Feb 22, 2024
नारीवादी

आई ती आईच असते

Read Later
आई ती आईच असते

मीरा आणि अमेयच लग्न झाले. मीराने लगेचच घरची सगळी जबाबदारी आपण घेतली. घरी अमेय, मीरा आणि अमेयची आई इतकेच असतात. मीराला अमेयच्या आईची थोडी अडचणच वाटू लागते.

"अमेय तुझ्या आई खूप लुडबुड करतात रे घरात. मला त्या घरात लुडबुड केलेलं आवडत नाही. सांग तसे त्यांना." मीरा.


"अगं तू समजून घेत जा की जरा."अमेय.


"घ्या म्हणजे तेही मीच समजून घेणार." मीरा.


"हो अगं तिने खूप केलंय ग माझ्यासाठी." अमेय.


मीरा काहीच न बोलता रागाने निघून जाते. तिचं अस सारखच चाललेलं असतं. कधी सासूला घालुनपाडून बोले तर कधी भांडण करे. अमेयला सारखं सारखं सांगे "सासूबाईंना वृध्दाश्रमात ठेवा. माझं त्यांच पटत नाही." पण तो काही मनावर घेत नसे. तो मनावर घेत नाही म्हणून परत राग राग करे.


काही दिवसांनी मीराला दिवस गेले. मीराच्या सासूने सगळं विसरून तिचे सगळे हट्ट पुरवले. तिला काय हवे नको ते पाहिले. तिचे नऊ महिने अगदी सगळे लाड केले आणि थोड्या दिवसांनी घरात छोटीसी परी आली. मीराची सासू त्या परीच सगळं करत असे. तिला अंघोळ घालणं, जेऊ घालणं, खेळवण हे सगळं मीराची सासू करत असे. तरीही मीराला तिची अडचण वाटू लागली. तिची लुडबुड वाटू लागली. तिला फक्त राजाराणीचा संसार हवा होता.


"आता तर हद्द झाली. माझ्या मुलीला मी साधं वळण सुध्दा लावायचं नाही." मीरा तावातावाने अमेयला येऊन म्हणाली.


"का काय झालं आहे?" अमेय.


"अरे आपली सोनु खोटं बोलली म्हणून मी तिला चपाटा मारला. तर म्हणे तिला मारू नकोस. मुलीला वळण लावायचे की नाही मग." मीरा रागाने बोलत होतो.


"अगं मग समजून सांगायच तिला." अमेय.


"घ्या तुम्ही पण आईचीच बाजू घ्या. आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे हे. मला या घरात रहायचं नाही. मी चालले." मीरा.


असे एकावर एक वाद होत मोठं भांडण झालं. मीरा भांडून शेवटी घराबाहेर जायला निघाली. अमेय तिला आडवू लागला.
"आता या घरात एक तर मी राहीन किंवा तुमची आई. यातल एक तुम्हाला निवडाव लागेल." मीरा.


मनात नसतानाही अमेय आईला घेऊन वृध्दाश्रमात जातो कारण त्याला आईपेक्षा बायको जास्त प्रिय असते. तो वृध्दाश्रमात आईला सोडून निघताना ठेच लागून जमिनीवर पडतो. त्याची आई लगेच येते आणि "लागलं का बाळ तुला?" असे म्हणते. तेव्हा अमेयच्या डोळ्यातून पाणी येते. अमेयला आधीच सगळं आठवू लागतं. आईने त्याला कसं लहानाचे मोठे केले. बाबांच्या नंतर एकटीने कसं त्याला शिकवल. त्याच्यासाठी कष्ट सोसले. हे आठवून तो रडू लागला आणि शेवटी मनाशी ठाम ठरवले की "आता काहीही होऊ दे. ही आईला घरीच नेणार. भले मीरा काहीही बोलू दे. ती तर मला सोडून किती दिवस लांब राहिल?" असे मनात म्हणत तो अखेर आईला घरी घेऊनच आला.


ते दोघे घरी आले तोच मीराने दरवाजा उघडला. आईला सोबत बघून ती अमेतला म्हणाली "बरं झालं तुम्ही आईंना घरी घेऊन आलात. आई माझं चुकलं मला क्षमा करा. तुम्ही थोडाच वेळ नव्हता तर घर सुनसुन वाटतं होत. पलीकडे काही चोर आले होते तेव्हा मी घाबरून गेले. घरात कोणच नाही आधार द्यायला. माझा जीव घाबरा झाला. सोनू तर रडायलाच लागली. मग तुम्हाला फोन करावा तर तुम्ही गाडी चालवत असाल म्हणून गप्प राहिले. अहो आई मला माफ करा माझं चुकलं."


"अगं माफी काय मागतेस? तुझी चूक तुला समजली ना मग झालं." अमेयची आई.


"खरंच आई तुमचं मन खूप मोठं आहे." मीरा.


"अगं शेवटी आई आहे मी. आईचं मन मोठच असतं." अमेयची आई.


ही कथा लिहिण्याच कारणं म्हणजे मदर्स डे आहे. तर तो मदर्स डे एका दिवसापुरता साजरा न करता रोजच आईचे महात्म्य लक्षात घेऊन आईशी आदराने वागले पाहिजे. अनंत उपकार असतात तिचे आपल्यावर त्यामुळे आईवडीलांना वृध्दाश्रमात न ठेवता त्यांच्या हक्काच्या घरात रहायला द्या. कारण खूप खस्ता खाल्लेल्या असतात त्यांनी आपल्याला वाढवताना. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आपल्या गरजा पूर्ण केलेल्या असतात.

आज मदर्स डे निमित्त सर्व आईंसाठी ही कविता

आई तुझे किती उपकार
शब्दात सांगता नाही येणार
किती कष्ट तू सोसलेस
शब्दात सांगता नाही येणार
मला पाहुनी तुला किती आनंद झाला
शब्दात सांगता नाही येणार
आम्हाला वाढवताना तुला झालेले कष्ट
शब्दात सांगता नाही येणार
जन्माचे हे ऋण कसे फेडू
शब्दात सांगता नाही येणार
जन्मोजन्मी तूच आई हवीस
असेच फक्त सांगता येणार

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//