मृगजळ भाग... 3

रोहनने नंतर जाऊन बघितलं गार्डन मध्ये तर कोणीच नव्हतं, आत येऊन त्याने दार खिडक्या नीट बंद आहेत का ते बघितल, सुलभा ताई रेवा त्यांच्या रूम मध्ये होत्या, आता त्याला बर वाटत होत, आत येवून त्याने सिक्युरिटी गार्ड ला फोन केला गेट वर


मृगजळ भाग... 3

©️®️शिल्पा सुतार
..............


रेवा एका हॉटेल मध्ये बसली होती, समोर रणजित होता, "थँक्यू बेटा तू आलीस",..

"काका थँक्यू काय रे काका , का बोलवलं मला इथे तू आज ",..रेवा

"मग थँक्यू नको बोलू तर काय बोलू? आता तू बघते ना वातावरण, आपल्या हातात काही आहे का आता? , सगळ प्रिया ठरवते, मला वाटलं आज तुला ती पाठवते की नाही मला भेटायला",.. रणजित खोटी चिंता दाखवत होता

"ती काय पाठवेल मला, मी माझे निर्णय स्वतः घेते काका",.. रेवा

"विभा वहिनी भेटली होती का? ",.. रणजित

"नाही रे काका ममा अजून आली नाही फॉरेन हून, ती बिझी असते, तीच माझ्यावर प्रेम नाही ",.. रेवा

" अस बोलू नये बेटा, विभा वहिनी बरोबर करते आहे तुला रोहन जवळ ठेवून, नाहीतर सगळी प्रॉपर्टी प्रिया हडप करेल, आपल्या सगळ्यांचे खूप हाल होत आहेत रेवा, आधी प्रियाने विभाला घरा बाहेर काढले, आई ला स्वतः जवळ ठेवल, आणि ती तुला कोणाला भेटू देत नाही ",.. रणजित

" काका अस काही नाही, ममा स्वतः सोडून गेली डॅडी ला, मला माहिती आहे थोड, जाऊ दे ना तो विषय, आपण जमलो की सारख प्रिया बद्दल का बोलतो? ",.. रेवा

" मग काय करणार आपण?, ती आहेच तेवढी डेंजर, पुरून उरते ती आपल्याला ",.. रणजित

सारख प्रिया पुराण ऐकून रेवाला आता बोर झालं होतं..

" मला का बोलवलं आज इकडे काका?, तुला माहिती आहे का मला असं इथे तुला भेटायला येणं किती अवघड आहे ते, आता जर हे डॅडी ला समजलं तर तो मला खूप बोलेल",.. रेवा

" बघ म्हणजे आपण भेटू शकत नाही आता, अग तुझी काळजी वाटते मला, कशी राहत असशील तू तिथे, तू माझ्या कडे येते का रहायला? तेच बोलायला बोलवलं होत मी तुला, पुढे काय करायचं? तू माझ्याकडे कींवा विभा वहिनी कडे का नाही शिफ्ट होत? ",.. रणजित

" ममा असते का घरी काका, काय करणार मी तिकडे, आणि तो अंकल ममाचा नवरा मला आवडत नाही, तुझ्या कडे ही नको ",.. रेवा

का ग?,...

" घरी कोणीच नाही तुझ्या काकू ही नाही, काय झालं काका काकू कधी येणार आहे परत?",.. रेवा

" तुझी काकू रागवली आहे माझ्यावर माहिती नाही ती कधी परत येईल",... रणजीत

रेवाला अजिबात इच्छा नव्हती रणजित सोबत रहायची, तिला ही तो विशेष आवडत नव्हता, पण काका आहे म्हणुन ती त्याला भेटत होती, काका चा स्वार्थ होता रेवा त्याच्या कडे रहायला लागली तर आपसूक त्याला रोहन कडून पैसे मिळतील, आणि आताही तो जे बोर करतो आहे ते ही रेवाला आवडत नव्हत

" तू निघून ये इकडे डायरेक्ट, रोहन त्या प्रिया च्या आहारी गेला आहे, त्याला कुठे तुझी काळजी आहे ",.. रणजित

"डॅडी सोडणार नाही मला, डॅडी माझी खूप काळजी घेतो ",.. रेवा

"रोहन ला कुठे विचारायचा आपण, त्याला सगळे भाव देतात तर तो जास्त करतो आहे",.. रणजित

"नको काका मम्मा आली की बघू, मला असा स्वतः डिसिजन नाही घेता येणार, मी निघते खूप उशीर झाला आहे ",.. रेवा

रेवा तिथून निघाली, तिने कार मधुन विभा ला फोन लावला समोरून विभा ने फोन कट केला

रेवाने परत फोन लावला

" काय हव आहे रेवा? का सारखं फोन करते आहेस तू? मी मीटिंग मध्ये आहे, जर मी दोन वेळा तुझा फोन कट केला तर तुला समजत नाही का मी बिझी असेल लहान आहेस का तू आता रेवा",.. विभा

"mamma please talk to me i need you mamma ",... रेवा

रेवा रडायला लागली

"Give me some time my child, मी करते फोन",.. विभा

"काल ही तू अशीच बोलली होती ममा, नंतर तू मला फोन केलाच नाही, तुला माझी आठवण नाही येत का ग? तुला असं नाही वाटत का मी तिथे कशी राहात असेल? अशी कशी आहेस तु, स्वतःच्या मुलीला दुसऱ्यांच्या भरोशावर बिंदास सोडून गेलीस",.. रेवा आता चिडली होती

" stop this nonsense रेवा enough is enough, मला काम आहे, नक्की करते मी तुला नंतर फोन, तू शांत हो आधी ",.. विभा ने फोन ठेवून दिला

रेवा प्रचंड दुःखी झाली होती, मला कधी ममाच प्रेम मिळाला नाही, ती नेहमी स्वतःच बघते, तिला काहीही घेण नाही आहे की मी कशी आहे? सारख आपला मीटिंग नाही तर कुठे तरी गेलेली असते ती त्या तिच्या नवर्‍यासोबत, घरी पण किती बोर आहे सगळे, अजिबात माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही

रेवा घरी आली, तिचा आधीच मूड आॅफ होता, रोहन खाली बसलेला होता प्रिया सोबत

"कुठे गेली होतीस तू रेवा",.. रोहन विचारात होता,

"कॉलेज नंतर क्लास होता माझा डॅडी ",.. रेवा

"कॉलेज सुटला की डायरेक्ट घरी का येत नाही तू रोज? , फोन कुठे आहे तुझा? तू फोन ला उत्तर का देत नाहीस?",... रोहन

"मी काका ला भेटायला गेली होती तो बोलतो आहे माझ्या कडे ये रहायला, मी नाही सांगितलं त्याला, पण आता वाटायला लागलं चूक केली आहे, जायला पाहिजे तिकडे मी, डॅडी तू मला डोक्याला शांतता मिळू देत नाही, इथे कोणी माझ्यावर प्रेम करत नाही, वाईट लोक आहात तुम्ही",... रेवा

" एक मीनट रेवा, तू ठीक आहेस ना काहीही मूर्खासारखे बडबड करू नकोस, तू परत रणजित ला भेटणार नाहीस",.. रोहन

" मी ठरवेन डॅडी कोणाला भेटायचा ते, मी काही लहान नाही, आता तू मला अजिबात काही सांगू नकोस ",.. रेवा

" Shut up रेवा, मुद्दाम करते का ग तू",.. रोहन

"हो तू ऐकतो का माझ मग डॅडी, मी बोलली होती प्रिया नको मला घरी, तरी केल ना तू लग्न, सगळे आपल्या मनाचं करतात, मला मात्र सगळे निर्बंध आहेत मीही नाही ऐकणार आता कोणाच",.. रेवा

" आता माझा आणि प्रियाचा विषय कशाला मध्ये ",.. रोहन

" म्हणजे आता भांडण तू बोलशील त्या विषयावर वर करायचा का आपण? ",... रेवा

" रेवा बेटा अस करतात का? ",.. सुलभा ताई आल्या आत तेवढ्यात

" आजी बघ हा डॅडी माझ्या वर आजिबात विश्वास ठेवत नाही, नुसते आल्या आल्या प्रश्न विचारतो, मला चिडवतो हा",.. रेवा

" तस काही नाही रेवा, प्लीज ऐक जरा ",.. रोहन

रेवा रागाने तिच्या रूम मध्ये निघुन गेली, ती एवढी चिडली होती की ती डिनरच्या वेळे पर्यंतही खाली आली नाही रोहन तिची वाट बघत बसला होता

कोणी ही माझ नाही डॅडी तसा, ममा ही बोलत नाही माझ्याशी, तिला कधीच वेळ नसतो माझ्या साठी, त्या काकाला मी आवडते फक्त मला नाही रहायच इथे

" प्रिया जावून बघ रेवा काय करते आहे ते, तिला बोलव जेवायला",.. रोहन

"मी जाते रोहन पण रेवा आधीच खूप चिडलेली आहे, बघते काय म्हणते ती ",.. प्रिया

प्रिया रेवाच्या रूम कडे गेली, दार आतून बंद होत

"रेवा अग जेवायला चल",.. प्रिया

"मला नाही जेवायचं आहे, तुम्ही लोकं जेवा, आणी यापुढे माझ्या रूम मध्ये येत नको जाऊस प्रिया",.. रेवा

" रेवा प्लिज डोक्यात राग घालून घेऊ नकोस, रोहन तुझी जेवायला वाट बघतो आहे चल लवकर",.. प्रिया

"मला माहिती आहे किती काळजी आहे तुम्ही लोकांना माझी ते, मला जेवायचं नाही आहे किती वेळा सांगितलं मी, मला परत बोलवायला येवू नको ",.. रेवा

रोहन वरती आला त्याने डोळ्यानेच प्रिया ला खाली जा सांगितलं, रोहनने दरवाजा वाजवला

" प्रिया तुला सांगितलं ना जा तू, मला नको बोलवू, का त्रास देतेस ",.. रेवा

" मी डॅडी आहे ",.. रोहन

रेवाने येऊन दार उघडलं, रडून तीचे डोळे सुजले होते, तिने बघितलं प्रिया सोबत नव्हती, ती खाली गेलेली होती, रोहन रेवाच्या रूम मध्ये गेला, कॉटवर जाऊन बसला, रेवा जाऊन त्याच्या शेजारी बसली,

" आय एम सॉरी बेटा, मला तुझ्या वर संशय घ्यायचा नव्हता, मला तुझी फक्त काळजी वाटते, तू सुरक्षित रहावी हाच माझा उद्देश असतो समजून घे मला",.. रोहन

"डॅडी पण मी काम नसताना ईकडे तिकडे फिरत नाही, तुला माहिती आहे ना, तू पण कसा बोलतो नेहमी त्यां प्रिया च्या समोर",... रेवा

" प्रिया च्या समोर म्हणजे काय? ती मम्मी आहे तुझी",.. रोहन

" नाही मी किती वेळा सांगितले की ती माझी मम्मी नाही आणी तु मला सारखा तिला मम्मी म्हणण्याचा आग्रह करू नकोस ",.. रेवा

" ठीक आहे, पण हा अॅटीट्युड चांगला नाही, एकदा प्रिया शी नीट बोलून बघ, खूप चांगली आहे ती मम्मी म्हणून जाऊ दे एक फ्रेंड म्हणून तरी वाग" ,.... रोहन

रेवा विचार करत होती...

" आता जेवायला चलणार आहे का? मला खूप भूक लागलेली आहे ",.. रोहन

" तू जेवला नाही का डॅडी ",.. रेवा

" नाही जेवले मी, तू नव्हती घरी तुझी वाट बघत होतो मी ",.. रोहन

" मी येते पण मला तू असं सारखं बोलत नको जाऊ, चिडू नकोस माझ्यावर, ममा ही बोलत नाही माझ्याशी",.. रेवा

" का काय झाल आता विभा ला",.. रोहन

" ती नेहमी बिझी असते, फोन केला की म्हणते की मी बिझी करते तुला फोन, ती नंतर फोनच करत नाही, मी काहीच महत्वाची नाही आहे का डॅडी? ",.. रेवा

" माझ्यासाठी तर तू सगळ्यात जास्त महत्वाची आहे, विभाच मला काही माहिती नाही",.. रोहन

"आजही असच केल ममा ने म्हणून मी नाराज होते त्यात तू ही चिडलास",.. रेवा

" ठीक आहे I am so sorry ",.. रोहन

प्रॉमिस.. नाही चिडणार तू परत..

पक्का प्रॉमिस...

रेवा रोहन दोघं खाली आले, जेवण झाल, जेवताना कोणी फारस एकमेकांशी बोलल नाही,

सुलभा ताई रेवा ला आग्रह करत होत्या, ती नीट जेवत होती ते बघून रोहन प्रिया खुश होते...
........

प्रिया आणि रोहन रूम मध्ये आले

"रणजीतच काहीतरी करावं लागेल प्रिया, तो कशाला रेवाला भेटायचा प्रयत्न करतो, तिला काहीही शिकवतो",.. रोहन

"हो मला पण तेच वाटत आहे रोहन, मला खूप काळजी वाटते आहे रेवाची, रणजीत काही ना काही तिच्या कानात भरवत असणार, म्हणून रेवा अशी वागते, नाहीतर ती एवढी लहान आहे, अशी का करेल ती, आधी नीट होती ती",.. प्रिया

" रणजित किती पोहोचलेला आहे मला माहिती आहे, त्याला रेवा बद्दल अजिबात प्रेम नाही, काही तरी स्वार्थ नक्की असेल ",... रोहन

दोघ बोलत असतांना गार्डन मध्ये काहीतरी चमकल्यासारखे दिसल, कोण आहे तिकडे त्या झाडा मागे? मोबाईलचा लाईट लागल्यासारखा दिसला, रोहन ने नीट बघितल, वाटत काहीतरी भास असेल, परत जरावेळाने कोणी तरी दिसल तिथे उभ

" प्रिया शु.... बंगल्यात कोणी तरी शिरल आहे",... रोहन

काय???

हळू जरा....

"चल माझ्यासोबत गुपचुप.. आवाज करू नकोस",.. रोहन

"काय रे काय झाल",.. प्रिया

शु..... बोलू नको

प्रिया आणि रोहन दोघं हळूच टेरेस वर आले, रोहन ने इकडे तिकडे बघीतल वरुन, गार्डन मध्ये कोणी नव्हत, दोघ खाली आले,

" आधी लाईट बंद कर",.. रोहन

"काय झाल रोहन? कोण आहे तिकडे? ",.. प्रिया

" कोणी तरी होत तिथे झाडा मागे ",.. रोहन

केव्हा..

"आता.. कोणीतरी पाळतीवर आहे आपल्या, मी आलोच एका मिनिटात",.. रोहन

"नको रोहन, थांब, मला भीती वाटते आहे" ,... प्रिया

" मी आलोच एका मिनिटात तू घाबरू नकोस प्रिया",.. रोहन

रोहनने नंतर जाऊन बघितलं गार्डन मध्ये तर कोणीच नव्हतं, आत येऊन त्याने दार खिडक्या नीट बंद आहेत का ते बघितल, सुलभा ताई रेवा त्यांच्या रूम मध्ये होत्या, आता त्याला बर वाटत होत, आत येवून त्याने सिक्युरिटी गार्ड ला फोन केला गेट वर

"कोणी आलं होतं का आत मध्ये बंगल्यात",.. रोहन

"नाही सर कोणीच आलं नव्हतं",.. सिक्युरिटी

"मी आत्ता बगिच्यात कोणालातरी बघितलं",... रोहन

"माळी असेल, काम करत असेल",.. सिक्युरिटी

"इतक्या रात्री? , पण तो तर बोलतो ना की संध्याकाळी झाडांन जवळ जायचं नाही, मग रात्री तो कसा काय काम करत असेल ",.. रोहन

"माहीत नाही साहेब मी आत येवून बघतो" ,.. सिक्युरिटी

" नको तू गेट सोडू नकोस, तू तिथे थांब",.. रोहन

" कोणी तरी होत गार्डन मध्ये, व्हिडिओ घेत होत",.. रोहन

" मला माहिती नाही साहेब पण या गेटपासून तर कोणीच पास झालं नाही",.. सिक्युरिटी

ठीक आहे... रोहन

रोहन येऊन झोपला उद्या बघू काय आहे ते....

🎭 Series Post

View all