मृगजळ... भाग 9

हो ना तो एवढा चांगला आहे तर तो इन्स्पेक्टर ला बघून का पळाला? आणि आता रणजीत म्हणतो आहे की मीच तुला इन्स्पेक्टर कडे पाठवलं आणि तुमच्या मला तुम्हा दोघा भावांन मध्ये फूट पाडायची आहे , आणि मला एकटीला तुझी इस्टेट घ्यायची आहे



मृगजळ... भाग 9

©️®️शिल्पा सुतार
..............

" तू खूप छान प्रकारे हॅण्डल केलं रेवाला",... प्रिया

आई ही रोहन कडे कौतुकाने बघत होती..

"हो मग काय करणार ना रेवाला चांगलं-वाईट कळत नाही, तिला नेहमी तो रणजीत काका चांगला वाटतो, जर आपण रणजीत विरुद्ध बोललो तर ती आपल्यापासून दूर जाते, म्हणून मी ही आयडिया केली की मीच घेऊन जातो त्याला दवाखान्यात",... रोहन

"बरोबर केल तू, आता आपण रणजित चा प्लॅन सक्सेसफुल होवू द्यायचा नाही, त्याने रेवाला काही सांगितल की आपण त्याला मदत करायची म्हणजे रेवा शांत होईल रणजित चा प्लॅन फेल जाईल ",.. प्रिया

" रेवाला सगळं सांगितलं असतं तर की तो रणजित तीन चार दिवसापासून आपल्या सगळ्यांकडे पैसे मागतो आहे तर रेवाला खरं वाटलं नसतं, ती बोलली असती मग तुम्ही दिले का नाही पैसे, तो आजारी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच आजारपण एक ढोंग आहे",.. रोहन

"प्रिया तू ऑफिसला जा, मी रणजीतला डॉक्टरकडे नेऊन आणतो, सीमा वर हल्ला झाला ती पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून येतो एक तासात",.. रोहन

" ठीक आहे पण खरच रणजित ला काही झाला आहे का आजार",.. प्रिया

"नाही ग पण रेवा साठी कराव लागेल हे",... रोहन


रोहन रणजीत कडे गेला रणजीत बाहेर आला आणि कारमध्ये बसला

" मला माफ कर रणजित मला माहिती नव्हतं की तु खरोखर एवढा आजारी आहेस",.. रोहन

" एक काम कर रोहन तू खूप बिझी असतो, मी जाईन माझा माझा डॉक्टर कडे मला पैसे देऊन दे",.. रणजित

" नाही रे तुझ्यासाठी कशाला आहे मी बिझी, जाऊ आपण डॉक्टर कडे, ड्रायव्हर आधी गाडी पोलीस स्टेशनला घ्या",.. रोहन

" पोलीस स्टेशनला..... पोलीस स्टेशन का बरं",.. रणजित

" घाबरायला काय झालं? माझ काम आहे तिकडे, काल रेवा ची बॉडीगार्ड सीमा वर रात्री हल्ला झाला, कोणी केला हल्ला ते सगळं माहिती आहे मला, तिच कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला जायचं आहे, पाच मिनिटात थांबशील ना तू",.. रोहन

तसा रणजीत चपापला,... " कसे लोक असतात ना या जगात का केला असेल कुणी हल्ला",..

" काय माहिती ते च तर पत्ता करायचा आहे, आलोच मी जावून ",.. रोहन


रोहन कार मधून उतरला,.." तू येतोस का रणजीत आत मध्ये ",

" नको मी ईथेच थांबतो",.. रणजित

रोहन आत गेला

"या रोहन साहेब",.. इन्स्पेक्टर सावंत खुर्चीत बसलेले होते

" काल रात्री मी फोन केला होता ना तुम्हाला तीच कंप्लेन ऑफिशियली नोंदवून घ्या",.. रोहन

चालेल इंस्पेक्टर सावंत यांनी शिपायाला हाक मारली,.." हे साहेब जे सांगत आहे ती कंप्लेंट नोंदवून घ्या आणि कंप्लेंट नोंदवली की एक कॉपी त्यांना द्या",..

येस सर..

रोहन बराच वेळ बोलत होता हवालदार यांच्याशी, ते लिहून घेत होते

"चला इंस्पेक्टर साहेब निघतो मी",... रोहन

" ठीक आहे आम्ही चौकशी करतो" ,.. सावंत

" मला बोलायचं आहे तुमच्या शी मी येतो नंतर आता घाईत आहे ",.. रोहन

"चालेल तेव्हा जिच्यावर हल्ला झाला त्या बॉडी गार्ड ला ही घेवून या",.. सावंत

" ठीक आहे... एक छोटसं काम होत साहेब ",.. रोहन

"बोला ना साहेब तुम्ही आदेश द्यायचे",.. सावंत

"बाहेर गाडीत रणजित आहे, जरा त्रास देतो आहे तो, येता का सोबत, भेटू त्याला आपण ",... रोहन

सावंत साहेबांच्या चेहर्‍यावर हसू होत,.." चला",.. दोघ बोलत बाहेर आले

रणजित गाडीत बसला होता, इंस्पेक्टर साहेबांना बघून त्याला घाम फुटला, चुपचाप तो गाडीतुन उतरला आणि निघून गेला

" चला निघतो मी गेला तो",.. रोहन

रोहन कार जवळ आला... रणजित कुठे गेला

" त्यांना काम होत काही तरी अर्जंट ते नंतर भेटतील तुम्हाला",.. ड्रायवर काका

"ठीक आहे गाडी ऑफिस कडे घे",.. रोहन
.....

रेवा कॉलेज ला पोहोचली, सगळ्या फ्रेंड मध्ये संदीप च्या बर्थडेची चर्चा होती

रेवा मनात विचार करत होती काय गिफ्ट द्यावे आपण संदीप ला, तो मला प्रपोज करणार आहे का? , काय उत्तर देवु मी डॅडी ममा कोणाला काही माहिती नाही त्याच्या बद्दल, actually मलाही काही माहिती नाही त्याच्या बद्दल, आज करते चौकशी,

तिचा लहानपणा पासूनचा मित्र सौरभ आला क्लास मध्ये

हाय सौरभ..

हाय रेवा..

"तुझा नवीन मित्र संदीप कुठे आहे आज",... सौरभ

" आला नाही अजून तो",... रेवा

"कुठे राहतो तो",.. सौरभ

"माहिती नाही, तुला माहिती आहे का त्याच्या बद्दल थोडी",.. रेवा

"नाही तो आपल्या ग्रुप मधे नव्हता, का ग",.. सौरभ

"तो कुठे राहतो त्याच्या बद्दल काहीच माहिती नाही मला",..रेवा

"मग माहिती करून घे एवढच सांगतो मी तुला, बाकी तू हुशार आहेस ",.. संदीप


सर आले शिकवायला सुरुवात झाली, जरा वेळाने संदीप त्याचे मित्र आले

लेक्चर झाल

" चल रेवा डब्बा खायला",.. संदीप

ते कॅन्टीन मध्ये गेले, संदीप चा मित्र सोबत होता, रेवा एकदम गप्प होती, संदीप ला समजल काहीतरी झाल आहे, त्याने मित्रा ला पाठवून दिल

" काय झालं रेवा आज एकदम गप्प आहेस तू",...संदीप

"काही नाही",.. रेवा

"काय झालं सांग ना प्लीज, आपण आता कुठलीही गोष्ट लपवायची नाही एकमेकांन पासून ",.. संदीप

" तुझ्या बद्दल मला काहीच माहित नाही संदीप, तू आधी कुठे होतास शिकायला? ",..रेवा

"बस एवढच ना विचार काय विचारायच ते",...संदीप

"तू कुठे राहतोस घरी कोण कोण आहे तुझ्या ",..रेवा

"माझ्या घरी माझी आई, त्याने पत्ता सांगितला, एकदा घरी चल माझ्या, माझ्या आई खूप चांगली आहे ",... संदीप

" तुझ्या घरी कोण कोण आहे रेवा, मलाही काही माहिती नाही तुझी ",... संदीप

" मी मम्मा डॅडी आजी आणि प्रिया, माझी मम्मा आमच्या सोबत नाही रहात, डॅडी मम्मा चा डिवोर्स झाला आहे, आता प्रिया आहे माझी न्यू मम्मा, आणि माझी आजी खूप छान आहे ",.. रेवा

" चांगली आहे का ती प्रिया? का तुला त्रास देते ",.. संदीप

" नाही देत त्रास, खूप चांगली आहे ती , मीच चीड चीड करते तिच्यावर ",.. रेवा

" का अस करते तू मग",.. संदीप

" माहिती नाही पण आता हल्ली होते माझी चीड चीड, माझी विभा मम्मा उलट मला नीट सांभाळत नाही पण प्रिया सांभाळते ",... रेवा

" तू अस नको करूस मग रेवा, चांगला नसेल वागायच प्रिया शी तर चीड चीड नको करूस ",... संदीप

" ठीक आहे संदीप मी नीट वागेन या पुढे",.. रेवा

संदीप अतिशय समजूतदार वाटत होता तिला, किती चांगला आहे हा मला किती समजून घेतो

संदीप रेवा कडे बघत होता, किती विश्वास ठेवते ही आपल्यावर, किती ऐकते मी जे सांगेन ते, आणि मी काय करतो आहे तिचा विश्वास घात, माझ्या आई ला ही किती वाईट वाटेल जेव्हा तिला समजेल की मी काय करतो आहे
.........

रोहन ऑफिस ला आला

" काय म्हटले डॉक्टर? रणजित गेला का घरी ",.. प्रिया

" काही नाही ग इंस्पेक्टर सावंत यांना बघून रणजीत पळून गेला ",... रोहन

" का पण काही काय केलं आहे का रणजित ने",.. प्रिया

" केलंच आहे ना त्यांची ओळख आहे दोघांची आधीपासून",.. रोहन

" मग तुम्ही दोघे डॉक्टरकडे गेलेच नाही का",.. प्रिया

"नाही आधी मी पोलिस स्टेशनला कंप्लेंट नोंदवायला गेलो तोपर्यंत रणजीत पळून गेला, बर झालं सुंठीवाचून खोकला गेला",.. रोहन

लंच ब्रेक झाला रेवाला आठवल रणजित काका डॅडी डॉक्टर कडे जावून आले असतिल तिने डॅडी ला कॉल केला

" झाल का डॉ च काम? कशी आहे तब्येत काकाची?",...रेवा

"एक काम कर रेवा तू तुझ्या काकाला फोन लावून विचार मी मीटिंग मध्ये आहे",... रोहन

रेवाने रणजित ला फोन लावला

" काय म्हटले डॉक्टर? काका कसा आहेस तू?",... रेवा

"अग रेवा मला बर वाटतय, अचानक एक महत्वाच काम आठवल मी घरी आलो डॉक्टर कडे गेलो नाही",... रणजित

" का डॅडी नव्हता आला का तुला घ्यायला",... रेवा

" आला होता रोहन पण मी आता घरी आहे",.. रणजित

" काय झालाय नक्की?",... रेवा

"अग तुझ्या बॉडी गार्ड वर काल कोणी तरी हल्ला केला तर रोहन पोलिस स्टेशनला गेला होता मला उशीर होत होता म्हणून मी निघून आलो",... रणजित

" काय omg कोणावर?, सीमा वर झाला का हल्ला ",... रेवा

" हो, तुझी बॉडी गार्ड आहे ना तिच्यावर हे बघ रेवा तीच सुरक्षित नाही तर तुझ काय रक्षण करणार? मुळात एवढ्या सेफ वातावरण कश्याला हवी बॉडी गार्ड? ",... रणजित

" मला कोणी काही बोलल नाही या बाबत लागलय का सीमा ला ",.... रेवा

"हो तुझ्या पासुन सगळ लपवून ठेवते ती प्रिया",.. रणजित

"नको ना काका आता प्रिया चा विषय, मी ठेवते फोन, सीमा शी बोलते जरा,... रेवा

रेवाने सीमा ला फोन केला

बोला मॅडम...

"तुझ्यावर हल्ला झाला का? कोणी केला अॅटेक",... रेवा

"हल्ला असा नाही पण मी काल घरी जातांना दोन लोकांनी मला अडवला होत, मी त्यांना थोड मारल इतकच",... सीमा

"तू मला का नाही सांगितल मग",... रेवा

"त्यात काही विशेष, नाही काही खराब लोक असे प्रकार करतात don\"t worry ",... सीमा

" काही लागल वगैरे नाही ना तुला",... रेवा

" अजिबात नाही don\"t worry मॅडम ",... सीमा

रेवा तिच्या विचारात होती, नक्की काही तरी प्रॉब्लेम आहे, काय सुरू आहे आपल्या आजुबाजुला, कोण काय बोलत तर कोण काय, कोणाच नक्की खर आहे काय माहिती?

" कुठल्या विचारात आहे मॅडम",... संदीप

" काही नाही",.. रेवा

"आज काय झाल तुला रेवा सकाळ पासून अस्वस्थ्य आहेस तू",... संदीप

"ठीक आहे मी",.. रेवा

"आज काय मॅडम एवढी चौकशी केलीस माझी विचार काय आहे, घरी तर नाही ना येणार माझ्या तुझ्या मम्मी डॅडी ना घेवून",.. संदीप

रेवा लाजली

खूप छान वेळ गेला तिचा संदीप सोबत, संदीप तिला खूप अटेन्शन देत होता, रेवाला खूप स्पेशल फिलिंग येत होती, आणि आता तिचा संदीप वरचा विश्वास वाढला होता
......

प्रिया ऑफिस मध्ये काम करत होती, तिचा मोबाईल वाजला, रणजित चा फोन होता

" तुला काय वाटलं प्रिया तुझी चाल मला कळत नाही का? किती तरी दिवसांनी माझा भाऊ माझी काळजी करत होता तू बरोबर चाल खेळलीस",.... रणजित

"शट अप रणजित काहीही काय बोलतोस तू, मी आता काय केलं आहे? ",... प्रिया

"तू बरोबर रोहनला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं",... रणजित

" जरी रोहन पोलीस स्टेशनला गेला, त्याच काही तरी काम होत, तरी तू तिथून घाबरून का पळाला रणजित? काय नात आहे तुझं आणि इन्स्पेक्टर सावंत यांचं? यात माझा काय दोष? तुला आत्ता मला फोन का करायचा होता मला समजलं नाही? ",... प्रिया

" तुला आम्हाला दोघा भावांना एकत्र येऊ द्यायचा नाही म्हणजे मग तुला रोहन ची सगळी इस्टेट एकटीने मिळेल हाच प्लॅन आहे तुझा",.. रणजित

" काहीही बोलतोस का तू रणजित वाटेल ते, आणी हे तुझ काय सारख इस्टेट च सुरू असत, मी बिझी आहे कामात, आणि मला तुझ्याशी बोलण्यात काही इंट्रेस्ट नाही ",... प्रिया ने फोन ठेवून दिला,

रोहन जेवायला आला

" कोणाचा फोन होता ",.. रोहन

" तुझा प्रिय भाऊ रणजित चा",.. प्रिया

"काय म्हणत होता ",.. रोहन

" मला दोष देत होता तू पोलीस स्टेशनला गेला तर",... प्रिया

" रब्बिष काहीही त्यात तुझा काय दोष",... रोहन

" हो ना तो एवढा चांगला आहे तर तो इन्स्पेक्टर ला बघून का पळाला? आणि आता रणजीत म्हणतो आहे की मीच तुला इन्स्पेक्टर कडे पाठवलं आणि तुमच्या मला तुम्हा दोघा भावांन मध्ये फूट पाडायची आहे , आणि मला एकटीला तुझी इस्टेट घ्यायची आहे ",.. प्रिया

" तो काहीही बरळतो तू टेन्शन घेऊ नको, आणि हे इस्टेट च काय आहे ",... रोहन

" तो रणजित कायम माझ्याशी अस बोलतो की तुला एकटीला इस्टेट घ्यायची आहे ",.. प्रिया

" पण ती इस्टेट तुझी आहे प्रिया, आपली आहे ",.. रोहन

" हो रणजित ला घ्यायची आहे आपली इस्टेट, त्याच्या काहीतरी प्लॅन दिसतो, we need to be careful n alert",.. प्रिया

"हो बरोबर आहे, आपण सांगायच का इंस्पेक्टर सावंत यांना रणजित संदीप बद्दल",.. रोहन

"चालेल आज भेटू संध्याकाळी, हे खूप महत्वाचं आहे ",.. प्रिया

.........


🎭 Series Post

View all