आई..…...सामाजिक बांधिलकीची शिकवण.

Mother's day special

आई..…...सामाजिक बांधिलकीची शिकवण

आई माझा गुरू आई कल्पतरु  सौखाच्या सागरू आई माझी....
आई विषयाच्या अनेक उपमा आपल्याला वाचायला मिळतात. हे सगळं लिहिण्याचा खटाटोप कशाला तर आज international mother's day आहे. तसा mother's day रोजच साजरा करायला हवा.
व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरु होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत: ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं. घरातला प्रत्येकजण तिला गृहीत धरत असतो. एकाचवेळी आई, सून, मुलगी, पत्नी, वहिनी अश्या विविध जबाबदाऱ्या ती कोणतीही तक्रार न करता पार पाडत असते. तिच्या कामाचा मोबदला सोडाच पण साधं कौतुकही तिच्या वाट्याला येत नाही. घरासाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलींची महती हे केवळ एक दिवस सांगून उपयोग नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईचे स्थान हे special असते. माझ्याही आयुष्यात आहे. ते यासाठी की तिने इतरांप्रमाणे आयुष्यात अनेक खस्ता खाल्या आहेत.
मी समज ममाध्यमातून गेले 7-8 वर्षे काम करत आहे. हे केवळ तिच्या पाठिंब्यामुळे काम करण्याची ऊर्जा येते.
आपणही या समाजाचे दायित्व आहोत. ही दुरष्टी तीने मला दिली. तसेच तिनेही ती अंगीकारली होती.
याचच प्रत्यय अनेकदा आला आहे. तिने मरणोत्तर आपले शरीर आणि नेत्र हे दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा वाटले होते याची काय गरज आहे. 
यामागील एकच हेतू असा होता की, माझा नातू जर डॉक्टर झाला तर त्याला प्रात्यक्षिक करण्यासाठी body गरजेची असते.
सगळ्यांनी जर मरणोत्तर क्रिया केल्या तर या भावी डॉक्टर पिढीला आपण घडवण्यात आपण कमी पडू म्हणून तिने देहदान आणि नेत्रदान करण्याचं निर्णय घेतला. 
 औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्याची पूर्तता केली.
आज तिला जाऊन 3 वर्ष झाले असले तरी सुद्धा तिचे अस्तित्व आजही कायम आहे. हे समाधान अधीक आहे.
आपल्या जर समजत काही बदल करायचे असतील तर त्याची सुरुवात आपल्यापासून करूयात. यानिमित्ताने आपण सगळे मिळून देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प करूयात.

©प्रतिक्षा परिचारक-पाठक