मोह मोह के धागे भाग 9

Story Of Love


मोह मोह के धागे भाग ९
क्रमश : भाग ८
तो तिला मनात नसताना टाळत होता .. एक प्रकारे लांब पळत होता तिच्यापासून .. फक्त तिच्यासाठी ... तिच्या चांगल्या साठी .. ती मात्र अनभिज्ञ होती .. तिच्या साठी आता तो सर्वस्व होता .. .. लाडिक पणे बोलता बोलता तिने त्याच्या गळ्यात तिचे दोन्ही हात टाकले आणि त्याच्या डोळ्यांत एक टक पाहत होती .. डोळ्यांतून ती त्याला विश्वास द्यायचा प्रयत्न करत होती कि काहीही प्रॉब्लम असला तरी टेन्शन घेऊ नकोस .. तुझ्या सुख दुःखात मी सहचारिणी म्हणून तुझ्या बरोबर सदैव असेंन .. तिने तिच्या टाचा उंच केल्या आणि त्याच्या कपाळावर किस केले .. दुसऱ्या क्षणाला त्याने तिला त्याच्या हाताने जोरात धक्का दिला आणि मागे ढकलले ..
तिला काही कळायच्या आत ती खाली पडली आणि बेडचा कोपरा .. तिच्या डोक्याला लागला ..
"आई ग " अशी एक आर्त किंकाळी ऐकू आल्यावर तो भानावर आला ..
तिच्या कपाळाच्या इथून रक्ताची बारीक धार लागली होती.. तो पटकन खाली झुकला .. आणि तिला दोन्ही हातांवर उचलून त्याने तिला बेड वर ठेचले ..
कपाटातून फर्स्ट एड बॉक्स काढला .. आणि तिच्या जखमेवर डेटॉल लावून .. साफ करू लागला ..
तिच्या डोळ्यांतळे प्रश्न पाण्यात भिजत होते .. तो .. तिच्याकडे बघणे टाळत होता .. तिच्या नजरेला नजर न देता .. त्याने जखम साफ केली आणि क्रिम लावून छोटी पट्टी बांधली ..
ती उठून तिच्या रूम मध्ये जाऊ लागली
अजय " सॉरी .. "
मीरा " तुम्हांला मी आवडत नाही का ?"
अजय " मीरा , मला प्रश्न विचारत जाऊ नकोस ? मला आवडत नाही कोणी प्रश्न विचारलेलं ?"
मीरा " तुम्हांला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील "
अजय "माझ्या रूम मध्ये तू पुन्हा यायचं नाही .. आज इथे आराम कर मी खाली दुसऱ्या रूम मध्ये झोपतो "
मीरा पटकन उठली " काही एक गरज नाहीये .. मला माझी किंमत आणि जागा तुमच्या आयुष्यतली माझी जागा कळली आहे .. बरं झाले माझे डोळे वेळेवर उघडलेत " आणि रूमच्या बाहेर निघून गेली
पुढे दोन दिवस ती अजयशी एकाही शब्दाने बोलली नाही आणि त्याच्या समोर सुद्धा आली नाही ..
झाल्या गोष्टी बद्दल अजयला खूप वाईट आणि गिल्टी वाटत होते .. नुसते सॉरी बोलणे पुरेसं नव्हतं .. आणि घरातले वातावरण एकदम गंभीर होत चालले होते ..

रात्री
अजय स्वतः मीराच्या रूम मध्ये गेला .. तिला त्याचे वागणे मनाला खूपच लागले होते .. दिवस रात्र .. उशीवर आसवे गाळत बसायची ..
अजय " मीरा , मला थोडे बोलायचं होते .. "
मीरा काहीच बोलली नाही
अजय " हे बघ मीरा , तुला राग आलाय मी समजू शकतो .. काही गोष्टीत तू मला समजून घ्यावंस असे वाटत मला .. ते तू मोठ्या आजरातून बाहेर आली आहेस .. आता तू आनंदी राहणे जास्त गरजेचं आहे . तू अशी रडत राहिलीस तर तुझ्या तब्बेतीवर परिणाम होईल .. तू सध्या तब्बेतीवर लक्ष दे .. डॉक्टरांनी सुद्धा मला हेच सांगितले आहे .. तुझी काळजी घेण्यासाठी तू माझ्या पासून थोडी दूर राहणे गरजेचं आहे .. म्हणून ते .. मी ... माझे चुकले .. असे नको वागायला पाहिजे होते .. तू मला पाहिजे तर शिक्षा देऊ शकतेस ..पण प्लिज असे रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस "
मीरा काहीही बोलली नाही.. त्याला वाटले कि ती रागावली आहे म्हणून ..
तो हि रूम मधून बाहेर जाऊ लागला .. तर कण्हण्याचा आवाज आला म्हणून तो मागे फिरला .. त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला तर घाबरलाच .. सणसणून ताप भरला होता तिला.. आणि ती कण्हत होती ..
लगेचच डॉक्टरांना घरी बोलावले .. तिचे ड्रेसिंग नीट करून डॉक्टरांनी इंजेक्शन दिले ..
पुढे दोन दिवस त्याने तिच्या रूम मध्ये बसूनच काम केले .. तिच्या जखमेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ताप भरला होता .. तिची एक प्रकारे सेवाच तो करत होता .. हाताने जेवण भरवत असे,मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायचा , तिला हाताला धरून बाथरूम मध्ये न्यायचा ..
आणि तिला हे सगळं पाहून जास्तच भरून यायचं .. एक दोनदा तिने त्याला रागाने ढकललं “ .. जा तुम्ही .. नका येऊ इकडे “असेही सांगितले तरीही तो तिथेच थांबला ..
दोन दिवसांनी ती बरी झाली ..
अजय " कसे वाटतंय ?"
मीरा " आधी जखमा द्यायच्या आणि त्यावर मलम लावायचे .. नका नाटकं करू माझ्या समोर "
अजयला खरंतर रागच आला .. तो ताडकन उठून निघून गेला ऑफिसला
अजय मनात " कसे वागू तेच कळत नाही .. कसल्या असतात ह्या मुली ? किती त्रास देतात .. "
तेवढ्यात त्याच्या वडिलांचा फोन आला
भाऊसाहेब " अजय , आम्ही येतोय .. कोल्हापुरच्या देशमुखांच्या मुलीचे स्थळ चालून आलेय .. मुलीचे नाव राधा आहे .. एमबीए शिकलीय .. आणि आता नोकरी साठी मुंबईत राहतेय .. तिचा फोटो आज तुम्हांला कुरिअर वाला देईल .. मुलगी आम्हांला आवडलीय .. सून म्हणून आपल्या घराण्याला साजेशी आहे .. आम्हीं तिला त्या लहान पोरीं बद्दल कल्पना दिली आहे .. त्या पोरीला दत्तक घेऊन सांभाळायला पण ती तयार आहे .. तिच्या आईला लवकरात लवकर घरातून बाहेर काढा .. आम्ही पुढच्या महिन्यात येतोय .. तुमचा बंगला बघायला मुलीचे आई बाबा .. आणि स्वतः राधा येणार आहेत "
अजय " भाऊसाहेब ,आम्हांला थोडा वेळ हवा आहे .. इतक्यात लग्न करायचे नाहीये "
भाऊसाहेब " लग्नाचे योग्य वय आहे तुमचे .. फार विचार करू नका .. आणि हा हे समजा सेवेचं जे भूत आहे ना डोक्यावर ते उतरवा.. त्या बाईला घरा बाहेर काढा .. आणि एक सांगू का एवढीच आवडली असेल तर ठेवलेली बाई म्हणून तिला जागा द्या .. पण अशी घरात नांदवू नका "
अजय " भाऊ साहेब , काय बोलताय .. एका पवित्र स्त्री बद्दल बोलताय तुम्ही ह्याचे भान असू द्या .. "
भाऊसाहेब " तुम्ही तिला तुमच्याकडे ठेवून तेही बिन लग्नाची .. तिची हीच पवित्रता कलंकित करत आहात .. एका विधवेला तिच्या वैध्यव्या बद्दल सांगून टाका .. तिची ती स्वतः निघून जाईल "
अजय " भाऊ साहेब , हे सर्व करायची हि वेळ नाहीये .. तिची तब्बेत नाजूक आहे "
भाऊ साहेब " तिच्या तब्बेतीची तुम्हांला काळजी नसावी .. तुम्ही तिचे कोणीही लागत नाही .. हे बघाअजय .. हे मोहाचे क्षण असतात .. त्यातून वेळेवर बाहेर या यात तुमची आणि तिची दोघांची भलाई आहे .. "
अजय " भाऊ साहेब , आम्हांला रिया आणि तिची आई आमच्या आयुष्यात कायमच्या असाव्यात असे वाटते "
भाऊ साहेब " खबरदार !! हे शब्द पुन्हा काढलेत तर .. आम्हीं काय करू आम्हांला माहित नाही .. "
अजय " भाऊ साहेब , मीरा .. खूप चांगली मुलगी आहे "
भाऊ साहेब " तुम्हीं एका विधेवे विषयी बोलत आहेत .. देव सुद्धा माफ करणार नाही तुम्हांला .. हे असले पाप करू नका "
अजय " माझ्या मुलीची आई आहे ती ?"
भाऊ साहेब " अजय ... तुम्ही .. काय बोलताय काही कळतंय का तुम्हांला "
अजय " रियाने आम्हांला वडील बनवलंय .. आणि आता आम्हीं तिला दत्तक घेऊन कायमचे वडील बनणार आहोत .. "
भाऊ साहेब " रियाला दत्तक घेण्या विषयी आमचं काहीच म्हणणं नाहीये .. पण तिच्या आई विषयी तुम्ही विचार सुद्धा करू नका "
अजय " भाऊ साहेब .. ठेवतो आता फोन "
अजयला चारी बाजूने त्रास होत होता .. एक वेगळीच घुसमट होत होती .. इकडे वडील नाराज , तिकडे मीरा नाराज , रियाला आई पाहिजे.. स्वतःची आई असताना सावत्र आई तिला मिळवून का द्यायची ? मीरा स्वतःचे बाळ असताना तिला अनाथ आश्रमात पाठवून तिच्या मुली पासून दूर का करावं ? पण मीरा विधवा आहे हे सत्य आहे .. ती त्याला एक्सेप्ट करेल का ? तिला मागचं सगळं आठवलं तर ती अजय ला स्वीकारेल का ? हे असे एक नाही असंख्य प्रश्न डोकावत होते ..

तेवढ्यात पियुनने कुरिअर आणून दिले अजयने पटकन कुरिअर ओपन केले तर आतमध्ये एकदम सुंदर मुलीचा फोटो होता .. केसांचा स्पेप कट , निळ्या रंगाची बनारसी साडी तिने नेसली होती .. हसरे , बोलके डोळे ..तिला नकार देण्यासारखे काहीच कारण नव्हते .. आणि खरंतर भाऊ साहेब जसे म्हणाले तसे त्यांच्या घराण्याला शोभून दिसेल अशीच होती ती
अजयने फोटो त्याच्या ड्रॉवर मध्ये ठेवून दिला
चेअरला मागे टेकून डोळे बंद करून विचार करत बसला होता .. तेवढयात डोअर नॉक झाले .. त्याला वाटले नीरज असेल
अजय " कम इन् " डोळे बंद करूनच बोलला
कोणीतरी आत चालत आलय हे त्याला डोळे बंद असतानाही जाणवले होते पण स्ट्रेस इतका होता कि डोळे बंद करूनच थांबला
अजय " बोल निरज "
तेवढ्यात त्याच्या केसांमधून हलकासा मसाज झाला .. त्याला तो मसाज हवा हवास वाटला .. रीलॅक्स .. इतका रिलॅक्स .. कि आता इथे झोप लागेल .. आणि बंद डोळ्यांना अराम पडला .. आणि त्याला त्याच चेअर वर झोप लागली .. सब कॉन्सशन्स माईंडला कळत होते .. कि कोणीतरी मसाज करतंय .. एसीचे टेमरेचर सेट करतंय ... आणि त्याच्या डोळ्यांवर पडत असलेला प्रकाश हळू हळू बंद होतोय .. मन कसलाही विचार करायचं थांबलय .. आणि एकदम हलकं .. फ्रेश वाटतंय .. अशा अस्वस्थेत तो खूप वेळ होता .. कदाचित एक तास ..
एक तासा नंतर त्याला जाग आली .. तर एकदम फ़्रेश वाटत होते .. उठून तोंडावर पाणी मारून आला .. लंच ची वेळ निघून गेली होती .. पण ह्याला भूख लागली होती ..
समोर डबा दिसला .. त्याने डबा उघडला .. आणि आनंदात जेवला .. जस जस पोट भरत होत तसा हा आनंद वाढत होता .. एक आंतरिक समाधान मिळत होत .. त्या अन्नात प्रेम होते .. खाताना त्याला जाणवत होते ..
जेवून हात धुवून झाल्यावर पियुनला बोलावून त्याने विचारले " हा टिफिन ?"
पियुन " सर , मॅडम आल्या होत्या तुम्हांला डबा घेऊन " हे वाक्य ऐकताच हृदयात कसतरी झाले त्याला .. धड धड वाढली .. चेहऱ्यावर ब्लश आला
पियुन " सर , मॅडम .. खूप चांगल्या आहेत .. एकदम लक्ष्मी आहेत "
अजय " कधी गेल्या मॅडम "
पियुन " ते तुम्हांला झोप लागली होती ना .. म्हणून .. त्या गेल्या .. जाताना सांगून गेल्या .. कोणीही डिस्टरब करू नका "
अजय मुद्दामून खाली मान घालून कामात आहे असे दाखवत होता .. पण मनातून खुश होत होता
मेरी बेचैनियों को चैन मिल जाए
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये
मेरे दीवानेपन को सब्र मिल जाए
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये
ज़िक्र तुम्हारा जब जब होता है
देखो ना आँखों से
भीगा भीगा प्यार बह जाता है
मेरी तनहाइयों को नूर मिल जाये
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये
मैं रात-दिन ये दुआ करूँ
तेरे लिए मैं जियूं मरुँ
चारों पहर तुझे देखा करूँ
मेरा जहाँ ये तुझपे फ़ना करूँ
ज़िक्र तुम्हारा जब जब होता है
देखो ना होंठों पे
तेरा एहसास रह जाता है
मेरे हर रास्ते को मंज़िल मिल जाये
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये
बेरंग हवाएं मुझे ना जाने दे गयी सदा क्यूँ अभी अभी
है सरफ़रोशी ये आशिक़ी भी जायेगी जान मेरी इसमें कभी
ज़िक्र तुम्हारा जब जब होता है
देखो हर लम्हा तेरी दास्ताँ कहता जाता है
मेरी हर एक तड़प को सुकून मिल जाए
तेरा चेहरा जब नज़र आये
तेरा चेहरा जब नज़र आये

🎭 Series Post

View all