मोकळा श्वास.......

S k lokhande

कर्तव्य कर्तव्य कर्तव्य.........उबग आलाय मला त्या कर्तव्यांचा........मोठी सून आहे म्हणून माझी काही कर्तव्ये आहेत मान्य आहे मला.........पण त्या आधी मी पण एक माणूस आहे, मला पण मन आहे, भावना आहेत, माझ्या पण काही इच्छा........ काही स्वप्न आहेत........कधी मोकळा श्वास ही घेऊ नाही दिलात तुम्ही......... पै पाहुणे आले की त्यांचा पाहुणचार करा.....वन्स आल्या की त्यांचं माहेरपण करा........पण मी माहेरी जायचं म्हंटल की आधीच नकारघंटा सुरू. मी काय कर्तव्य पूर्ण करत बसणार यंत्र नाही.….....माझे वडील गेले त्यादिवशी मला शेवटचं बघू ही नाही दिलंत हो तुम्ही ........त्या दिवशी तुमच्या बहिणींना बोलावून मटणाचं जेवण करायला लावलंत मला.......शेवटचं भेटू पण नाही दिलंत माझ्या बाबांना....... कसला आनंद झाला होता हो तुम्हाला......माझे बाबा गेल्याचा की बाबा जाऊन पण तुमची उठाठेव केल्याचा.........सासू एकदा का सासू झाली की तिने तीचं सूनपण कधीचं विसरू नये..........गेली सत्तावीस वर्षे या घराला दिली मी.........मला काय दिलं या घराने........ सतत एका कामवाली ची वागणूक........आत्ता मिशी फुटलेला हा माझा दीर........मी लग्न होऊन आल्यापासून...... ते त्याच लग्न होईपर्यंत...... मी स्वतः...... याच्या चड्ड्या धुतल्या आणि काल परवा लग्न करून बायको आली घरात तर जास्त हुशार झाला.......मला अक्कल शिकवायला लागला..........पाहुण्यांसमोर माझी सून कशी सगळं करते हे दाखवण्यात फार मोठेपणा वाटतो ना तुम्हाला...... तुम्हीच सांगा मग, तुमच्या राज्यात केलीत का अशी सेवा कुणाची........??? नाही ना.....?? तुम्हीच म्हणाला होतात ना मला.......मी कधी म्हणून सासूला जुमानलं नाही आणि कधी त्यांच्या कामाला हात नाही लावला........मग काय म्हणून मला राबवलात इतकी वर्षे........... तुमच्या वेळी जेंव्हा घरातली काम पडली तेंव्हा तुम्ही वेगळ्या झालात ना..?? मग गेली इतकी वर्षे मी विषय काढला वेगळं होण्याचा की मग कशासाठी तुमची कर्तव्ये आड येत होती......... आता बस झालं..........मी एक क्षण ही इथे थांबणार नाही......... एवढं सगळं करून देखील तुम्ही......काल आलेल्या माझ्या सुनेसमोर माझाचं पाणउतारा करताय......???? 

आता नाही खपवून घ्यायची मी.......चल ग मधू.........मी आहे या घरात तोवर तुझा टिकाव लागेल........नाही तर सावत्र लेकाची बायको म्हणून जसं मला राबवलं तसंच सावत्र लेकाची सून म्हणून तुला कामाला जुंपायला कमी करणार नाहीत........ यांची साथ होती.... प्रेमाचे, आपुलकीचे चार शब्द होते सोबत, म्हणून इतकी वर्षे काढली हो मी.......पण आता तुझ्या वाट्याला पण तेच येईल की काय अशी भीती वाटते........आई आई असते......सख्खी किंवा सावत्र नसते........फक्त आई पण आपल्याला निभावता आलं पाहिजे..........जे यांना कधीच जमलं नाही......... यांनी त्यांचा सावत्रपणा पुरेपूर जपला पण तुझ्या सासऱ्यांनी नेहमीच या माणसांना आपलं जपलं.


चल.......बॅग भरायला घे तुझी......मी येते तुझ्या मदतीला........सासू आणि जावेकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकत ती सुनेच्या खोलीत गेली.........सुनेच सगळं आवरून स्वतःची आवरा आवर केली आणि सुनेला घेऊन ती आज सत्तावीस वर्षांनी घराबाहेर पडली......तिच्या सासरच्या घरापासून दोन तासांवर आणि मुलाच्या ऑफिसच्या जवळच त्यांनी एक घर घेऊन ठेवलं होतं. दोन महिन्यांपूर्वीचं तिथले भाडेकरू त्यांचा करार संपवून गावी रवाना झाले होते.......2bhk चा फ्लॅट होता.......मधु ने नवऱ्याला फोन करून आई सोबत नव्या घरी शिफ्ट झाल्याचं सांगते....... दोघे बाप बेटे फोन वर बोलून लवकरचं घरी जातात. सगळ्यांना सगळा प्रकार आपसूकचं लक्षात येतो......झाल्या विषयावर कोणी बोलत नाही उलट बाप बेटे मनोमन सुखावतात.......कारण दोघानाही तिने बजावलेल्या कर्तव्यांची कष्टाची जाणीव असते........


घर घेऊन जवळ जवळ बारा ते पंधरा वर्षे झालेली असतात पण आज ती इतक्या वर्षांनी स्वतः त्या घरात राहणार असतात......लेक आणि सून दोघांच्याही हातून घरातल्या घरातच गणेश पूजन करून दोघेही नवीन संसाराला सुरवात करतात.हो दोघेही.........कारण आज ती पण तिच्या नवऱ्यासोबत सत्तावीस वर्षांनी संसार करणार असते.......जेवढी स्वप्न बघितली तेवढी पूर्ण करणार असते. मुलगा आणि सून पण काही दिवस बाहेर फिरायला जातात......कारण त्याला त्या दोघांच्याही कष्टाची जाण असते.....लहानपणापासून त्याने त्याच्या आईवडिलांना कधीच कॉलिटी टाईम स्पेन्ड करतांना नाही बघितलं नेहमी आपली दोघे घराचं आणि घरातल्या माणसांचं करत होती हे त्याने बघितलेलं असतं..... मधूची खरेदी दोघी सासू सुना करतात........ती नात्याने जरी सासू असली तरी मधूची आई होणार असंच ठरवते........तिला कधी कर्तव्यात अडकवून नाही ठेवायचं कारण नात्यात जेवढी मोकळीक असेल तेवढंच घट्ट प्रेम आणि विश्वास असतो....


ती आज मोकळा श्वास घेत असते......

समाप्त.......

कथा कशी वाटली हे आपल्या कमेंट द्वारे जरूर कळवा......आणि कथा शेअर करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासहित करावी.

धन्यवाद????????????????