Feb 24, 2024
वैचारिक

मोकळे व्हा- ऐतराज

Read Later
मोकळे व्हा- ऐतराज

मोकळे व्हा 

एकदा आम्ही मुंबई हुन पुण्याला प्रवास  करत होतो . मुबईवरून निघालो ..आणि वाटेत  एक्सप्रेस हायवे ला मॉल ला गाडी थांबवली . फ्रेश होण्यासाठी .. साधारण रात्रीचे  ११ वाजले होते .. गाडी करून गेलो होतो . ड्रायव्हरला पण चहा पाणी घायचे होते . आणि माझी मुलगी पण लहान होती तिला पण एकदा वॉशरूम ला नेऊन आणावे या हिशोबाने मी पण खाली उतरले .

 

मी लेकीला घेऊन वॉशरूम मध्ये गेले .. तिकडे थोडी रांग होती .. मी तीचा हात धरून ठेवला आणि तिला सांगितले एकदा जाऊन ये .. मग गाडी थांबवता येणार नाही .. जनरली मुलांना घरातल्या क्लीन टॉयलेट ची सवय असते आणि आपल्याला हायजिन ची .. अश्या ठिकाणी जेवढे होईल तेवढे आपण टाळतोच .. पण रात्रीचा प्रवास .. आणि अजून पुणे यायला बराच वेळ लागणार होता .. एकदा ती वॉशरुम ला जाऊन आली तर ती झोपून गेली तरी चालेल या दृष्टीने मी तिला तयार करत होते .

एकेक जण बाहेर पडत होते आणि आमचा नंबर जवळ येत होता .

माझ्या आधीची बाई आत गेली .. आणि मी बाहेर वाट बघत होते कि ती आली कि मी हिला आत मध्ये नेईन . ती बाई साधारण पाहता शिकलेली .. चांगल्या घरातली आहे अशीच दिसत होती .. ती बाई आत गेली आणि बाहेर आली तरी आतमधून ना नळाचा आवाज आला ना फ्लश चा आवाज आला आणि ती सरळ बाहेर पडून निघून जायला निघाली .

मी " हॅलो .. तुम्ही आता वॉशरूम वापरले .. तुम्ही पाणी का नाही वापरले .. नळ  का नाही सोडला .. फ्लश का नाही सोडला .. "

ती अतिशय उर्मटपणे " त्या नळाला कोण हात लावेल .. "

मी " हॅलो .. हे काय वागणे आहे का ? तुम्हांला कळत नाही का ? साधे बाथरूम मॅनर्स नाहीत का तुम्हांला ? प्लिज फ्लश इट ऑफ .. मला मुलीला आत मध्ये न्यायचंय "

ती अगोदर तयार नव्हतीच पण माझ्या मागे असलेल्या बायका पण बोलू लागल्या तश्या मॅडम पुन्हा आत गेल्या आणि नाक दाबून फ्लश करून निघून गेल्या .. जाताना तिच्याच पायाचा चिखल सगळा आत मधला फ्लोअर घाण करून गेला ..

आता ह्या अशा  अस्तव्यस्त वॉशरूम मध्ये लेकीला न्यायचे म्हणजे कठीण काम होते माझ्यासाठी .. शेवटी मी नळ चालू केला .. पाच एक मिनिटे नळ चालू ठेवला .. आत मधली बादली भरली आणि पाणी ओसंडून वाहून गेले तसे ते बाथरूम एकदम चकाचक दिसू लागले .. मग माझ्या लेकीने त्या वॉशरूम चा स्वीकार केला ..

दोघी बाहेर आलो .. तर माझा नवरा खुणेनेच विचारत होता " किती वेळ "

मी त्यांना काही उत्तर देणार तर आमच्याच कार च्या शेजारी एक ऑडी कार उभी होती आणि तीच ती मगाचची दीड शहाणी .. ऑडी च्या बाहेर चहाचा काप हातात घेऊन तिचा दंताड दाखवत होती

माझे  डोके सणकले होते ना ..  

मी मुद्दामून मोठ्याने " अहो .. जगात मूर्ख लोक काय कमी आहेत काय ? मांजर पण आपल्या विष्ठेला मातीत झाकते .. पण काय काय बायकांना तेवढं पण समजत नाही .. मुळात दुसऱ्याचा विचार च नाही .. आपले काम झाले कि झाले .. पब्लिक टॉयलेट जर नीट वापरायचे नसले तर वापरतात कशाला काय माहित .. मोठं मोठ्या गाड्यांमधून फिरतात पण अक्कल नावाची चीज नसते .. लोकांना "

 

नवऱ्याने लेकीला त्याच्याकडे उचलून घेतले आणि आम्ही गाडीत बसलो .. आणि निघालो ..

जाताना काचे मधून मी बाहेर डोकावून बघितले .. जे दंताड ती दाखवत होती ना ते आता बंद झाले होते आणि माझ्या मनाला वेगळीच शांती मिळाली होती.

जरी मी एक स्त्री असले तरी असल्या स्त्रियांचा मला खूप ऐतराज आहे 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//