मातृत्व भाग-५ (अंतिम)

Wating For Motherhood
दुसरा दिवस उजाडला तो शांत आणि मन हलक झालेल्या तेजस्वी रुपात. दोघेही हसून उगवत्या दिवसाचे स्वागत करत होते.

सारांश:
राहूल ची बदली झाल्यानंतर एका वर्षांनी झालेली बदली आणि तो घरी चार वर्षांनंतर आई-वडिलांना घ्यायला येतो. ते तयार नसतात, त्यांच्याबरोबर जायला. दिवाळीला नातेवाईकांना भेटता येईल म्हणून दोघे घरीच येतात.
पण लग्न झाल्यापासून रिमा मातृत्वासाठी आसुसलेली होती. तीच्या आणि राहूलच्या बाबत घडणा-या घटना कथेच्या भागात आपण पाहिल्याच असतील. या भागात आपण कथेचा अंतिम भाग पाहणार आहोत.

राहूलने बागेतला किस्सा रिमाला न सांगता तीला स्वत: अनुभव घेऊन जाणवला पाहिजे. तो प्रसंग रिमा सोबत शेअर करत नाही. रिमाला पार्ट टाईम नोकरी करुन घरी येत असताना. एक छोटी मुलगी रडताना सापडते. माझी आई कुठे गेली. मला सापडत नाही.

रिमा त्या इवल्याश्या जीवाला पाहून भावनिक होते. तीच्या आईला शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागते. ती त्या मुलीला विचारते. तू कशी आणि कोणत्या ठिकाणी उभी होती. मुलीने सांगितले आई सामान घेत होती. मला फुगे वाला दिसला त्याच्या मागे मी आले. आणि मागे वळून पाहिले तर मागे कोणीच दिसले नाही. आई कुठे गेली माहित नाही.

रिमाने जवळ दुकान आहे का बघितले. तिथे एक बाई रडताना दिसली. त्या मुलीला घेऊन तिथे आल्या. मुलगी आई का रडते तू. त्या बाईने पाहताच कुठे गेली होतीस तू. माझ्या तर जीवात जीव नव्हता.

या काकूंनी मला आणले. त्यांचे आभार मानले. त्या बाई रक्ताच नाही तर दैवी लाभलेले नात अस कस माझ्याकडून देव हिरावून नाही घेऊ शकत. रिमाला याचा अर्थ कळाला नाही. तिने माफ करा. पण मी जाणून घेऊ शकते का तुम्ही असे का बोलत आहात ते.

त्या बाईने सांगायला सुरवात केली. आणि विशेष म्हणजे ती दुसरी तिसरी कोणी नसून समीहा आणि तीची आई होती. योगायोगच म्हणावा लागेल. रिमालाही मनात वाटले. स्वत: आई असतानाही मुलगी दत्तक घेतली.

रिमाने मात्र घडलेला प्रसंग लगेच राहूल कडे बोलून दाखवला. आपणही असे करुयात का??? एकमेकांना प्रश्न केला. दोघे ही जाणार होते आश्रमात. राहूल आॅफिसवरून डायरेक्ट येणार होता. तर रिमाने आज सुट्टी काढली होती. तीला थोड्या दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते.

पित्त झाल्यासारखे वाटत होते. राहूल आॅफिस करता चालला. रिमा आज उठली नाही की डबा देखील केला नाही. आज सुट्टी म्हणून झोपली असेल कदाचित. जाताना रिमा वेळेत ये. आपल्याला जायचे आहे. मी आज आॅफिसलच कॅन्टीन मध्ये जेवतो.

रिमा ताडकन उठते. मला का नाही उठवले. डबा केला असता. जाऊ दे ग आराम कर एक दिवस. राहूल निघून जातो. रिमाला बर वाटत नसते. ती डाॅक्टर कडे जाते. तिथे रिमाची प्रेंगनेंसी टेस्ट केली जाते.

ती टेस्ट आपल्या सगळ्यांच्या मना सारखी पाॅझिटिव्ह येते. हा आनंद शब्दात व्यक्त करणे रिमाला शक्य होत नाही. ती देवाचे आभार मानत राहूलला फोन करते. तू घरी ये आपण नंतर जाऊया. राहूल रिमाला विचारतो. तू ठिक आहेस ना. मी आत्ता येतो घरी.

रिमा बोलते आत्ता नको नंतर ये सावकाश. रिमा आपल घर सजवून टाकते. तीला डेकोरेशनची इतकी आवड तीने दोन पुष्ठ्यांवर बाळाचे हसरे चित्र काढून आई तू बाबा मी होणार ग..... कुणी तरी येणार ग....... असे देखील लिहले होते. त्यावर अजून एक पुष्ठा असा लावला की फ्लॅप होईल वर खाली सरकवता येईल असे ते नाव लिहले होते. कपड्यां शेजारी चेक केलेली टेस्टकिट देखील ठेवले होते.

राहूल घरी आला. आज घर सजलेले पाहून वाढदिवस, अॅनिवरसरीच्या तारखा आठवू लागला. पण त्यापैकी कोणतीच नव्हती.

रिमा जरा लाजत मुरडत होती. तीला काय झाले कळत नव्हते.सकाळी आजारी वाटणारी रिमा आता मात्र वेगळी वाटली. राहूलने फ्रेश होऊन कपडे घ्यायला आला. पाहतो तर काय टेस्टकिट पाॅझिटिव्ह होते. राहूल आनंदाने उड्या मारतच नाचू लागला.

रिमाने तो एक पुष्ठा हातात घेतला आणि एक राहूलला दिला. त्याने उघडले तर त्यात बाबा तू आई मी होणार ग...... आणि हसर बाळ पाहून दोघांची इच्छा पूर्ण होऊन देवाने शेवटी फळ दिले.

कधी एकदा आई-वडिलांना ही बातमी देतो असे झाले होते. राहूलचा आलेला फोन आई-वडील दुस-याच दिवशी घरात हजर. एरव्ही आग्रह करून नकार देणारे. नातवाची बातमी ऐकून लगेच धावत आले.

मातृत्वाचे सुख ख-या अर्थाने रिमा आणि राहूल अनुभवणार होते. रिमाने हे सुखद क्षण लेखणीत टिपायचे ठरवले. प्रत्येक महिन्यात होणारी हालचाल लिहायचे पक्के केले.

बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले. यात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली. रिमाला जुळ होणार होते. योगायोगाने एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली.

पुढे राहूलला आणि रिमाच्या सान्निध्यात आलेली समीहाचे उदाहरण मनात मात्र होत. दोघांनी आपल्या मुलांच्या जन्माच्या दिवशी प्रत्येक वाढदिवसाला आश्रमात भेट देऊन एका वर्षाचा दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करुन इतर मुलांसाठी जेवण देण्याचे ठरवले.

रिमा राहूल च्या या कार्याला खरोखर सलाम आहे.
अश्या पद्धतीने रिमाचा मातृत्वाचा लक्षणीय प्रवास सुरू झाला. आपल्या कथेचा या ठिकाणी शेवट होत आहे.

कथेचे सर्व भाग वाचून मला प्रतिक्रिया नक्की द्या. वरील लेख काल्पनिक रचला आहे. कोणत्याही घटनेशी याचा संबंध नाही. तसे आढळल्यास क्षमस्व.

©®प्रज्ञा तांबे बो-हाडे.

🎭 Series Post

View all