Dec 01, 2021
कथामालिका

मातृत्व भाग-४

Read Later
मातृत्व भाग-४

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
राहूल घराबाहेर पडतो. त्याला शांत ठिकाणी एकांतात बसायचे होते. त्याने घराजवळ असणा-या बागेत जाणे पसंद केले. बागेत बसले असताना एक चिमुकली खेळत-खेळत राहूल जवळ येते. तीचे खेळणे राहूल च्या बाकाखाली जाते.

समीहा कुठे चाललीस थांब जरा. मला येऊ दे. एकटी कुठे चालली. राहूलला ती गोंडस मुलगी मनापासून भावली. समीहा आईची आई असावी ती. राहूलने खेळणे समीहा च्या हातात दिले. काय गोड मुलगी आहे तुमची.

किती सुंदर हसते. तीच्याकडे कुतूहलाने पाहावेसेच वाटते मला. हो ना. मला तीच्यातला हाच गुण भावला आणि मी तीला घरी आणले.
म्हणजे???
काही समजले नाही मला ताई. दादा मी हिला दत्तक घेतले. दोनच दिवसांच एवढेसे बाळ. तीला कोणीतरी आश्रमात सोडून गेले होते. मला राहवल नाही मी तीला दत्तक घेतले. स्वत:च मुल पदरात असतानाही मी ह्या मुलीला आणले.

आणि समीहाची आई निघून गेली. राहूल विचार करू लागला. समीहाची आई पदरी मुल असताना सुद्धा हा विचार करतात, मग आपण का नाही करायचा हा विचार. एका वेगळ्याच उमेदीत राहूल घरी आला.

रिमाने इकडे रडून-रडून डोळे सुजून घेतले. आपल्याच नशिबात भोग लिहले आहे. मागच्या जन्मीचे काहीतरी पाप घडले माझ्या हातून त्याचीच शिक्षा माझ्यामुळे राहूलला पण मिळते अशी स्वत:शीच पुटपुटत होती.

राहूलच्या चेह-यावर मात्र वेगळेच तेज होते. त्याने रिमाला हाक मारली. रिमा धावत येऊन राहूलला मिठी मारून रडू लागली. माझ्यामुळे सगळ घडतय, राहूल. मी तूला बाळ देऊ शकत नाही.

मलापण व्हायचय आई....!! काय करू हतबल आहे मी. रिमाने आज मनातले सगळे ओझे आज हलके करायचे ठरवले. राहूलने तीचा हात हातात घेतला. काय तूझ्या मनात आहे. सांग मला.

रिमाने सांगायला सुरवात केली. तुम्ही परदेशात जाताना मी गावी गेले होते तेव्हा. समोरच्या काकूंची सून घरी आली होती. माहेरी जाऊन आल्यावर कुलदेवीला जाऊन लहान मुलांना बोलवत होते. त्यांच्या बरोबर त्यांच्या आई देखील बरोबर होत्या. त्यांनाही हळदी - कुंकू लावून प्रसाद देण्यात आला.

मी आपल्या घराच्या खिडकीतून पाहिले. मला खूप रडायला येत होते. मनात वाटले कि आपल्याला मुल नाही म्हणून बोलवले नाही. आपण किती मोठ्या आनंदाला मुकलो आहोत असे वाटले.

मला सभारंभाला जाण्याचा खूप उत्साह असतो, तुम्हांला तर माहितच आहे. आणि त्यातच दुस-या दिवशी आपल्याकडे सासूबाईंच्या ओळखीची मंडळी आली. काय ओ सूनबाई खूप वर्षांनी आल्या. गोड बातमी आहे की काय????????

सासूबाई नाही हो तसे काही. देईल लवकरच पण. सासूबाईंनी बाजू सावरली. मला तर अश्या वेळी काय बोलावे कळतच नव्हते. ते लगेच पंडीतजींचा पत्ता देऊ लागले. तीची आणि राहूलची पत्रिका बघून घ्या एकदा असे सांगितले.

डाॅक्टरचे नाव देखील सांगितले एकदा चेक-अप करुन घ्या.
हे ऐकून मी आत निघून गेले. स्वत:ला दोष देऊ लागले. राहूल तूला खरतर या गोष्टी सांगायच्या नव्हत्या पण आज ...

मनावरचा भार हलका करायचा ठरवले. राहूलच्या डोळ्यात क्षणभर अश्रू तरंगले. खरच किती बोलणे ऐकावे लागते. तूला रिमा. आमच्या बाबत असे काही घडत नाही. पण नोकरी करताना कोणी उद्या सुट्टी साठी अर्ज देऊन आज हाफ डे जातो तेव्हा तो न विचारताच उद्या मुलाचा वाढदिवस आहे त्याला कार्टून खूप आवडतात. त्याची शाॅपिंग करायला आजची रात्र देखील पुरायची नाही. असे सांगून गेलेला तो..... दुस-या दिवशी वाढदिवसाचे क्षणांवर जेव्हा चर्चा करुन सांगतो. तेव्हा मात्र मनात विचार यायचा माझ्या मुलाच्या वाढदिवसाला मी त्याला मोठी फोरव्हिलरची कार, टाॅईज, खेळणी,जे. सी. बी., कपडे त्याला आवडणा-या सर्व वस्तू आणल्या असत्या.

राहूल ही ह्या भावना मनात साठून न राहता रिमा जवळ मन व्यक्त केले. राहूल आणि रिमाची रात्र आज एकमेकांचे मन मोकळे करण्यात गेली.

राहूल बागेत घडलेला किस्सा रिमाला सांगेल का????? काय होईल राहूलच्या आणि रिमाच्या आयुष्यात???? ते ही मुल दत्तक घेण्याचा विचार करतील का????
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कथेचा पुढचा आणि अंतिम भाग वाचायला विसरू नका.

©® प्रज्ञा तांबे बो-हाडे.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now