Login

झाले मोकळे आकाश - भाग - 5 ( अंतिम भाग )

mokle aakash
झाले मोकळे आकाश

भाग – ५ ( अंतिम भाग )


प्रियाने हे सगळं ऐकल्यावर पालवीला धीर दिला आणि बोलली, बाळा तू रडू नकोसं हा..... मी अर्ध्या तासात येते हा......

प्रियाने ताबडतोब तिची गाडी काढली... तिने तिच्या नवर्याला हि सोबत घेतलं आणि तिच्या एका पोलीस इन्स्पेक्टर मित्राला फोन करून बोलवून घेतलं....आणि ते सगळे कविताच्या घरी पोचले.......

कविताची अवस्था खूपच वाईट होती...... डोळे सुजले होते.. एक डोळा काळानिळा झाला होता...चेहऱ्यावर, हातावर माराचे वळ होते....... कविता घाबरली होती, रडत होती, कण्हत होती...पालवी तिला चिटकून बसली होती......दोघी पण रडत होत्या..... प्रियाने पालवी .....का मारलं बाबांनी आईला ...... असं पालवीला विचारलं... ती सांगू लागली.. आईच्या ऑफिस मध्ये कॉम्पुटरमध्ये काहीतरी चुकलं होत म्हणून तो प्रोब्लेम सोडवण्यासाठी तिचे सर तिला सतत फोन करत होते....आणि त्यामुळे बाबा चिडले...बाबांना आईने कोणत्या पुरुषाशी बोललेलं अजिबात आवडत नाही...

आणि आईची काहीच चूक नसताना बाबांनी तिला खूप मारलं गं मावशी असं बोलून पालवी जोरात रडू लागली......

परेश आत बेडरूम मध्ये बसला होता... तो बाहेर आला आणि प्रिया आणि पोलिसांना बघून जोरात कवितावर ओरडून बोलला... तू यांना बोलावलसं......


मी इन्स्पेक्टर अमित ... तुमच्या मुलीच्या फोनमुळे मी इथे तपास करायला आलोय.... असं मोठ्याने इन्स्पेक्टरने म्हंटल्यावर परेश घाबरला....... इन्स्पेक्टरने परेशला अटक केली.....प्रिया आणि कविता पोलीस चौकीत गेल्या......परेशविरुद्ध एफ आय आर नोंदवली.... ... येतांनाच डॉक्टरकडे जावून आल्या....कविताला औषधोपचार केले..... थोड्या वेळाने प्रिया आणि कविता घरी आल्या...


घरी पालवी होती .. प्रिया कविताजवळचं बसून होती... प्रियाने कविताला विचारले हे असं नेहमीच होतं का... परेशला हे माहित नाही का बायकोला मारणं हा गुन्हा आहे.....

पालवी म्हणाली मावशी हे एवढं मारणं दुसर्यांदा झालं आहे... आईला एकदा बऱ नव्हत तेव्हा तिच्या ऑफिसचे दोन कलीग तिला सोडायला घरी आले होते... तेव्हा बाबांनी आईला खूप मारलं होत.. ते तिच्या बाबतीत अतिशय पजेसीव्ह आहेत...... ते आईला कुठल्याही पुरुषाबरोबर बघूच शकत नाहीत....


कविता म्हणाली ........ हजारदा मनात आलं वेगळं व्हावं, पण पालवीचा विचार करून मी गप्प बसते .. आणि सहन करते......

प्रिया म्हणाली.... सहन करण्याची पण एक सीमा असते... तुला तुझं हे मन मोकळं करायला कोणी नव्हत... म्हणून तू आजवर गप्प बसलीस... पण हे अजून किती दिवस सोसशील.....अजून किती वर्ष सहन करशील हे सगळं... आपण बायका आपला संसार तुटू नये म्हणून सगळं सहन करतो, त्यामुळे ह्या पुरूषांच फावत अग... लग्नाच्या बावीस वर्षानंतर पण तू असा त्रास सहन करते आहेस.....आणि तो परेश बिनधास्त होता ...कारण त्याच्या मनात हे फिक्स आहे कि हि आपलं काहीच वाकड करू शकत नाही.....


पालवी म्हणाली आई आता मी मोठी झाली आहे, आणि आता मी तुला अजून त्रासात नाही बघू शकत, मी लहानपणापासून हे सर्व बघत आली आहे... तू वेगळी हो... आपण इथून कुठेतरी निवांत ठिकाणी राहायला जावूया....


तशी कविता अंगात शक्ती संचारल्यासारखी उठून म्हणाली... बसं झालं .... आता मी नाही सोसणार.... पालविनेच मला आता वेगळं व्हायला सुचवलंय... आता मी घटस्पोट घेणार.......


प्रिया , पालवी दोघीही खुश झाल्या... आणि मग लग्नानंतर बावीस वर्षांनी कविताची सुटका झाली... बावीस वर्षांनी तिला आकाश मोकळे झाल्यासारखे वाटले.. आयुष्यातले मळभ दूर झाल्याने तिने सुटकेचा निश्वास सोडला....

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख – रत्नागिरी )
0

🎭 Series Post

View all