मैत्रीच्या पलीकडे.... भाग 1

Story about friendship. Bond between three friends. Their ups and downs. Their problems.

    " अंकित...... हॅलो अंकित.. कुठे आहे ? लवकर कट्ट्यावर ये. स्नेहल रडत आहे. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती माझं काही ऐकत नाहीये. " - गौरी

अंकित - " दहा मिनिटात पोचतो मी. तुम्ही पण या. "

गौरी स्नेहल ला घेऊन त्यांच्या कट्ट्यावर पोहोचते अंकित आधीच तिथे येऊन त्यांची वाट बघत बसला होता . 

अंकित - " काय झालं ही का रडत आहे ? " 

गौरी - " अजून काय होणार ? स्नेहल पाटील फक्त एकाच कारणाने रडते . "

अंकित - " म्हणजे आज परत भांडण झाले की काय. "

गौरी - " मग काय .कशावरून भांडण झाले ? काय झाले? काहीच सांगत नाहीये. तो तिथे मुंबईमध्ये, ही इथे पुण्यामध्ये का भांडतात तेच कळत नाही? "

अंकित - " स्नेहल बोलणार आहेस का काय झाले आहे ते ? "

स्नेहल - " काही नाही माझं आणि अभिषेक थोडं भांडण झाला आहे. "

अंकित आणि गौरी दोघेही एकदम बोलतात - " अग पण मग एवढी का रडत आहेस  ? "

स्नेहल - " काही नाही. "

अंकित - " ठीक आहे . ज्या वेळी तुला वाटेल त्यावेळी तू सांग आम्हाला. "

स्नेहल - " गौरी ...मी रडत आहे म्हणून तू अंकितला बोलावून घेतलं आहेस का? " 

गौरी - " हो.  मग काय करणार होते मी. तुला कधीच शांत करत होते पण तू माझं ऐकतच नव्हती. आणि मला माहिती आहे आपण तिघं कट्ट्यावर एकत्र भेटलो की तू शांत होते ते. "

स्नेहल - " हे खर आहे. तुम्ही दोघे माझ्या सोबत असलात की मी माझे सगळे प्रॉब्लेम ,टेन्शन विसरून जाते."

अंकित - " हे असं रोज भांडण करायचं ,रडायचं कशाला प्रेम करतेस ग " 

गौरी - " मग काय. सारखच भांडण करायचं आणि रडत बसायचं. "

स्नेहल - " प्रेमात असणं हे वेगळेच फिलिंग आहे .तुम्हाला दोघांना हि नाही कळणार, त्यासाठी कोणावर तरी प्रेम करावा लागतं. आणि भांडण काय दोन व्यक्ती एकत्र आले की भांडण होतच नाही " 

गौरी - " आपण तिघे कॉलेज सुरू झाल्यापासून म्हणजे जवळपास एक वर्ष झालं एकत्र आहोत मला नाही आठवत आपलं कधी भांडण झाले ते.

अंकित - " आपल्या तिघांचा विषयच वेगळा आहे. आपलं कधीच भांडण होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या मैत्रीची पूर्ण कॉलेजमध्ये चर्चा  असते. " 

गौरी - " खरच मैत्रीचं नातं हे जगातील सगळ्यात सुंदर नातं असतं. " 

स्नेहल - " आणि मैत्रीच्या पलीकडे प्रेम असतं. " 

अंकित - " नाही. मैत्रीच्या पलीकडे खूप घट्ट मैत्री असते. " 

गौरी - " तुम्हा दोघांचा हे मैत्री आणि प्रेम या मधील भांडण कधीच संपणार नाही. आपली आता परीक्षा आहे तर अभ्यासाचा बघुयात का आपण."

स्नेहल - " हो. आपला स्पेशल चहा घेऊ आणि निघु . "

तिघेही चहा घेतात. अंकित ,गौरी आणि स्नेहल ला त्यांच्या होस्टेलवर सोडतो आणि जातो.