मृगजळ...

मृगजळ.... एक प्रेम कविता

तुझा तो सहवास हवाहवासा,

ओढ लावी जीवा....

येशील का रे सख्या,

पुन्हा एकदा मिठीत माझ्या....

भेटीसाठी तूझ्या,

कासावीस झाला जीव हा....

एकदा तू यावे,

अलगद मला कवेत घ्यावे...

डोळे मिटता हळूच,

स्वप्नात तू दिसावे....

काय ही जादू प्रेमाची,

जवळ नसतानाही,

भासतो मज अवतीभवती...

प्रेमाची जादू ही निराळी,

भासे मज मृगजळ कहानी सारी...

©® कविता सुयोग वायकर