मोह मोह के धागे भाग १९

story of love

मोह मोह के धागे भाग १९

क्रमश : भाग १८

महादू " संजय , आज माझे अंग लई दुखतंय .. तू वाईच मसाज कर?" ओळखे पिळोखे देत महादू संजयला धूर्तपणे म्हणाला .. त्याला आयता  सेवक मिळाला होता आणि आता त्याचा वापर स्वतःची मालिश करून घ्यायला पाहिजे होता ..

संजय एकदम गोड हसला " अरे .. ये तो मेरे दाये हात का खेल  है .. अस मालिश करतो ना कि .. नानी याद आयेगी ..अं म ... म .. म्हणजे लै भारी वाटेल तुम्हांला .. फक्त माझी एक अट आहे ?"

महादू " अट ?कसली अट ?"

संजय " आधी मला मस्त गरमा गरम जेवण जेवायचंय .. मस्त भाकऱ्या आणि आणि भाजी पाहिजे मला "

महादू " सांगतो कि मग .. आपण दोघे आधी खाऊन घेऊ मग करू मालिश ?"

संजय " नाही नाही .. तुम्ही न्हाई खायचं .. भरल्या पोटी मालिश करायची नसते .. तुम्ही उपाशीच रहायला पाहिजे "

महादू " अस्से हाय व्हय "

संजय " व्हय "

महादू " बरं मग आपण दोघ आधी नदीवर जाऊन येऊ मग जेवण करू ?'

संजय " आता मी तुंम्हाला मालिश करणार म्हणजे मी थकून कसा चालेल .. त्या पेक्षा मी ह्या  बा जावर  झोप काढतो .. तोपर्यंत तुम्ही या नदीवर जाऊन "

महादू  नाराजीतच गोठ्याकडे गेला

महादू " ए .. बाई .. ए .. अग ए बाई .. म्या नदीवर जाऊन येतोय .. तोपर्यंत भाकऱ्या अन भाजी करून ठिव .. आणि आज जरा जास्त कर .. पावन आलंय "

आतून होकारा खातीर पातेलं खाली पडलं

महादू नदीवर अंघोळीला निघाला ..

याच क्षणांची संजय आतुरतेने वाट बघत होता .. आतुरतेने श्वास वाढला होता .. कधी एकदा हा निघून जाईल आणि कधी मी माझ्या लेकीला घट्ट मिठीत घेईन असं झाले होते त्याला

महादू त्याचे कपडे घेऊन नदीवर गेला .. तसा तो धावतच गोठ्याकडे गेला .. रिया पेंढयात बसली होती .. आणि गोठ्याच्या मागच्या अंगणात शेणाच्या गवऱ्या बनवत होती ..

त्याने धावतच जाऊन रियाला उचलून घेतले आणि तिच्या कपाळावर , गालावर हजारो किशी देत होता .. डोळ्यांत पाणी आले त्याच्या  एव्हाना रियाला पण कळले कि हा आपला डॅड आहे

रिया पण मुसमुसत त्याला बिलगली " डॅड , आय मिस्स्ड यु .. सी डॅडा आय ह्याव रॅशेस ऑन  माय बॉडी " आणि ती त्याला तिचे रॅशेस दाखवत होती

अजय " ओह !! बेबी .. डोन्ट वरी आय विल टेक यु टू द डॉक्टर अंकल "

तेवढ्यात मीराने आत मध्ये पाहिले तर तो आलेला माणूस आपल्या मुलीला उचलून तिला किशी देत आहे बघितल्यावर ती घाबरली  .. हातावर पाणी घेऊन धावतच आत आली डायरेक्ट त्याच्या पायात

मीरा " माझ्या मुलीला काही करू नका ... मी पाया पडते तुमच्या .. प्लिज .. तिला खाली ठेवा .. तिला माझ्या पासून दूर करू नका "आणि घाबरून रडू लागली

अजय आणि रिया दोघे एकेमेकांकडे बघून डोक्यावर हात मारून हसू लागले

अजय ने रियाला खाली उतरवले.. अजूनही मीराने त्याच्या चेहऱ्याकडे बघितले नव्हते

अजयने तिला खांद्याला धरून वरती उचलले

त्याने तिच्या खान्द्याला हात लावला म्हणून मीराने एक रागाने भरलेला कटाक्ष त्याच्याकडे टाकला .. आणि जशी तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर पडली तशी रागाने भरलेल्या त्या नयनांमध्ये प्रेम भरून आले आणि डोळ्यांतून मोठे मोठे अश्रू ओघळले .. आज पहिल्यांदाच दोघांना समोरा समोर आल्यावर काहीतरी वेगळेच फील झाले होते . श्वास भरून आले होते दोघांचे .. तिचे रडताना तिचे ओठ थरथरले आणि कंठ दाटून आला

मीरा " अहो .. " हळूच बोलली आणि कसलाही विचार न करता अजय ने तिला घट्ट मिठीत घेतले ... घट्ट कवटाळून घेतले दोघांनी एकमेकांना .. शब्दांची  गरजच नव्हती .. दोघे एकमेकांच्या बाहू पाशात विरघळत होते ..

रिया " मम्मा .. डॅड माझा आहे "

तसे दोघे हसले आणि वेगळे झाले ..

मीरा डोळे पुसतच " रिया , डॅड आपल्या दोघींचे आहेत "

रिया " नो ... डॅड लव्हज मी मोअर "

मीराने नाक मुरडले " कदाचित रिया बोलली हेच सत्य होते

रिया " यु नो मम्मा .. आय गॉट लॉट्स ऑफ किसेस अँड यु डिड नॉट गॉट  अ  सिंगल किस  मीन्स डॅड ल्व्ज मी मोअर "

मीराला एकदम लाजल्या सारखेच झाले आणि पटकन तिने डोळे खाली घेतले

अजय ला पण असे वाटले कि जेवढ्या हक्काने मी रियाला किस केलं तेवढ्या हक्काने मी निदान तिच्या कपाळावर तरी किस करायला पाहिजे होते .. आता त्याने एवढे तर नक्की स्वीकारले होते कि रोहन इज नो मोअर अँड रिया अँड मीरा आर पार्ट ऑफ माय लाईफ .. सो माझा मीरावरही तेव्हढाच हक्क आहे "

अजयने बाजू सावरण्यासाठी लगेच तिला पुन्हा एक हाताने मिठीत घेतले आणि तिच्या कपाळावर किस केले " आय मिस्ड यु मीरा .. अँड व्हेरी सून यु विल गेट पनिशमेंट फॉर लिविंग अलोन "ह्यावेळी त्याने जरा घट्टच तिला जवळ घेतले होते .. आणि मीरा त्याच्या अधिकार युक्त झालेल्या स्पर्शाने मोहरून गेली

अजय " मोस्ट इम्पॉरटंट थिंग .. मी अजय आहे हे कोणाला कळले नाही पाहिजे .. सो रिया डोन्ट कॉल मी डॅड डोन्ट टॉक टू मी  .. कोण आहे ह्या प्लॅन मागे हे कळले पाहिजे .. दोन दिवसात आपण आपल्या मेन्शन मध्ये असू .. फक्त आजचा दिवस आपण इथे थांबू "

रिया एकदम खुश झाली .. आणि खाली उतरून पळतच गोठ्यातल्या वासरा मागे पळाली

अजय आणि मीरा तिच्या कडे आनंदाने बघत राहिले .. तेवढयात अजय मीराला काही कळायच्या आत तिच्या एकदम जवळ आला .. आणि एकदम तिच्या ओठांवर हलके किस केले

मीराचे डोळे बटाट्या एवढे मोठे झाले

अजय लगेचच लांब झाला " आय लव्ह  यु .. "

मीरा हसतच बाहेर पळाली

अजय " ए हॅलो ... यु लव्ह मी ना ?" असे बोले पर्यंत मीरा त्याच्या नजरे आड झाली

दोघांच्याही हृदयात हलचल झाली होती .. नुसतीच ती हवी आहे , आवडते , प्रेम आहे ह्याच्या पलीकडे आता माझा तिच्यावर हक्क आहे आणि तिला स्पर्श करायला मला कोणाची परमिशन नकोय हा कौल त्याला त्याच्या मनाने दिला  होता .. तिला केलेला तो स्पर्श अजूनही त्याला जाणवत होता आणि बेचैन करत होता .. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून त्याने पाहिले तर त्यालाही जाणवले " धक धक... " त्याची होत असलेली अवस्था बघून तो स्वतःवरच हसू लागला

 आज आत्ता या क्षणाला तिघेही खूप खुश होते

अजय खुशीतच बाहेर येऊन त्या बाजेवर झोपला  ... आणि हसतच एक गोड स्वप्न बघू लागला ..

धक-धक करने लगा, हो मोरा जियरा डरने लगा
सैंया बैंया छोड़ ना, कच्ची कलियाँ तोड़ ना
दिल से दिल मिल गया, मुझसे कैसी ये हया
तु है मेरी दिलरुबा, क्या लगती है, वाह रे वाह
धक धक करने लगा...

अपना कहा जो पिया तूने मुझे, मैं मीठे-मीठे सपने सजाने लगी
देखा मेरी रानी जब मैंने तुझे, मेरी सोई-सोई धड़कन गाने लगी
जादू तेरा छाने लगा, मेरी नस-नस में समाने लगा
ख़ुद को मैं भुलाने लगा, तुझे साँसों में बसाने लगा
रिश्ता, अब ये रिश्ता, साथी टूटेगा न तोड़े कभी
दिल से दिल मिल गया...

उलझी है काली-काली लट तेरी, ज़रा इन ज़ुल्फ़ों को सुलझाने तो दे
इतनी भी क्या है जल्दी तुझे, घड़ी अपने मिलन की तु आने तो दे
ऐसे न बहाने बना, मेरी रानी, अब तो बाहों में आ
ऐसे न निगाहें मिला, कोई देखेगा तो सोचेगा क्या
मस्ती छाई है मस्ती, आके लग जा गले से अभी
धक-धक करने लगा...

अजय बाजेवरच्या उशीला कवटाळून गाढ झोपला होता .. तेवढ्यात महादू आला ..

महादू जोरातच रियावर खेकसला " ए .. पोरी .. कितीदा सांगितलं तुला ? त्या वासराच्या मागे पळू नकोस .. कशाला त्याला पळवतेस ?"

तशी रिया एकदम घाबरली आणि मिराकडे रडत गेली

महादू " ए बाई , केल्यास का भाकऱ्या ? चल जेवायला वाढ "

तसा अजय रागाने लाल झाला .. " ह्याची हिम्मत कशी झाली माझ्या पोरीवर आणि बायको वर ओरडायची ? म्हणून तो जोरातच त्याला ओरडणार होता पण त्याला त्याच्या कपड्यांवरून आपण कुणीकडे आहोत ह्याचे भान आले

मग दोघे मीराच्या हाताचे भाकरी भाजी चे जेवण जेवला .. डोळ्यांत पाणी होते त्याच्या .. चुलीवर जेवण करताना तिला बघून .. पण हातची चव .. आज बऱ्याच दिवसांनी तो पोट भरून जेवला होता .. मीराने तिच्या हाताने एक घास तरी भरवावा असे त्याला वाटत होते पण आत्ता ते शक्य नव्हते .. रिया त्याला खांबा अडून बघत होती .. डोळे रडून लाल झाले होते तिचे ..

अजय " महादू राव , चला आपली मालिश राहिली आहे "

महादू " हो .. मी वाटच बघतोय .. "

मग काय अजयला जो जोर चढला होता .. महादूला मालिशच्या नावाखाली अजयने हाताने लाथेने तुडव तुडव तुडवले .. आणि खांबा मागून रिया आणि मीरा गालात हसत होत्या .. आणि महादूचा आवाज येत होता " आई ... आई  .. ग ... आई .. आई ग "

अजयमनातच  " साल्या .. आताच तुला स्वर्गात पाठवले असते पण अजून खरा सूत्रधार कोण आहे हे मला कळले नाहीये .. म्हणून मी गप्प आहे "

महादू ला मालिश इतकी भारी पडली होती कि जो झोपला ते दिवसभर उठलाच नाही .. आणि अजय पण इतका दमला कि तो हि झोपून गेला ..

ह्या दोघी मात्र एक मेकींना टाळ्या देऊन किशी देत होत्या ..

--------------------------------------

संध्याकाळी महादू कसा बसा रात्रीचे जेवायला उठला आणि पुन्हा झोपून गेला ..

अजय ला हेच पाहिजे होते .. त्याला रिया आणि मीरा जवळ वेळ घालवायला मिळणार होता .. रोज रात्री रिया डॅडा .. डॅडा.. करून रडायची .. महादू ला जरा म्हणून रियाने झोपून दिले नव्हते .. पण आज .. आज रिया एकदम शांत कशी काय ? म्हणून महादुला थोडे आश्यर्य वाटले

महादू " ए बाई .. तुझी लेक आज रडत न्हाई का ? डॅडा .. डॅडा  करून "

संजय " म्हणजे काय हो महादू राव ?"

महादू " अरे या पोरीने एक रात्र बी मला झोपून दिली नाय .. रोज रात्री रडत बसतेय .. "

अजयला एकदम भरून आले .. पोरीची अशी झालेली आबाळ त्याला सहन होत नव्हती .. एखाद्या प्रिन्सेस सारखी तीला सांभाळली त्याने आणि आता ह्या पेंढ्यात "

मीरा ने तिला मांडीवर घेतले आणि अंगाई गाऊन तिला झोपवू लागली ..

रिया " मम्मा .. तो मामा .. आपल्या डॅडला काही करणार नाही ना .. तो किती डेंजर आहे ना "

बिचारी  रिया तिथे येणारा  माणूस ज्याला ती मामा समजत होती त्याला बघूनच घाबरली होती . तिच्या समोर त्याने एका माणसाला खुप मारला होता

मीरा " डोन्ट वरी रिया , डॅड इज व्हेरी स्ट्रॉंग .. "

रिया एकदम खुद्कन हसली " सकाळी त्या महादू मामाला कसे मारलं ?

मीरा पण हसली

(माझे सर्व वाचक एकदम छान आहेत .. त्यांना लगेच कळले होते कि संजय दुसरा कोणीही नसून अजय आहे .. मज्जा आली कमेंट्स वाचताना .. अ  बिग थँक यु टू ऑल माय रीडर्स .. सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचतेय .. पण रिप्लाय द्यायला होई ना . सॉरी .. उद्या अजून एक भाग पोस्ट करण्याचा नक्की प्रयत्न असेल)

हा भाग कसा वाटला नक्की सांगा स्पेशली गाणे .. हा...  हा ... अजय मीरा मला त्यात दिसले या सिचवेशन ला )

🎭 Series Post

View all