मोह मोह के धागे भाग 31

Story Of Love


मोह मोह के धागे भाग ३१

क्रमश :भाग ३०

प्रिय वाचकहो,

सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! येणारे नवीन वर्ष तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवोत हीच सदिच्छा !

पार्टस उशिरा टाकतेय त्या बद्दल दिलगिरी शिवाय काही करू शकत नाही .. असो असेच तुमचे प्रेम माझ्या लिखाणावर राहू द्या ..
सर्व ईरा फॅमिली मेंबर्स ला पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

सौ. शीतल माने

बिचारी एक क्षण मोहरून गेली .. त्याने हळुवार कपाळावरून हलक्या हाताने तिचे केस मागे घेतले .. आणि तिच्या कपाळावर दीर्घ काळ ओठ ठेवले .. समाधान काय असते हेच तो क्षण दोघांना सांगून गेला . उघड्या डोळ्यांनी त्याच्या खोल डोहासारख्या डोळयांत ती शांत पडून बघत होती ..
अजय " फार विचार करू नकोस .. फार रात्र झालीय .. झोप आता "
मीराने पण नकळत डोळ्यांनीच होकार दिला आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटले ..
अजय छताकडे बघत विचारात हरवला
लग्न झाल्यापासून मनातले गिल्ट वाढले आहे .. डोक्यावंर एक ओझे असल्यासारखे वाटतंय .. जेवढं मीरा बद्दल प्रेम आहे तेवढीच मला तिला माझ्या पासून दूर करावेसे वाटतंय . आज हक्क आहे पण तो गाजवता येत नाहीये .. यातून मी तिला सुद्धा दुखी करतोय .. हा सगळा खटाटोप मीराला आनंदी बघण्यासाठी आहे तरीही तिला दुःख देण्याला कारणीभूत मीच बनत आहे .. अशाने आमचं नवीन नातं एक कोडं बनून राहिलंय .. लग्न करताना तिला मी वेगळच स्वप्न दाखवलं होते आणि आत लग्न झाल्यावर सत्य वेगळेच दाखवत आहे ..
हिला रोहन बद्दल कसे सांगू .. कशी रिऍक्ट करेल ती .. तिला सहन होईल का ते ? आणि जर तिला तिचा भूतकाळ आठवला तर तिच्या आयुष्यात ती मला हेच स्थान देईल का ? आज जशी बिनधास्त माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपली आहे त्याच विश्वासाने ती माझी होईल का ?
तेवढया त झोपेत मीराने त्याच्या छातीवर हात टाकला आणि त्याच्या कुशीत झोपली .. त्याने पण त्याच हाताने तिला घट्ट कुशीत घेतले .. त्याला वाटले ती झोपली पण थोड्याच वेळात त्याच्या मानेवर त्याला ओले जाणवले .. तिच्या डोळ्यातले पाणी त्याच्या कुर्त्याची कॉलर ओली करत होत .. आवाज सुद्धा न करता ती रडत होती .. आणि ह्याचे कारण तो होता ..
अजयने तिच्या पापण्यांवर ओठ टेकवले
अजय " किती विचार करतेय मीरा ?"
मीरा " मला भीती वाटतेय .. मनात अस्वथ , चलबीचल होतंय .. काहीतरी मन ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतंय पण मी तिथपर्यंत पोहचू शकत नाहीये "
अजय " नको ना असा निगेटिव्ह विचार करुस ?"
मीरा " मला कोणीतरी तुमच्यापासून दूर घेऊन जातंय असे वाटतंय मला .. खूप धडधडतय .. "
तिचे हात पाय लिटरली थरथरत होते .. तिच्या शरीराचे कंपन जाणवले
अजय " शु.. असे काही होणार नाहीये .. आपण दोघे आता साता जन्माचे साथी आहोत .. हेच सत्य आहे .. मी तुला माझ्यापासून दूर जाऊच देणार नाहीये "
मीराला बोलायला पण श्वास लागत होता ..
मीरा " अजय , डोळे मिटले कि कोणाचे तरी डोळे मला दिसतात.. जेव्हा तुमच्या जवळ असते तेव्हा डोळे मिटले कि ते डोळे माझ्याकडे बघून हसतायत असे वाटते मला " ती मोठे श्वास घेत घाबरून बोलली कारण आता पण तिच्या डोळ्यांसमोर हसणारा रोहन आला होता .. रोहन आपल्या मिटलेल्या डोळ्यांसमोर का येतो हे तिला कळेना
अजय " म्हणजे मला काही कळले नाही ?"
मीरा त्याला घट्ट मिठी मारत " तुमच्या त्या मेलेल्या मित्राचे डोळे माझ्या डोळ्यांसमोर येतात जेव्हा पण मी तुमच्या जवळ येते तेव्हा " आणि पुन्हा रडू लागली
अजय पटकन उठला
मीरा त्याच्या कुशीत होती म्हणून तिलाही उठावेच लागले
अजय " हे कधी पासून होतंय ?"
मीरा " जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा स्पर्श केलात तेव्हा पासून "
अजयाला पण घाम फुटला
मीराला आता कधीची तिची स्मृती येऊ शकते .. मी तिच्या विस्मृतीच्या गैरफायदा घेतला असेच वाटेल तिला
मीरा " मला भूत बाधा तर झाली नाहीये ना अजय .. मला भीती वाटते .. कोणीतरी परपुरुष माझ्या डोळ्यांसमोर येतो ? का ? कशासाठी ? आणि फक्त जेव्हा मी तुच्या जवळ असते तेव्हाच .. असे का होतंय ?"
अजय " आपण उद्या डॉक्टर कडे जाऊया .. आणि चेक अप करू ? कदाचित तुझ्या भूतकाळातील असेल कोणीतरी ?"
मीरा " कोणीतरी नाही ? ते डोळे तुमच्या मित्राचे आहेत ..रोहनचे .. मी ते डोळे लगेच ओळखले .. असे का होतंय ?"
अजय " मीरा , आय थिंक यु नीड रेस्ट .. तुझ्या टॅब्लेट्स कुठे आहेत ? घेतलीस का तू आज ?"
मीरा " नाही .. आज मला झोपायचं नव्हते .. ती गोळी खाल्ली कि मला खूप झोप येते म्हणून मी आज गोळी खाल्ली नाही "
बोलता बोलता अजयने उठून तिला तिची झोपेची गोळी खायला दिली ..
दोनच मिनिटात ती निद्राधीन झाली .. तिच्या अंगावर बँकेट टाकून तो ताडताड जिने चढून त्याच्या रूम मध्ये गेला
सकाळी मीरा उठली आणि तिचे आवरून किचन मध्ये माईंना डब्याचा मेनू सांगायला गेली तर तीला कळले कि अजय दोन दिवसांसाठी बिझनेस ट्रिप ला गेलाय .. साधं सांगून पण गेला नाही म्हणू न तिला वाईट वाटले
ती रियाला उठवायला गेली तर तिथे के चिट होती
डिअर रियू ,
डॅडा इज गोइंग आऊट फॉर २ डेज .. बी अ गुड गर्ल.. ओके .. टेक केअर ऑफ यु अँड युअर मम्मा . आय विल ब्रिन्ग लॉटस ऑफ चॉकलेट्स ओके .. टेक केअर .. लव्ह यु .. आय विल मिस यु "
डॅड
चिठ्ठी वाचून मीराचे डोळे ओले झाले .. किती छान बॉण्डिंग आहे दोघांचे पण वाईट वाटले कि साधे मला सांगावेसे पण वाटले नाही . बायको आहे मी त्यांची .. हे असे कोण वागत ? आता येऊच दे .. बायकोगिरी दाखवूनच देते "
अजय मीराचे सगळे मेडिकल डॉक्युमेंट्स घेऊन स्वित्झरलँड च्या एका स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे आला होता .. आधी तिची फाईल दाखवून मग तिला दाखवूं असा विचार केला त्याने .. तीचे सगळे मेडिकल रिपोर्टस त्या डॉक्टरांनी चेक केले .. ब्रेन स्कॅन रिपोर्ट्स त्यांनी नीट पाहिले .. विस्मृती कधी पासून होती , कोमात किती दिवस होती सगळे सगळे रिपोर्ट्स पाहिले

अजय बेचैन झाला होता .. काय सांगतील याची ओढ लागली हो ती त्याला तेवढयात डॉक्टरांनी त्याला बसवून समजावून सांगितले कि .. तिची स्मृती कधीच परत येणार नाही .. तिच्या मेंदूवर जो वार झाला होता त्यातच तिची स्मृती गेली आहे .. जी परत येण्याचे चान्सेस झिरो पेरसेन्ट आहेत .. एखाद्या कॅम्पुटरचा मदरबोर्ड डिस्ट्रॉय झाल्या सारखा आहे
अजय "पण तिला काही चेहरे डोळ्यासमोर येऊ लागलेत त्याचे काय ?"
डॉक्टर " आता मेमरी काहीच नाहीये त्यामुळे असे होऊ शकते .. तुम्ही त्या रिकाम्या मेमरीत जशा घटना भरत जातील तस तशा ते चेहरे पण निघून जातील .. १ दोन टक्के जो त्रास आहे तो तुम्ही आठवण करून देऊ नका कारण त्याने त्यांना त्रास होईल .. कधी कधी त्या बेशुद्ध होऊ शकतात .. जसा कॉम्पुटर हँग होतो तसाच ब्रेन ला काही ताळमेळ लागला नाही तर तो हँग होईल "
त्याला आठवले कि ति कोल्हापुरात रोहनचा फोटो बघून बेशुद्ध पडली होती
अजय "मला तिला तिचा सग ळा भूतकाळ सांगून टाकायचं आहे ? त्याशिवाय माझ्या जिवाला चैन नाही पडणार ? तुम्ही काय सजेस्ट कराल "
डॉक्टर "ते तुमच्यावर आहे .. कितीही तुम्ही सांगितलेत तरी त्या भूतकाळात जाऊ शकत नाहीत .. पण तुम्ही जे सांगाल त्यावर त्या कश्या रिऍक्ट होतील हे मी सांगू शकत नाही .. "
अजय "मला तिला मी फसवतोय अशी गिल्ट येतेय "
डॉक्टर " हि तुमची मानसिकता आहे .. त्याचा तिच्या आजाराशी काही संबंध नाही .. दोन वेगळ्या गोष्टी आहेत .. मी माझ्या पेशण्ट बद्दल बोलतोय "
अजय शांतच बसला
डॉक्टर " हे बघा अजय , बी प्रॅक्टिकल आता काय आहे , कसे आहे ते जास्त महत्वाचे आहे .. तिचा भूतकाळ ती विसरलीय हे तुम्ही एक्सेप्ट करत नाहीये .. तुमच्या मनात अजून तिचा भूतकाळ रेंगाळतेय .. टेक युअर टाइम .. सारखं सारखं तुम्ही माझ्या पेशंटला आठवून देण्याचा प्रयत्न करताय कि काहीतरी आहे , काहीतरी आहे आणि त्याला ते आठवतच नाहीये .. किती पीडा असेल त्या मेंदूला तुम्ही समजू शकत नाही .. तेव्हा मी सजेस्ट कारेन कि जे हि १ टक्के स्मृती मध्ये आहे ते सगळे फ्लश आऊट करून टाका .. त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या .. मेंदूवरचे दडपण मोकळे करून टाका त्यांच्या "

अजय " पण माझ्या मेंदूवरच्या दडपणाचे काय ? मी पण अस्वथ आहे ना " तो गळ्याची टाय लूज करत बोलला .. एकदम रेस्टलेस झाला होता तो
डॉक्टर " तिची स्मृती परत येईल अशी भीती वाटते तुम्हला ? राईट ?"
अजयने होकारार्थी मान हलवली
डॉक्टर " ओके जर समजा तिची स्मृती परत आली .. तर तुम्ही काही पाप केलंय का ? तुम्ही तिचे नुकसान केलंय का ? तुमच्या मु =ळे तिचा काही लॉस झाला आहे का ?\"
अजय ने नकारार्थी मान हलवली
डॉक्टर " मग घाबरता का आहेत ? जर तुम्ही तिला काही नुकसान केले नाही तर गिल्ट येण्याचे कारण काय ? "
अजय " माझ्या मित्राच्या बायकोशी मी लग्न केलंय ? " शेवटी तो खरंखरं बोलला
डॉक्टर " ओह आय सी "
अजय " तिला हे जेव्हा कळेल तेव्हा ती माझ्यावर चिडलेच ना .. आणि मला सोडून गेली तर .. माझे प्रेम आहे तिच्यावर "
डॉक्टर " तुम्ही तिचा नवरा असताना लग्न केलं का ?"
अजय रागानेच " काही काय बोलता ?"
डॉक्टर " तुम्ही तिच्या नवऱ्याचा मर्डर करून मग तिच्याशी लग्न केलं का ?"
अजयने रागानेच बघितले
डॉक्टर " तुम्ही तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तिच्याशी लग्न केले का ?"
अजय " डॉक्टर ? हे कसले प्रश्न आहेत ? हे असले करायला मी काय नीच माणूस आहे का ?" तो रागातच बोलला
डॉक्टर " म्हणजे ती खूप सुंदर आहे पण तुम्हांला तुमच्या मित्रा बरोबर तिला पाहवत नव्हते कारण तुमचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते म्हणून तिला फसवून ... "
अजय " ओह गॉड .. डॉक्टर .. प्लिज स्टॉप .. आय एम नॉट क्रिमिनल "
डॉक्टर " मग तिची किंव आली , दया आली , भीक म्हणून तुम्ही तिला जीवनदान देताय .. तुम्ही म्हणजे कोणीतरी महान आत्मा दिसताय . त्यागाची मूर्तीच दिसताय .. ए का विधवेला समाजात स्थान मिळवून देण्यासाठी एवढा मोठा त्याग केलाय .. बरोबर ना "
अजयने रागानेच टेबल वर हात मारला " जस्ट शट अप .. माझे प्रेम आहे तिच्यावर म्हणून मी तिच्याशी लग्न केलंय .. बाकी काही नाही .. तो डोळ्यांत राग आणून डॉक्टरांच्या डोळ्यांत बघून बोलला " आणि रागाने तिची फाईल समोरून उचलली आणि केबिन बाहेर जाऊ लागला
तेवढयात मागून डॉक्टर " हेच तुमच्या मनातल्या गिल्ट वरचं उत्तर आहे मिस्टर अजय " डॉक्टर एकदम शांतपणे बोलले .
डॉक्टर " जर तुम्ही काही चूक केली नाही तर कशाचे गिल्ट बाळगताय .. जरी तिला सगळे आठवले तरी तेव्हाही सत्य हेच आहे कि तुम्ही तुमच्या प्रेमासाठी लग्न केलंय .. मग का त्रास करून घेताय आणि देताय "
अजय एकदम शांत झाला .. बहुदा सगळी जाळी जळमटं , मनातले विचारांचे जंजाळ साफ झाले होते .. एका न्यूरो सर्जनने त्याला छान समजवून सांगितले होते
तिथून थोडा हसतच बाहेर पडला .. बाहेर आल्यावर मीराची खूप आठवण आली त्याला .. आज मीरा माझी आहे आणि तिची अशा पद्धतीने आठवण काढणे म्हणजे मी पाप करत नाहीये असेच वाटले त्याला
त्याने लगेच मीराला कॉल केला .. पण मीरा जी फुरंगटून बसली होती ती त्याचा फोन घेईना .. आणि हा उतावळा बेचैन झाला ..

🎭 Series Post

View all