मृगजळ... भाग 2

रणजित रोहितच्या घरापासून थोड्या अंतरावर एका बंगल्यात रहायचा, बंगला ही गहाण होता त्याचा सावकार कडे, सगळीकडून पैसे घेवुन बसला होता तो, लोक नेहमी पैसे वापस कर असा तगादा लावायचेमृगजळ... भाग 2

©️®️शिल्पा सुतार
..............

रोहनच्या घरचे अगदी साधे लोक आहेत , रोहनच्या वडलांनी शून्यातुन सगळं निर्माण केलं, त्याकाळी एवढ्या अवघड परिस्थिती त्यांनी इंडस्ट्रीजची स्थापना केली, बहरवली, वाढवली, त्यात सुलभा ताईंनी त्यांची खूप छान साथ दिली, पाच वर्षापुर्वी रोहनच्या वडलांच निधन झाल, रोहन ने घरची पूर्ण जबाबदारी अंगावर घेतली, हेच खटकल त्याचा भाऊ रणजीतला, खूप भांडण होवू लागले, नंतर सुलभा ताईंनी रोहन आणि रणजीत दोघा भावांना सगळी संपत्ती समसमान वाटली, स्वतः चा वाटा वेगळा ठेवला, त्या रोहन बरोबर रहात होत्या

रोहन अतिशय हुशार आणि मेहनती होता पाहिल्या पासून, त्याने त्याच्या बुद्धीच्या जोरावर आहे तो बिजनेस खूप वाढवला, खूप यश मिळवलं, सगळी त्याच्या वाटेची ईस्टेट नीट सांभाळली

त्याच्या उलट रणजित, लहान पणा पासुन बंड, गुंड प्रवृत्तीचा, त्याने त्याचा वाटा नीट वापरला नाही, मिळालेली ईस्टेट ही त्याला पुरली नाही, सगळं खाऊन पिऊन एक केलं, आहे तेही जपलं नाही, रोज पार्टी व्हायची त्याच्याकडे, कामाकडे लक्ष नाही, खराब मित्रांची संगत, कर्जाचा डोंगर वाढत गेला, पत्नी घर सोडून गेली, सोबत राहिले ते टुकार मित्र, फुकट खाऊ

रोहनला मिळालेला वाटा दुप्पट झाला, भरभराट झाली, रणजीतला मिळालेला वाटा थोडाही राहिला नाही, फक्त दिखावा राहिला, घर गहाण ठेवलेल, आतून रणजीतची इंडस्ट्री पूर्ण पोखरली गेली आहे, अतिशय कर्जबाजारी झाला होता रणजित, सदोदित मागणारे दारात असायचे, त्यांना कस टाळायच हाच एक विचार कायम रणजित करायचा

आता त्याचा आता पूर्ण डोळा रोहनच्या इस्टेटीवर होता, एवढ आहे थोड मला दिल तर काय होणार आहे, मी किती त्रासात आहे ते नाही दिसत रोहनला, पण ही परिस्थिती त्याने स्वतः खराब वागून निर्माण केली होती

वारंवार तो पैशाची मागणी करत असे, सुरुवातीला केली रोहनने त्याला मदत पण नंतर रोहनच्या लक्ष्यात आल हा फक्त पैसे उडवतो, नंतर तो त्याला अजिबात उभ करत नव्हता , त्यात रणजितची बायको ही त्याला सोडून गेली, त्यामुळे तो निराश असायचा, त्याची प्रियाकडे वाईट नजर होती ,एवढी सुंदर बायको आहे भावाची तिला तो नेहमी घालून पाडून बोलायचा, विभाची मुलगी रेवाला तो मुद्दामून भडकवत असायचा, भावाच चांगल बघवत नव्हत त्याला

रणजित कडे बघून सुलभा ताई खूप टेंशन मध्ये असायच्या, सदोदित आई कडे ही पैशाची मागणी, दागिने तो मागत रहायचा, तू तुझा वाटा रोहनला दिला म्हणून त्याच चांगल आहे असा आरोप तो नेहमी सुलभा ताईं वर करायचा, काही दिल नाही की जे काही गोंधळ घालायचा की सुलभा ताईंची तब्येत खराब व्हायची, त्यामुळे प्रिया रोहन काळजीत असायचे, ते शक्यतो रणजित ला घरी येवू द्यायचे नाहीत, सुलभा ताईंच्या प्रॉपर्टीचा हिस्सा बँकेत सुरक्षित होता, रोहनने कधीच हात लावला नव्हता त्यांच्या पैशाला, सुलभा ताईंचे दागदागिने त्यांच्याकडे होते, उलट रोहन सुलभा ताईंना नीट सांभाळत होता, आईचा शब्द ही खाली पडू देत नव्हता तो, खूप प्रेम आधार देत होता.
.............


नाश्त्या झाल्या नंतर प्रिया ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाली, अतिशय सुंदर अशी मरून रंगाची प्लेन साडी ती नेसली होती , डिझायनर ब्लाऊज, थोडीशी ज्वेलरी , केस मोकळे, आज खूपच सुंदर दिसत होती प्रिया, रोहन आत आला आणि प्रिया कडे बघत बसला

"आज काय विचार आहे मॅडम? ऑफिस ला जायचा ना" ,.. रोहन

तशी प्रिया लाजली,.. "आटोप लवकर रोहन, महत्त्वाची मीटिंग आहे आज ऑफिस मध्ये",

"दुपारी जावुया ना लंच टाइम नंतर",.. रोहन

"प्रियाला समजल तो काय म्हणतो आहे ते",..

"नाही रोहन तू घरी राहिला तरी लगेच एका तासात फोन येईल, खूप काम आहे, चल आटोप लवकर येवु घरी",.. प्रिया

आलिशान गाडीने प्रिया रोहन ऑफिसला पोहोचले, सगळ्यांचे गुड मॉर्निंग स्विकारत केबिन मध्ये आले

" आज काय मीटिंग आहे? ",.. रोहन सेक्रेटरीला विचारात होता,

प्रिया ची केबिन बाजूची होती ती पूर्ण फायनान्स डिपार्टमेंट बघत होती, त्यामुळे सगळ कंट्रोल मध्ये होत, हेच रणजितला खटकत होत, प्रिया आल्या पासून त्याला रोहनच्या ऑफिस मधून पैसे मिळत नव्हते

रणजित रोहितच्या घरापासून थोड्या अंतरावर एका बंगल्यात रहायचा, बंगला ही गहाण होता त्याचा सावकार कडे, सगळीकडून पैसे घेवुन बसला होता तो, लोक नेहमी पैसे वापस कर असा तगादा लावायचे, अतिशय भकास बंगला स्वच्छता नाही, घरात एक स्वैपाकी यायचा तो त्याच काम करून निघून जायचा, वरती रणजितची रूम होती सगळी कडे दारूच्या बाटल्या पडल्या होत्या, साफसफाई करायला आठवड्यातून एकदा एक माणूस यायचा तोच ही सगळी घाण आवरायचा

आज काहीही करून रोहनच्या ऑफिस मध्ये जाव लागेल, पैसे मागणारे लोक खूप उरावर बसले आहेत, कर्ज वाढत चालला आहे, प्रिया देईल का पैसे? जावून बघतो, प्रिया च्या विचाराने रणजितचे डोळे चमकले

रोहन मीटिंगला आत निघून गेला, प्रिया तीच काम करत होती, रणजित ऑफिस मध्ये आला, सिक्युरिटी गार्डची नजर चुकवून तो येवून प्रियाच्या केबिनमध्ये खुर्ची वर बसला, तशी प्रिया दचकली

"ओह आय एम सॉरी प्रिया, तू एवढी घाबरतेस मला",.. रणजित

"शट अप रणजित तुला कोणी आत पाठवल? सिक्युरिटी.... सिक्युरिटी तू मला डिस्टर्ब करतो आहेस",.. प्रिया

"मी या कंपनीचा मालक आहे हे विसरू नकोस तू प्रिया, मला मान द्यायला पाहिजे तू",.. रणजीत

"मालक my foot, तुझा या कंपनी वर काही हक्क नाही, तेव्हा इथून निघायच, आता मला माझ काम करू दे ",... प्रिया

" Ohh बिझी n all, कोण आहेस ग तू? साधी एम्पलोयी होतीस या कंपनीत, तू माझ्या भावावर जादू केली, माझ्या वाहिनीला घरातून बाहेर काढल, मालकीण बनली, एवढ लक्ष्यात ठेव तुझ पितळ मी लवकर उघड करेन, लवकरच रोहितला समजेल कोण चांगला आणि कोण वाईट",.. रणजित

" हे बघ रणजित रोज तेच तेच बोलून उपयोग नाही, मला या गोष्टीं साठी वेळ नाही तू जा इथून, नाही तर माझ्याहून कोणी वाईट नाही ",.. प्रिया

" Chill कर ग, तुझ्या सारख सुंदर मुलीला राग शोभत नाही, माझ ऐक, तुझा फायदा होईल, आपण दोघ मिळून आनंदात राहू ",.. रणजित

"Shut up रणजित, आज सकाळी सकाळी दारु पिऊन आलास का इथे, तू जा बर",.. प्रिया

"जरा एक पन्नास हजार रुपये दे लागता आहेत ",... रणजित

"मुळीच नाही आधीचे दिलेले पैसे परत कर",.. प्रिया

"ऐ तू कोण आहेस ग मला विचारणारी? मागितले की द्यायचे पैसे understand",.. रणजित

सिक्युरिटी.... सिक्युरिटी.....

सिक्युरिटी गार्ड पळत आला

"किती वेळा सांगितलं तुला यांना आत सोडायचा नाही म्हणुन, समजता नाही का?, पुढच्या वेळी रणजित आत आला तर तुझी नौकरी जाईल ",.. प्रिया

I am sorry Madam..... "चला हो सर प्लीज, हे कसे काय आत आले",...

प्रिया कडे बघत बघत धमकी देत रणजित गेला, प्रिया डोक्याला हात लावून बसली,... "काय करायचं या माणसांच? वैताग आला आहे",

लंच ब्रेक झाला मीटिंग झाली, रोहन जेवायला आला, प्रिया ने जेवण वाढल, प्रिया चा चेहेरा उतरलेला दिसत होता,

"काय झाल प्रिया काही प्रॉब्लेम आहे का",...... रोहन

"आज परत रणजित आला होता ऑफिस मध्ये डायरेक्ट माझ्या केबिन मध्ये", .. प्रिया

"ओह माय गॉड का आला आता तो",.. रणजित

"अशीच बडबड करत होता फालतू सारखी, 50,000 रुपये मागत होता मी नाही दिले",. प्रिया

"गुड काही काम करायला नको त्याला , टवाळ गिरी करत फिरतो तो, कितीही पैसे दिले तरी उडवणार तो",.रोहन

"मला भिती वाटते रोहन, त्याची नजर चांगली नाही रोहन, तो नुसता माझ्या कडे बघत बसतो, या पुढे तो माझ्या केबिन मध्ये नको यायला, सक्त ताकीद दे तू त्याला आणि सिक्युरिटी गार्ड ला",..प्रिया

" मी करतो काही तरी, त्याची ही हिम्मत, तू एक थोबाडीत मारायची ना त्याच्या, का ऐकत बसली त्याच, एकदा परत पोलिस कंप्लेंट करावी लागेल त्याची, प्रसाद मिळाला की होईल नीट थोड्या दिवसासाठी तो रणजित",..रोहन

"काही नीट होत नाही असे फालतू लोक ,तो मला त्याची वहिनी मनात नाही,माझ्या मागे लागला आहे तो ",.. प्रिया

" बघतो मी जरा त्याच्या कडे काळजी करू नकोस",.. रोहन

" तुझ्या वाईटावर आहे तो, आता हल्ली रेवाला भेटतो, सदोदित तिचे कान भरतो आपल्या विषयी काहीही सांगतो तिला नेहमी ",.. प्रिया

" म्हणून रेवा चिडून असते का आपल्या वर? ",... रोहन

" आपल्या वर नाही माझ्या वर",.. प्रिया

" प्रिया तू नाराज होवू नकोस मी समजून सांगेन रेवाला",.. रोहन

" रेवा ऐवजी रणजित चा बंदोबस्त कर सगळ नीट होईल बघ , तोच आहे मूळ प्रॉब्लेम ",.. प्रिया

" मी करतो काही तरी बंदोबस्त ",.. रोहन

लंच झाला रोहन केबिन मध्ये आला, त्याने आल्यावर एक नंबर डायल केला, तिकडुन फोन उचलला,.." मला एका बॉडीगार्ड ची गरज आहे, लेडी बॉडीगार्ड असेल तर उत्तम, माझी मुलगी आहे सतरा वर्षाची तिच्यासाठी बॉडीगार्ड हवा आहे",

"ठीक आहे सर मिळून जाईन ",..

" जरा वेळाने रोहनला सीमा चा फोन आला, सर मला अपॉईंट केल आहे, काय सर्विस हवी आहे",.. सीमा

"माझी मुलगी आहे, कॉलेजला जाते तिच्या सिक्युरिटी साठी हव आहे ",.. रोहन

" काही धोका काही प्रॉब्लेम ",.. सीमा

" ती भोळी आहे, पैशासाठी बाकीचे फसवू शकतात, ती कुठे जाते कोणाला भेटते ते महत्वाचं जाणून घ्यायचा आहे मला",.. रोहन

" कोणावर संशय",.. सीमा

"हो माझा सख्खा भाऊ म्हणजे तिचा काका रणजीत, त्याच्या पासून लांब राह्यलाय हव तिने" ,... रोहनने पूर्ण माहिती सांगितली

"ठीक आहे सर मी डिटेल्स घेतले आहेत ",.. सीमा

" उद्या पासून काम सुरू करा तुम्ही ",.. रोहन

" ठीक आहे सर मी येऊन जाईल, काही लागल अजून इन्फॉर्मेशन तर मी करते तुम्हाला कॉन्टॅक्ट",... सीमा

आता रोहनला बरं वाटत होतं थोड, काय काय अडचणी असतात, कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही, घरचे लोक असे करतात, उलट त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे तर तेच त्रास देतात

रोहनने आता पोलीस स्टेशन ला फोन लावला

" बोला रोहन सर",.. इंस्पेक्टर

" रणजित त्रास देतो आहे खूप, जरा भेटला तर दम द्या त्याला",.. रोहन

" हो काम होवुन जाईल काळजी करू नका",.. इंस्पेक्टर

काम आटोपलं प्रिया आणि रोहन घरी आले, राधा काकू काहीतरी काम करत होत्या, सुलभा ताई बागेत फेर्‍या मारत होत्या, त्यांच्या सोबत त्यांना सांभाळणारी मदतनीस होती

"आली का कॉलेज हुन रेवा?",.. प्रिया

"ताई साहेब आज उशिरा घरी येणार आहेत त्यांनी निरोप दिला आहे",...

"कुठे गेली ती काही सांगितलं का?",.. रोहन प्रिया ला विचारत होता

"नाही मला काहीही सांगितलेला नाही",.. प्रिया

फोन लाव तिला,

प्रिया ने रेवाला फोन लावला समोरून फोन उचलला गेला नाही, रोहनने त्याच्या फोन वरुन रेवाला मेसेज केला ....


🎭 Series Post

View all