मोह मोह के धागे भाग 25

Story Of Love
मोह मोह के धागे भाग २५
क्रमश : भाग २४
कसा बसा वर त्याच्या रूम पर्यन्त आला आणि बेड वर आडवा पडला .. औषध घेऊन झोपून गेला
रिया स्कुल मधून आली .. तिला आई माई आणि भाऊसाहेब अगदी हातावर झेलत होते .. घर आनंदाने भरले होते
पण
मीराला अजयचा खूप राग आला होता .. राधा त्याला अरे तुरे काय करत होती , फ्याइंग किस काय देत होती , हॉटी काय बोलत होती .. हे बरं त्याला सगळे चालत होते .. त्यावरून जळफळाट चालू होता मनात .
दुपारचे जेवण , संध्याकाळचा चहा सगळे आईने नेले .. पण लग्नाला आलेल्या मुलाला आईच्या हातचे जेवण गोड लागेना .. त्यात मीरा त्याचा फोन पण उचलत नव्हती .. नक्की काय झालंय .. हात जास्त दुखत नाही ना असे अनेक प्रश्न होते त्याला
आई " अजय , काही टेन्शन आहे का ?"
अजय " ते , मीराचा हात बरा आहे ना .. नाही म्हणजे नाहीतर डॉक्टर बोलावू या ?"
आई " नाही रे . इतकं नाही काही झालंय .. मी स्वतः बघून आलेय .. दोन दिवसात बरे होईल .. तिला आज म्हटले पाण्यात हात नको घालू आराम कर .. मग ती पण जेवून झोपली असेल "
अजय " आई , तुला मीरा सून म्हणून पसंत आहे ना .. भाऊसाहेब मना विरुद्ध तयार झाले .. पण कधी कधी वाटते कि तुमच्या पण माझ्याकडून अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करु नाही शकलो
आईने प्रेमाने हात डोक्यावरून फिरवला " अजय , नको इतका विचार करू ? आपण सगळ्यांना एका वेळी खुश नाही ठेवू शकत .. लग्न हे आयुष्यातला फार महत्वाचा टप्पा आहे . ते मना सारखच होयला पाहिजे .. "
अजय " आई , मीराला सत्य आठवले किंवा कळले तर... हि अशी एक भीती लागून राहिलीय माझ्या मनात "
आई " हो ना बाळा , ती एक टांगती तलवार आहे डोक्यावर .. मी समजू शकते "
अजय " बऱ्याचदा सांगावे असे वाटते पण ती खचून जाईल म्हणून मन धजावत नाही माझे "
आई " हो .. खरं आहे .. अजय पण आता हे विचार मनातून काढून टाक .. नाहीतरी तिचा नवरा आता हयात नाहीये आपण तिच्या भल्याचाच विचार करून हे सगळे करतोय "
अजय " आई , असे नाहीये काही .. तिची भेले करायचं म्हणून मी हे लग्न नाही करत आहे .. माझे प्रेम आहे तिच्यावर खरंखुरं "
आई " पण कुठेतरी ती एकटी काय करेल असाही विचार असेल ना मनात "
अजय " खरं सांगू आई .. तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केली तेव्हा सुद्धा मला तिची काळजी होती .. कारण माझ्या मित्राची बायको होती ती .. ती वाचली पाहिजे असेच वाटत होते .. डॉक्टरांची प्रोसिजर पूर्ण करें पर्यन्त डॉक्टरांनी रियाला माझ्या हातांवर ठेवली .. थरथरतल्या हातांनी तिला हातात घेतले आणि मी रियाचा डॅड झालो .. ह्या मुलीची सगळी जवाबदारी माझी आहे असे मला वाटून गेले ..
मीराच्या प्रेमात मी नंतर पडलो.. आता हि हे लग्न मी माझ्या साठी करतोय .. बिकॉज आय लव्ह हर .. आय वॉन्ट हर इन माय लाईफ "
आपल्या मुलाच्या विचारातील ठामपणा ऐकून आईला खूप छान वाटले
आई " मग आता हे प्रेम तुझ्या पासून कधीच लांब जाणार नाही ह्याकडे लक्ष दे .. ठीक आहे "
अजय " हो .. आई "
आई " चल .. थोडा चालून ये लॉनवर "
अजय " हो जातो .. "
भाऊसाहेब तयार लग्नाला तयार झाले ह्या एका गोष्टीने अजयला नाचावेसे वाटत होते ... खूप एक्ससाईट दिसत होता .. शेवटी त्याचे स्वतःचे लग्न होते आणि तेही त्याला पाहिजे असलेल्या मुली बरोबर ..
नीरज हि खूप खुश होता .. त्याच्या जिगरी दोस्ताचे लग्न होते .. शहरातले मोठं मोठे फॅशन डिझायनर घरात येऊ लागले, वेडिंग प्लँनर्स घरात फिरत होते .. भाऊसाहेब , आई आणि माई खूप बिझी झाल्या .. मीरा मात्र लज्जेने भरून गेली होती .. नुसता अजय दिसला तरी तिचे अंग मोहरून जायचे .. त्याची नजर बघून अस्वथ होयची .. तो आजूबाजूला असला कि रूम मध्ये पळायची .. तिच्या दृष्टीने तिचे पहिले लग्न होते .. दोघांची अवस्थ सेम होती ..
रिया , अजय आणि मीरा याचे तिघांचे ड्रेस मोठ्या डिझायनरला बनवायला दिले .. तिघांचे ड्रेस मॅचिंग एकमेकांना सूट होतील असे होते ..
लग्नाला दोन दिवस राहिले तेव्हा सर्वजण कोल्हापूरला गेले .. मोठ्या हॉल मध्ये धूम धडाक्यात लग्नाची तयारी झाली होती .. कशातच काहीच कमी नव्हती ..
मीराला लग्न होई पर्यंत आऊट हाऊस मध्ये ठेवले होते ..तिच्या हातांवर मेहंदी काढून झाली होती .. अजयच्या नावाची मेहंदी मीराने लावली होती ..
तिला आऊट हाऊस मध्ये ठेवली हे अजयला फारसे आवडले नव्हते .. पण नवरी हि लक्ष्मीच्या पावलानेच घरात आली पाहिजे म्हणून तिला आऊट हाऊस मध्ये ठेवली होती .. अजय आणि मीराचे काही खास असे बोलणे झाले नव्हते .. ती थोडी रागावली होती राधाच्या कॉलने हे त्याला माहित होते .. शिवाय तिचा हात हि त्याने नीट बघितला नव्हता ..
रात्री चान्स मिळाल्यावर हळूच त्याच्या कडच्या कीजने तो हळूच आऊट हाऊस मध्ये आला ..
मीरा बेडवर झोपली होती .. तिला शांतपणे झोपलेलं बघून एकदम शांत झाला तो .. तिला उठवावे असे वाटले नाही .. त्याने अलगद तिच्या हाताला पाहिले .. हात बरा झाला होता .. अलगद तिच्या कपाळावर किस करून तो निघणार होता .. त्याचे ओठ तिच्या कपाळावर असताना तिने दचकून डोळे उघडले .. आणि ती किंचाळणार होती कि त्याने तिचे तोंड हाताने धरले
ती पटकन उठून बसली .. एकदम घाबरली होती ती
अजय "मी .. मी आहे .. तुझा हात कसा आहे ते बघायला आलॊ होती .. घाबरू नको "
मीराला अजून धड धडत होते ..
अजय "रिलॅक्स , बाबा .. सॉरी .. मी घाबरवलं तुला " बोलतच तिला पाणी दिले त्याने .. तिनेही घटघट पाणी प्यायले
मीरा " तुमचा पाय कसा आहे आता .. फार ताण देऊ नका त्यावर "
अजय "हमम .. तू कशी आहेस ? राग गेला का माझ्या वरचा "
मीराने लगेच नाक मुरडले "अशा किती मैत्रिणी आहेत तुम्हांला ?"
अजय खो खो हसायला लागला "यु जेलस ?"हाऊ क्युट " बोलतच त्याने तिचे नाक ओढले
मीरा " ती तुम्हांला फ़्ल्याईन्ग किस देत होती .. ते चाललं तुम्हांला ?"
अजय " त्यात काय ? तिला वाटले तिने दिला .. मी थोडीच घेतला "
तसे मीराने त्याची कॉलर पकडली " मला नाही चालणार .. तुम्ही फक्त माझे आहेत .. कळलं "
अजय "ओके बाबा .. आता नाही करू देणार " आणि हसू लागला
मीरा "यु बेटर डू दयाट "
अजय "तू एवढी गुंडी आहेस मला माहित नव्हतं "
मीरा " मी ना .. लहानपणी माझ्या वस्तूला सुद्धा कोणाला हात लावून देत नव्हते .. आता तर तुम्हीं आहेत .. तुमच्याकडे वाकड्या नजरेने कोणाला बघून पण देणार नाही "
अजय "काय करशील ग ? "बोलतच तो तिच्या शेजारी हसत हसत बेडवर आडवा पडला
मीरा "मी .. ठोकून काढेल तुमच्या त्या राधाला .. "
अजय "तिला ना मग ठीक आहे .. मला वाटले मला पण ठोकणार कि काय ?"
मीरा " तुम्हांला .. मी वेगळी शिक्षा देईन "
अजय एकदम सिरिअस होऊन ऐकू लागला \"
अजय "बोला काय असेल आमची शिक्षा ?"
मीरा "मी .. मी .. खाली माझ्या रूम मध्ये शिफ्ट होईन .. मला जेव्हापण तुमचा राग येईल तेव्हा "
अजय " मग मी पण तिकडेच शिफ्ट होईन "
मीरा "अजिबात घेणार नाही मी माझ्या रूम मध्ये "
अजय "मग मी उचलून घेऊन जाईन तुला आपल्या रूम मध्ये ?"
मीरा "मी उचलून देणारच नाही तुम्हांला मला "
अजय "मी .. उचलू शकतो तुला .. कधीही तू काही करू शकणार नाहीस माझ्यापुढे "
मीरा " नक्की ना .. "
अजयला तिच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही
अजय " नक्की ना म्हणजे ?"
मीरा " अजय , मी रुसले तर तर मला मनवायला याल ना नक्की .. मी वाट बघेन तुमची " ती भरल्या डोळ्यांनी बोलली
अजय " हे .. मीरा , आपण आता का बोलतोय या विषयावर .. आणि तू रडते काय ?"
मीरा " अजय .. या जगात तुमच्या शिवाय माझे कोणीच नाहीये .. असले तरी मला आठवत नाहीये .. माझे काही चुकलं , मी कधी रुसले कधी भांडले तर मला एकटीला सोडणार नाही ना तुम्हीं .. मी कुणीकडे जाऊ .. "
अजयने तिला पडल्या पडल्या त्याच्या कुशीत घेतले .. " मीरा , कशाला निगेटिव्ह विचार करतेय .. माई आहेत , आई , भाऊसाहेब आहेत , रिया आहे .. माझ्या शिवाय एवढे जण आहेत तुझ्या बरोबर .. तू आता ऐकटी नाहीयेस.. आणि लवकरच आपण रियाला सोबत म्हणून दादा पण आणू मग तर काय बाबा .. मलाच तुझे पाय धरावे लागतील .. मला सोडून जाऊन नकोस म्हणून "
तशी मीरा रडता रडत खुद्कन हसली ..
अजय " आणि एक सांगू का ? कितीही भांडण झाले ना तरी आपल्या रूम मधून तू बाहेर जायचं नाहीस .. आधीच मला प्रॉमिस कर .. जे काही असेल ते आपल्या बेडरूम मधेच असले पाहिजे .. आपण रूम मध्ये कराटे खेळू पाहिजे तर .. पण रूम बाहेर आपण आनंदी एकत्र आहोत असेच वाटले पाहिजे "
मीरा "त्याची वेळच येणार नाही .. मला माहितेय .. तुम्ही माझ्याशी कधीच भांडण करणार नाही "
अजय " असे काही नाही .. मी लग्न केले म्हणजे मी काय लगेच \"जोरू का गुलाम वगैरे बनणार नाहीये " तो हसत म्हणाला
मीराने नाक वाकडं करून त्याला चिडवलं आणि तो पुन्हा खळखळून हसला
लग्ननानंतरची स्वप्न बघत दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले .. तिला झोपवून मग अजय त्याच्या रूम मध्ये गेला
----------
नीरज " अजय , फायनली यु आर गेटिंग मॅरीड .. आय एम सो ह्यॅप्पी "
अजय " थँक्स ब्रो .. "
नीरज " मग , हनिमूनचे पॅकेज माझ्या कडून .. बोल कुठली तिकिट्स देऊ "
अजय " नो .. नो .. मी आधीच तयारी केलीय त्याची "
नीरज " अरे वाह !! मेरे शेर .. सगळी तयारी आधीच केलीस " म्हणत त्याला गुदगुल्या करू लागला
अजय " स्टॉप इट नीरज .. " आणि हसू लागला
नीरज " मग कुणीकडे .. आ .. आ .. स्वित्झर्लंड कि पॅरिस "
अजय " द्याट्स माय सिक्रेट "
नीरज " अरे .. डोन्ट वरी .. मी काय जासूस लावणार नाहीये तुझ्या मागे तिथे आणि हसू लागला
अजय " लग्न झाले कि सांगेन .. अजून अक्षता डोक्यावर पडल्या नाहीत माझ्या "
नीरज " का रे ? काही टेन्शन आहे का ?"
अजय " तेच ते रे .. मीराच्या भावाला फाशीची शिक्षा झालीय .. तिचे पेरेंट्स मला भेटले काल .. म्हणत होते .. आमच्या मुलाला .. निदान जन्मठेप होऊ द्या तुम्ही काही तरी करा "
नीरज " व्हाट ? हे कधी झाले ? मग तू काय केलेस ?"
अजय " काय करू ? आहे तर तो माझा साला .. काय करू तेच समजत नाहीये "
नीरज " हि इज क्रिमिनल ... डोन्ट इव्हन थिंक"
अजय " तिचे आई बाबा तिला गाठून काही सांगायचे नाहीत ना .. मला त्याच टेन्शन आहे .. ती बाहेर गेली कि टेन्शनच येते .. काल पार्लरला गेली होती .. ती येई पर्यन्त जीवात जीव नव्हता "
नीरज " डोन्ट वरी .. मी सिक्युरिटी वाढवतो .. तू काळजी करू नकोस .. तू आता फक्त तुझा आणि तिचा विचार कर .. बाय द वे .. रियाला माझ्या कडे ठेवलस तरी चालेल. मी सांभाळेन तिला .. तू बिनधास्त लग्नात वावर "
अजय " थँक यु .. पण मीरा जशी माझ्या लाईफचा पार्ट आहे तशीच रिया पण आहे .
नीरज " बरं बाबा .. तुला जसे योग्य वाटेल तसे कर .. चल निघतो मी .. "

🎭 Series Post

View all