मोह मोह के धागे भाग 17

Story Of Love


मोह मोह के धागे भाग १७
क्रमश : भाग १६
अजय मस्त तयार होऊन खाली येत होता .. भाऊ साहेब सोफ्यावर बसून त्याला पहात होते .. मन भरून आले त्याला असे रुबाबात खाली जिना उतरताना पाहताना .. पुत्र असावा तर असा .. असे काहीसे मनात आले ..
अजयने खाली वाकून भाऊ साहेबांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला ..
भाऊसाहेब " यशस्वी भव ! " असा मन पासून आशीर्वाद देतात
भाऊसाहेब " राधिकाला तुम्ही नक्की काय सांगितले ती अशी अचानक का निघून गेली "
अजय " गेली का ती .. मला काहीच बोलली नाही "
भाऊसाहेब हसतच " चांगली खेळी खेळताय .. आम्हांला काही कळत नाही असे समजू नका .. "
अजय " भाऊसाहेब , मी आज दुपारी इटलीला जात आहोत .. अर्जंट काम आहे "
भाऊसाहेब " तुमच्या लग्नाचा विषय .. "
अजय " आमचं लग्न झालंय .. आम्ही मागच्या वेळेसच तुम्हांला सेंटिफिकेट दाखवले होते ना "
भाऊसाहेब " त्या तसल्या कागदाला आम्ही लग्न मानत नाही .. खुद्द त्या बाईला सुद्धा माहित नाही .. काही कुळाचार नावाची काही चीज असते हे तुम्हांला चांगलेच माहित आहे ना ?"
अजय " सध्या माझी पत्नी माहेरी गेलीय .. ती आल्यावर जे काही कुळाचार असतील बाकी ते करून घेऊ .."
भाऊसाहेब " इतके हट्टी तुम्ही लहानपणी पण नव्हतात "
अजय " भाऊसाहेब , नक्की काय प्रॉब्लेम आहे .. तुम्ही या गोष्टी साठी इतका विरोध का करताय हेच कळत नाहीये मला
भाऊसाहेब " इतका राजबिंडा , रुबाबदार , हुशार , सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला पुत्र मी एका विधवेच्या आहारी जाताना नाही पाहू शकत "
अजय " भाऊसाहेब , तुम्ही आमच्या पत्नी बद्दल बोलताय हे लक्षात असू द्या "
भाऊसाहेब " आता हे शेवटचं !! तुमच्या ह्या घरात पुन्हा पाय ठेवणार नाही आम्ही .. जा करा खुशाल .. काय करायचंय ते ,, बापाचे नाव धुळीत मिसळावा .. "
तेवढ्यात नीरज आला
नीरज " उफ्फ !! अजय .. काय करतोय ,, तू त्या मीरा साठी चक्क तुझ्या वडिलांशी वाद घालतोय "
अजय रागानेच " इट्स नॉट ओन्ली मीरा .. शी इज मीरा मिसेस अजय सरपोतदार .. "
भाऊसाहेबांच्या कपाळावर आठ्यांचं उमटल्या ..अजय ताडताड ऑफिस ला निघून गेला
नीरज पण त्याच्या मागे गेला
अजय ची आई " अहो , तुम्ही तरी समजून घ्या ना त्याला .. तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढा तो अजून हट्टाला पेटेल .."
भाऊसाहेब " तुम्ही जरा गप्प बसा हो .. हघर सोडून गेली तरी अजून त्याच्या डोक्यातून जात नाहीये "
अजयची आई " अंबे मातेच्या इच्छे पुढे तुमचे काही चालणार नाही .. एरवी तुम्ही स्वतः नेहमी अजयला माझे वडीलच पुन्हा आलेत असे म्हणायचे .. तुमच्या वडिलांनी त्या काळी तुमच्या आईशी म्हणजे एका विधवेशी लग्न करून तिच्या जन्माचा उद्धार केला होता .. हे सांगताना नेहमी तुम्ही किती अभिमानाने बोलायचात .. हि गोष्ट त्याने तुमच्या तोंडूनच ऐकली आहे .. त्यामुळे त्याला हे काही वेगळे वाटत नाहीये .. शिवाय परदेशांत शिक्षण .. त्यामुळे पहिली बायको .. नि दुसरी बायको असलं काही मानतच नाही तो .. त्याचे खरं प्रेम आहे तिच्यावर "
भाऊसाहेब "तुमचा त्याला सपोर्ट आहे हे त्याला माहित आहे म्हणूनच तो आमचं ऐकत नाही
आई " असे नाहीये अहो , मीरा पेक्षा मला त्याचा आनंद जास्त महत्वाचा वाटतो.. तो दुसऱ्या कोणाशी लग्न करून सुखी नाही राहू शकणार .. आज जाता जाता राधा पण मला म्हणाली त्याच्या प्रेमाला कमी समजू नका . तो आयुष्यभर बिन लग्नचा राहील पण मीरा सोडून कोणाला जवळही येऊ देणार नाही .."
भाऊसाहेब " राधिका मध्ये काय वाईट होते .. आपल्या घराण्याला शोभेल अशीच आहे "
आई " नुसती शोभून काय उपयोग .. त्याला आवडली पाहिजे ना पण ती "
भाऊ साहेब " आम्ही त्या मुलीला पुन्हा अजयच्या आयुष्यात येऊ देणार नाही .. एका मुलीची आई आमची सून आम्हांला कदापि मान्य होणार नाही " असे म्हणत भाऊ साहेब त्याच्या रूम मध्ये गेले "
-----------------
अजय ऑफिस मध्ये गेल्या गेल्या वकिल ऑफिस मध्ये आला होता .. अर्ध्या एक तासानंतर अजयने नीरजला केबिन मध्ये बोलावून घेतले
नीरज " बोला अजय साहेब "
अजय " हे पेपर घे "
नीरज " कसले आहेत ?"
अजय " बस इथे आणि वाच "
नीरज चेअर वर बसला .. आणि पेपर वाचू लागला .. पुन्हा डोळे बटाट्या एवढे मोठे केले त्याने
नीरज " काय आहे अजय हे ? काय डोक्यावर पडलाय का तू ?"
अजय " मी आताच्या दुपारच्या फ्लाईटने इटलीला जातोय .. आपले करोडोचे डील मी सोडून आलो ते सुरु करतो .. मला आता इथे रहायची इच्छाच नाहीये .. घरी गेलो कि रिया आणि मीराच्या आठवणीने जीव कावरा बावरा होतो .. त्यापेक्षा मी काही महिने तिकडेच राहीन असे म्हणतोय .. इथला सगळा बिझनेस तू सांभाळ .. हि पॉवर ऑफ ऍटर्नी मी तुझ्या नावावर केलीय "
नीरज " नको रे असेल काही ? उगाच .. तुझ्या इतकी समज नाही मला बिझनेस मधली .. उगाच फायद्यातला बिझनेस नुकसानीत जायचा "
अजय " जमेल रे तुला सगळे .. आणि एक नीरज .. आई आणि भाऊ साहेबांकडे लक्ष ठेव .. भाऊसाहेब सध्या नाराज आहेत माझ्यावर .. "
नीरज " मी काय म्हणतो .. तू त्या राधा शी लग्न करून टाक ना आता .. कशाला ताणतोय तू विषय "
अजय " ठीक आहे .. मी करेन पण त्या आधी मला एकदा मीराला भेटायचंय .. ती नक्की अशी मला न सांगता का निघून गेली त्याचा जाब विचारायचाय मला ..तोंडाने बोललो नसलो तरी माझ्या कृतीतून मी कितीदा दाखवून दिलंय कि माझे जग आहेत त्या दोघी मग असे वागताना तिने जरा तरी माझा विचार करायचा होता "
अजयच्या डोळ्यांतून पटकन एक अश्रू ओघळला त्याचं त्याला कळलं नाही .. नीरज एकदम भयानक चिडला .. एक मित्र म्हंणून अजयसाठी खूप वाईट वाटू लागले त्याला
नीरज " यार अजय , तू चक्क रडतोय .. काय करू मी .. मी नाही तुला असा बघू शकत "
अजय " तू काहीही करू शकत नाहीस . आणि आता मी एक ठरवलं आहे .. मी या सगळ्यातून बाहेर येऊन आता इटलीला सेट होईन "
नीरज मनात " अतिशय चांगला विचार करत आहे हा .. आता तिकडचीच एक गोरी मुलगी मला वाहिनी म्हणून आण .. तिलाच फॉरेनची पाटलीन बनवून टाकू "
नीरज मनातल्या मनात बोलत होता तर अजय बाहेर निघूनही गेला .. डायरेक्ट एअरपोर्ट ला कार मधून निघाला ..
कार मध्ये गाणे लागले होते
शायद कभी ना कह सकूँ मैं तुमको

कहे बिना समझ लो तुम शायद
शायद मेरे ख्याल में तुम इक दिन
मिलो मुझे कहीं पे गुम शायद

जो तुम ना हो, रहेंगे हम नहीं
जो तुम ना हो, रहेंगे हम नहीं
ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा, तुमसे कम नहीं

जो तुम ना हो तो हम भी हम नहीं
जो तुम ना हो तो हम भी हम नहीं
ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा, तुमसे कम नहीं

आँखों को ख्वाब देना
खुद ही सवाल करके
खुद ही जवाब देना तेरी तरफ से

बिन काम, काम करना
जाना कहीं हो चाहें
हर बार ही गुजरना तेरी तरफ से

ये कोशिशें तो होंगी कम नहीं
ये कोशिशें तो होंगी कम नहीं
ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा, तुमसे कम नहीं

जो तुम ना हो रहेंगे हम नहीं
जो तुम ना हो तो हम भी हम नहीं
ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा, तुमसे कम नहीं

जो तुम ना हो...

मन रडत होते आणि गालावर अश्रू ओघळत होते .. मीराचा? का रियाचा ? का दोघींचा ? नक्की कोणाचा विरह त्याला सहन होत नव्हता .. पण त्याने घेतलेला हा निर्णय साफ चुकला होता ... प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा प्रॉब्लेम पासून लांब पळत होता .. पण त्या दोघी मोठ्या संकटात होत्या आणि त्यांना वाचवणारा फक्त तो एकटाच होता आता तो हि हा देश सोडून निघाला होता ..
काचेतून बाहेर बघत असताना गाडी सिग्नल उभी राहिली .. त्याला एका माणसाच्या खांद्यावर रिया एकदम मलूल पडून झोपली आहे .. आणि तिच्या अंगावर मीराचा स्कार्फ होता .... आणि मीरा कदाचित मागून चालणारी ती स्त्री मीराचं असेल .. कारण तिचा चेहरा दिसत नव्हता ...

एका क्षणात डोळ्यांसमोरून ते तिघे कुठेतरी गायब झाले
धकधक ... धकधक .. हृदयाने त्याच्या अस्तित्वाची पावती दिली.. घसा कोरडा पडला त्याचा .. मन सांगू लागले होय ती रियाचं आहे ..
अजयने टाय लूज केली .. रुमालाने चेहऱ्याला अचानक फुटलेला घाम पुसला .. बॉटल मधले पाणी प्यायले ..
अजय " ड्राइवर टेक मी टू द निअरेस्ट हॉस्पिटल .. आय .. एम नॉट फिलिंग वेल .. "
ड्राइवर ने गाडी लगेच जवळच्या दवाखान्यात घेतली .. अजयला अचानक चक्कर आल्या सारखे वाटू लागले .. आणि दवाखान्याच्या दारातच चक्कर येऊन पडला तो .. अचानक मीरा आणि रियाचा भास झाला .. आणि त्याने त्याचे बीपी वाढले .. मन सांगू लागले .. काहीतरी आहे जे ठीक नाहीये ..
ड्राइवर ने त्याला धरून ऍडमिट केले .. लगेच ट्रीटमेंट केली एक इंजेक्शन दिले तसा तो शुद्धीवर आला .. पण डॉक्टर नि त्याला सोडले नाही .. त्याचा चेक अप करू लागले .. हि टेस्ट करून बघू .. ती टेस्ट करून बघू .. असे चालू होते .. आफ्टर ऑल हि वॉज ग्रेट फेमस पर्सन.
अजय " आय एम ओके नाऊ .. लेट मी गो .. माझी फ्लाईट मिस होईल असे म्हणत होता तितक्यात शेजारून एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला .. तिला डॉक्टर हाताला सलाईन लावत होते म्हणून खूप घाबरून जोर जोरात रडत होती
अजय एकदम बेचैन झाला त्या मुलीचा आवाज ऐकून
अजय त्या आवाजाच्या मागे गेला .. आणि वाकून त्या केबिन मध्ये बघू लागला .. तर समोर एक लहान मुलगी रिया एवढीच होती ती तिच्या बाबांच्या डोळ्यांत बघून रडत जणू सांगत होती .. कि बाबा .. ह्याला सांगा ना मला हा सुई टोचतोय .. रिया इतक्याच त्या लहान जीवाला रडताना बघून अजय पटकन आत गेला आणि त्याने त्या मुलीला उचलून घेतले .. " डोन्ट क्राय बेबी .. आपण नाही टोचणार तुला सुई .. ठीक आहे .. " असे बोलला ..
त्याच्या कोटाच्या पॉकेट मध्ये एक तरी चॉकलेट असते ते तिला खायला दिले .. तशी ती रडायची थांबली .. आणि मुसमुसत चॉकलेट खाऊ लागली आणि बोलली " थँक यु अंकल "
चॉकलेट खाल्ल्यावर ती लगेच तिच्या बाबांकडे गेली .. मग बाबांनी तिला झोपवली .. आणि मग डॉक्टरने हळूच सुई टोचली ..आणि सलाईन लावली ..
अजय तिथून बाहेर पडला खरा .. पण आता रियाच्या आठवणीने तो बेचैन झाला होता .. हॉस्पिटल च्या बाहेर आला तर पुन्हा ते तिघे त्याला चालत रस्त्याच्या पलीकडे दिसले .. कसलाही विचार न करता अजय त्यांचा पाठलाग करू लागला .. पण ते कुठे गायब झाले ते पुन्हा त्याला नाही कळले .. शेवटी निराश होऊन तो इटलीला गेला ..
-----------------------------------
इकडे रिया ला आता पेंढ्याची ऍलर्जी आली होती .. ऍलर्जीने सगळ्या अंगाला खाज सुटत होती .. रॅशेस आले होते .. त्यामुळे रसरसून ताप भरून यायचा त्यात अजयचा टुकळा घेतला होता तिने .. एकदम परी सारखी राहणारी रिया एकदमच खालच्या दर्जाचे जीवन जगात होती .. त्यात अन्नही हि प्रॉपर मिळत नव्हते .. मीराने लिटरली हातापाया पडून तिला दवाखान्यात न्यायला सांगितले .. तेव्हाच नेमके अजय ने त्यांना दोघींना पुसटसे पाहिले होते .. पण तो त्यांना गाठू शकला नव्हता ..

🎭 Series Post

View all