उत्सुकता ही नव्हती,

कॉलेज झाल्यानंतर रेवा ने फोन बघितला, मम्मा चा मिस कॉल होता, तीने आनंदाने कॉल बॅक केला..

" बेटा मी आली आहे घरी, संध्याकाळी येते घरी डिनर साठी",... विभा

"मम्मा मी तुझ्या सोबत येणार आहे का तुझ्याकडे? ",.. रेवा

"हो तू येणार आहेस माझ्या कडे मी एक वीक आहे",.. विभा

"मम्मा मी खूप खुश आहे, मी घरी गेल्यावर बॅग भरते",... रेवा

"काय झाल रेवा? खूप खुश आहेस तू? Anything special? ",..संदीप

" माझी मम्मी आली आहे, आता तिला फोन केला होता ",.. रेवा

" अरे वा मजा आहे मग, कॉलेज ला येणार ना पुढचा आठवडा ",.. रेवा

" बघते मम्मा चा काय प्लॅन आहे ते",.. रेवा

" माझा बर्थडे आहे मॅडम लक्ष्यात आहे ना ",... संदीप

" Ohh I am sorry... येइन मी नक्की कॉलेज ला ",... आनंदात रेवा संदीप चा बर्थ डे आहे हे विसरून गेली होती

रेवा घरी निघाली आज लवकर, संदीप ने त्याच्या बॉस ला फोन करून सांगितलं की विभा आली आहे, रेवा घरी गेली आता..

संध्याकाळी लवकरच रोहन आणि प्रिया घरी यायला निघाले,... "आधी पोलिस स्टेशन ला जाऊ",

" हो ती कंप्लेंट पूर्ण करू ",... प्रिया

"तू सीमा ला फोन कर",... रोहन

आज रेवा लवकर घरी आली होती, सीमा ने फोन उचलला

"तुला आता पोलिस स्टेशन ला येता येईल का",.. प्रिया

"हो येते मी मॅडम",.. सीमा

रोहन प्रिया सीमा पोलिस स्टेशनला गेले..

सीमा ने त्या दिवशी काय झालं ते सगळ सांगितल, गुंडांनी दिलेला नंबर दिला, सावंत साहेबांनी सगळ लिहून घेतल,

"ते फोटो दाखव सीमा रेवाच्या मित्र मैत्रिणींचे",.. रोहन

सीमा ने संदीप चा फोटो दाखवला, इंस्पेक्टर सावंत यांनी सगळी माहिती लिहून घेतली,... "तुम्ही काळजी करू नका मी करतो चौकशी पण अलर्ट रहा",.

रोहन प्रिया घरी आले.. सीमा घरी गेली

रेवा आज खूप खुश होती, तयारी करून खाली बसली होती, विभा अजून आली नव्हती,

" विभा केव्हा येणार आहे",... रोहन

"येईलच ममा आता दहा मिनिटात, तुम्ही फ्रेश होऊन या दोघ",... रेवा

प्रिया पहिल्यांदा रेवाला एवढ आनंदी बघत होती

दोघ रूम मध्ये आले

"खरच एका मुलीसाठी आई तिच्या सोबत असण किती महत्वाच आहे, रेवाला आईच प्रेम मिळाल नाही, आज किती खुश आहे ती ",.. प्रिया

"हो ना, ती अगदी लहान होती तेव्हा पासून एकटी आहे, तस आहोत आपण सगळे मी आहे, आई आहे, तू आहेस, पण विभा ची कमी जाणवते तिला",.. रोहन

हो ना...

"आपण एक पार्टी ठेवू या का उद्या अशी विभा आली त्या मुळे मस्त गेट टुगेदर होईल, कधीच नुसत टेंशन सुरू आहे ",.. रोहन

"हो चालेल, मस्त प्लॅन आहे, पण आज सांगाव लागेल मॅनेजर ला, पार्टी अरेंज करावी लागेल, तर होईल अरेंज मेंट",... प्रिया

" ठीक आहे मी करतो मॅनेजर ला फोन",... रोहनने फोन लावला, बराच वेळ तो बोलत होता

दोघ आवरुन खाली आले

दहा मिनिटाने विभा आली, पँट शर्ट जॅकेट घातल होत तिने, छान दिसत होती ती, तिने रेवा साठी खूप गिफ्ट आणले होते, रेवा तिच्या आजूबाजूला होती अगदी लहान मुली सारखी

प्रिया ही सलवार सूट मध्ये खूप छान दिसत होती ती येवून विभा ला भेटली, दोघी लगेच छान गप्पा मारत होत्या, सुलभा ताई रूम मधुन बाहेर आल्या, विभा जावून त्यांना भेटली, रोहन ही छान लक्ष देत होता सगळ्यांकडे

विभा ने प्रिया साठी ड्रेस गिफ्ट आणला होता,... "हे घे प्रिया मला वाटल होत त्या पेक्षा तू खूप सुंदर आहेस, वापर हा ड्रेस",..

Thank you विभा...

सुलभा ताईंन साठी साडी आणली होती तिने , त्या ही खूप खुश होत्या, तस त्यांच पूर्वी ही विभा शी काही भांडण नव्हत, सुलभा ताई अतिशय समजूतदार होत्या सगळ्यांशी पटत होत त्यांच

जेवण झाल, आज रेवाने काही तक्रार केली नाही जेवतांना ,..." मी ममा सोबत जाते घरी ",..

"विभा रेवा उद्या आपल्या कडे छोटस गेट टुगेदर आहे उद्या, काही प्लॅन करू नका दुसरा ",... रोहन

"ठीक आहे संध्याकाळी ना ",.. विभा

"हो, मी कळवतो वेळ ठिकाण, मी सोडवून येतो तुम्हाला, चल प्रिया",... रोहन

प्रिया रोहन पुढे बसले होते गाडीत, विभा रेवा मागे, विभा तिच ऑफिस काम, प्रोफाईल, तिकडच शहर बद्द्ल खूप सांगत होती, रेवाने तिला प्रश्न विचारून बेजार केल होत, आज रेवा खूप लहान आहे अस वाटत होत, एन्जॉय करत होती ती तिच्या मम्मा ची कंपनी,

घर आल दोघी खाली उतरल्या,.. "आत येतात का रोहन प्रिया",

"नको निघतो आम्ही बराच उशीर झाला आहे येवू नंतर",... रोहन

"घरी पोहोचले की मेसेज कर डॅडी",... रेवा

ठीक आहे

ते दोघ निघाले


विभा रेवा घरात आल्या खूप खुश होत्या दोघी

"रेवा तू कॉफी घेशील का? ",.. विभा

हो..

विभा ने छान कॉफी केली दोघी बाहेर बाल्कनी त येवून बसल्या

" कस सुरू आहे तुझ कॉलेज रेवा? , मित्र मैत्रिणी कोण कोण आहेत? ",.. विभा

रेवा खूप भरभरुन बोलत होती सगळ्या ग्रुप बद्दल सांगत होती, संदीप चा बर्थडे आहे ते ही तिने सांगितल

" कोण आहे संदीप",...विभा

"मम्मा त्याच्या बद्दल मला तुला सांगायच होत, मी फोन केला होता बघ तुला, मला संदीप आवडतो त्याला ही मी आवडते",.. रेवा

" कधी पासून सुरू आहे हे",.. विभा

"अजुन तस काही नाही मम्मा म्हणजे संदीप मला प्रपोज करणार आहे त्याच्या बर्थडे ला अस मला समजल आहे तुला काय वाटतं आहे",... रेवा

" मला अजिबात माहिती नाही तुझ्या ग्रुप बद्दल, पण तरी आधी नीट चौकशी कर, तुझ्या डॅडी ला सांग सगळ परस्पर ठरवु नकोस ",.. विभा

" नाही मम्मा मी सांगणार आहे घरी, पण अजून आमच नक्की नाही ",.. रेवा

" रोहन काय म्हटला थोडी तरी कल्पना आहे का त्याला",.. विभा

" डॅडी ला सांगितल नाही मी अजून ",.. रेवा

" का अस केल बेटा कुठलीही गोष्ट लपवुन ठेवायची नाही",.. विभा

"मी सांगणार होते पण अजून आमच तस काही नाही आम्ही जस्ट फ्रेंड्स आहोत आणि संदीप माझ्या ग्रुप मध्ये आहे हे माहिती आहे रोहन आणि प्रिया ला",... रेवा

"प्रिया कशी आहे वागायला घरात",.. विभा

" चांगली आहे ती खूप, घरात नीट लक्ष असत तीच, आजीची खूप काळजी घेते ",... रेवा

"तुझ्या कडे लक्ष देते का ",.. विभा

" हो ती नेहमी मला मदत करते, माझी काळजी घेते मीच चीड चीड करते तिच्यावर ",... रेवा

" का करतेस अस तू बेटा ",.. विभा

" तिला बघितल की मला तुझी आठवण येते ममा, मग मला खूप राग येतो ",.. रेवा

" पण तिचा काही दोष नाही बेटा, तू नीट वागायला पाहिजे तिच्याशी , आम्ही आधी वेगळ झालो होतो नंतर प्रिया आली ऑफिस मध्ये, तू नीट मोकळ रहा बेटा प्रिया सोबत, छान आहे ती स्वभावाने, बॉडी गार्ड का ठेवला आहे रोहनने तुझ्या साठी ",.. विभा

" खूप विचित्र गोष्टी होता आहेत मम्मा, कोणी तरी घराचा व्हीडिओ घेत होत त्या दिवशी, कोणी तरी मागे आहे, त्या दिवशी बंगल्यात कोणी तरी शिरल होत ",... रेवा

" कोण होत ते, का मागे आहेत ते लोक? तुझ्या की रोहन च्या मागे ",.. विभा

" ते माहिती नाही आणि सीमा वर अॅटॅक केला कोणी तरी, डॅडी ला वाटत आहे मला रणजित काका पासून धोका आहे, तो बोलतो भेटू नको त्याला, पण काका माझ्याशी चांगल बोलतो मम्मा मी काय करू ",... रेवा

विभा विचार करत होती हे नक्की कोणी तरी जवळ ची व्यक्ति करत आहे, रणजित आहेच बदमाश, पण प्रिया च्या घरचे कोण आहेत कसे आहेत ते ही बघितल पाहिजे

" हे प्रिया च्या घरचे येतात का कधी घरी रेवा",.. विभा

" कधी तरी तो एक मामा येतो, नाही तर प्रिया जाते तिच्या घरी, मी एकदा गेली होती प्रिया सोबत, चांगली आहे ती आजी, मला खूप खाऊ दिला तिने आणि ड्रेस घेतला, प्रेमळ आहे ते लोक",... रेवा

विभा विचार करत होती खरच चांगले वाटता आहेत ते लोक, पण तरी चौकशी करायला पाहिजे कारण माझ्या मुलीला धोका आहे, मी थोडे दिवस इथे राहू का रेवा सोबत, करू विचार पण आता पासुन कोणाला नको सांगायला उगीच जमल नाही तर..

" रणजित तुला किती वेळा भेटतो तो काय बोलतो ",... विभा

"रणजित काका नेहमी भेटतो तो मला म्हणतो तू माझ्या कडे ये रहायला ",.. रेवा

"अजिबात जायचं नाही कुठे घर सोडून रेवा, अजिबात चांगला नाही तो रणजित, नेहमी पैसे मागतो तो",.. विभा

"हो माझ्या कडे ही पैसे मागतो कधी कधी तो काका",... रेवा

"बापरे खूप त्रासदायक आहे तो",... विभा

लॅन्ड लाइन वर फोन वाजत होता रेवाने फोन उचलला कोणी काही बोलल नाही रेवाने फोन ठेवला

" कोण होत ग? कोणाचा फोन होता? ",.... विभा

" माहिती नाही मम्मा, काही बोलल नाही कोणी",... रेवा

परत फोन वाजला परत रेवाने फोन उचलला, परत कोणी बोलल नाही

" आता रेवा तू थांब मी बघते कोण आहे ते",... विभा

परत दहा मिनिटांनी फोन वाजला यावेळी विभा ने फोन उचलला

"मी तुमचा हितचिंतक बोलतो आहे तुमच्या मुलीला धोका आहे प्रिया पासून ",...

" कोण बोलतय काहीही काय सांगताय, hello कोण बोलतय सांगा",... विभा

"मी कोण आहे हे महत्वाचं नाही, तुमच्या मुलीला धोका आहे त्या घरात, प्रॉपर्टी साठी काहीही करू शकते ती प्रिया",...

"Shut up I said shut up या पुढे इथे फोन करू नका, नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नाही",... विभा

"प्रिया रोहन सोडून कोणाला माहिती आहे की तुम्ही आल्या आहेत या सिटीत, मी कशाला फोन करेन या नंबर वर, हे घर नेहमी बंद असत ना, मला हा नंबर प्रिया कडून मिळाला आहे be alert मॅडम, be serious ",...

विभा ने फोन ठेवला, ती खाली बसली, नक्की काय आहे हा प्रकार, प्रिया अस करणार नाही, ती ऑलरेडी मालकिण आहे, तिला प्रॉपर्टी ची हाव असेल अस वाटत नाही, मग तो माणूस कोण आहे ज्याला आमची पूर्ण माहिती आहे, तो हे घर फोडण्याच्या विचारात आहे, मला नाही वाटत प्रिया विलन आहे

"काय झाल मम्मा कोण होत? काय म्हटले ते? ",.. रेवा

"तू बरोबर बोलते रेवा काहीतरी गडबड आहे चल बॅग पॅक कर आपल्याला रोहन कडे जाव लागेल इथे धोका आहे ",... विभा

विभा ने रोहनला फोन केला,... "आम्हाला घ्यायला ये रोहन सोबत सिक्युरिटी गार्ड ही आण",..

"काय झालं विभा, आता गेला ना तुम्ही तिकडे काही प्रॉब्लेम आहे का ",... रोहन

" इथे आता मला अननोन व्यक्ति चा कॉल आला होता, आम्हाला इथे सुरक्षित नाही वाटत ",... विभा

" पण तुम्ही तिकडे आहात हे कस समजल त्या कॉलर ला काही तरी मोठा प्रॉब्लेम आहे ",... रोहन

" हो ना",...

रोहन परत निघाला त्या दोघींना आणायला या वेळी प्रिया घरी होती सिक्युरिटी गार्ड सोबत होता

रोहन विभा रेवा वापस घरी आले प्रिया हॉल मध्ये बसुन त्यांची वाट बघत होती

" काय झालं अस अचानक ",... प्रिया

" मला अननोन व्यक्तीचा फोन आला, तो बोलत होता तुम्हाला धोका आहे, रेवाला धोका आहे, मला खूप भीती वाटली मी इथे राहू का? ",... विभा

प्रिया उठून विभा जवळ गेली,... "विभा तू रहा इथे, विचारतेस का अस, नंबर आणला का तू तो, खूप प्रॉब्लेम सुरू आहे सध्या ",..

"हो हा बघ नंबर ",... विभा

" रोहन हाच तो नंबर सीमा ने दिलेला आणि मला ही कॉल्स येत होते या नंबर वरुन",... प्रिया

" काय तुला ही कॉल्स येत होते का? काय म्हणत होता तो माणूस ",.. विभा

" उगीच एक दोन दा धमकी दिली आणि सांगितल मला रोहनला धोका आहे, रेवाचा बॉडी गार्ड काढून टाक अस",... प्रिया

" तुला काय बोलला तो माणूस ",.. रोहन

" तो ही बोलला की रेवा ला धोका आहे ",...विभा

" कोणाकडून? ",. ..रोहन

" घरच्यांकडून", ...विभा

म्हणजे?? ..

"तो माणूस बोलला तुमच्या मुलीला धोका आहे, मला भिती वाटली तिकडे म्हणून आम्ही इकडे आलो ",..विभा

"मम्मा मलाही रणजित काका बोलला होता का बॉडी गार्ड नको ठेवू", ...रेवा

"तू आज बोलली होतीस का रणजित काका शी",..रोहन

"नाही पण मी माझ्या फ्रेंड्स ला सांगितल मम्मा आली आहे ते ",..रेवा

"जा बेटा तू आराम कर ",..रोहन

" मम्मा तू माझ्या रूम मध्ये रहा, माझ्या सोबत ",... रेवा

" हो आलीच मी ",.. विभा

रेवा रूम मध्ये निघून गेली

" मला खूप टेंशन येत आहे रोहन प्रिया, रेवा च्या मागे कोणी लागल आहे का? , रणजित तर नसेल ना ",.. विभा

" काय माहिती काय सुरू आहे, तू रेवाला सांग रणजित ला सगळ्या गोष्टी सांगत जाऊ नकोस, आणि कॉलेज ते घर थोडे दिवस एवढ कर, तिच्या मित्र मैत्रिणी बद्द्ल बोलून घे",.. रोहन

" हो ती सांगत होती संदीप नावच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याला रेवा आवडते तो तिला प्रपोज करणार आहे",... विभा

" काय? मला काही माहिती नाही या बद्दल ",.. रोहन

" संदीप कोण आहे त्याची चौकशी करावी लागेल ",.... विभा

" हो उद्या सीमा ला सांगू लक्ष ठेवायला आणि आपण परत पोलिस स्टेशनमध्ये जावून येवू ",... रोहन

" उद्या गेट टुगेदर आहे तर रेवाला सांगू संदीप ला बोलव घरी म्हणजे ओळख होईल, कशी वाटते आहे आयडिया ",.. प्रिया

"चालेल तस करू, बघु तरी कोण आहे संदीप ",.. विभा
🎭 Series Post

View all