Nov 30, 2021
कविता

शरदाचं चांदणं..

Read Later
शरदाचं चांदणं..

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


शरदाच चांदणं
कुणाचं तरी बोट पकडताना
 कुणाच तरी बोट निसटणारच
दुःख उगाळणारी वेदनेची
 सहाण वापरायचीच कशाला
त्याच्यापेक्षासुगंधित आठवणीची
 उदबत्ती लावाज्याच्यामुळे भवताल
थोडा वेळ तरी सुखावून निघेल
परोपकार करायचाच असेल
 तर प्राजक्ताच्या सड्या प्रमाणे
 दुसऱ्याच्या अंगणात थोडा
 सुखाचा सडा शिंपायला शिका.
कारण जेवढा द्वेष कराल
 तेवढं कापरा सारखे संपाल
आसमंत उजळवूनच टाकायचा
 असेल तर शरदाचं चांदणं व्हां.
डॉ.अनिल कुलकर्णी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr.Anil Kulkarni. Pune

Retd.

Ex -Director Education Dept.