मृगजळ मागे धावतांना.....

डोळ्यात खूप मोठ स्वप्नं घेवून रेखा आजकाल जगत होती, तिला काहीतरी करून दाखवायच होत, आहे ही परिस्थिती बदलायची होती, कारण ही तसच होत त्याला, कायमची ही गरिबी चा कंटाळा आला होता तिला
 मृगजळ मागे धावतांना..... 

................. 

आपल्याच स्वप्नात रमणार्या रेखाला आजही उठायला उशीर झाला, सकाळी आई रेखाला जोरा जोरात हाका मारत उठवत होती,..... "उठ ग रेखा किती वेळ झोपणार, मला उशीर होतोय कामाला जायला, चहा ठेव" , 


रेखा चिडून उठून बसली,...... "या घरात पाच मिनिट आराम नाही, आपल्या मनाप्रमाणे रहाता येत नाही", 


एका गरीब घरात रेखाचा जन्म झाला, वडील एकटे कमावणारे आई थोडसं काम करून संसाराला हातभार लावायची, पण ते पुरेस व्हायचं नाही, खूप लहान घर होतं त्यांचं, अगदी एकाच रूमच, त्यात किचन बाजूला छोटीशी मोरी, कपाट ही एकच, कपडे नव्हते फारसे, तीन भाऊ बहीण आई वडील सगळे दाटीवाटीने रहायचे, प्रत्येक गोष्टीत मन मारायचं, त्यामुळे रेखाच्या भावना बोथट झाल्या होत्या, श्रीमंत लोक चांगले, भरपूर पैसा असला की सुख मिळतं, हेच मनात भरून ठेवलं होतं रेखाने


डोळ्यात खूप मोठ स्वप्नं घेवून रेखा आजकाल जगत होती, तिला काहीतरी करून दाखवायच होत, आहे ही परिस्थिती बदलायची होती, कारण ही तसच होत त्याला, कायमची ही गरिबी चा कंटाळा आला होता तिला 


वडील ही कंटाळले होते सततच्या कामाला, अजिबात विश्रांती नव्हती त्यांना, काम नाही केलं तर खाणार काय? ते खूप काटकसरी झाले होते, वडिलांचा खर्चाला नेहमी नकारच असायचा, कोणी काही मागितलं की ते चीडायल लागायचे. काय करणार ते पैशाच सोंग नाही करता येत, 


पूर्वी पासुन नेहमी धकवुन घ्यायच सुरू होत आईचं , घरात पुरेस सामान नाही, मुलांची शिक्षण असेच झाले, आज वहि आहे तर उद्या पुस्तक नाही, बघता बघता रेखा कॉलेज ला पोहोचली, तेव्हा ही असच सुरू होत तीच, एक ही धड ड्रेस नव्हता तिला, कुठे जाण नाही की येण नाही, बाकीच्या मुलींसारखी आपण ही एन्जॉय कराव अस नेहमी तिला वाटायचं 


क्लास संपला तशी आशा आली मागे.. 


"रेखा तू पैसे नाही भरले अजून ट्रीपचे? उद्या शेवटचा दिवस आहे, येणार आहेस ना? आठवणीने आण उद्या, खूप मजा करू आपण ",........ आशा, 


"हो नक्की",......... हो बोलली खरी रेखा पण पैसे मिळतील की नाही शंका होती, 


"आई मला जायचा ग ट्रीपला, सगळे चाललेले आमच्या क्लास मधले" ,....... रेखा 


"कस जमेल आपल्याला, तू पप्पांना विचार" ,..... आई 


आई दर वेळी प्रमाणे रेखाला समजवत होती, म्हणजे झाल पप्पा नकार देतील,...... "बाकीच्या मुलींचे बघा किती लाड होतात, पॅकेट मनी किती मिळतो, मला काही देत नाही तुम्ही", 


घरच्या परिस्तिथी मुळे रेखाचा स्वाभाव जरा चिडका झाला होता, आई नेहमी बोलायची वेळ हे औषध आहे सगळ्यावर , येतील चांगले दिवस, तू अशी चिडचिड करू नको, बोलून माणसं दुखवू नको, खरी श्रीमंती आपल्या आजूबाजूचे लोक घरची मंडळीच असतात, पण रेखाला ते समजत नव्हतं, तेवढा दम नव्हत तिला, 


रेखाला आधी पासून खूप फिरायची हौस होती, पण नेहमीच तिला फिरायला जायला मिळायच नाही, कधी पैसे नाही..... कधी कोणी सोबत नाही , घरची परिस्थिती जेमतेम होती, दोन वेळ जेवायला मिळण्याचे तेवढच, बाकी विशेष लाड झाले नाहीत, कधी मनसोप्त खरेदी केली नाही, आवडता ड्रेस नाही, हौस मौज नाही, नेहमी आईची नकार घंटा, त्यामूळे का माहिती नाही रेखाला श्रीमंतीच आकर्षण होत, श्रीमंत होताच काय काय करायचं मनात ठरवून ठेवल होत तिने 


शिक्षण झालं, पुढे सुट्टीत काही कराव..... स्वतः च्या पायावर उभं रहाव, आपल्या सोबत आपल्या भावंडांचे लाड करावे.... खूप वाटत होतं तिला,


"आई आज माझा इंटरव्ह्यू आहे" ,....... रेखा तयारी ला लागली, छोट्याश्या फर्म मध्ये अकाऊंट सांभाळायचे काम होत, ही नौकरी रेखा साठी महत्वाची होती 


तेवढ्यात बाबा घरी आले,....... "काही गरज नाही जॉब ची, उद्या पाहुणे येणार आहेत बघायला, त्याची तयारी करा, जे जॉब वगैरे करायचे ते स्वतः च्या घरी जावून करा आता", 


 रेखाला एक स्थळ सांगून आल होत , मुलगा नौकरी करत होता, जेमतेम होती परिस्थिती तिकडे , खर तर रेखाला हे स्थळ अजिबात आवडल नव्हत , ती ही लहान पणापासुन गरिबीत दिवस काढत होती, रेखाला वाटल होत लग्नानंतर परिस्थिती सुधारेल आपण मस्त राहू, असच श्रीमंत स्थळ बघू तर हे शरदच स्थळ आल,


 घरात मोठी मुलगी होती ती, पाठच्या भावंडांचा खर्च वाढत होता, आई वडलांना एक लग्न झाल म्हणजे एका जबाबदारीतून मोकळा झाल अस वाटत होत, तिची आवड विचारायचा प्रश्न नव्हता , अजून शिकायचं होत तिला स्वतःच्या पायावर उभे राहून जग बघायच होत पण आईबाबांना पुढे नाईलाज झाला 


दुसर्‍या दिवशी पाहुणे येणार होते बघायला , स्वतः च अस काही सामान नव्हता तिला, आईकडे एकही साडी धड नव्हती, नवीन साडी घेतली तर परत शिलाईचा खर्च कोण करेन? आई बोलली,..... "शेजारच्या वहिनी करतील मदत तयार व्हायला" , त्यांची साडी तिकडून भांडी वगैरे आणली कशीबशी 


दुसर्‍या दिवशी पाहुणे आले घरी, साधीशी रेखा शरदला पसंद पडली, देण घेण विशेष मागितल नाही, चांगले लोक वाटत होते ते, लग्न ठरलं, देण घेण नसल्यामूळे खरेदी ही विशेष झाली नाही, रेखा नाराज होती, हवी तशी लग्नाची साडी मेकअप तिला मिळाला नव्हता, 


इतरांचे लग्न किती धूमधडाक्यात होतात, आपल्याला तेही मिळालं नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच रेखा नाराज होती, अत्यंत साध्या पध्दतीने लग्न होवुन एका महिन्यात रेखा सासरी आली, 


घर लहान होत, माणस जास्त जबाबदारी खूप होत्या, घरी सासू सासरे नणंद नवरा एवढे लोक, नणंद लग्नाची होती , सगळ्यांच कराव लागायच, पण माणस समजूतदार होती, त्यांना होईल त्या परीने ते रेखाची मदत करायचे,


 रेखाची चीड चीड व्हायची, कोणाशी नीट बोलायची नाही ती, शरदवर चिडायची, सगळा राग काढायची, कुठे फिरायला नेत नाही की हौस मौज नाही, बर्‍याच वेळा बोलायची शरदला की उगीच लग्न केल, एक एक खर्च डोळ्यापुढे दिसायचे त्याला , जमेल तसे फिरत होते ते पण दर आठवड्यात ही हौस मौज परवडण्यासारखी नव्हती 


रेखाची समजून घेत नव्हती, घरचे सगळे तिला खुश ठेवायचा प्रयत्न करत होते, एका रात्रीत तिला सगळ्या गोष्टी हव्या होत्या, होईल ग रेखा आपल नीट...शरद नेहमी समजवायचा


तिच्या मैत्रिणी, माहेरचे लोकसुद्धा सांगत होते, किती चांगले आहेत तुझ्या सासरचे लोक, जरा नीट वागत जा सासरी, पण सगळ रेखाच्या डोक्यावरून जात होत, फक्त ते लोक गरीब आहेत, मला श्रीमंत सासर हवा होतं, असंच सुरु होतो तिच


नणंद बाईंच लग्न जमल, देणे घेणे विशेष नव्हत, प्रत्येक खरेदीला रेखा भांडण काढू लागली, किती वस्तू घेते, हे नको ते नको अस सुरू होत तीच, नणंदेच्या दागिन्यांनसोबत रेखाने नेकलेस घेतला, शरदने विरोध केला पण सासुबाई बोलल्या


 "घेवू दे, तिला लग्नानंतर काहीही दागिने केले नाही, मी देते पैसे" , ...... आई 


"आई पण या मुळे लग्नाचा बजेट बिघडेल" ?..... शरद 


"माझे साठवणीच्या पैसेतुन घे" ,....... आई 


रेखाला स्वताला हे समजत का नाही याचा शरदला राग येत होता,...... "ही वेळ जाऊ दे घेवू तुला ही दागिने", 


पण रेखा थांबायला तयार नव्हती, हट्टाला पेटली, शेवटी खरेदी करून ते लोक घरी आले, 


संसाराचा वेलीवर एक गोड मुलीच जन्म झाला, आता तरी रेखा नीट वागेन अशी शरदला आशा होती, पण रेखाच्या स्वभावात बदल झाला नाही, आता सगळ्यांना हे नेहमीच झाल होत, रेखा फक्त स्वतः पुरता बघायची , 


रेखाला जॉब करायचा होता, शरदला वाटला तेवढीच आपल्याला मदत होतील 


सासुबाई बोलल्या,..... "मी बघेन घरचं तू जा बिनधास्त" , 


रेखाला जॉब मिळाला होता, घरचे सपोर्ट करायला तयार होते मग विचारू नका रेखाला आभाळ ठेंगणं झाला होत, मनाप्रमाणे जगता येणार होत तिला, घरच्या कामापासून थोडी सुटका, नाही म्हणायला मुलीला घरी सोडून जातांना जड जात होत, 


मिळालेल्या पगारात रेखा तिच्या साठी.... मुली साठी वस्तू घेवू लागली, कधी बाहेर जेवायला जायच्या त्या मैत्रिणी, अश्यातच तिची ऑफिस मधल्या सारिकाशी मैत्री वाढू लागली, ती श्रीमंत घरची, रोज वेगळ्या साड्या, सुंदर दागिने, तिला बघून रेखा भारावुन गेली, तीच अनुकरण करतांना खूप पैसा खर्च करू लागली 


 " पैसे जपून वापर रेखा"........ शरद 


रेखा जुमानत नव्हती , सकाळी उशिरा उठत होती, घरात तिची विशेष मदत होत नव्हती, 


एक दिवस रेखा तापाने खूप फणफणली, तिच्या मुळे तिच्या मुलीला खूप ताप भरला, दोघींना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केला, सासुबाईंनी खूप छान काळजी घेतली, दोघींची बिल बरेच आला, शरदने रेखाच अकाऊंट चेक केल तर काहीच बॅलन्स नव्हता, 


 "कर्ज घेण्या शिवाय पर्याय नाही रेखा, हॉस्पिटल च बिल कस भरणार" ,....... शरद चिंतातूर दिसत होता, 


रेखाच्या नजरेतुन ते सुटला नाही, तिने कपाटाची चावी दिली तिने, 


" माझा नेकलेस मोडा पण कर्ज घेवू नका" ,...... रेखा 


चांगलेच डोळे उघडले होते तिचे,..... "मला माफ कर शरद ,मी पैसे साठवायला हवे होते" , 


बिल भरून तिघे घरी आले, सासुबाईंनी स्वागत केल, तिची कपाटाची चावी वापस केली, दुसर्‍या दिवशी बघते तर नेकलेस तसाच कपाटात होता , 


" बाबांनी दिले पैसे ते ऐकत नव्हते, माझा नाईलाज झाला" ,....... शरद 


रेखा च्या डोळ्यात पाणी होत, ज्या लोकांना आपण एवढ कमी समजत होते..... ज्यांना आपण कधीच माया लावली नाही त्यांनी आज मला एवढी मदत केली, 


दुपारी जेवताना रेखा ,.... "मला बोलायच सगळ्यांशी, आई बाबा मला माफ करा मी अजिबात नीट वागले नाही तुमच्याशी, नेहमी स्वताची तुलना श्रीमंत मैत्रिणीशी करून दुखी राहिले, योग्य वेळ आली की सगळ मिळत हे मला माहिती नव्हत, मला पूर्वी पासून श्रीमंतीचा... खरेदीच आकर्षण होत, चांगले लोक चांगली माणस केवळ गरीब आहेत म्हणून मी डावलत होती, आता मला खरी श्रीमंती समजली, खरे श्रीमंत तेच लोक असतात ज्याना घरच्यांचा आधार असतो, प्रेमळ अस कुटुंब असते, असे समजूतदार लोक मला भेटले माझे भाग्य, या पुढे तुम्ही जसे बोलाल तस करेन मी", 


" तुझं तुला समजलं अजून काय हवय, आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहोत, वेळ ही खरच औषध आहे सगळ्यावर, शरद अणि तू नीट राहावे एवढच वाटत आम्हाला ",...... सासुबाईंनी आधार दिला 


आता शरद अणि रेखा सोबत ऑफिस हून मार्केटला जायचे, रोजची भाजी फळ घेवून घरी यायचे, रोज हाच दिनक्रम होता, आता घरी येवून ती स्वौपाकाला मदत ही करायची रोज, शरद खुश होता 


रेखाला समजल होत की नात्यानं वेळ दिला की ते छान फुलतात, बहरतात, आधार देतात, पूर्वी झालेल्या चुका वेळेवर सुधारल्या म्हणून आज हा आनंद उपभोगता येत होता , रेखाच्या डोळ्यात पाणी होत, एकत्र कुटुंब हाच आधार आहे याची पुन्हा प्रचिती आली, दोघ कुटुंबासोबत पुन्हा जीवनाच आनंद घेत होत....... 

©️®️शिल्पा सुतार