मृगजळ भाग... 5

तुला तर माहितीच आहे विभा रणजीत कारस्थानी आहे, आता तो रणजीत सारखा रेवाला भेटत असतो, आम्ही सांगितलं तरी रेवा ऐकत नाही, तू प्लीज एकदा बोलून बघ तिच्याशी, मला खूप काळजी वाटते तिची तो रणजित रेवाला काही सांगतो, रेवा चिडते मग आमच्या वर",.. रोहन
मृगजळ भाग... 5

©️®️शिल्पा सुतार
..............

रेवा कॉलेजला पोहोचली सीमा तिची बॉडीगार्ड कार मध्ये थांबली, सीमा ने रेवाला तिचे मित्र मैत्रिणी चे फोन नंबर विचारले ते रेवा ने दिले नाही, तिचं असहकार सीमाला समजत होता, सहाजिकच होत ते,

रेवा उतरून क्लासमध्ये गेली, सीमा ने फोन काढून रोहनला फोन लावला,.. "रेवा क्लास मध्ये गेली आताच" , त्यासोबतच कॉलेजमध्ये सीमा चे काही कॉन्टॅक्ट होते त्यांना तिने क्लासमध्ये लक्ष द्यायला सांगितले

रेवा क्लासमध्ये पोहोचली आणि तिने बघितलं सीमा मागे आलेली नाही, तिला बरं वाटलं, श्रुती तिची मैत्रीण वाट बघत होती, दोघी क्लास मध्ये गेल्या, संदीप तिची वाट बघत होता

" हाय रेवा, रोज प्रमाणे आज ही तू खूप सुंदर दिसते आहेस",.. संदीप

"काहीही ह संदीप ",.. रेवा हसत होती

" आज यायला का उशीर झाला रेवा",... संदीप

"अरे काय सांगू संदीप डॅडी ने एक बॉडीगार्ड नेमली आहे माझ्यासाठी, सीमा नाव तीच ",.. रेवा

" ती सोबत आली आहे का कॉलेजला? का पण? I mean seriously ",.. संदीप

" हो.. सोबत राहणार आहे ती आता माझ्या",... रेवा

" पण का? कॉलेज ला कश्याला हवा बॉडी गार्ड? , तुला काही धोका आहे का कोणा पासून? कुठे आहे ती सध्या आता? ",.. संदीप थोडा घाबरला होता

" अरे डॅडी ऐकत नाही, खूप प्रोटेक्टींव आहेत ते, माहित नाही ती सीमा गाडीत असेल",.. रेवा

संदीप चपापला होता,.....

संदीपशी रेवाची नुकतीच ओळख झालेली होती, नवीनच तो कॉलेज ला जॉईन झाला होता, कोण तो कुठून आला, आधी कुठल्या शाळेत होता कोणाला काही माहिती नव्हत, त्याने एवढ्यात रेवाला प्रपोज केलं होतं, अजून रेवाने त्याला उत्तर दिलं नव्हतं, पण तो रेवाच्या पुढेमागे असायचा, कोणाला जास्त रेवाशी बोलू द्यायचा नाही, हे रेवाला खूप छान वाटायचे, तिला वाटायच तो खूप काळजी घेतो तिची , तिला समजत नव्हतं की संदीप तिचे कॉन्टॅक्ट तोडतो आहे

क्लास सुरू झाला, संदीप ने फोन काढला आणि कोणाला तरी मेसेज पाठवला

" रेवा साठी बॉडी गार्ड नेमला आहे",...

"OMG मी तुला सांगितलं ना रेवा कडे नीट लक्ष दे, तिला सांग बॉडी गार्ड नको आपल्या सोबत, जरा बोल तिला, तू करतो तरी काय ? तुला का नेमल आहे? कसले एवढे पैसे देतो मी तुला? बॉडी गार्ड च बघ जरा समजल का? ",..... अनोळखी व्यक्ति

"कुठे मिळाले पैसे मला? , कधी देणार? , एवढी रिस्क घेतली आहे मी, करतो आहे ना मी काम सर, सांगतो रेवाला बॉडी गार्ड नको ते ",.... संदीप

" रिजल्ट हवा मला, टाइम पास नको आहे, आटपा जरा पटापट, रेवा हो बोलली की नाही तुला अजून ",..

" नाही अजून काही बोलण नाही झाल आमच, हो बोलली नाही अजून रेवा",.. संदीप

" काय चाललय मग हे? , विचार परत एकदा, तिच्या पुढे मागे रहा, रेवाला आवडत तस वाग, तिला भाव दे, शब्द झेल तिचे, तुझ्याशिवाय तिने जगण्याची कल्पना नको करायला एवढी काळजी घे तिची, समजल का काही? तुला माहिती ना रेवा किती श्रीमंत आहे, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती, तिची कॉलेजची बॅग जरी झटकली तरी करोडो रुपये पाडतील, आटोप लवकर, साधी पोरगी तुला हो बोलत नाही म्हणजे काय ",..

" येस सर मी करतो आहे प्रयत्न, अस नका बोलू सर",.. संदीप

" रिजल्ट दाखव मग मी मानेन तुला",..

संदीप क्लास मध्ये आला.. काय कराव समजत नव्हत त्याला

" रेवा हे घे तुझे आवडते आलू पराठे आई ने दिले तुला",.. संदीप

" Thank you संदीप तुला माहिती होत मला आवडतात पराठे ते ",.. रेवा

" हो माझ्या आई ने आज सकाळी उठून हे बनवले तुझ्या साठी",.. संदीप

" काकूंना thank you सांग, किती छान आहे तुझी आई" ,.... रेवाच्या डोळ्यात पाणी होत

" रेवा प्लीज अस करतात का? काय झाल? आई ची आठवण आली का",... संदीप

" हो संदीप माझी मम्मा कधी येईल इकडे काय माहिती",.. रेवा

" Come on मूड चेंज कर आता मी आहे ना ",.. संदीप ने पुढे होवुन रेवाला आधार दिला, रेवा खुश होती त्याच्या सोबत

"तू किती चांगला आहेस संदीप, माझी किती काळजी घेतोस ",... रेवा

" Anything for you my dear",.. संदीप

रेवा छान लाजली होती...

"आज आपल्याला शॉपिंग ला जायचा होत ना, लक्ष्यात आहे ना",.. संदीप

"हो जाऊ या no problem",.. रेवा

"तुझ्या बॉडी गार्डच काय करायच, किती प्लॅन केला होता आपण , तुझ लक्ष्यात आहे ना माझा बर्थडे आहे ते",... संदीप

"ओह या... सॉरी गुपचुप जाऊ या का",.. रेवा

हो..

लेक्चर सुरु होत, रेवा विचार करत होती संदीप च्या बर्थडे ला काही तरी स्पेशल करायला हव, त्याला कळता कामा नये, किती चांगला आहे तो, माझी किती काळजी घेतो, मी पण त्याला खूप सपोर्ट करेन, त्याच्या बर्थडे स्पेशल व्हायला हवा, गिफ्ट काय घेवू?, डॅडी कडून घेवू पैसे

लंच ब्रेक झाला.....

"रेवा you know संदीप तुझ्या साठी सरप्राईज प्लॅन करतो आहे",.... श्रुती

काय ग...

"बहुतेक पार्टी नंतर तो तुला प्रपोज करणार आहे, मी तुला सांगितल कारण तु तस छान तयार होवुन ये",.. श्रुती

रेवा आता लाजली होती,.... तिच्या डोळ्यासमोर दिसत होत........... संदीप तिला प्रपोज करतो आहे, त्याने तिला गुलाबाचं फूल दिलं, हातात हिर्‍याची अंगठी घातली आणि संदीप पुढे होऊन रेवाला किस करणार..... तेवढ्यात श्रुती ने रेवाला धक्का दिला,

" काय विचारात आहे मॅडम? पोहोचलीस का तू बर्थडे पार्टीला",..

रेवा मनातल्या मनात लाजत होती, संदीप किती हँडसम आहे, व्हाईट शर्ट मध्ये तो कमालीचा डॅशिंग दिसतो, काय होईल तो माझ्या जवळ येईल तेव्हा, omg I am excited

"You are so lucky रेवा, एवढा चांगला मुलगा मिळाला आहे तुला, मजा आहे तुझी, सांभाळ त्याला",... श्रुती

रेवाच्या मनात संदीप विषयी अजून सॉफ्ट कॉर्नर तयार झाला, समोरुन संदीप आला, रेवा त्याच्या कडे बघत बसली,

"निघायच का रेवा, झाले लेक्चर",.. संदीप

हो... चालेल

कॉलेज सुटलं, रेवा गुपचुप संदीप आणि इतर मुलांसोबत माॅल मध्ये गेली, सीमा खाली पार्किंग मध्ये तिची वाट बघत होती,

शॉपिंग झाल, मुव्ही तिकीट काढले होते त्यांनी, संदीप रेवा शेजारी बसले होते हातात हात घेवून, रेवा खूप excited होती, ही relationship तिला खुप आवडत होती, काही बोलायचं असेल तर संदीप तिच्या जवळ येवून सांगत होता, रेवा लाजून अर्धी झाली होती, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही संदीप.... रेवाने मनोमन ठरवल

मुव्ही संपला सगळे बाहेर आले, आता मस्त डिनर करू या,
......

कॉलेज सुटल्यावर बराच वेळ रेवा पार्किंग मध्ये आली नाही तेव्हा सीमाने रोहन ला फोन केला...... "सर रेवा मॅडम आल्या नाहीत अजून कॉलेजहुन बराच वेळ झाला आता",..

"म्हणजे कुठे गेली ती",.. रोहन

"मी बघते पण मला कॉलेज मध्ये जायला परवानगी नाही",.. सीमा

" tracking चेक कर, बॅग मध्ये केल ना install आपण",.. रोहन

"Yes सर माॅल मध्ये गेल्या आहेत रेवा मॅडम , मी बघते जावून तिकडे",.. सीमा

मुव्ही संपला सगळे बाहेर आले.... सीमा उभी होती, तिला बघून रेवा दचकली, तिने संदीप चा हात सोडला

"चला मॅडम घरी, तुम्ही अस मला न सांगता इकडे का आलात? , पुढच्या वेळी अस होता कामा नये" ,.. सीमा

"हे बघ सीमा मी कोणी लहान बाळ नाही, माझ्या मागे मागे करू नको आणि इथे मला काही धोका नाही",.. रेवा

"ते मला माहिती नाही मॅडम, मी माझी ड्युटी करते आहे, चला घरी, सरांनी घरी यायला सांगितल आहे ",..सीमा

रेवा संदीप कडे बघत होती, संदीप पुढे झाला.." हे बघ तू अस रेवाला बोलू शकत नाही",

" तुम्ही मध्ये मध्ये करू नका ",.. सीमा

" मी येणार नाही, मला अजून शॉपिंग करायच आहे",.. रेवा

"तुम्ही सरांना फोन करा आता",.. सीमा

रेवाने रोहीतला फोन केला

"डॅडी काय हे? आम्ही इथे माॅल मध्ये आलो तर सीमा मला फिरू देत नाही इथे, सारखी बोलते घरी चल",.. रेवा

"तू तिला सांगून आली का इकडे माॅल मध्ये ",.. रोहन

रेवा काही बोलली नाही...

" बोल ना रेवा? तू सिमाला सांगून आली का? मला माहिती आहे तू गुपचूप तिकडे गेली ना तिकडे?",.. रोहन

"अच्छा म्हणजे सीमा ने माझी कंप्लेंट केली वाटतं तुझ्याकडे डॅडी ",.. रेवा

" ते महत्त्वाचं नाही आहे रेवा, तुझी सिक्युरिटी महत्त्वाची आहे, सीमा काय सांगते ते तू ऐकायला पाहिजे, तू असं तिला चुकवून परस्पर मॉलमध्ये जायला नको होतं, आता काय प्रोग्राम आहे तुझा ",... रोहन

" डॅडी मला शॉपिंग करायचे आहे पण सीमा बोलते आहे की घरी चल ",.. रेवा

"ठीक आहे अर्धा तास शॉपिंग कर आणि मग घरी ये ",.. रोहन

" आम्ही सगळे डिनरला जाणार होतो डॅडी",.. रेवा

" ठीक आहे मग सीमा लाही घेऊन जा डिनरला",.. रोहन

रेवा ने फोन ठेवून दिला,

" काय म्हटले तुझे डॅडी ",.. संदीप

" काही नाही माझे डॅडी बोलले शॉपिंग करून ये",.. रेवा मित्रांबरोबर शॉपिंगला गेली, सीमा तिच्या सोबत होती, डिनर करून ते रात्री घरी आले
.....

रोहित प्रिया पुढच्या खोलीतच बसले होते रेवाची वाट बघत

" आज माहिती आहे का प्रिया तुला रणजीत घरी आला होता आणि तो आईंकडे पैसे मागत होता",.. रोहन

" हो आई बोलल्या मला, रोहन त्याच्या आधी तो रणजित आपल्या एका क्लायंट कडे गेला होता आणि त्यांना सांगत होता की तुमचं काही पैसे बाकी असतील रोहन इंडस्ट्रीला द्यायचे तर ते मला द्या",.. प्रिया

"हो ना काय हे एक एक ",.. रोहन

" काय करावं त्याचं कितीवेळा सिक्युरिटी गार्ड ला सांगितला आहे की त्याला सोडू नका आत तरी ते त्याला आत सोडतात ",... प्रिया

सुलभाताई आल्यास तेवढ्यात बाहेर...

" तो रणजित सिक्युरिटी गार्डला मला भेटायचे आहे असं सांगून आत आला म्हणून सिक्युरिटी गार्ड येऊ दिलं आणि नंतर त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले, दागिने मागितले",.. सुलभा ताई

"तुम्हाला काही इजा तर नाही पोहचवली ना त्याने",.. प्रिया

"नाही अजिबात नाही, मी ठीक आहे त्याच लक्ष माझ्या बांगडय़ांकडे होत, तो बोलला एका हातातल्या बांगड्या मला दे ",... सुलभा ताई

" बापरे हे आता अति होतय ",... रोहन

" बोलत होता तो तुझ बँकेच कार्ड दे",.. सुलभा ताई

"पुढच्या वेळी अस काही झाल रणजित घरी आला तर तू तुझ्या रूम बाहेर निघू नकोस, त्याच्याशी बोलू नकोस",.. रोहन

हो...

रेवा सीमा आल्या घरी

" जेवण झालं का रेवा, झाल का शॉपिंग ",.. रोहन

" हो... मला थोड काम आहे मी जाते रूम मध्ये",.. रेवा ला वाटलं रोहन रागवेल म्हणून ती तिच्या रूम मध्ये निघून गेली,

" मी निघते सर, उद्या सकाळी येईन ",.. सीमा

रेवा ने विभा ला फोन लावला विभाने फोन उचलला

"काय चाललं आहे रेवा, कशी आहेस तु ",.. विभा

"काही नाही मम्मी, तू काल मला बोलली होती की मी फोन करते तर तू फोन केलाच नाहीस, मी किती वाट बघत होती तुझ्या फोनची, तू कधी येते आहे इंडियात? I miss you so much",.. रेवा

"सॉरी बेटा नंतर मी मिटिंग मध्ये बिझी होते, पुढच्या आठवड्यात येईल बहुतेक मी बेटा, मग मी तुला घ्यायला येईल आपण दोघीजणी हॉलिडे प्लान करू",.. विभा

"चालेल मम्मा, रेवा खुपच खुश होती, मम्मा इथे डॅडी ने माझ्यासाठी बॉडीगार्ड नेमली आहे",... रेवा

"का काय झालं का गरज आहे बॉडीगार्ड ची",.. विभा

"माहिती नाही पण आज ती बॉडी गार्ड माझ्यासोबत कॉलेजला आली होती",.. रेवा

" मी काय सांगते रेवा, तू ऐकणार आहेस बॉडीगार्ड च",.. विभा

हो ममा... रेवा

"प्लीज बॉडीगार्ड ला सोबतच ठेव, मी बोलते तुझ्या डॅडी शी",.. विभा

" मम्मा आज आम्ही बॉडीगार्ड ला चुकून मॉलमध्ये गेलो होतो फ्रेंड्स, खूप मजा केली आम्ही",.. रेवा

" असं करायचं नाही रेवा, तुझ्या डॅडींनी काही विचार करूनच बॉडीगार्ड नेमला असेल ना, प्लीज असं चुकून सुद्धा करू नको ",.. विभा

" ऐक ना मम्मा मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे, महत्वाची आहे",.. देवा रेवा

" एक काम कर रेवा मला तू नंतर फोन कर, आता एक कॉल सुरु होतो आहे आपण नंतर बोलू ",... विभा

" मम्मा ऐक ना महत्त्वाचा आहे",.. रेवा

"रेवा प्लीज ",... तिकडे विभा चा ऑफिस कॉल सुरू झाला होता, विभा जॉईन झाली मीटिंग मध्ये

"ठीक आहे, बाय मम्मा मी नंतर सांगते तुला",.. रेवाने फोन ठेवला, तिला विभा ला संदीप बद्दल सांगायच होत

जरा वेळाने विभाने रोहितला फोन केला,.. "आज रेवा सांगत होती की बॉडीगार्ड ठेवला आहेस तू तिच्यासाठी? Is there anything serious? काय झालं काही प्रॉब्लेम आहे का?",..

"तुला तर माहितीच आहे विभा रणजीत कारस्थानी आहे, आता तो रणजीत सारखा रेवाला भेटत असतो, आम्ही सांगितलं तरी रेवा ऐकत नाही, तू प्लीज एकदा बोलून बघ तिच्याशी, मला खूप काळजी वाटते तिची तो रणजित रेवाला काही सांगतो, रेवा चिडते मग आमच्या वर",.. रोहन

" मी एक काम करते पुढच्या आठवड्यात मी येते आहे तिकडे, माझ्याकडेच चार दिवस बोलवुन घेते रेवाला, मग मी तिला समजून सांगेन, तशी मी आता फोन करून बोलतेस तिच्याशी",.. विभा

" हो हे चांगलं राहील, कारण रणजित हा चांगला मनुष्य नाहीये तो पैशासाठी काहीही करू शकतो, रेवा साधी मुलगी आहे तिला समजत नाही हे ",.. रोहन

" हो बरोबर आहे, मी समजून सांगते तिला, काळजी करू नको, आई कशा आहेत? ठीक आहे सगळे तिकडे ",.. विभा

" हो ठीक आहे आई",.. रोहन

विभा ने फोन ठेवला.....

🎭 Series Post

View all