मातृत्व भाग-२

Waiting For Motherhood
राहूलला चांगली नोकरी मिळते. तिकडे रिमाला बरोबर घेऊन जातो. राहूलचे उत्तम काम पाहून वरिष्ट त्याला चांगला पगार आणि पोस्ट देऊ करतात.

रिमा आणि राहूल आनंदित असतात. आयुष्यात एक तरी गोष्ट मना सारखी घडते या विचाराने आनंदित होतात. एक वर्षा नंतर आई-वडिलांना घेऊन येण्याचा निर्णय दोघेजण घेतात. आई-वडिलांना राहत्या घराची इतकी आवड निर्माण झाली होती की ते यायलाच तयार नव्हते.

दिवाळीला या वर्षी आई-वडिलांना थोडे दिवस घेऊन येऊयात. आता दिवाळीला गेलो की घरी सगळ्या नातेवाईकांना भेटता येईल. रिमाने होकार दर्शवला. दोघांनी बॅग पॅक केली.

अरे, किती वर्षांनी घरी येतोस. आता मोबाईल मुळे व्हिडिओ काॅल वर बोलतो पण प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आई-वडील प्रेमाने डोक्यावर हात ठेवत बोलले.

इतक्यात सासूबाईंची नजर रिमा वर स्थिर झाली. काय ग..... अग काय गोड बातमी आणली की नाहीस तू. रिमा आणि राहूल दोघे अस्वस्थ झाले. नको त्या विषयावर पुन्हा चर्चा चालू होणार........

इतक्यात राहूल आईला बोलतो. आई खूप भूक लागली. काय बनवले जेवायला. आई, "मी तर विसरून गेले." गप्पा काय होतच राहतील.

जेवण झाल्यावर आईने रिमाला घेऊन रुम मध्ये बसली. डाॅक्टर चालू आहे का???? स्वस्थ बसू नका. तिथे आपले एक नातेवाईक राहतात. त्यांना सांगते मी डाॅक्टर बघायला. रिमा सासूबाईंशी बोलू लागते. आई, जेव्हा बाळ येईल त्याची वेळ ठरलेली असणार. आपण कितीही प्रयत्न केला तरी बाळ लगेच तर नाही ना राहणार. आता आम्ही दोघे खूप वैतागलो आहे.

डाॅक्टरची ट्रिटमेंट घेऊन दोन वर्ष झाले. दुस-या पण डाॅक्टर कडे जाऊन आलो. काहींच बाशिंग बळ लांब राहत तर काहींचा पाळणा उशीरा असतो. माझ्या बाबतीत हेच होत असणार.

रिमाचे बोलणे सासूबाईंना पटते. तो विषय तिथेच थांबतो. रिमा देखील आता निश्चिंतपणे राहू लागते. दिवाळीची साफ-सफाई, वेगवेगळे पदार्थ बनवण्यात दोघी सासू-सूना व्यस्त असतात.

रिमाला आनंदी पाहुन राहूल देखील सुखावतो. आता दिवाळीला आत्या, भाचे, मामी-मामा सगळे घरी आले. राहूल आणि रिमा चार वर्षांनी घरी आले होते.

राहूल च्या आत्याने सासूबाईंशी बोलायला सुरवात केली. काय ग..., एवढ्या वर्षांनी सून घरी आली. बातमी घेऊन आरी कि काय डोहाळे पुरवायला. रिमाच्या डोळ्यात टचकन अश्रू वाहू लागले.

मातृत्व जरी वाट्याला आले नसले तरी. मैत्रिणींच्या डोहाळे जेवणाला रिमा जायची. डेकोरेशन करता मदत करू लागायची. त्यांना विविध पोज घ्यायला सांगायची.

बहिणीच्या प्रेगनंसी मध्ये ती आरशात पाहून पोटावरून मायेने हात फिरवताना अनेक वेळा रिमा ने पाहिले. बहिणीच्या पोटाला कान लावून बाळ लाथ मारताना होणारा आवाज देखील ऐकला.

हे सार पाहून आपल्या पोटावर उशी ठेवून आपण प्रेग्नेंट राहिल्यावर कसे दिसू याचे चित्र आरश्यात पाहत रिमाला कधी कधी हसू आणि अश्रू देखील यायचे.

आपल्या हातात काही गोष्टी नसतात नाही का????? असे बोलत येणारा प्रत्येक क्षण पुढे चालला होता. आत्याबाई सासूबाईंना आमच्या इथे एक डाॅक्टर आहे तिकडे या. काही अडचण असेल तर लगेच सांगतो. ब-याच जणांना गुण आला आहे याचा.

सासूबाई इतक्या दिवस गप्प होत्या. आत्या गेल्यावर पाच दिवसात राहूलला आणि रिमाला त्या डाॅक्टर कडे घेऊन जाऊ. असे सास-यांना सांगत होत्या. राहूल जवळ विषय काढला. राहूल बोलला आई आता खरच आमच्या सहनशक्तीचा अंत झाला. जेव्हा व्हायचय तेव्हा होईल.

आम्ही आता मनावर घेत नाही काही. खूप सावरलय आम्ही. नामांकित डाॅक्टरांनाही भेटलोय. आता मी कुठलाही डाॅक्टर करणार नाही.

अग आई आम्ही कुठे कमी पडतो तेच कळत नाही. आपल्या कुलदेवी, कुलदेवतेला जाऊन आलो. अनेक देवांची दर्शन सुद्धा घेतली. डाॅक्टर ईलाज देखील केले. आता मी हार मानली.

सासूबाई बोलतात. अस थोडच आहे. एका जोडप्याने चौदा वर्ष सतत प्रयत्न केले. डाॅक्टर सोडला नाही. जिथे माहिती मिळेल तिथे जाऊन आले. कधी कधी तर ती एकटी बाई एवढ्या लांब येऊन जायची. तीला बघा आता छान मुलगा होऊन दुस-यांदा गरोदर आहे.

तुमच्या तर लग्नाला जेमतेम पाच वर्ष झाली. तरी काय लगेच हार मानता. आपण प्रयत्न करणे इतकेच हातात आहे. आम्हांलाही वाटत नातवंडांना अंगा-खांद्यावर खेळवाव. इतर मित्र परिवार नातवंडांना घेऊन फिरायला जातात. त्यांचे फोटो स्टेटसला ठेवतात. आमच मन आतल्या आत तुटत असते,राहूल.

जिवंत आहे तेच नातवंड बघायच आहे मला. रिमाला त्या हिरव्या साडीत फळांची परडी घेऊन, वाढीतला फुलांचा हार, गळ्यात माळा,बाजूबंद नटलेली डोळे भरून बघावस वाटत. तीची ओटी भरत ती पेढा उचलते की बर्फी हे कुतूहलाने पाहायचे मला. मुलगा - मुलगी कोणीही चालणार आपल्याला पण ती एक हौस असते. झोपाळ्यावर, चंद्र, इंद्रधनुष हातात घेऊन तीचे फोटो काढायचे आहेत.

आई बोलताना डोळ्यातून आसवे येत होती. दूर उभी राहून ऐकणारी रिमा आता हुंदके देत रडू लागली. ते पाहून राहूलने रूम मध्ये नेले. रिमा सांगू लागली. अहो आपण आई एकमेकांच्या जागी बरोबर आहोत. त्यांना असे वाटणे साहजिकच आहे. यावेळी आत्यांनी सांगितलेल्या डाॅक्टरकडे जाऊया.

रिमाचे बोलणे राहूलला पटले. दोघे ही तयार झाले. सासू - सासरे बुवांना आनंद झाला. आत्या कडे गेलो. तीला ही आनंद झाला. लगेच डाॅक्टर कडे गेलो. रिमा आणि राहूल च्या तपासणी केल्या.

काही दिवसांत रिपोर्ट येतील चार - पाच दिवसांनी पुन्हा या असे सांगितले.

आता या रिपोर्ट मध्ये नक्की काय असणार.........?????

आहे ना उत्सुकता. तर मग पुढचा भागात याविषयी जरुर जाणून घेऊयात. वाचायला विसरू नका.

पुढचा भागात लवकरच भेटूया........!!

©®प्रज्ञा तांबे बो-हाडे

🎭 Series Post

View all