Aug 16, 2022
कथामालिका

मृग ...( ओरायन)

Read Later
मृग ...( ओरायन)
? म्रुग (orion )भरत ?
( The Hunter )
अवकाश निरीक्षण करतांना खगोलप्रेमींचा अतीशय आवडता तारकापुंज महणजेच म्रुग (orion ) किंवा भरत हा होय आणि जर तुमच्या कडे जरा चांगल्या प्रतीची दुर्बीण असेल तर मग सांगायला नकोच !
कारण या तारकापुंजात निरीक्षण करण्यासारखे अनेक तेजोमेघ , दैती तारे , रूप विकारी तारे दीर्घिका आहेत .की ते पहिल्यानंतर एक वेगळाच आनंद निरीक्षकाला वाटतो .
हा सुप्रसिद्ध तारकापुंज उतर गोलार्धातील असुन म्रुग हें सत्तावीस नक्षत्र पैकी एक नक्षत्र आहे .
ग्रीक पुराणात याची एक मजेदार कथा आहे .ओरियन हा एक शिकारी होता .आणि तो जेव्हा शिकारीला जात असे तेव्हा त्याच्या बरोबर .केनिस मेजर व केनिस मायनर हें दोन अतीशय विक्राळ असे कुत्रे असत आणि लिपस नावाचा ससा देखील असे .
ओरायन चे प्रेम अटेमिस नावाच्या देवते वर जडले .पण तिचा भाऊ अपोलो याला हें अजीबात आवडले नाही .
आणि त्याने एका जहाल विषारी विंचवाला वृश्चिक
(Scorpius) ला ओरियन ला मारण्यास पाठवले .विंचवाने ओरियन च्या पायाला कडकडून चावा घेतला .त्यांच बरोबर ओरियन चा म्रुत्यू झाला .
ओरियन च्या म्रुतु मुळे त्यांची प्रीयसी अटेनिसला फार दुखः झाले .आणि तीने ओरियनला स्वर्गात स्थान दिले .
म्हणून तर रात्रीच्या अवकाशात स्कॉर्पिओ मावळ्यांल्या नंतरच ओरियन चा उदय होतो .
हिंदू पुराण कथेत हा तारकापुंज म्रुगची आक्रुती दर्शवतो .यातील चार तेजस्वी ताऱ्यांचा चौकोन म्रूगचे पाय दर्शवतात .
यातील तीन सरळ रेषेत असणारे तारे ओरियन चा कमरेच्या पट्टा दर्शवतात .Mintaka (डेल्टा ), Alnilam (इप्सिलोन ) Alnitak (झिटा )
या तीन ताऱ्यांना अमेरिकेत ..थ्री मेरीज \" असे म्हणतात .
या तारकापुंजात M 42 हा दिव्य तेजोमेघ व NGC 2024 अश्वमुखी तेजोमेघ प्रसिध्द आहेत .
या मध्ये राजन्य(Rigel) हा अतीशय तेजस्वी असा दैती तारा आहे .तसेच काक्षी (Betelgeuse)हा महाराक्षसी असा रुपविकारी तारा आहे .
या मध्ये २ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालवधीत उल्कावर्षाव होतो .याला (ORIONIDS)असे म्हणतात .२१ऑक्टोंबर या दिवशी उल्काचे प्रमाण सर्वात जास्त असते .
-चंद्रकांत घाटाळ
(संचालक -अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक