मोह मोह के धागे भाग 28

Story Of Love
मोह मोह के धागे भाग २८
क्रमश: भाग २७

मीराचं अचानक हमसून रडण्याने अजयला एक वेगळीच मानसिक शांती मिळत होती .. रोहन गेल्यापासून रोहनसाठी मीरा अजूनपर्यंत रडलीच नव्हती .. आज अचानक त्याचा फोटो पाहून मीराच्या आत्म्याने त्याला ओळखले होते आणि ती आपसूक रडायला लागली .. तिला मिठीत घेऊन शांतपणे डोळ्यांत पाणी घेऊन तो कितीतरी वेळ थोपटत होता ..आणि तिला रडून मोकळं करत होता ..
थोड्या वेळाने मीरा रडून दमली आणि डोळे मिटून त्याच्या कुशीत शांत पडून राहिली .. पण रोहनचे डोळे पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर आले .. आणि तिने पटकन डोळे उघडले .. अजयच्या जवळ असताना डोळे मिटल्यावर तिला नेहमी हे डोळे दिसायचे आणि आज तिला हे जाणवले कि हे डोळे ह्या रोहनचे आहेत
मीरा पटकन अजय पासून लांब झाली ..
अजय काळजीने " मीरा .. काय झाले ?"
मीराला हे अजयला कसे सांगू तेच कळत नव्हते कि तिने डोळे मिटल्यावर हे डोळे तिला दिसतात .. मीरा अजयच्या डोळ्यात पाहत होती ..एकटक
अजयने हात लावून तिला हववले " मीरा .. अग काय होतंय ? तू ठीक आहेस का ? "बोलतच तिला त्याने पाणी दिले
मीरा " अजय .. मी एक प्रश्न विचारू ?"
अजय " बोल "
मीरा " आज अचानक या मित्राचा फोटो तुम्ही मला का दाखवलात ? तुम्हांला मला काही सांगायचंय का ? किंवा मी जे विसरलीय ते ह्या तुमच्या मित्रा बद्दल आहे का ? "
अजयने चमकून तिच्याकडे बघितले
मीरा " सांगा ना अजय ? काय संबंध आहे ह्या तुमच्या मित्राचा आणि माझा ?"
अजयला काय उत्तर द्यावे कळत नव्हतं
मीरा " हे डोळे .. ह्या फोटोतल्या मित्राचे डोळे मला खुप त्रास देतात अजय .. कोण आहे हा नक्की ?" मीरा एकदम हायपर झाली होती .. आणि आता .. तिच्या चेहऱ्यावर घाम येऊ लागला होता .. डोळ्यांत तर भावनांचा समुद्र खवळला होता
अजय " मीरा .. टेक इट एझी .. काय होतंय तुला ?"
बोलेपर्यंत मीरा चक्कर येऊन अजयच्या हातात बेशुद्ध पडली ..
अजय खूप घाबरला .. मीरा ला रोहनचा फोटो दाखवून मी मोठी चूक केली कि काय असे त्याला वाटू लागले .. मीरा जर पुन्हा कोमात गेली तर या विचाराने त्याला घाम फुटला .. त्याला काही कळेना .. काय करू .. मीराला शुद्धीवर कशी आणू ?"
त्याने पटकन तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले .. आणि तिला गदागदा हलवू लागला " कम ऑन मीरा .. यु कॅन नॉट डू धिस टू मी .. मीरा .. वेक अप "
अजय तिला कंटिन्यूअसली हलवत होता .. तिच्या छातीवर पंपिंग करू लागला .. आणि फायनली मीरा एकदम शुद्धीवर आली .. तिने अलगद डोळे उघडले
आणि पडल्या पडल्याचं अजयच्या कुशीत शिरून रडू लागली
अजयने तिला पटकन हाताने उचलून बेड वर ठेवले .. तिला पाणी प्यायला लावले
अजय " कसे वाटतंय आता ?"
मीरा काहीच बोलत नव्हती .. फक्त त्याच्या भुऱ्या डोळ्यात एकटक पाहत होती
अजयने त्याच्या रुमालाने तिचा चेहरा कोरडा केला
अजय " उद्या सकाळी आपण निघतोय .. तुझा रेग्युलर चेक अप करायचा आहे "
मीरा " अजय , मला काही झालेलं नाही .. थोडे थकल्या सारखं वाटतंय .. मला झोपवस वाटतंय "
अजय " हो ठीक आहे .. तू आराम कर .. ड्रेस चेंज करून ये .. तोपर्यंत मी बेड ठीक करतो .. "
मीरा उठली आणि नाईट ड्रेस चेंज करायला वॉशरूम मध्ये गेली
अजयने फक्त तिच्याकडे एक नजर पहिले आणि मोठा श्वास घेतला ..
फुलं बिलं सगळी बाजूला काढून त्याने बेडरूम नॉर्मल केली .. पुन्हा रोहनचा विषय तिच्या समोर सध्यातरी काढायचा नाही असे ठरवून टाकले त्याने .. मीराच्या तब्बेतीपुढे सगळे शून्य होते .. आणि आता त्याला तिला गमवायचा नव्हतं .. जपायचं होत..
तेवढयात मीरा जराशी ऑकवर्ड होत नाईट ड्रेस घालून त्याच्या समोर आली .. आज पहिल्यांदा दोघे एकत्र झोपणार होते .. ती बाहेर आली तसा तो हि फ्रेश होयला गेला ..
अजय मनात विचार करू लागला " मला अजून लाईफ सिम्प्लिफाय करावी लागणार आहे . रोहन आता पास्ट आहे आणि तिच्या पास्ट मधल्या गोष्टी ती विसरलीय यात माझा काही दोष नाहीये .. मी असे वागून तिच्या वाट्याचे सुख उगाचच दुःखात कन्व्हर्ट करतोय .. आज आमची फर्स्ट नाईट होती याविषयी कदाचित ती आई म्हणते तशीही उत्साही असेल .. मी असे नको होते करायला " कितीतरी वेळ शॉवर खाली थांबून अजय विचार करू लागला ..
मीराला तिने नक्की कुणीकडे झोपावे काही कळेना आणि हा अर्धा तास झाला बाहेर येईना
शेवटी बाजूच्या आराम खुर्चीत बसल्या बसल्या ती झोपली
अजय बाहेर आला तर मीरा झोपून गेली होती ..
तिला दोन्ही हातावर उचलून त्याने बेडवर ठेवली .. तिच्या अंगावर पांघरून टाकले आणि बाजूला पडला .. पण आज त्याला झोप येईना .. ह्या गोष्टी कशा सोडवाव्यात काही कळेना त्याला . बेचैन झाला तो .. कधी मीरा माझी , कधी मीरा रोहनची .. हे असे विचार का मनात येतात .. आज तर माझा तिच्यावर आणि तिचा माझ्यावर संपूर्ण हक्क होता ..तरीपण .. मी असा वागलो .. आणि आमच्या दोघांच्या आयुष्यातला इतका मोलाचा क्षण घालवून बसलो ..
मीरा म्हणजे माझ्यासाठी सोन्याचे हरीण झाले आहे .. सीता मातेला त्या सोन्याच्या हरिणांचा मोह झाला तशी मीरा माझ्यासाठी .. छे .. हे काय बोलतोय मी .. माझे प्रेम आहे तिच्यावर .. आणि आता तिचेहि माझ्यावर प्रेम आहे .. ह्यात कसला आलाय मोह .. मोह म्हणजे रावणाला सीतेचा पडला तो होता मोह .. दुसऱ्याच्या पत्नीचा मोह रावणाला पडला .. पण .. मीरा पण तर रोहनची पत्नी आहे .. मग ह्या स्टोरीचा रावण मी आहे का ?"
अजय कसल्या बसल्या विचार चक्रात अडकून जाऊ लागला ..
विचार करता करता अजयला डोळा लागला .. तितक्यात त्याच्या रूमचे दार वाजले .. त्याने डोळे उघडले आणि मोबाईल मध्ये किती वाजले ते बघितले तर घड्याळात २ वाजले होते .. आता कोण दार वाजवेल तेही आज .. विचार करतच तो उठला आणि डोळे चोळत त्याने दार उघडले ..
बघतो तर रिया दारात डोळे चोळत उभी
अजयने पटकन खाली वाकून तिला उचलून घेतले
अजय \" हे .. काय झाले पिल्लू .. तू झोपली नाही का ?"
रिया थोडीशी नाराज " डॅड .. मला जाग आली तर माझा ड्रेस ओला झालाय .. सॉरी .. मी झोपेत सु सु केली "
अजय " ओह .. डिअर .. इट ओके .. यु आर लिट्ल गर्ल .. इट ह्यापन्स सम टाईम्स "
अजयने तिला बोलता बोलता वॉशरूम मंधे नेले.. हॉटवॉश दिला .. सगळे कपडे चेंज केले .. तिला फ्रेश केले .. आणि झोपायला बेड वर आणले ..
रिया " व्हाय .. मॉम इज हिअर टुडे ?"
अजय " बिकॉज नाऊ शी इज माय वाईफ "
रिया " मग आधी नव्हती का ?"
अजय " आधी पण होती "
रिया " मग आधी का नाही झोपायची ती तुझ्या रूम मध्ये ?"
अजय " कारण तिला बरं नव्हतं ?"
रिया " ओके .. बट आता आपण तिकडे गेलो कि पण ती तुझ्या रूम मध्ये शिफ्ट होईल "
अजय " येस .. तुला चालेल ना ?"
रिया " हो चालेल पण मी पण दोघांच्या मध्ये झोपेन .. चालेल का ?"
अजय " हो .. नक्कीच .. समटाईम्स यु कॅन "
रिया त्याच्या पोटावर झोपली आणि
तो गाणं गुण गुणत तिला थोपटू लागाला " सुरमई अखियों मे एक नन्हा मुन्हा सा एक सपना दे जा रे .. "
रिया त्याचे गाणे ऐकत शांत पडली होती तितक्यात अजयच्या एका दंडावर मीराने झोपेत डोके ठेवले आणि त्याला घट्ट पकडून ती झोपून गेली
त्याने लगेच त्या हाताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला ..
किती समाधान आले होते त्याच्या चेहऱ्यावर .. एका साईडला त्याची प्रिन्सेस आणि आता एका साईडला त्याची पत्नी .. त्याला बिलगून शांतपणे झोपल्या होत्या .. हाच तो क्षण त्याची तो आतुरतेने वाट पाहत होता .. या क्षणांत तो हि शांतपणे झोपून गेला ..
झोपताना रूमचे दार लावायला विसरून गेला
सकाळी जेव्हा आईंना जग आली तेव्हा रियाला आपल्या जवळ न पाहून त्या घाबरून गेल्या आणि लगेच अजयच्या रूम कडे आल्या .. रूमचे दार उघडेच होते त्यांनी आत मध्ये डोकावून पाहिले तर तिघे एकमेकांच्या कुशीत छान आरामात आनंदात , समाधानात झोपले होते .. आईनी बाहेरून दार घट्ट ओढून घेतले आणि त्याही आनंदात समाधानात खाली त्यांचे आवरायला गेल्या ..

🎭 Series Post

View all