Dec 01, 2021
कथामालिका

मातृत्व भाग - १

Read Later
मातृत्व भाग - १

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

       मातृत्व हा शब्द ऐकला की रिमा ला चाहूल लागते ती तीला जाणवणा-या आई पणाची. लग्नाला पाच वर्ष झाली तरी पाळणा हालला नव्हता. काय करावे तीला समजत नव्हते. सगळे उपाय करुन देखील गुण काही केल्या येत नव्हता.

रिमाला राहूलने चांगल्या डाॅक्टरकडे दाखवले. रिपोर्ट नाॅरमल होते. मग नेमकी अडचण कुठे येते ते समजत नव्हते. मुल नक्की होणार असे मात्र डाॅक्टर नेहमीच बोलात असायचे.एकच नाही तर चार-पाच
डाॅक्टरांचा सल्ला घेतला.सगळ्यांचे समान मत पडले.

रिमा आणि राहूलला भेटणारे नातेवाईक वेगवेगळ्या डाॅक्टरांची नावे सुचवत असे. तर काहींनी बाहरचे काही असेल असे बघायला सांगितले.
तर कुलदेवी, कुलदेवतेला जाऊन यायला सांगितले.
जे सांगतील ते उपाय रिमा आणि राहूल ने केले. आता काय करायचे राहिले असा विचार दोघे करू लागले. राहूल च्या आणि रिमा च्या सर्व मित्र मैत्रिणींना लग्ना नंतर वर्षभरातच खुश खबर मिळालेली होती.
आपल्याला जर मुल असतं तर ते असच गोंडस असल असता याचा विचार करत मित्रांच्या मुलांमध्ये आपल्या बाळाचे चित्र पाहत रिमा आणि राहूल येणारा दिवस पुढे ढकलत होते.
आता जेव्हा बाळ होईल तेव्हा होईल असे दोघांचे मत बनले. रिमा महिन्याच्या त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असायची. कधी आपली प्रेगनेंसी पाॅझिटिव्ह येईल. राहूल ही तितक्याच उत्कंठतेने आपल्या बाळाची बातमी ऐकण्यासाठी आतूर असायचा.
पदरी निराशाच होती. रिमाचे रडून रडून डोळे सुजत होते. राहूलही त्याला मनातले भाव मनातच लपवून सरळ झोपून घ्यायचा. कोणतेच काम न करता नैराश्य आल्याने तो सरळ झोप येत नसतानाही झोप लागली असे रिमाला दाखवत असे. रिमाला हे माहित होते. बायका आपल दु:ख रडून मोकळे होतात. पण पुरूष मात्र आतल्या आत स्वत:च्या मनाला खात राहतो.
रिमाने आता स्वत:ला ताकदवान बनवले होते. बाळ हा विषय जेव्हा देव पदरात देईल तेव्हाच खरे. आता स्वत:ला मानसिक त्रास करुन घ्यायचा नाही.
रिमा ताकदवान झालेली पाहून राहूल देखील निवांत राहू लागला. त्याने ठरवले की जेव्हा आपली योग्य वेळ येईल तेव्हा देव नक्की आपल्याला मुलाचे सुख पदरात देईन.
आता कुठे सगळे चांगले होत असताना रिमा च्या सासू ला काय झाले कोणास ठाऊक. रिमाला घेऊन गावाजवळच्या डाॅक्टर कडे घेऊन जायचे असा आग्रह राहूलच्या मागे लावला. रिमा ला कोणताही उपायाने का होईना मुल राहणे गरजेचे वाटत होते.
पण त्या डाॅक्टरने पहिल्यांदा नवरा-बायको दोघांनाही बोलावले होते. प्रश्नच आहे मोठा नाही का???? राहूल आईच्या सांगण्याप्रमाणे डाॅक्टरकडे जायला तयार होईल???? या आणि तुमच्या मनातल्या शंकाचे निरसण होण्यासाठी कथेचा पुढचा भाग वाचायला नक्की तयार रहा.
लेख आवडल्यास कमेंट आणि प्रतिक्रिया आवश्य द्या. कथामालिका लिहण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. तुमच्या पसंतीस नक्की पात्र ठरेल अशी आशा मी करते.
लेखनात काही त्रूटी आढळल्यास क्षमस्व.

©® प्रज्ञा तांबे बो-हाडे.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now