मोह मोह के धागे भाग 29

Story Of Love
मोह मोह के धागे २९

क्रमश : भाग २८

मीरा सकाळी उठली तर अजय दोघींना मिठीत घेऊन झोपला होता . नक्की काय आहे ह्याच्या मनात हेच कळेना तिला ..प्रेम तर खूप करतो दोघींवर .. कदाचित पहिल्या बायकोची जागा मला देताना त्याला अवघड होत असेल .. म्हणून लांब राहतोय का ?
तेवढयात खाली देवाच्या पूजेची घंटी ऐकू आली .. आता उठले पाहिजे हे जाणवले आणि ती तिचे आवरून खाली गेली ..
दारात छान मन लावून मोठी रांगोळी काढली ..ओल्या केसांनी तुळशी वृन्दावनाला नमस्कार केला .. मन प्रसन्न झाले तिचे ..मनात नवीन नात्याला थोडा वेळ द्यावा सगळे एक दिवस ठीक होईल आशा मनात पालवीत झाली ..
आई " सुनबाई , छान रंग भरलेत आज रांगोळीत असेच आमच्या अजय च्या आयुष्यात पण रंग भरा "
तशी तिने त्यांना वाकून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला ..
मीरा " आईसाहेब , आज मी जेवण बनवले तर चालेल का ?"
आई " चालेल कि ? आता असे पाहुण्यासारखे विचारू नका .. हे घर , किचन सगळे तुमचेच आहे .. मला आत रिटायर करून टाका "
भाऊसाहेब " इतक्यात रिटायर होऊन कसे चालेल ? सगळ्या चाली रीती सुंनबाईंना शिकवा .. आपण नसताना त्यांनी त्या सगळ्या सांभाळल्या पाहिजेत .. काय सुनबाई ? कराल ना एवढं आमच्यासाठी "
मीरा लगोलग भाऊसाहेबांना पाया पडली " भाऊसाहेब , मी नक्कीच सगळे शिकून घेऊन आईकडून "
भाऊसाहेब " आता आज मस्तपैकी पुरणाचा स्वयंपाक होऊन जाऊ द्या "
मीरा हसतच " चालेल भाऊसाहेब .. मी लगेच तयारी करते " आणि मीरा आनंदातच किचन कडे पळाली ..
आईसाहेब " अहो , अजय उठला कि ह्या तिघांना अंबादेवीचे दर्शन करून येऊ दे .. अजय कधीही निघू शकतो "
तेवढयात अजय जिन्यावरून खाली आला
अजय " भाऊसाहेब , आज आम्हांला निघावे लागेल "
भाऊसाहेबी " ठीक आहे .. तुम्ही जावा , सुनबाई आणि रियाला काही दिवस राहू दे इकडे "
अजयचा चेहराच पडला आणि हे बघून आईसाहेब गालात हसल्या "
अजय " आई , मला चहा मिळेल का ? म्हणे पर्यंत मीराने नाश्ता आई चहाचा काप समोर ठेवला
अजय एकदम बघतच बसला तिच्याकडे .. एकदम एका दिवसात घरात रूळली होती ती .. जणू हे आता माझे घर आहे आणि ह्या घरातली सगळी माणसे आहेत

अजय " गुड मॉर्निंग "
मीराने फक्त मान हलवून रिप्लाय दिला .. आणि किचन मध्ये निघून गेली .. हा पाठमोरी मिराकडे बघत बसला .. तहान भूक हरपली त्याची .. आई साहेब लांबून सगळे बघत होत्या .. ह्या दोघांना थोडा एकांत मिळावा म्हणून त्या भाऊसाहेबाना घेऊन तिथून निघून गेल्या
अजय लगेच संधी दिसताच किचन मध्ये आला ..
अजय " मीरा .. "
मीरा " आ .. काही हवय का ? ती भाजी फोडणीस टाकता टाकता बालली
अजय " काय बनवतेय ?"
मीरा " आज पुरणाचे जेवण बनवतेय .. तुम्ही प्लिज आजच्या दिवस डाएट वगैरे बाजूला ठेवा "
काल काहीच झाले नाही इतकी सहज बोलत होती .. नाराज नव्हती ह्याचे त्याला आश्चर्य वाटले
अजय " तू कशी आहेस ? म्हणजे तुला जरा त्रास झाला होता ना काल म्हणून विचारले "
मीरा " त्रास तर झाला ? पण आता तो होऊन गेला .. तेच तेच धरून बसून कसे चालेल मिस्टर अजय .. लाईफ मस्ट गो ऑन "
अजय " आय एम इम्प्रेस्ड .. सगळ्याच गोष्टीकडे तू असेच बघशील तर आपले लाईफ एकदम सुरळीत चालेल "
मीरा " सगळ्या .. म्हणजे बरंच काही मी सोडून द्यावे असे काही आहे का तुमच्या आयुष्यात "
अजय " बरं चल .. दुपारी आज निघायचंय आपल्याला .. "
मीरा " लगेच ?"
अजय " हे बघ , मी काय सांगतो .. “ किचन बाहेर बघतच तिच्याशी हळू हळू बोलू लागला .. हळू बोलायला एकदम तिच्या कानाजवळ आला.. आणि सर्रकन काटा आला तिच्या अंगावर
अजय एकदम हळू आवाजात " मीरा , भाऊसाहेब तुला आणि रियाला इकडे थांब असे म्हणतील तर प्लिज तू नकार दे .. प्लिज . मला एकट्याला नाही जायचंय .. प्लिज तेवढं सांभाळून घे "
चक्क मिस्टर अजय थोडासा घाबरला होता कि आता आपली नवी कोरी बायको आपल्याला सोडून एक महिना इकडे राहून जाईल
मीरा " अहो , ते आपल्या घराण्याच्या सगळ्या चाली रीती मी शिकावं म्हणून म्हणत असतील ते "
अजय " म्हणजे , तुला पण रहायचंय का इकडे .. मी एकटा जाऊ का तिकडे ?"
मीरा " एकच महिन्यचा तर प्रश्न आहे ?"
अजय " शु\"... मी सांगतोय तेवढं कर ना मीरा .. का उगाच त्रास देतेय "
मीरा " मग तुम्हीं सांगाना भाऊसाहेबांना.. मला कशाला मध्ये घेताय उगाच "
अजय " हळू बोल ना .. मीरा .. बघ हा .. जर तू इकडे राहिलीस ना तर मी एकटा पॅरिसला निघून जाईन तेही महिन्यासाठी "
मीरा " मग तर मी इथेच राहते ? जाऊन या तुम्ही .. तुमचे ऑफिसचे काम असेल ना ?"
अजय " शट अप यार .. सांगतोय ते कर ना "
मीरा " बर .. बघते .. "
अजयने पटकन गालावर किशी दिली तिला .. " मस्त दिसतेय तू अशी इथे किचन मध्ये काम करताना "
मीरा " त्यात काय मस्त दिसायचं .. मी तर नेहमी सारखीच आहे "
अजय " पण आज माझी हक्कची बायको आहेस "
मीरा हसतच " हमम .. लग्न केल्याचा फील आलाय म्हणायचा म्हणजे तुम्हांला ?"
अजय " का तुला नाही आला .. हे सगळे विधी आपल नातं अजून घट्ट करत होते "
मीरा " हमम .. "
अजय " आपल्या आयुष्यातला एक विधी राहिलाय अजून ?"
मीरा " हो माहितेय मला .. आईसाहेब म्हणाल्या मला अंबादेवीच्या मंदिरात जायचं राहिलंय "
अजय " ते तर आहेच .. पण अजून काहीतरी "
मीरा " काय "
अजय पुन्हा कानाजवळ गेला " हनिमून " असे बोलला .. आणि तिची चलबिचल झाली एकदम
अजय " दिवाळीच्या सुट्टीत आपण पॅरिसला जाऊ .. तोपर्यंत तुझा पासपोर्ट विझा येऊन जाईल "
मीरा काहीच बोलली नाही
अजय " तू रागावली आहेस का माझ्यावर ? काहीतरी मनात आहे तुझ्या असे का वाटतंय मला ?"
मीरा " नाही काहीच नाही .. तुम्ही आता बाहेर बसा ना असे किती वेळ बोलणार ? कोणी पाहिलं तर ?"
अजय " ए हॅलो .. तू माझी लग्नाची बायको आहेस .. तुझ्याशी बोलायला मला वेळ काळ , जागा बघायची गरज नाहीये ? कळलं ना .. म्हणतच त्याने तिला कमरेला पकडून त्याच्याकडे वळवले
मीरा " अजय .. काय करताय .. कोणीतरी येईल ना .. भाऊसाहेब आहेत ह्याचे तरी भान ठेवा ना "
अजय वैतागातच " यार , तू पण ना "
म्हणतच किचनच्या बाहेर गेला आणि चहा नाश्ता ना करताच डायरेक्ट वरती गेली आणि कामात डोके घालून बसला
मीराने पण दुर्लक्ष केले आता तिला भाऊसाहेबांना पुरणाचा स्वयंपाक करून दाखवायचा होता
थोड्या वेळाने घरात पुरणाचा घमघमाट होता आणि आता नाश्ता न केल्यामुळे पोटात कावळे ओरडत होते एक माणसाच्या पण हक्काच्या बायकोने चक्क दुर्लक्ष तेही लग्नच्या तिसऱ्या दिवशी हे म्हणजे जरा अतीच झाले होते बिचार्याच्या बाबतीत
रिया आजी आजोबा बरोबर खुश होती , मीरा घरातल्या काम बरोबर खुश होती आणि अजय मात्र अजूनही एकटाच बसला होता
देवाला नेवैद्य दाखवायला भाऊ साहेबांनी त्यालाच बोलावली .. त्याला सुद्धा काही गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून
खाली आला .. पण आता तो तिच्याकडे पाहतच नव्हता .. भाऊसाहेब जे सांगतील ते करत होता ..
सगळे एकत्र जेवायला बसले .. भाऊसाहेब आणि आई अगदी भरभरून कौतुक करत होते जेवणाचे .. पण अजय एकदाही साधे मान वर करून तिच्याकडे बघत नव्हता .. तारीफ तर दूरच राहिली
मीराला जरा वाईटच वाटले
तेवढयात आई साहेबांनी तिला हातातले तोडे काढून दिले
आई साहेब " सुनबाई , हे आपल्या घराण्याचे तोडे आहेत .. जेव्हा आम्ही ह्या घरात पहिल्यांदा जेवण बनवले होते तेव्हा आमच्या सासूबाईंनी दिले होते .. आज पासून ह्यावर तुमचा अधिकार ...
मीरा " आई साहेब , ऐका ना .. राग मानू नका .. नुसते जेवण बनवले म्हणून ह्यावर माझा अधिकार होत नाही .. अजून मला तुमच्या हाताखाली खूप काही शिकायचे आहे .. तेव्हा द्या "
पण आई साहेबांनी हातात घालूनच दिले तिच्या .. तिने पुन्हा वाकून नमस्कार केला
भाऊसाहेबांनी तिला " एका कुलदेवतेचे पुस्तक दिले .. " सुनबाई ह्यात आपल्या कुलदेवीचे महात्म्य आहे तू वेळ काढून हे नक्की वाचून घेशील .. काही कळले नाही तर मला नक्की विचार "
मीरा " हो चालेल भाऊसाहेब "
ह्या सगळ्यांचे चालू होते आणि हा नुसताच शांत बसला होता .. रुसवा घेऊन
अजय " भाऊसाहेब , मला जावे लागेल .. माझे काम खूप बाकी राहिलंय ,माझा ऍक्सीडेन्ट , मग लग्न या सगळ्यात कामाकडे जरा दुर्लक्षच झालय .. आज निघेन म्हणतोय " चक्क तो त्याच्या पुरतं बोलून मोकळा झाला
भाऊसाहेब " चालेल .. मग आता दोघे मंदिरात जाऊन या आणि तुम्ही गेलात तरी चालेल .... मीरा , रिया राहतील काही दिवस "
अजयने मिराकडे एक क्षण बघितले कि ती काही बोलतेय का ? पण ती काहीच बोलली नाही .. याचा त्याला प्रचंड राग आला .. एवढं सांगूनही तिने आयत्या वेळी तोंड उघडले नव्हते .. म्हणजे तिला माझ्या बरोबर यायचंच नाहीये हे नक्की असा विचार करत ताड ताड रूम मध्ये गेला
तो गेल्यावर
मीरा " भाऊसाहेब , यावेळी रियाच स्कुल पण खूप बुडलंय .. परवा तिच्या मिसचा कॉल आला होता .. आता मी आणि रिया पण जातो .. पुढल्या वेळेस आले कि राहीन इथे चांगली महिना भर "
भाऊसाहेब " हो चालेल .. काही हरकत नाही .. "
तेवढ्यात अजय चेंज करून खाली आला
अजय " निघायचं मंदिरात .. मला निघावे लागेल .. लवकर "
मग सगळेच मंदिरात गेले .. अंबामातेचं नतमस्तक होऊन दर्शन घेऊन नमस्कार करून ओटी भरून मंदिरातून घरी आले ..
अजयने लगेच त्याची बॅग उचलली . रियाला उचलून घेतलं .. आणि खाली आला
"आई भाऊसाहेब , मी रियाला घेऊन जातोय .. तिच्याशिवाय मला करमणार नाही "
मीराने रागाने एक कटाक्ष टाकला त्याच्याकडे
मीरा " रिया , माझ्या बरोबर असेल "
अजय " रिया माझ्या बरोबर असेल "
रिया " मॉम डॅड .. आर यु फायटिंग ?"
मीरा आणि अजय दोघे एकदम " नो .. व्यिई आर जस्ट डिस्कसिंग "
रिया " इट लूक्स लाईक यु बोथ आर फायटिंग "
तशी मीरा रडतच धावत त्यांच्या रूम मध्ये गेली
आई साहेब " काय अजय ? दुखावलेस ना तिला ? किती आनंदात होती सकाळ पासून आणि तू .. तिने एवढं सगळं जेवण केलं तरी एक शब्दाने तीच कौतुक केले नाहीस .. आम्हांला हे असले वागणे पटतच नाही .. लग्नाआधी छान स्वप्न दाखवायची आणि मग लग्न झाल्यावर सत्य काहीतरी वेगळंच "
अजय " तसे नाहीये आई , तिला स्वतःला यायचं नाहीये तिकडे .. तिला इकडे राहायचंय .. मी उलट तिच्या मनासारखे होऊ दे म्हणून म्हणून एकटा चाललोय "
भाऊसाहेब " पण ती तर म्हणाली तुम्ही तिघेही जाताय .. आता तूच काय ते ठरव .. म्हणतच ते आत मध्ये गेले "
आईसाहेब रिया ला घेता का जरा .. मी मीराला घेऊन येतो खाली
अजय वरती त्याच्या रूममध्ये गेला तर ती मीरा बेड वर पालथी पडून झोपली होती . डोळ्यांच्या कड्यातून पाणी ओघळत होते
अजय " मीरा .. चल निघायचंय आपल्याला "
मीरा रडतच " मी नाही येत आहे .. जावा तुम्ही .. तेही तुमच्या लेकीला घेऊन जा .. तुम्ही नाही राहू शकणार तिच्याशिवाय .. "
अजय " मीरा .. मला तू पण हवीय .. चल ना "
मीरा " खोटं बोलू नका .. मला सत्य कळलंय .. मी नसले तरी चालेल तुम्हांला .. तुम्ही जाऊ शकता .. मी राहीन इथे आई भाऊसाहेबां बरोबर "
अजय "मीरा .. तू किती वैताग देतेस यार . म्हटलं ना .. चल ना आता .. मला उद्या सकाळी मिटिंग आहे "
मीरा " जा ना मग .. कशाला तुमचा वेळ वाया घालवताय माझ्यासाठी .. जा लवकर जा "
अजयने नीरज ला फोन लावला " नीरज , माझी ती मिटिंग कॅन्सल करून टाक .. मी नाही येत आहे "
अजय " हा पण आता काय करू ? नाही पोहचू शकणार मी रात्री "
रियाला घेऊन मी रात्रीचा प्रवास करत नाही आता उद्याच निघावे लागेल
तशी मीरा उठून बसली आणि उलट्या हाताने डोळे पुसू लागली
मीरा " चला , उगाच माझ्यामुळे तुमचे बिझनेसचे नुकसान नको "
अजयने तिचे डोळे त्याच्या रुमालाने पुसले
अजय " जायचं ? नक्की ना?"
मीरा " जा बाबा .. आता निघालीय ना मी .. का असे छळताय "
अजय " तू छळतेय मला "
तेवढयात आईसाहेबानीं हे वाक्य ऐकले आणि डोक्यावर हात मारून घेतला
आईसाहेब " अरे .. काय करताय दोघे . भांडताय काय ?"
दोघेही " भांडत नाहीय .. डिस्कस करतोय " असे बोलले तसे तिघेही हसू लागले
फायनली तिघे गाडीत बसून त्यांच्या शहरातल्या घराकडे निघाले .. आई आधीच पुढे गेल्या होत्या दोन दिवसांपूर्वी "
रात्री घरी पोहचल्यावर रिया स्वतःच्या घरी आल्यावर एकदम खुश झाली .. फ्रेश होऊन लगेच झोपून गेली .. मीरा मात्र .. आता मी नक्की कुठे जाऊ असा विचार करत खालीच तिच्या रूम मध्ये बसून राहिली
तेवढयात तिच्या रूमचे दार वाजले ति नुकतीच फ्रेश होऊन झोपायच्या तयारीत होती .. दार उघडले तर दारात अजय हजर

🎭 Series Post

View all