Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

क्षितिजाची रिटायर्डमेंट

Read Later
क्षितिजाची रिटायर्डमेंट


गोष्ट छोटी डोंगराएवढी

आई रिटायर्ड होतेय

क्षितिजाची रिटायर्डमेंट

आई क्षितिजा आणि बाबा रवींद्र यांना दोन मुल नमिता , आकाश होती . क्षितिजा आणि रवींद्र दोघ नोकरी करत होते . नमिता , आकाश लहान असतांना त्यांना पाळणाघरात ठेऊन दोघ नोकरी करत होते .

नमिता , आकाश मोठे झाले दोघांचे लग्न झाले .

आकाश आणि स्वाती दोघ आई बाबा सोबत राहत होते.

रवींद्र रिटायर्ड झाल्यावर क्षितिजा दोन वर्षानंतर रिटायर्ड होणार होती .

दोन वर्षानंतर क्षितिजा रिटायर्ड झाली तेव्हा स्वाती (सून ) गरोदर होती .

काही महिन्यात घरी नवीन बाळाच आगमन झाल . स्वाती नोकरी करत असल्याने बाळाला पाळणाघरात ठेवण्याचा विचार करत होती . क्षितिजाने सांगितले मी बाळाला सांभाळून घेइल .

क्षितिजा आता घरी होती . क्षितिजाला अनुभव होता , छोट्या बाळाला पाळणाघरात ठेवताना मनाची होणारी घालमेल , त्याची वाटणारी काळजी ती समजून होती .

क्षितिजाने स्वातीला सपोर्ट केला . क्षितिजा बाळाला सांभाळत होती . स्वाती घरून निघेपर्यंत तिला जमेल तेवढ आवरण्याचा प्रयत्न करत होती .

क्षितिजा बाळाला सांभाळत असल्याने स्वातीला बाळाची काळजी नव्हती .

क्षितिजा रिटायर्ड झाली होती पण बाळाला सांभाळताना तिचा पूर्ण दिवस जात होता . क्षितिजा आनंदी होती , तीचा नातू समोर होता .

स्वातीला प्रमोशन मिळून पगार वाढणार होता . पाच दिवस ऑफिस असणार होत .स्वातीने क्षितिजाला विचारल तेव्हा क्षितिजाने तिला सांगितले आता बाळ हळूहळू मोठ होत आहे , त्याचा त्याचा तो खेळतो , तू काळजी करू नको प्रमोशन घेऊन घे . क्षितिजाचा सपोर्ट असल्याने स्वातीने प्रमोशन घेतल .

अशाप्रकारे स्वातीने दोन प्रमोशन घेतले . बाळ आता पाच वर्षाचा होऊन शाळेत जात होता .

एका दिवशी स्वाती घरी आली तेव्हा तिने घरातील क्षितिजाच्या मैत्रीणी यांचा संवाद ऐकला

मैत्रिणी : " अग चल छान सगळ्या मिळून प्रवासाला ( फिरायला ) जाऊया , अशीही आता नोकरीतून रिटायर्ड झाली आहे . "

क्षितिजा : " अग बाळाकडे कोण लक्ष ठेवेल ? "

मैत्रीणीनी बरच काही सांगण्याचा प्रयत्न केला पण क्षितिजा काही तयार झाली नाही .

आज स्वाती विचार करत होती
 ' आई रिटायर्ड तर झाल्या आहेत पण बाळाच्या जबाबदारीने त्या अजूनही जणू नोकरीच करत आहे .

आता आईंनाही रिटायर्ड करायच .त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फिरू द्यायच . '

दुचऱ्यादिवशी सकाळी सर्व सोबत चहा घेत होते तेव्हा स्वाती म्हणाली
" आई तुम्ही आता खऱ्या अर्थाने रिटायर्डमेंट घ्यायची आहे ."

बाकी सगळे( नवरा ,सासु , सासरे ) : " काय ? "

स्वाती : " मी आता आई बाबा ( आई ) यांना खऱ्या अर्थाने रिटायर्डमेंटच आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणार आहे ."

स्वातीने सगळ्यांना सांगितले बाळाला सांभाळण्यास एक बाई ठेऊया , असाही तो शाळेत जातो ,त्या वेळेस त्या घरातील इतर काम करतील , बाकी कामाला मशीन आहेतच .

स्वातीचा निर्णय हो नाही करत सगळ्यांनी मान्य केला.

आता आईबाबांना सोबत फिरता येईल , मित्र मैत्रिणी सोबत थोड मोकळ होता येईल यासाठी ही रिटायर्डमेंट खासकरून आईंसाठी .

आज खऱ्या अर्थाने क्षितिजा ( आई ) रिटायर्ड झाली होती . खुप खुश होती . थोड मोकळ्या मनासारख करता येणार होत .

Veena
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//