मृगजळ भाग... 4

रणजित चिडला, आजही मला पैसे मिळाले नाही, माझा अपमान झाला सगळ्यांसमोर उलट अजून त्या लोकांनी मला घालवून लावल, मी सोडणार नाही रोहनला, काय लोक आहेत हे? जरा म्हणून मला मदत करत नाहीत, आई ही असच करते, सारख तो रोहन चांगला अस बोलते, आई कडून होवू शकते मदत

मृगजळ भाग... 4

©️®️शिल्पा सुतार
..............

रोहन रूम मध्ये आला....

" काय झाल रोहन समजल का काही कोण होत गार्डन मध्ये? ",.. प्रिया

"काही तरी गडबड आहे प्रिया, कोणी तरी आपल्यावर लक्ष् देवून आहे, कोण करत आहे अस, धोका आहे आपल्याला ",.. रोहन

"कोण असेल पण? , मला आता भीती वाटते आहे ",.. प्रिया

"माहिती नाही, घराची सिक्युरिटी वाढवावी लागेल, माझे मित्र आहेत, इंस्पेक्टर त्यांना सांगतो मी सगळ, तू काळजी करू नकोस ",.. रोहन
.....

सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर रेवा खाली आली, सुलभा ताई आधीच येवून बसल्या होत्या, रोहन कसल्या तरी विचारात होता, प्रिया नाश्ता वाढत होती

गुड मॉर्निंग डॅडी.. आजी.. प्रिया..

गुड मॉर्निंग बेटा...

रेवाने आज जे केलेल आहे ते चुपचाप खाल्लं, आज ती खुश दिसत होती, सुलभा ताई प्रिया कडे बघत होत्या, प्रिया छान हसत होती

" आज काय आहे प्रोग्रम रेवा",.. रोहन

"कॉलेजला निघते आहे मी डॅडी , बाकी काही नाही, आज रेग्युलर क्लासेस आहेत आणि त्यानंतर आम्ही सगळे फ्रेंड्स मॉल मध्ये जाणार आहोत शॉपिंग साठी, मी चार पाच वाजेपर्यंत येते घरी",... रेवा

"पैसे लागतात आहे का तुला रेवा? घेवून जा ",.. रोहन

"मम्मा ने दिलेले आहेत पैसे डॅडी, लागले तर सांगेन मी, thank you ",.. रेवा

" हे बघ रेवा तू मला चुकीचा समजू नको पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे आता ",.. रोहन

" प्लीज डॅडी आता नको, मला उशीर होतो आहे आणि मी खूप छान मूड मध्ये आहे",.. रेवा

" मी काही भांडत नाही बेटा तुझ्याशी, पण प्लीज रणजीत ला भेटू नको, तु खुप लहान आहेस, यापेक्षा जास्त मी तुला काही सांगत नाही, कदाचित तुझी मम्मी विभाला हे कळतं तर ती पण ते सांगेल कि रणजीतला भेटू नको, तुझ्या मम्माला ही रणजीत अजिबात आवडत नव्हता ",.. रोहन

रेवा लक्ष देऊन ऐकत होती, रोहनला बरं वाटलं तेवढंच, कधी नव्हे ते रेवाने त्याचं म्हणणं ऐकलं होतं न भांडता, तिला ही रणजित काका फारसा आवडत नव्हता, काल उगाच रागात ती बोलली होती की मी काका कडे जाईल रहायला, पण तिचा तसा काहीही विचार नव्हता

" ठीक आहे डॅडी मी नाही भेटणार काका ला, पण काका चांगला आहे रे आणि तो रोज नाही भेटत ",.. रेवा

"पुढच्या वेळी जर रणजित ने तुला बोलवलं भेटायला तर मला सांग, मी पण येईन सोबत ",.. रोहन

ठीक आहे डॅडी....

रेवा कॉलेजला जायला निघाली तशी एक जीन्स आणि टी-शर्ट घातलेली मुलगी तिच्याबरोबर जायला लागली

" एक्सक्युज मी ही कोण आता? ",.. रेवा

"अरे हा.. रेवा ही आहे तुझी बॉडीगार्ड सीमा",.. रोहन

"नोट अगेन डॅडी, मी हिला माझ्या सोबत ठेवू शकत नाही आणि मला कोणापासूनही धोका नाही, हे काय आता नवीन? कॉलेजला कसं दिसेल ते आणि जेव्हा मी क्लासेस मध्ये असेन तेव्हा ही सीमा काय करेन, त्या पेक्षा सीमा तू येवू नकोस माझ्या सोबत ",.. रेवा

"ते सीमा सीमाच चा बघून घेईल काय करायचं ते, ती तुला डिस्टर्ब करणार नाही, पण बॉडीगार्ड तुला सोबत ठेवावा लागेल, ती तुझ्या मित्र-मैत्रिणींना डिस्टर्ब करणार नाही, व्यवस्थित अंतर राखून राहिन",.. रोहन

" पण याची खरंच गरज आहे का डॅडी",.. रेवा वैतागली होती

" हो आहे गरज तू लहान आहेस अजून तुला अजून चांगले वाईट लोकं कळत नाहीत, आता मला तुला जास्त सांगता येणार नाही रेवा, सीमा तुझ्या सोबत राहील आणि that is final ",.. रोहन

" मी फोन उचलेल डॅडी तुझा, कुठेही जातांना सांगून जाईन मी, पण ही सीमा नको ",.. रेवा

" मला काहीही ऐकायचं नाहीये रेवा, मला तुझ्या सुरक्षिततेची भीती वाटते आणि सीमा तुझ्या सोबत जाणार आहे ",... रोहन

" ठीक आहे, चला मॅडम पण कॉलेजच्या मध्ये येवू नको पार्किंग मध्ये थांब ",.. रेवा

रेवा कॉलेजला गेली..

रोहन च्या चेहऱ्यावर समाधान होतं, तयारी करून रोहन निशा ऑफिसला जायला निघाले, ते दोघ कार मध्ये बसणार तेवढ्यात रोहनला काहीतरी आठवलं, काल त्या झाडा मागे कोणीतरी होतं, तिथे रोहन गेला, निरीक्षण करू लागला, तिथे त्याला एक कागदाचा तुकडा पडलेला दिसला, माळी काका त्यांच्या कामाबाबत इतके चांगले आहेत की गार्डन मध्ये कुठे थोडाही कचरा नसतो, मग हा कागद कसला आहे? त्यांने काकांना बोलावले,

"हा कागद कसला आहे काका",.. रोहन

"माफ करा साहेब मी लगेच आवरतो लगेच",.. माळी काका

"तो प्रश्न नाही येथे काल रात्री कोणी आलं होतं का",.. रोहन

"मला माहिती नाही साहेब",.. काका

"ठीक आहे तू जा",.. रोहन

रोहनने तो कागद नीट बघितला, कसलं तरी बिल होतं जुन झालेलं, त्याने ते बिल नीट खिशात ठेवून दिलं

" नक्की काल रात्री कोणीतरी येथे आल होत",...

प्रिया घराची सिक्युरिटी अजून वाढायला हवी, बर झाल आपण बॉडीगार्ड मागवला रेवासाठी, तुही सावध रहा ऑफिसमध्ये गेलं की मला सिक्युरिटी गार्ड अजून मागवायचे आहेत हे लक्षात ठेव

" ओके तू काळजी करू नको",... प्रिया

रोहन आत आला, सुलभा ताई रूम मध्ये जात होत्या

" आई एक मिनट मला बोलायच आहे थोड तुझ्याशी ",.. रोहन

काय झालं...

"अग तु घाबरू नकोस पण जरा अलर्ट रहा घरात, काल रात्री मला अस वाटल होत की कोणी तरी गार्डन मध्ये उभ होत, कोणीतरी लक्ष देवून आहे आपल्यावर, सिक्युरिटी गार्ड ला सांगितल मी घराकडे नीट लक्ष द्यायला, तुझ्यासोबत मदतनीस अनिता आहे ना, दार उघडू नका कोणी आणि काही वाटलं तर मला फोन कर ",.. रोहन

"कोण होतं रे पण रोहन",.. सुलभा ताई

" माहिती नाही आई मला असं वाटलं होतं की कुणी होत तिथे, मी करतो आहे चौकशी, सीसीटीव्ही कॅमेरात करतो चेक ",.. रोहन

रोहन प्रिया दोघं ऑफिस मध्ये पोहोचले, प्रिया ने बोलतांना दाखवलं रोहनला की काही सिरीयस नाही आहे पण तीही विचार करत होती कोण असेल तिकडे? तिला माहिती होतं की हे काम नक्की रणजीतच असेल, जर तो नसेल तर मग आणखी कोण असेल? का अस करतो रणजित, खूप काम पडल होत, कंपनी च ऑडिट होत पुढच्या महिन्यात, ती कामात व्यस्त झाली

"आज काय मीटिंग आहेत? आणि गेट वर सांग की रणजीतला आत सोडू नका, तो उगीच डिस्टर्ब करतो",.... रोहन सेक्रेटरी ला सांगत होती
.......

रणजित आज आता रोहन च्या एका क्लायंटच्या ऑफिसला पोहोचला होता,... "मी रोहन इंडस्ट्री तून आलो आहे, किती पेमेंट बाकी आहे तुमचा? तो माझ्याकडे द्यायला सांगितल आहे ",..

" पण अस आम्हाला काहीही सांगितल नाही साहेबांनी, कधी कोणी आल नाही तिकडून अस पेमेंट घ्यायला ", ,.... त्यांनी रोहनला फोन केला,.. "तुम्ही पाठवलं का यांना?",.

"कोण आल आहे ",.. रोहन

" सर तुमच्या ऑफिस मधून रणजित सर आले आहेत इकडे ते पैसे मागत आहेत",..

"नाही अस कोणाला पाठवल नाही मी तिकडे आणि पेमेंट नेहमी बँक to बँक होतो ना? या पुढे अस कोणी आले आणि काही गैरव्यवहार झाले तर आम्ही जबाबदार नाही, जो पर्यंत आमच्या अकाऊंट वर पैसे येत नाही, तो पर्यंत आम्ही transaction झाल अस मानणार नाही",... रोहन

त्या लोकांनी रणजितला पैसे द्यायला नकार दिला....

रणजित चिडला, आजही मला पैसे मिळाले नाही, माझा अपमान झाला सगळ्यांसमोर उलट अजून त्या लोकांनी मला घालवून लावल, मी सोडणार नाही रोहनला, काय लोक आहेत हे? जरा म्हणून मला मदत करत नाहीत, आई ही असच करते, सारख तो रोहन चांगला अस बोलते, आई कडून होवू शकते मदत

रणजित रोहन च्या घराकडे निघाला, आई ला भेटायला...

रणजित घराच्या च्या गेट जवळ आला, त्याला सिक्युरिटी गार्ड ने अडवला

"मला आई ला भेटायच आहे",.. रणजित

"पण सर कोणाला ही आत सोडायला नाही सांगितल",.. सिक्युरिटी

"मी घरचा मेंबर आहे माहिती नाही का तुला?",.. रणजित

"माहिती आहे पण ",..

"पण नाही बिण नाही, आई ला तर भेटू शकतो ना मी? , बोलव तिला गेट जवळ",.. रणजित

"जा आत जा, पण लवकर आटपा भेट साहेब रागावतील मला",..

"माझी ही आई आहे ती, तू काळजी करू नकोस ",.. रणजित

सिक्युरिटी गार्ड स्वतः आला त्यांच्या सोबत

सुलभा ताई त्यांच्या रूम मध्ये होत्या, त्या खाली आल्या हॉल मध्ये, रणजित त्यांना जावून भेटला

"कशी आहेस आई तू",.. रणजित

"बर्‍याच दिवसांनी आठवण झाली रे तुला माझी, कसा आहेस तू",.. सुलभा ताई

बरा आहे..

" आज कसा काय इकडे आलास" ,.. सुलभा ताई

"तुला भेटायला आलो आहे मी आई कशी आहेस तु ",.. रणजित

" मी ठीक आहे अगदी मजेत, रोहन छान ठेप ठेवतो माझी",.. सुलभा ताई

" म्हणुन सगळ त्याला दिल का? ",.. रणजित

" काय बोललास ",..

" काही नाही थोडे पैसे हवे होते",.. रणजित

"ठीक आहे मी सांगते रोहन ला, किती हवे आहेत पैसे ",.. सुलभा ताई

"नको त्याला का त्रास देते तू, त्याने पाठवल मला इकडे, तू दे ना तुझ्या कडचे ",... रणजित

" का लागता आहेत? , माझ्या कडे नाही पैसे आता, आणि रोहन का पाठवेल अस तुला माझ्याकडे पैसे घ्यायला, तो तर मला कुठल्याही गोष्टीत त्रास देत नाही ",.. सुलभा ताई

" थोड बर नाहि वाटत आहे मला, डॉ कडे जायच आहे, कार्ड असेल तर दे मी काढून घेईन",.. रणजित

" लाॅकर मध्ये आहे सगळ, चावी नाही माझ्या कडे, डॉक्टर कडे का जातो आहेस, बर नाही का तुला, चल मी येते तुझ्या सोबत ",.. सुलभा ताई

" तू कश्याला मी जाईन माझा माझा तू पैसे दे ",.. रणजित

" अरे पैसे नाहीत माझ्याकडे एक काम कर तू जावून ये डॉक्टर कडे रोहन देईन नंतर पैसे",.. सुलभा ताई

" आई मला आता पैसे हवे आहेत, मी जाईन डॉक्टर कडे ",.. रणजित चिडला होता

" का आला आहेस तू इथे मला त्रास द्यायला? , मला माहिती आहे तुला पैसे का लागतात ते, आणि काल का आला होता रात्री इकडे बंगल्यात चोरा सारखा ",.. सुलभा ताई

" मी नव्हत आलो, काय झालं, कोण आल होत इकडे? प्लीज मला मदत कर, थोडे तरी दे पैसे आई",.. रणजित रडायला लागला

वॉचमन वॉचमन......" रणजित माझ्या समोर रडून उपयोग नाही तुला एवढा त्रास होत असेल तर थांब जरा वेळ रोहन येईलच तो नेईन तुला डॉक्टर कडे ",..

" का करतेस आई अस? दोन मुलांमध्ये फरक करतेस तू ",.. रणजित

" अस काही नाही, माझ जे आहे तुमच्या दोघांच आहे, मी भेदभाव करत नाही ",... सुलभा ताई

"हो ना मग दे माझ्या वाटणीच्या एका हातातल्या बांगड्या",.. रणजित

" तुला थोडी लाज वाटत नाही रे अस बोलतांना, तुला पोलिसात दिल पाहिजे, नेहमी पैसे पैसे करतोस, आहे ते सांभाळल नाही आणि आता आम्हाला त्रास देतो आहेस, रोहन कडून शिक काहीतरी ",.. सुलभा ताई

वॉचमन येवून रणजित ला घेवून गेला....

सुलभा ताईंनी रोहन ला फोन लावला...... " आता रणजित इथे आला होता पैसे मागत होता, माझ्या बांगड्या मागत होत्या, त्याला आत का सोडतात हे लोक काय माहिती ",

" आई तू कशी आहेस, तू दिल नाहीस ना त्याला काही ",.. रोहन

"नाही पण त्याचा त्रास वाढत चालला आहे ",.. सुलभा ताई

" आई तू त्याला घरात घ्यायला नको होत, मी सांगितल होत सकाळी ",.. रोहन

"तो बळजबरीने आत आला, सिक्युरिटी गार्ड होता सोबत ",.. सुलभा ताई

"काळजी घेत जा आई",.. रोहन

सुलभा ताई रडायला लागल्या .....

" आई मी येतो लवकर तू रूम मध्ये बस, अनिता आहे ना सोबत ",.. रोहन

" हो तू कर काम, काळजी नको करू, मला थोड भरून आल ",.. सुलभा ताई

रोहन काळजी करत होता, या रणजित च काहीतरी करायला पाहिजे.....

🎭 Series Post

View all