कवितेचे शीर्षक- मातृत्व
तू नसताना,घराला घरपण नव्ह्तं,
मला मातृत्व नव्हतं,
मन कसं ओकं बोक्ं होतंं.
तू आलीस, आणि सगळचं बदललं,
माझ्यात हत्तीच बळ आलं,
मातृत्व अनुभवयास मिळालं.
तुझं ते हसणं,भूक लागली की रडणं,
झोप आली की किरकिर करणं,पालथं पडणं,
पालथं पडून पुढं सरकण्याचा प्रयत्न करणं,
तुझ्या या बाळलीला बघताना, माझा थकवा निघून जाणं,
पण तरीही मनाच प्रसन्न होणंं,
जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटण,
सगळं कसं नवीन होतं, सगळं कसं अद्भूत होतंं,
मातृत्व काय आहे, याची प्रचिती येत होती,
आईच बोल आठ्वत होते ,
मातृसुखाची चव चाखत होते,
देवाला नमस्कार करत होते ,
मनापासून धन्यवाद देत होते.
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा