Dec 08, 2021
कथामालिका

मातृत्व भाग-३.

Read Later
मातृत्व भाग-३.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
रिमा आणि राहूल डाॅक्टर कडे येतात. सगळे रिपोर्ट नाॅमल आहेत. ह्या काही गोळ्या लिहून दिल्या आहेत. त्या घेतल्या की एक महिन्याने भेटायला या.असे सांगितल्यावर दोघे घरी परत येतात. राहूलची दिवाळी सुट्टी संपल्याने आपल्या घरी जाण्यासाठी दोघेजण निघतात.

रिमा देखील घरकाम आणि पार्ट टाईम नोकरीत गुंतून जाते. महिना संपत आला आता डाॅक्टर कडे जायचे असे राहूलला सांगितल्यावर नेमकी त्याच वेळी राहूलला प्रोजेक्ट मुळे परदेशी जावे लागते. महिना भर जात असल्याने रिमा काही दिवस सासूबाई कडे रहावे असे ठरवते.
            रिमा डाॅक्टर कडे जाऊन येते. डाॅक्टर तीला पी. सी. ओ. डी. झाल्याचे सांगतात. काही पथ्य आणि वजनावर नियंत्रण ठेवले तर लवकरच दिवस जाऊ शकतात असे सांगितले.

रिमा आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी चालणे, जीम जाॅईन करते. संध्याकाळी योगा क्लाॅसला देखील जाते. तीची धावपळ पाहून रिमा आजारी तर नाही ना पडणार याची चिंता सासूबाईला सतावत होती. रिमाने खाणे देखील कमी केले होते.

रिमाला इतका अशक्तपणा जाणवत होता की दिवस रिमा जीमला जायला का??? उठली नाही. हे बघायला सासूबाई खोलीत गेल्या तर.... काय??? रिमाला ताप आला होता. डाॅक्टर ला घरी बोलवण्यात आले. तीला उठता देखील येत नव्हते.

राहूल फोन करत होता. पण रिमाला फोन घेणे शक्य नव्हते. अशक्तपणा मुळे सारखी भोवर येत होती. आईशीच राहूल फोनवर बोलत रिमाची चौकशी करत होता.

राहूलचे मन काही केल्या लागेना त्याने काम लवकर पूर्ण करुन रिमाला भेटायला आला. अग काय हे.... रिमा. काय अवस्था करुन घेतली आहेस तू. डोळे किती खोल गेले. आणि काय गरज वजन कमी करण्याची. आहे तशी छान आहेस तू.

अहो डाॅक्टर बोलले. वजन कमी झाले तर लवकर राहू शकते. राहूल बोलतो अग आपल्या जीवावर बेतले आहे एवढे पण उपाय करायची गरज नाही. नसेल होत आपल्याला मुल तर नको आहे. आपण आहोत एकमेकांना.

आपण एखाद मुल दत्तक घेऊ नाहीतर. उगाच त्रास नको करुन घेऊस. मला तू हवी आहेस. बाकी काही नको. नकोय मला डाॅक्टरची ट्रिटमेंट वगैरे.

सासूबाईंच्या डोळ्यात पाणी येते. खरच!!!!! आपल्या मुलाला जर मुल झाल नाहीतर. कसे होईल??? इथे स्वत:चीच मुले वृद्धाश्रमात ठेवायला तयार होतात. दत्तक मुल काय सांभळणार.

रिमा आणि राहूल आईचा निरोप घेऊन पुन्हा निघतात घरी जायला.
राहूल आता यापुढे मुल या विषयावर चर्चा नकोय. रिमाला काय बोलावे काहीच कळत नव्हते.

कितीही नाही म्हटले तरी आयुष्यात सगळ काही गोष्टी होत्या. आणि आपल्याला जी गोष्ट नाही तीचाचा ध्यास जास्त असतो जे म्हणतात ते काही खोटे नाही.

रिमानेही राहूलला बर वाटाव म्हणून हा विषय बंद करायचे ठरवले. तेवढ्यात सासूबाईंचा एका दिवशी राहूल ला फोन येतो. अरे तो निलेश आहे ना त्याला दहा वर्षांनी मुलगी झाली. समोरच्या काकूंच्या सुनेला मुलगा झाला. तू काही पण कर पण मला आता नातवंडाचा तोंड बघायचे आहे.

राहूल ला आनंद झाला. दहा वर्षांनी का होईना मुलगी झाली. काकूंच्या घरात देखील बालगोपाल आला. पण आई जे नंतर बोलली या विचाराने राहूल घराबाहेर निघून गेला. राहूलने रिमाला दोन आनंदाच्या बातम्या सांगितल्या पण नंतर आई बोललेले न सांगताच निघून गेला.

काय झाल असेल??? राहूलला??? नैराश्याने ग्रस्त होऊन काय करणार होता राहूल?? भीती वाटते थोडी काय होईल. रिमा ला क्षणिक वाटणारा आनंद परंतु आपल्याला अजून मुल नाही या विचारने तीला ही आले असेल का नैराश्य???

जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचायला विसरु नका.

©®प्रज्ञा तांबे बो-हाडे.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now