मोह मोह के धागे भाग 18

Story Of Love


मोह मोह के धागे भाग १८

क्रमश: भाग १७

(काय मग वाचकहो अजय वर रागावले ना सगळे .. आता अजून गम्मत आहे .. आजच्या पार्ट मध्ये नवीन पात्राची एंट्री आहे .. )

अजय इटलीला पोहचला .. जे काही पेपर्स साईन करायचे होते ते त्याने केले आणि नवीन बिझनेझ डील सुरु झाली .. इकडे न्यूज मध्ये इटलीला असलेल्या अजयची सर्वजण तारीफ करत होते .. मोस्ट एलिजिबल बॅचलर भारताचे आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करत आहे .. एक मोठ्या इटालियन कंपनीतले ५० टक्के शेअर्स विकत घेऊन त्यांनी मोठे काम केले आहे .. त्याचे टीव्ही वर इंटरव्यूह्ज येत होते ..
हे सगळे बघून भाऊसाहेबांची छाती गर्वाने फुगली ... आणि नीरज मनोमन आनंदित झाला ..
नीरजने त्याला कॉल केला
नीरज " अरे वा !! मेरे बैल .. तू तो छा गया "
अजय " बैल ??? .. हि कसली तारीफ ?"
नीरज हसतच " अबे !! इंग्लिश मध्ये हँडसम हंक बोला तो चलता है .. मराठीत हंक म्हणजे बैलच असते .. ते नाही का चालत "
तसे दोघे मोकळे हसले ..
अजय " बर चल .. आता कोणती तक्रार नाहीये माझ्या बद्दल .. "
नीरज " नाही रे .. आय एम प्राऊड ऑफ यु "
अजय " ऐक .. आय नीड सम ब्रेक .. मी आता वल्ड टूरला जातोय .. सो आता माझा फोन बंद असेल .. मी सगळा हॅन्डओव्हर तुला दिला आहे .. यु आर फ्री टू टेक डिसिजन्स "
नीरज " अबे !! इतना भरौसा मत रख !! तुने बाजीगर फिल्म देखी नहीं क्या ? मदन चोप्रा "
अजय " मी माझ्या आजू बाजूला फार मोजकीच माणसे ठेवतो .. पण अशी माणसे ठेवतो कि ज्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ते जान पण देऊ शकतात .. त्यामुळे (पुढील वाक्य तो शाहरुख च्या स्टाईल ने म्हणतो " मदन चोप्रा ... तू त्रिशूल नहीं घुसायगा मालुम हैं " पुन्हा दोघे खळखळून हसले
नीरज " अजय .. दोज वेअर डेज .. किती मस्ती करायचो आपण .. बाजीगर ची पारायणं करायचो "
अजय " हमम . म्हणूनच आता जरा मोकळा फिरून येतो .. मला पण समजेल व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम धिस लाईफ "
नीरज " ग्रेट .. खूप चांगला विचार केला आहेस .. मेरे शेर .. मस्त एन्जॉय कर .. यु डिझर्व इट "
अजय " ओके बाय "
नीरज " बाय टेक केअर .. एन्जॉय "
अजय " बाय .. आणि घरीही लक्ष ठेव जरा "
नीरज " हे काय सांगायची गरज आहे का ?"
अजय " नाहीये .. पण माझे कर्तव्य आहे "
नीरज " हमम .. बाय चल .. बायको वाट बघतेय माझी " बोलतच त्याने कॉल कट केला
अजय एकदम शांतच झाला .. \" बायको वाट बघतेय.. मीरा पण माझि वाट बघत असेल का ? रिया .. तर माझ्या शिवाय रात्रीची झोपत नाही .. आज १० दिवस होऊन गेले .. दोघीही जणी कशा असतील "
जेवढा त्या दोघीं पासून लांब पळायचा प्रयत्न करत होता तेवढाच तोओढला जात होता
-----------------------------
रिया रडून रडून नुसता गोधळ घालत होती .. गोठ्यातली जनावरं (गाई .. म्हशी ) तिच्या आवाजांने ओरडू लागली .. त्यांचे बघून राखणदार म्हणून असलेली कुत्री भुंकायला लागली .. तिथे नुसता गोंधळ सुरु झाला .. त्या दोघींवर लक्ष ठेवायला ठेवलेला माणूस .. झोपलेला तो उठला ...
" काय त्रास आहे ह्या पोरीचा .. असे वाटतंय .. गळाच दाबून टाकावा .. नुसतं री .. री .. रडतंय .. सारखा आपला डॅडा ... डॅडा .. कसला डॅडा "
त्याने बाहेरची मोठी काठी हातात घेतली आणि रागातच गोठयात गेला ..
महादू " ए पोरी !! आवाज बंद करतेस का ? मारू .. तुझ्या आईला मारू .. आणि त्याने जोरातच एक काठी जमिनीवर आदळली .. त्याचे मोठे मोठे रागाने लाल झालेले डोळे बघून रियाने घाबरून मीराच्या मांडीवर सु केली .. आणि दातखिळी बसल्या सारखी झाली तिला ..
मीरा " काही नाही करत आला ते आपल्याला .. नको घाबरू तू .. आणि तिने तिला छातीशी कवटाळले "
महादू " ए बाई !! काय किट किट आहे ग .. थोबाड बंद कर हा तिचे .. नाहीतर दोघींचा गळा दाबून मारून टाकीन "
मीरा पण जारा घाबरलीच .. \"
रियाच्या तोंडावर तिने पटकन हात ठेवला ..
तो माणूस माघारी जाऊन परत झोपला ..
मीरा पण जोर जोरात रडू लागली " अहो !! तुम्ही कुठे आहात .. आम्हांला दोघीना घेऊन जा इथून "
मीरा " रिया .. डॅड आले ना कि त्या मामाला चांगला फटके देतील .. तू घाबरू नकोस हा "
रिया रडतच " डॅड कुठे आहेत ? आपण इकडे का आलोय ? मम्मा .. आपण आपल्या घरी कधी जायचं ? मला नाही रहायचं इथे ?"
मीरा " हो रे शोना .. आपण लवकरच जाऊ "
------------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी महादू बाजेवर झोपला होता .. मीरा सगळ्या गाई म्हशी धुवत होती .. गोठा साफ करत होती .. चुलीवर गरम गरम भात शिजवत होती .. तिकडे बाजूला पेंढ्यात मीराच्या स्कार्फ वर रिया एक साईडला झोपली होती ..
तेव्हढ्यात एक माणूस धोतर , त्यावर पांढरा सदरा .. पायात कोल्हापुरी चपला, पिळदार मिशी , आणि थोडीशी दाढी .. कमरेला बांधलेल एक कापड .. असा चालत आला
तो माणूस महादूला उठवू लागला
महादू " कोण हाय रे , झोपू दे कि वाईच !! रातच्याला पोरीने रडून झोप बिघडवली आता कोण आलंय भल्या सकाळी "वैतागातच महादू उठला
महादू त्याचे पिळदार आणि आपल्या पेक्षा ताकदवान शरीर बघून जरा नरमला
महादू " कोण म्हणायचं पावन तुम्ही "
तो म्हणू " महादू तुम्हीच काय ?"
महादू " व्हय जी !! तुम्ही कोन "
तो " मी ... संज्या !! ते .. आपले नाना आहे ना त्यांचा मुलगा "
महादू " कोण नाना ... नाना सरपंच का ?"
तो " बरोबर .. एकदम बरोबर वळखलीत "
महादू " हिकडं काय काम काढलंत सकळ सकाळी "
तो " ते तुमच्याकडेच .. नाना बोलले .. महादू शेट बघा कसे मस्त राहतात . पुढचा सरपंच महादू ला च बनवतो "
महादूची कॉलर ताठ झाली
तो " महादू .. जरा तुमच्या हाताखाली ठेवा कि वाईच मला .. म्हणजे मर्दा सारखं वागायला शिकवा कि .. मग निदान तुमच्या नंतर नाना मला सरपंच बनवतील "
महादू " चाललं कि ... म्या सांगल ती सगळी कामं करावी लागतील .. चाललं काय ? "
तो " व्हय जी .. करतो कि .. त्यात काय ?"
महादू " मनात " देवाने अजून एक नोकरच पाठवला मला म्हणायचा .. तिकडे ती बाई आयतं जेवण करून खायला घालते आता हा आला .. आता ह्याला नोकरच बनवतो .. "
तो "कसला विचार करताय महादू राव "
महादू " काय काय येतं तुला ?"
तो " सगळं काम येत .. कुक आहे मी .. सगळे पास्ता , पिझ्झा . असले खाणे बनवता येत मला "
महादू मनातच " आयला !! मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळा ... हिकडं हि बाई भाकर बनवून देते .. आता हा पिझ्झा बनवून देईल .. महादू .. तू तो राजा मी बन गया "
तो " मला ठेवून घेताय नवं "
महादू " हो हो .. पण पैसे नाही देऊ शकणार मी .. फुकटात काम करावं लागेल "
तो " फक्त कसे रहायचं मर्दा सारखं ते शिकवा .. बाकी काय बी नको मला "
ह्या दोघांचे बोलणे चालू होते तर रिया जी झोपली होती ती उठून खांबा आडून बाहेर बघू लागली .. कोण लोक बोलतायत ते ..
तेवढयात मीरा नुकतीचं अंघोळ करून आली .. समोरच्या दोरी वर तिची साडी वाळत घालू लागली .. कपडे वाळत घालताना तिने कपडे झटकले .. आणि कपड्यांमधले पाणी उडाले आणि तिच्या केसात दव बिंदू सारखे चमकू लागले .. जुनी पुराणी कॉटनची साडी .. नेसली होती .. पदर कमरेला खोचला होता .. केसांचा अंबाडा बांधला होता .. म्हणून तिचा कमनीय बांधा मागून दिसत होता .. आणि तो संज्या भान हरपून तिच्याकडे बघू लागला
महादू " ओ !! पावन !! हिकडं तिकडं बघायचं काम नाही .. "
संजयची तंद्री भंगली
संज्या " कोण आहे ती .. "
महादू " तुला काय करायचं बे .. "
तेवढयात रिया तोकड्या फ्रॉक मध्ये धावत गेली आणि मीराला चिकटली ..
मीरा " अरे .. उठलं माझे शोनु.. " म्हणतच तिने रियाला उचलून घेतली " आणि लगेच ताप आहे का ते बघू लागली
मीरा " चल तोंड धुवून घे .. मी मऊ मऊ भात केलाय तो तुला भरवते "
बोलतच त्या दोघी गोठ्यात गेल्या
संज्या एकटक दोघींनाच बघत होता हे महादूच्या नजरेतून सुटले नाही
महादूने संजयची कॉलर पकडली " साहेबाना कळलं ना तर जीवानिशी जाशील .. तिकडं वाकड्या नजरेनं बघायचं पण नाही .. आधीच सांगून ठेवतो .. "
संजय " पण कोण आहे ती .. इतकी सुंदर बाई मी बघितली नाही कधीच "
महादू " विधवा आहे ती .. "
संजय " काय पण काय .. मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं .. आणि कपाळावर एवढं मोठं कुंकू आहे त्याचं काय ?"
महादू " तुला काय करायचंय रे नको त्या चौकश्या .. हे बघ आधीच सांगतोय .. इथं नीट राहायचं .. नाही तर जा बाबा तू तुझ्या वाटेला "
संजय " अहो ... महादू राव तुम्ही तर रागावले .. मला काय करायचंय .. कोण आहे ती .. मला आपलं मर्दा सारखं वागायला शिकवा .. माझे म्हणजे असे झालंय .. बॉडी तेवढी कमावली पण वागायला येत नाही "
महादू मनात " येडं .. बेणं कुठून आलंय काय माहित "

🎭 Series Post

View all