A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionde75bec94f7888a4fa70c806fcf0925faee9fbdb1d02f26ce3305addc18e72543a852256): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Mrudgandh part 2
Oct 21, 2020
स्पर्धा

मृदगंध भाग २

Read Later
मृदगंध भाग २

© मधुनिता

© सुनिता मधुकर पाटील

मृदगंध - भाग २

श्याम तिच्याकडेच पाहत होता, त्याने पाहिलं की ती त्याच्याकडेच येत आहे. त्याच हृदय आता जोरजोरात धडधडायला लागलं होतं. जवळ येताच तिने आपला हात प्रेमाने अवधुतच्या हातात अडकवला आणि एक प्रेमळ कटाक्ष त्याच्यावर टाकला. हे पाहून श्यामला कसंतरीच झालं.

" मिस्टर श्याम खुप सुंदर,,,शब्द नाहीत कौतुक करायला. तुमच्या आवाजत एक दर्द आहे जे माणसाच्या काळजाचं ठाव घेतं, म्हणुनच कदाचित आमच्या मॅडम तुमच्या जबरदस्त फॅन आहेत बहुतेक. काय गं किती छान गायलं ना ह्यांनी गाणं." अवधूत श्यामलीकडे प्रेमाने पाहत बोलत होता.

ती फक्त हसली आणि, "कसे आहात तुम्ही?" इतकंच तिने अगदी सहजतेने अवधुतचा हात हातात घेत त्याला विचारलं. हे पाहून तो अस्वस्थ झाला आणि आपली अस्वस्थता लपवत त्याने फक्त, " मी बरा आहे " इतकंच जुजबी उत्तर दिलं. हिला आपल्याबद्दल काही वाटत असेल की नाही, आपलं प्रेम ही इतक्या सहजासहजी विसरली असेल का? अशा अनेक विचारांनी त्याला घेरलं.

" तू कशी आहेस " हे वाक्य आपसूकच त्याच्या तोंडातून बाहेर पडलं. 

ह्याला काय सांगाव, हृदयाचा एक कप्पा जो इतकी वर्षे बंद करून ठेवला आहे तो याला उघडून दाखवावा का? तुझ्या आठवणी अजूनही मनाच्या खोल आत तळाशी बंदिस्त आहेत, कधीतरी कातरवेळी सागराच्या लाटांप्रमाणे उफाळून वर येतात आणि व्याकुळ करून सोडतात, सांगावं का त्याला. तिचे डोळे ओलावले पण ती अवधुतच्या जवळ जात सुंदर हसून " मी...मी एकदम मस्त ", इतकंच ती बोलली. 

त्याला कळेल का? आपल्या ह्या हसण्या मागची वेदना. त्याला कळेल का आठवण यायला माणुस दूर असायला हवा पण तो...तो तर कायम माझ्या हृदयात बंदिस्त होता. हा विचार क्षणभर तिच्या मनात चमकून गेला.

श्याम मनातल्या मनात तिचाच विचार करत होता. त्याला वाटत होतं जावं का तिच्या जवळ? आणि तिचा हात हातात घेऊन तिला जवळ घेऊन सांगावं एकदा की, " मी चुकलो, तुला त्यावेळी नाही समजून घेऊ शकलो मी. मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. तुझ्याशिवाय माझं स्वतःच अस्तित्व शून्य आहे. एखादी गोष्ट आपल्याजवळ असते तेंव्हा त्याची किंमत नसते आपल्याला, पण जेव्हा ती आपल्या पासून दूर होते तेंव्हा तिची किंमत समजून उणीव भासू लागते. तु माझी प्रेरणा आहेस. तू आज माझ्यासोबत नाही आहेस पण माझ्या श्वासात फक्त आणि फक्त तूच माझा प्राण बनुन वाहत असतेस. 

तो तिच्याकडेच अधीर होऊन एकटक पाहत होता. एक क्षणभर त्या दोघांची नजरानजर झाली आणि आपोआपच त्याची पावले तिच्याकडे वळाली. नकळत तिचीही पावले त्याच्या दिशेने चालू लागली.

तिच्या मनात भावनांच, विचारांचं वादळ उठलं होतं. गेली पंचवीस वर्ष ती हे गुपित मनात आत दडवून एक सर्वगुण संपन्न बायको, संस्कारी सून आणि एक आदर्श आई अशी वेगवेगळी नाती निभावत, जगत आली होती.

पण आज...आज त्याने असं का केलं ह्या प्रश्नाचं उत्तर ती त्याच्याकडे मागणार होती. त्याला जाब विचारणार होती. प्रत्येक पावलागणिक तिचा विश्वास दृढ होत चालला होता. दोघे जवळपास एका हाताच्या अंतरावर होते. दोघांनाही हे अंतर पार करायचं होतं. 

तिने एक पाऊल पुढे टाकलं तोच तिची नजर त्याला बिलगणाऱ्या रेवावर पडली, रेवा श्यामची बायको. आणि तिची पावले तिथेच थबकली. तिने त्याच्याकडे पाहिलं तो सुद्धा आगतिकपणे असहायतेने तिच्याकडे पाहत होता. 

तो तिच्याशी काहीतरी बोलणार इतक्यात ती स्वतःला सावरत माघारी वळाली आणि झपाट्याने झपाझपा पावले टाकत अवधूतकडे गेली. पटकन डोळे पुसले आणि तेच नेहमीच मिलियन डॉलर कातीलाणा हसू चेहऱ्यावर आणत अवधुतसोबत आलेल्या पाहुण्यांना जोडीने निरोप देण्यात गुंग झाली. 

इतक्यात श्याम तो ह्या दोघांसाठी आणखी एक गाणं गाणार असल्याचं घोषणा करतो. तो इंदिवर यांचं गीत त्या दोघांसाठी गातो.

हर किसी को नहीं मिलता
यहाँ प्यार ज़िन्दगी में
खुशनसीब है वो जिनको है मिली
ये बहार ज़िन्दगी में

होठों से होंठ मिले ना भले
चाहे मिले न बाहें बाहों से
दो दिल ज़िन्दा रह सकते हैं
चाहत की भरी निगाहों से
हर किसी को नहीं मिलता...

जुल्फों के नर्म अँधेरे हैं
जिस्मों के गरम उजाले हैं
जीते जी हमको प्यार मिला
हम दोनों किस्मत वाले हैं
हर किसी को नहीं मिलता.

हे गाणं ऐकून ती आणखीच व्याकुळ होऊन उठते पण हसत सगळं ठीक आहे हे भासवण्याचा ती प्रयत्न करत असते.

पण आज तिच्या मनाच्या वारूने संयमाची लगाम सोडली होती. विचारांचे घोडे बेफाम उधळले होते. ती स्वतःला अडवण्याचा, सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती कारण तिच्या मर्यादा ती ओळखून होती. असं असलं तरीही आज तीच मन सैरभैर वाऱ्याप्रमाणे वाहत होत. मनात असंख्य विचारांच्या, भावनांच्या वावटळी उठत होत्या. तिचं चित्त आज थाऱ्यावर नव्हतं. 

" तू मला आपलंस केलं नाहीस. अर्ध्यावर एकटं सोडून गेलास पण जाताना चार शब्द प्रेमाचे देखील बोलला नाहीस. माझं मन दुखावेल असंच बोललास. पण तू माझ्यावर नुसतं शब्दांनी नाही तर तुझ्या वागण्याने सुद्धा अगणित वार केलेस. जाताना माझ्या वाटेवर काटेच पेरून गेलास." असे अनेक प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत होते.

पार्टी संपली, आलेले सगळे पाहुणे मार्गी लागले. शेवटी तिचे सारे प्रश्न अनुत्तरितच राहिले. 

सगळेजण दिवसभराची धावपळ नंतर पार्टी या सगळ्यामुळे दमले होते. त्यामुळे सगळे लौकरच सगळी आवराआवर करून आपापल्या रूम मध्ये आराम करायला निघून गेले.

त्या दिवशी रात्री तिला नीट झोप लागली नाही. सारखे श्यामचेच विचार तिच्या मनात येत होते. इतकी वर्षे बांधून ठेवलेलं आठवणीचं गाठोडं अचानक आज उघडलं गेलं होतं. अवधूत थोड्याच वेळात झोपी गेला. केंव्हा तरी पहाटेच्या सुमाराला तिचा डोळा लागला. 

दुसऱ्या दिवशी घरातील सारी काम आटोपल्यानंतर श्यामली निवांत बसून अवधूतने दिलेले सरप्राईज मृदगंध चाळत बसली होती. " किती बारकाईने काम केलं आहे ह्या कवितासंग्रहावर, खरचं जसा मला हवा होता अगदी तसाच  छान बनवून घेतला आहे. आपल्याला नखशिखांत ओळखून आहेत अवधूत. मनातली कोणतीच गोष्ट त्यांना कधी सांगावी लागली नाही. मनातलं अचूक हेरतात."

अवधुतबद्दल हाच सगळा विचार करत असताना अवधूत तिच्यासमोर मस्त तयार होऊन उभा ठाकतो.

" कुठे निघाली आहे म्हणायची स्वारी," त्याला असं तयार झालेलं पाहून ती विचारते.

" मी एकटाच नाही, आपणसुद्धा येताय मॅडम !!! चल पटकन तयार हो बरं," अवधूत फर्मान सोडतो.

" पण कुठे जायचं आहे आपल्याला, ते तरी सांगाल की नाही." ती उठत अवधुतला विचारते.

" आधी तयार तर हो, it's a surprise." तो अर्थपूर्ण हसतो.

" तुम्ही आणि तुमचे सरप्राइजेस, इतके धक्के सहन करायची सवय नाही हो मला, जीव जायचा माझा एखाद्यादिवशी," श्यामली डोळे मिचकावत बोलते.

" तो फिर हम किस मर्ज की दवा हैं, मॅडम. आपको ऐसें थोडे ही मरने देंगे।" म्हणत तो तिला तयार होण्यासाठी प्रेमाने जवळजवळ ढकलून रुम मध्ये पाठवतो.

ती तयार होऊन बाहेर येते. " हाय !!! आपकी इन्ही अदाओं पे तो मर मिटे थे हम," तिला पाहून अवधुतला परत मस्ती सुचते. हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.

" आणखी काही सुचायच्या आत, निघुयात का आपण, पण तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात मला ते तरी आधी सांगा." श्यामली हसत त्याला विचारते.

" तु चल तर. तिथे गेल्यावर तुला आपोआपच समजेल." आणि ते दोघे निघतात.

तासाभराच्या प्रवासानंतर अवधूत गाडी एका ठिकाणी नेऊन थांबवतो आणि दोघेही गाडीतून खाली उतरतात. श्यामली ती जागा पाहून आश्चर्यचकित होते. त्या जागेशी श्यामलीच्या काही हळव्या आठवणी जोडल्या होत्या. ही तीच जागा होती जिथे श्याम आणि ती दोघे नेहमी भेटत होते.

" अहो, इकडे कुठे घेऊन आलात तुम्ही मला." श्यामली आश्चर्याने त्याला विचारते.

" का ? तुला ही जागा आवडायची ना, लग्नाच्या आधी या जागी तू किती तरी वेळा आली आहेस ना?" अवधूत तिला हे विचारताच ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते.

" हो, पण तुम्हाला हे सगळं कसं माहीत?" ती अवधुतला विचारते.

" मी तुला एक प्रश्न विचारू, खरं खरं उत्तर देशील." अवधूत श्यामलीच्या डोळ्यात पाहून तिच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी उलट तिलाच प्रश्न विचारतो.

" अहो, विचारा ना, अशी परवानगी का मागताय." 

" श्यामली, तु काल पार्टीत त्याच्याशी बोलायला गेली होतीस ना? मग बोलली का नाहीस." अवधूत तिला विचारतो.

अवधुतच्या या प्रश्नावर ती गोंधळते, तिला कल्पनाही नव्हती की अवधूत असा काही प्रश्न विचारले.

" कोणासोबत अवधूत, तुम्ही कशाबद्दल बोलताय, काय विचारताय मला काही समजलं नाही." ती अवधुतपासून नजर चोरत बोलत असते.

" मी श्यामबद्दल बोलतोय, श्यामली." तो एकदम शांतपणे तिला सांगतो.

" असं काही नाही अवधूत, त्यांनी  छान गाणी गायली होती म्हणुन बस कौतुक करावं म्हणुन गेले होते." ती बोलताना चाचपडत होती.

" मला सगळं ठाऊक आहे श्यामली, तेंव्हा तु खर सांगशील अशी अपेक्षा करतो." तो एका एका शब्दावर भर देत बोलत होता.

" ह्यांना काय ठाऊक आहे? माझ्या आणि श्यामच्या भूतकाळातील नात्याबद्दल तर कळालं नसेल ना यांना आणि जर कळालं असेल तर आमच्याबद्दल कोणी सांगितलं असेल. श्याम !!! श्याम ने तर नसेल सांगितलं ना?" असे अनेक प्रश्न तिच्या मनात एका क्षणात येऊन गेले.

" काय...काय माहीत आहे तुम्हाला, तुम्ही कशाबद्दल बोलताय." श्यामली परत चाचपडत होती.

" आविष्कार साने...श्याम !!! सगळंच...सगळंच माहीत आहे मला, श्यामली." 

" आविष्कार...आविष्कार म्हणजे श्याम...सगळंच... पण लग्नाच्या इतक्या वर्षानंतर...कसं...कोणी ???" श्यामली आता रडकुंडीला आली होती. तिला काय बोलावं समजत नव्हतं ती बोलताना अडखळत होती. पंचवीस वर्षे लपवून ठेवलेलं गुपित आज उघड पडलं होतं आणि सगळं एका क्षणात हातातून निसटून चाललंय अस तिला वाटू लागलं होतं. तिच्या डोळ्यातून आता आसवे वाहू लागली होती.

" हे रडणं आधी थांबव, श्यामली. तुला माहित आहे ना तुझ्या  डोळ्यात मी अश्रू पाहू शकत नाही." तिला रडताना पाहून अवधूत तिच्याजवळ जातो आणि तिला जवळ घेत समजावतो.

" तुम्हाला हे सगळं कसं समजलं, श्यामने सांगितलं का? नक्की त्यानेच सांगितलं असेल. अहो, लग्नानंतर मी त्याला कधी भेटलेच नाही आणि भेटलेच तर ते काल पार्टीत पंचवीस वर्षानंतर. तुम्हीच आमंत्रित केलं होतं ना त्याला. विश्वास ठेवा माझ्यावर." ती रडत अवधुतशी बोलत होती.

" हो श्यामली, विश्वास आहे माझा तुझ्यावर आणि मला श्यामने ही काही सांगितलेले नाही." तो तिचे डोळे पुसत तिला सांगतो

श्याम आणि श्यामलीच्या नात्याबद्दल अवधुतला कोणी सांगितलं असेल पाहुयात पुढील भागात...

क्रमशः

© सुनिता मधुकर पाटील

© copyright

© all rights reserved.

या कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सारे हक्क लेखिकेकडे राखीव. कथेत अथवा कथेच्या नावात किंवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो कॉपी राईट कायद्याचा भंग मानला जाईल. कथा जशीच्या तशी शेअर करण्यास काहीही हरकत नाही.

 

 

 

Circle Image

Sunita Madhukar Patil

Self employed

I seem like a strict soul.... Yet I am a child at heart.... In my mind thoughts take a stroll.... And reach out in the form of an art....????