मज मोहित केले
माझी मी न राहिले
मोहरले मी मोहरले...
रात सारी गोजिरी
जणू चांदण्यात न्हाली
सजली ही निशा मल्मली
मोहरले मी मोहरले...
जणू चांदण्यात न्हाली
सजली ही निशा मल्मली
मोहरले मी मोहरले...
तुझी चाहूल दिसे मज
सागरात ह्या चांदराती
प्रतिबिंब त्यात पाहुनी
मोहरले मी मोहरले...
सागरात ह्या चांदराती
प्रतिबिंब त्यात पाहुनी
मोहरले मी मोहरले...
अप्सरा जणू स्वर्गाची
खुलुनी आले सौंदर्य
नयनास होता तुझा स्पर्श
मोहरले मी मोहरले...
खुलुनी आले सौंदर्य
नयनास होता तुझा स्पर्श
मोहरले मी मोहरले...
मुखकमल बहरले
तुज सामोरी बघूनी
रिजवी तारुण्य तुझे
मोहरले मी मोहरले...
तुज सामोरी बघूनी
रिजवी तारुण्य तुझे
मोहरले मी मोहरले...
नसावी बंध नियतीचे
न्हाऊनी ह्या चांदण्यात
हे शशिकरा मिठीत घे
मोहरले मी मोहरले...
न्हाऊनी ह्या चांदण्यात
हे शशिकरा मिठीत घे
मोहरले मी मोहरले...
दाटुनी नयनी प्रीत
नसे भान जगाचे
तोडावी सारी रीत
मोहरले मी मोहरले...
नसे भान जगाचे
तोडावी सारी रीत
मोहरले मी मोहरले...
पहाटेचा मंद मंद वारा..
रात-राणीचा परीमळ सारा
मनास स्पर्शुन गेला
मोहरले मी मोहरले...
रात-राणीचा परीमळ सारा
मनास स्पर्शुन गेला
मोहरले मी मोहरले...
✍?श्री...
(टीप: तर आइन्स्टाइन च्या लेकिनो आणि लेक हो... इतकं असीम दृश्य बघून मोह आवरलाच नाही... काहीही अंदाज लावू नये???
खूप उशीर झाला ऑफिस ला निघायला..??♀️)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा