मोह मोह के धागे भाग 5

Story Of Love
मोह मोह के धागे भाग ५
क्रमश : भाग ४
अजय ताड ताड जिना उतरत बाहेर निघत होता तर माई तेवढ्यात रियाला घेऊन आत आल्या .. घराच्या बाहेर छोटुसे गार्डन होते तिथे रिया झोक्यावर खेळून आली होती ..
रिया " बाय डॅडा .. "
अजय एकदम नॉर्मल होत .. " बाय बेटा .. सी यु इन द इव्हनिंग "
असे म्हणतच कार मध्ये बसला ..
ड्राइवरने गाडी सुरु केली .. गाडीत बारीक आवाजात हिंदी सॉंग्स लागली होती .. अजयच सांगायचा सॉंग्स लावायला नेहमी त्यामुळे आजही चालू होती ,ती हि एकदम बारीक आवाजात .. म्हणजे एखादा कॉल आला तर घेताही येईल
प्यार हुआ इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहता है दिल, रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल
प्यार हुआ इक़रार हुआ...

कहो की अपनी प्रीत का मीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का मीत न बदलेगा कभी
प्यार जो टूटा, साथ जो छूटा
चाँद न चमकेगा कभी
प्यार हुआ इकरार हुआ...

रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ
प्रीत हमारे प्यार के दोहराएंगी जवानियाँ
मैं न रहूँगी, तुम न रहोगे
फिर भी रहेंगी निशानियाँ
प्यार हुआ इक़रार हुआ...
का कुणास ठाऊक हे गाणे एकूण एकदम गालातल्या गालात अजय हसला ..
ऑफिस मध्ये आला आणि कामाला लागला
इकडे मीरा मात्र खूपच डिस्टरब झाली होती .. रागाने तिच्या रुम मध्ये आली आणि तिने मनाने काहीतरी ठरवले होते .. एक मोठी बॅग काढली आणि त्यामध्ये पटपट तिचे कपडे भरले ..
मीरा मनातच " आता ना मी माहेरीच जाते रियाला घेऊन चांगली एक महिना ...त्या शिवाय ह्यांना माझी किंमत कळणार नाही "
असा विचार आला आणि मटकन बेड वर बसलीच .. पटपट मोबाईल हातात घेऊन त्यात काहीतरी शोधू लागली .. जसे जसे शोधत होती तिची बेचैनी वाढत होती .. तिने तिच्या मोबाईल मध्ये आधी पहिले आई म्हणून नंबर शोधला , मग बाबा नंबर शोधला .. मग दादा म्हणून नंबर आहे का ते शोधला .. मग ताई म्हणून .. तिच्या मोबाईल मध्ये फक्त अजय हा एकच नंबर तिचा रिलेटिव्ह म्हणून होता .. बाकी असेच ओळखीचे .. नंबर .. आपल्याला आई बाबा नाहीयेत कि काय ? आपल्याला कोणी आहे कि नाही ? काहीच आठवत नाहीये .. या विचाराने ती एकदम पॅनिक झाली ..
अजय त्याच्या केबिन मध्ये नीरज आणि काही डायरेक्टर्स सोबत मिटिंग ला बसला होता इतक्यात तिच्या नंबर वरून कॉल आला ..
जनरली ती ह्या वेळी कधीच कॉल करायची नाही .. आज भांडणे झाली .. तर तिने आज कॉल केला म्हणजे बहुदा सॉरी बोलायला केला असे असे त्याला वाटले .. फोन घेऊन स्वतःच उठला आणि केबिन च्या बाहेर गेला ..
अजय " हॅलो "
समोरून फक्त हुंदक्यांचा आवाज
अजय " हॅलो .. मीरा .. "
काहीच रिप्लाय नाही
अजय " प्लिज स्टॉप क्राईन्ग मीरा "
मीरा " मला माहेरी जायचंय ? माझे माहेर कुठं आहे ? माझे आई वडील कुणीकडे आहेत ? "
अजय " मी घरी आल्यावर बोलूयाका आपण ?"
मीरा " नाही .. मी रियाला घेऊन चांगली एक महिना माहेरी राहणार आहे .. म्हणजे तुम्हांला माझी किंमत कळेल .. ड्राइवरला सांगा आम्हांला दोघीना माझ्या माहेरी सोडून यायला .. माझ्याकडे त्यांच्या पैकी कोणाचाच नंबर नाहीये .. नाहीतर मीच बोलवले असते माझ्या भावाला .. एका फोन मध्ये आला असता तो मला घ्यायला "
अजय " माझ्या कडे नाहीये तुझ्या भावाचा नंबर"
मीरा " मग कोणाचा आहे त्यांचा दया "
अजय " काही जायची गरज नाहीये माहेरी बिहेरी .."

मीरा " जाणार म्हणजे जाणार तुम्ही पत्ता तरी सांगा ना .. शी बाबा .. मला कंटाळा आलाय .. मला काहीच आठवत नाहीये .. मी नक्की कोण आहे ? बायको तरी आहे ना तुमची .. रिया माझी मुलगी आहे कि नाही ? "
अजय " तू गोळी खाल्ली का आजची .. मला वाटत जेवून गोळी खाऊन घे .. थोडा वेळ आराम कर .. मी संध्याकाळी आलो कि बोलतो या विषयावर "
मीरा " मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल ?\"
अजय " बोल ?"
मीरा " मी तुमची कोण आहे ?"
अजय " मीरा .. काय चाललंय .. तुला कळत नाही का ? मी इथे कामात आहे .. हे असले घरातले वाद आता ऑफिस मधून सोडवत बसू का ?" मुद्दामून जरा आवाज वाढवूनच बोलला तो ..म्हणजे मग ती गप्प बसेल
मीरा " ओरडा .. नुसते ओरडा .. सकाळी तर हात उचललात तुम्ही ? काय वाटत का तुम्हांला .. सुशिक्षित घराण्यात असे कोण वागतं का ? शोभतं का तुम्हांला ?"
अजय " बरं बाबा .. सॉरी .. आता असे पुन्हा नाही होणार ...सॉरी "
तेवढ्यात नीरज नेमका मागे आला होता .. नीरजला अजय च्या तोंडातून सॉरी निघालेलं ऐकून ४२० वोल्टचा शॉक लागला होता .. आणि तो मुद्दामून वेड वाकड तोंड करून त्याला चिडवत होता
अजयने त्याला बघून पटकन कॉल च बंद केला
अजय " व्हाट्स सो फनी !! ऍज इफ तू कधी सोनियाला सॉरी बोलतच नाही "
नीरज एकदम गप्पच बसला ..
नीरज मनात " साल्या , सोनिया माझि लग्नाची बायको आहे .. तिला नाही तर कोणाला सॉरी बोलू ?"
नीरज " काय रे काय झाले ? आज तिने चक्क दि अजय ला सॉरी बोलायला लावले ? "
अजय " तिला तिच्या दादाची आठवण येतेय . मला म्हणते माहेरी जायचंय .. थांब आता दादा म्हणून तुझाच नंबर देतो तिला .. रियाला घेऊन महिना भर माहेरी जाईन अशी धमकी देत होती मला "
नीरज " पण कारण काय ?"
अजय " तिला बायकोचे सगळे हक्क हवे आहेत ?"
नीरज " सी आय टोल्ड यु .. आता आधी बायकोचे हक्क मागेल . मग तुझ्या प्रॉपर्टीवर अर्धा हक्क मागेल .. "
अजय \" शट अप यार नीरज .. तू नक्की माझा मित्रच आहेस ना .. "
नीरज " मित्रच आहे रेभावा .. तुला या सगळ्यातुन बाहेर काढायचय मला .. कुठे हरवला माझा फन लविंग फ्रेंड .. किती दिवसात तू साधा डिनर ला आला नाहीएस बाहेर .. किती मस्ती , किती मज्जा करायचो आपण .. विसरलास तू .. एवढं कोण चेंज होत नाही .. आणि मला म्हणतोस कि मी मित्रच आहे ना ?कोण कुठच्या माणसांना जवळ घेऊन बसलाय तू ? स्वतःचे काही आयुष्य आहे कि नाही तुला ? मदत करावी रे .. पण इतकी .. अशी ? "
अजयने काही पेपर काढून त्याच्या समोर ठेवले ..
नीरजने ते वकिली कागद बघितले आणि डोळे मोठेच केले त्याने
नीरज " व्हॉट इज धिस नॉन सेन्स अजय ? ह्याव यु गॉन मॅड ?"
----------------------------
अजयने सॉरी बोलल्यावर मीरा ला थोडी शांती मिळाली ... मग रियाच्या नादात ती पण दुपारचे जेवली .. आणि गोळी खाऊन झोपून गेली ..रियाला खेळवायला आणि बघायला माई होत्याच ..
थोड्या वेळाने रियाला आवडतो म्हणून तिने चॉकलेट केक बनवला .. तिला खायला दिला .. एक छोटा पेस्ट्री खास अजय साठी डेकोरेट करून सेट करायला ठेवला ..
संध्याकाळचे जेवण तिची स्वतःच्या हाताने बनवायची .. आज किचन मधून मस्त मेनू शिजत होते ..
माई " ताई .. आज एकदम खुश आहेत ? आज काय स्पेशल ?"
मीरा " नाही काहीच नाही ?"
माई " अशीच खुश राहत जा बेटा .. "
मीरा " माई , तुम्ही आमच्या लग्नाला आला होतात का ?"
माई एकदम चपापल्या .. मी .. मी .. ते ना नाही ग नेमके मी गावी गेले होते "
मीरा " माई , ह्यांचे आई बाबा कुणीकडे असतात ? मी कधी पाहिले नाही त्यांना ?"
माई " ताई .. थांबा हा .. रिया काय करते बघून आले "
माई कशा बशा सटकल्या तिथून
आज मीरा नेहमी पेक्षा छान जेवण करून त्याची वाट बघत बसली होती .. भांडण करण्यापेक्षा गोड बोलून तिला तिच्या प्रश्नांची उत्तर पाहिजे होती ..
----------------------
रात्रीचे नऊ वाजले तरी अजय आणि नीरज आज ऑफिस मधेच काम करत बसले होते ..
नीरज " चल अजय आज बाहेर जाऊ जेवायला .. बऱ्याच दिवसात आपण गेलो नाहीये "
अजय " अरे .. "
नीरज " यार , प्लिज आता नाही म्हणू नकोस आणि डोन्ट टेल मी कि तुला तिला सांगावे किंवा विचारावे लागेल ?"

अजय " बरं बाबा .. चल जाऊ "
अजय ने एकदा मोबाईल हातात घेतलाही .. कि मी जेवायला नाहीये .. तुम्ही जेवून झोप सांगावे .. पण लगेच नीरज आलाच त्याच्या मागे त्यामुळे राहून गेले
बऱ्याच दिवसांनी अजय पब मध्ये गेला .. पब मधले त्याचे जुने मित्र लगेच त्याच्या भोवती आले .. हातात भरलेले ग्लास , मित्र मैत्रिणी , गप्पा , हसी मजाक , म्युसिक सगळेच फुल ऑन चालू होते ..
नीरज तर त्याला डान्स करायला पण ओढून घेऊन गेला .. टॅप डान्स ज्यात अजय ची खासियत होती तो सर्वांना बघायला मिळाला आणि त्याला खूप सारी दाद हि मिळाली ..
नीरज ड्रिंक्स अजून आणायला गेला तेवढयात अजय नाहीसा झाला ..
नीरज इकडे तिकडे त्याला शोधू लागला
तेवढ्यात त्याला मेसेज आला
अजय " रिया .. मी घरी गेल्या शिवाय शांत झोपत नाही .. मला जावे लागेल "
नीरज ला एवढा राग आला .. त्याला फुल नाईट इथेच घालवायची होती .. त्याला अजय ला निदान एक दिवस तरी ह्या दोघींच्यातून बाहेर काढायचे होते पण ११ वाजले तसा अजय तिथून निघाला ..
घरी येई पर्यंत १२ वाजले .. माईंनीच दार उघडले
माई " अजय दादा , काय हो आज उशीर केलात ? पोरगी रडून रडून आता शांत झालीय ?"
अजय नाहीच न बोलता वरती त्याच्या रूम मध्ये आवरायला गेला .. फ्रेश होऊन रियाच्या रूम मध्ये गेला .. तर रिया मीराच्या कुशीत झोपली होती .. हळूच आवाज न करता त्या दोघींच्या अंगावर पांघरूण टाकून अजय पुन्हा झोपायला म्हणून त्याच्या रूम मध्ये आला .. झोपायला जाणार तर तहान लागल्या सारखे झाले म्हणून किचन मध्ये पाणी प्यायला आला ..
बघतो तर डायनींग टेबल वर जेवण तयार होते .. दोन ताट लावली होती .. याचा अर्थ ती जेवली नव्हती ..
तेवढ्यात माई किचन मध्ये आल्या
माई " मी जेवण वाढू का ? मीराला कदाचित डोळा लागला असेल .. नाहीतर आली असती ती वाढायला ?"
अजय " नाही .. नको .. मी जेवलोय बाहेर ? "
माई किचन बाहेर जायला निघाल्या तर
अजय " माई .. मीरा आणि रिया जेवून झोपल्यात ना "
माई " रिया जेवली .. पण मीरा वाट बघत बसली होती .. ती नाही जेवली "
अजय ने स्वतःच्या कपाळावर बोटं घासली " जेवायचं ना .. म्हणजे आजच्या गोळ्या स्किप झाल्या का तिच्या ? एक दिवस मी बाहेर गेलो तर एवढे काय ?रुटीन फॉलो करता येत नाही का ? " वैतागातच तो बोलला

माई " अजय दादा , एक बोलू का ? "
अजय " हा बोला ?"
माई " मीरा ला आता खूप प्रश्न पडायला लागलेत .. मला असे वाटतंय कि आता तिला सत्य कळले पाहिजे ?"
अजय " का काही विचारले का तिने ?"
माई " तुमच्या दोघांच्या लग्ना विषयी , तुमच्या आई बाबां विषयी विचारत होती .. "
अजय "माई , ती गेली तरी चालेल पण रिया .. रिया माझी मुलगी आहे .. मी रियाला नाही सोडू शकत .. तिला सत्य कळले तर ती रियाला घेऊन जाईल "
माई " मी आई सारखी आहे तुमच्या .. मला तिच्या डोळ्यांत तुमच्यासाठी प्रेम दिसते.. मला हे पाहवत नाही .. तुम्ही तिला लवकर सत्य सांगून टाका " म्हणतच माई डोळ्यांच्या कडा पुसत बाहेर निघून गेल्या

🎭 Series Post

View all